मुका घ्या मुका -चित्रपटाचे जे काही झाले ते

Submitted by अस्मिता. on 5 August, 2024 - 17:09

इन्फिनिटीवर उतारा म्हणून मी दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांचा 'मुका घ्या मुका' बघितला. सध्या झी क्लासिक वर 'दादा कोंडके मॅरेथॉन' चालू आहे. त्यात त्यांच्या चावट सिनेमांची जंत्री याप्रमाणे - आंधळा मारतो डोळा, मुका घ्या मुका, पांडू हवालदार, सोंगाड्या.

लहानपणी बघू दिले नाही म्हणून उट्टे काढायला गेले तर स्वतःचेच निघाले. आयुष्यात कुठलेही मॅरेथॉन न करता हे तरी करायला हवे अशी मनाने उचल खाल्ली पण तीही पूर्ण झाली नाही. पुढच्या वेळी, अजून काही म्हातारी थोडीच झाले आहे.

पहिला अर्धा बघितला नाही. मुका हा आपल्याला वाटतो तो मुका नसून मुकुंद नावाचा भाबडा- बोलता न येणारा गावातील सगळ्यात महामूर्ख मनुष्य आहे. तरीही याच्या आईचा आग्रह की याला 'भोळा' समजा. पुत्राचे सहस्र अपराध, माता काय माने तयाचा खेद. आईचे एकवेळ समजून घेऊ. ती काही चार्जर हरवले म्हणून वनवासाला पाठवणाऱ्या हल्लीच्या कैदाशिणी आयांच्या गटात मोडत नाही. पण गावातील सगळ्यात श्रीमंत आणि सेक्सी मुलीचे पण हेच मत आहे. नक्की महामूर्ख कोण आहे???

श्रीमंत आणि सेक्सी मुलगी गावच्या पाटील टाईप माणसाची कन्यका असून घरी सुसज्ज बाथरूम असतानाही कधीमधी नदीवर आंघोळीला जाते.स्वच्छता फार प्रिय आहे हिला.

हा भोळसट तेथे येऊन तुषार कपूर आणि शक्ती कपूर दोघांचाही आजा असल्याप्रमाणे 'आ ऊ आ ऊ' करत तिला घरच्या बाथरूममध्ये(sexy lady on the (bathroom) floor) पिंपात बसून आणि नदीवर खडकाजवळ दोन्हीकडे अंघोळ करताना बघतो. विश्वास ठेवा, काहीही सुंदर नाही यात. दोन चार 'आ ऊ' बाथरूमबाहेरही होतात, त्यात तिला हा भोळा आहे आणि आता आपल्यालाच याच्यावर प्रेम करणे भाग आहे असे वाटते. बाबा म्हणतात, ' दुसरे कोणी सापडले नाही का, हा मूर्ख आहे आहे'.... duh. प्रेमात पडलेली स्त्री जगातील सगळ्यात महामूर्ख स्त्री असू शकते.

सगळं गाव याला 'मुका' म्हणत असते, घेत मात्र कोणी नाही. चुकीचा संदेश दिला आहे. एकेदिवशी रेड्यासहित फोटो असलेल्या यमाची पूजा करून याला वाचा फुटते आणि हा इतकं द्वयर्थी बोलायला लागतो की आई हात-पाय-तोंड बांधून मारते. सगळं गाव आधीपासूनच मारत असते, त्यांना फारसा फरक पडत नाही. हा सुधारावा म्हणून कसलेतरी हवन करतात. त्याची पूर्वतयारी चालू असताना हा पंथाला लागल्यासारखे करतो व 'ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ' याचे संगीत वाजते. हे चालू असताना खाली सतत झी वरील दुसऱ्याच कशाची तरी जाहिरात म्हणून मोठे स्क्रीन व्यापी गजानन महाराज येऊ लागले. योग आणि भोग बघून टडोपाच.

मुक्याला नटीचे बाबा म्हणतात 'एक लाख आणून दे, तरच लग्न लावून देईन. पोरगी अशीही ऐकेना, जीव देण्याची धमकी देऊ लागली. 'फणसाच्या झाडा खाली भेटू' वगैरे म्हणून अंगविक्षेप सुरू झाले. उगाच नाही थोर म्हणून गेले आहेत 'खेड्याकडे चला'. या शेतीवाडी- झाडांमुळे मिळणाऱ्या स्वातंत्र्यापुढे अमेरिकन हुक-अप्स सुद्धा मागासलेले वाटावेत. आता 'मोळी विका पण शाळा शिका' चा अर्थ शोधणे आले. जीवनातले संशोधन काही संपत नाही.

ह्या दोन सहस्रमूर्खांपुढे सासरेबुवा-व्हिलनचेही अवसान गळते. मुक्या डायरेक्ट ट्रेन पकडून मुंबईला निघाला. स्टेशनवरही 'हॉट टमाले'ने मिठ्या मारल्या. 'सांभाळून जा' या दोन शब्दांसाठी सुद्धा बराच चावटपणा केला.

एकदाचा रेल्वेत बसला, त्याच डब्यात सुळसुळीत रोब घातलेले श्रीमंत गृहस्थही बसले होते. वरिजनल श्रीमंत न वाटता गणेश मंडळातील नाटकातले श्रीमंत वाटत होते. त्यांच्याशी विनाकारण भांडणं उकरून काढली आणि पुन्हा कमरेची साखळी व रेल्वेतील ओढायची साखळी यावर द्वयर्थी संवाद व मारामारी केली.

नंतर खाली सतरंजी टाकून त्यावर भाकरी भाजी व कांदा यांची पिकनिक केली. हे बघून मला एकदम खावेच वाटले. Happy रात्री निरवानिरव झाल्यावर दोघे- हा खाली आणि रोबवाला आपापल्या बर्थवर- पडलेले असताना चोर येऊन अर्थातच रोब वाल्यावर सुरीने हल्ला करतो. कशाला घालावा रोब? तेव्हा मुका मधे पडून त्याचा जीव वाचवतो. मग म्हातारे इतके खुष होते की त्याला घरी नेऊन स्वतः लाख रुपये देऊ करते. त्याला लक्षात येतो की वरून कितीही महामूर्ख, मंद, आचरट, उथळ, बावळट, लंपट , उद्धट (अजून किती दुर्गुणं लिहू?) वाटला तरी मनाने साधाभोळा आहे. जवळजवळ नाड्याची चड्डी घातलेला कुणी साधुसंतच..! तो श्रीमंत याने दिलेले वीस रू एकदम डोळ्याला लाऊन प्रसादासारखे ठेवून घेतो.

हा महामूर्ख लग्नाची स्वप्नं बघत परतीच्या प्रवासाला लागतो.
एकुणएक गाण्यात एवढा आचरटपणा आहे की गाणे थोडे लांबले असते तर दोन-चार लेकरेही झाली असती.

रेल्वेच्या डब्यात भरपूर गर्दी असते व एक भारीचे केशरी टर्टलनेक स्वेटर घातलेली संशयास्पद व्यक्ती सोडून बाकी धोतरटोपीवाली गरीब-जनताच असते. संशयास्पद व्यक्ती संशयास्पद असल्याने भुरटा चोर असते. इकडे या वेड्याने 'गाय छाप बिडी' लिहिलेल्या पोत्याच्या पिशवीत लाख रुपये ठेवलेले असते. चोर त्याकडे बघतच असतो. हा मंद त्याला म्हणतो 'नाहीतरी तुम्ही उचल्यासारखे हिकडं तिकडं बघत आहातच, तर मी झोपेन तुम्ही या पिशवीकडे लक्ष ठेवा, यात एsssक लाsssssख रूपये आहेत.' झोपेत भक्कम नटीसोबत अजून एक आचरट गाणे होते. तोपर्यंत चोर सगळं लंपास करतो.

हा परत येतो व स्टेशनवर याच्यावर कुणीही विश्वास न ठेवल्याने बेदम मार खातो. वर्षानुवर्षे असलेल्या प्रतिमेपायी मार खाण्याची ही काही पहिलीच वेळ नसते. आपल्याला काहीच आश्चर्य वाटत नाही. कुणीतरी पोलिस बोलावून आणते, पोलिस चोर शोधून आणतात. तोपर्यंत हिरोईन सगळ्यांच्या हातापाया पडते. 'सोडा हो माझ्या भोळ्या सांबाला' टाईप. पुन्हा अचानक ते नकली श्रीमंत सद्गृहस्थ येऊन नोटांची ओळख सांगतात व हिला कळवळून 'आज पासून मला आबा म्हण, पोsssssरी' म्हणतात व डोक्यावरून हात फिरवतात.
शेवटी मुका मंदिरात जात असताना गाभाऱ्यातील घंटा लागून डोक्यावर परिणाम होऊन (इतका वेळ काय होतं मग ?) पुन्हा वाचा गमावतो.

मी अर्धवट/तुकड्यातुकड्यात बघितला आहे, सुरवातीचा बघावा म्हटलं तर तो भलताच चावट होता, बघूच शकले नाही. चावट असण्यापेक्षा जास्त भीती मी 'जसा आहे तसा' लिहिण्याची होती. Lol

मराठी चिकवावर लिहायला सुरुवात केली पण पोस्ट लांबली.
-अस्मिता

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वच्छता फार प्रिय आहे हिला.
योग आणि भोग
खेड्याकडे चला
>>> Lol
मस्त लिहिलंयस ग. काय उतारा शोधलाय पण! Proud

सुळसुळीत रोब घातलेले श्रीमंत गृहस्थ >>> ट्रेनमधे?

>> चावट असण्यापेक्षा जास्त भीती मी 'जसा आहे तसा' लिहिण्याची होती >> Rofl
मला पण करायची आहे मॅरेथॉन. लहानपणी बघायला मिळाले नाहीत. आता फक्त गरीब वाटायला नको म्हणजे झालं.

लहानपणी बघू दिले नाही म्हणून उट्टे काढायला गेले तर स्वतःचेच निघाले. >>> Lol इथेच फुटलो. बाकी वाचत वाचत लिहीतो.

चावट असण्यापेक्षा जास्त भीती मी 'जसा आहे तसा' लिहिण्याची होती >>> Lol

Lol जुन्या हिंदी पिक्चरांत श्रीमंत लोकं ते तसले रोब घालून वळणदार जिने उतरतायत, पाईप ओढतायत वगैरे पाहण्याची इतकी सवय आहे की रोब घालून ट्रेनमधे हे काही पचनी पडत नाहीये.

जुन्या हिंदी पिक्चरांत श्रीमंत लोकं ते तसले रोब घालून वळणदार जिने उतरतायत, पाईप ओढतायत वगैरे पाहण्याची इतकी सवय आहे की रोब घालून ट्रेनमधे हे काही पचनी पडत नाहीये. >>> Happy हो. सकाळी हा रोब घालून ब्रेफा टेबल वर पावाला सुरीने लोणी लावत बसलेला रायबहादूर वगैरे Happy

पाहिली क्लिप Happy

सकाळी हा रोब घालून ब्रेफा टेबल वर पावाला सुरीने लोणी लावत बसलेला रायबहादूर वगैरे >>> अगदी अगदी. टेबलावर टी कोझी वाला चहा नसेल तर ऑरेंज ज्यूस नक्की. Proud

ट्रेनमधले दृष्य बघा >>> आईग्गं! Lol नको ग नको! कसा पाहिलास हा पिक्चर?

Lol
भारी लिहीलेय. Happy
स्वच्छतेची आवड Lol
हा विसरलोच होतो. हे सिनेमे बहुतेक प्रौढांसाठी असत म्हणून पाहिलेले नव्हते.

स्वच्छता फार प्रिय आहे हिला. >>>
हॉट टमाले >>> Lol

हा महामूर्ख लग्नाची स्वप्नं बघत परतीच्या प्रवासाला लागतो.
एकुणएक गाण्यात एवढा आचरटपणा आहे की गाणे थोडे लांबले असते तर दोन-चार लेकरेही झाली असती. >>> Rofl हे सर्वात खतरनाक आहे.

ती क्लिप पाहिली. कसले पपलू (या शब्दाचे क्रेडिट र्म्द ला) सीन्स आहेत! ज्या क्वालिटीची फिल्म आहे त्या क्वालिटीच्या जवळपासही जाणारा एकही सीन नाही. तळाला भोक पडलेल्या बादलीच्या सीनला आपण हसणे अपेक्षित आहे का? किंवा काही दादा-लेव्हल द्व्यर्थी आहे का त्यात? नदीवरच्या त्या "चॅलेंज स्वीकारणार्‍या" स्त्रीला बॉलीवूडचा नियम माहीत आहे - "जे आपल्याला फ्रेममधे कॅमेर्‍यातून दिसते तेव्हढेच त्या सीनमधील सर्व उपस्थितांना दिसते". अरे तू खडकापलीकडे गेलीस तर आम्हाला दिसणार नाहीस. पण तिकडे पलीकडेही लोक नसतील का?

ती रेल्वेही पपलू आहे. एखाद्याच्या चेहर्‍यावरची माशी उडत नाही म्हणतात तशी त्या गाडीच्या खिडकीतली दृश्येही हलत नाहीत बराच काळ, गाडी चालू असूनसुद्धा. मग फक्त थोडा धूर इकडून तिकडे जातो. रेल्वेच्या शेवटच्या डब्याच्या खिडकीच्या लेव्हलला धूर दिसतो म्हणजे काय वजनदार धूर सोडत असेल ते इंजिन!

नंतर खाली सतरंजी टाकून त्यावर भाकरी भाजी व कांदा यांची पिकनिक केली. >>> इथे "खाण्याकडे xxx करून झोपतोय..." ला मात्र मी जेन्युइन हसलो Happy

Lol
धमाल लिहिलंय.
हा चित्रपट मी थेटरात बघायला गेलो होतो, पाहू नाही शकलो, उठून आलो मध्येच.

भारी लिहिले आहे Lol
मी सुद्धा बहुधा पाहिला आहे हा पिक्चर.. आणि लहानपणी बघू दिले नाही याचं नादात पाहिला आहे Lol

फा Lol

एकुणएक गाण्यात एवढा आचरटपणा आहे की गाणे थोडे लांबले असते तर दोन-चार लेकरेही झाली असती. >>> हे मिसले होते मगाशी. भारी कमेंट आहे Lol

क्लिप पाहिली.
ट्रेनच्या प्रसंगापेक्षा आधीच्या प्रसंगात मुक्याचे रॅगिंग पाहून आपण मुके झालो नाहीत हे किती बरे झाले हे प्रत्येक सभ्य पुरूषाला वाटून गेले असणार (मी नाही त्यातला. जळफळाट झालेल्या पैकी एक आहे).

अर्र किती घोर निराशा व्यापली असेल अस्मिते तुला की ह्या चित्रपटाची पिसं तू काढलीस Lol
एकुणएक गाण्यात एवढा आचरटपणा आहे की गाणे थोडे लांबले असते तर दोन-चार लेकरेही झाली असती>>> ह्याला खूप हसले.
असे चित्रपटच काय पण गाणी ही आई बाबा लहानपणी बघू देत नसत, त्यांचे आज कौतुक वाटले..नाहितर आपल्या जनरेशन ने अजून पांचट पणाची किती लेव्हल्स पार केली असती Lol

अस्मिता... प्लीज हे असले दादा कोंडकेंचे सिनेमे नको पाहत जाऊस गं!

तुझ्या टॅलंट ला भावतील असे अजून खूप चित्रपट आहेत.
या गटारात पाय नको घालूस!

अरेच्चा!
माझ्या पीएचडीचा विषयच आहे तो.
"दादा कोंडके यांच्या मुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात घडून आलेले मूलगामी बदल, मूल्यवर्धन आणि आर्थिक क्रांती"

स्वच्छता फार प्रिय आहे हिला.
या शेतीवाडी- झाडांमुळे मिळणाऱ्या स्वातंत्र्यापुढे अमेरिकन हुक-अप्स सुद्धा मागासलेले वाटावेत. आता 'मोळी विका पण शाळा शिका' चा अर्थ शोधणे आले. जीवनातले संशोधन काही संपत नाही.
हॉट टमाले
सुळसुळीत रोब घातलेले श्रीमंत गृहस्थ
>>>>> Biggrin Biggrin

फार वर्षांपूर्वी दूरदर्शनवर पांडू हवालदार पाहिला होता असे आठवते. बाबांसोबत पाहिला होता त्यामुळे त्यात फारसे काही नसावे/मला कळले नसावे/ बाबांनाच कळत नसावे/दूरदर्शनवर असल्याने सॅनिटाइझ्ड असेल. त्यात अशोक सराफ होते एवढेच आठवतेय. या पिक्चरमुळे पोलिस हवालदारांना मामा म्हणायचा रिवाज सुरु झाला असे ऐकिवात आहे. @खंबा तुमच्या पीएचडीसाठी हा पॉईंट घेऊ शकता.

अगदीच torturous चित्रपट वाटतो आहे. लेखातले पंचेसही फार हताश वाटले.
दादांच्या कारकीर्दीच्या उत्तरार्धातला आहे आणि ते कळतं आहे.
सोंगाड्या, एकटा जीव सदाशिव पाहिले होते. आता फार डिटेल्स आठवत नाही. पांडु हवालदार ही सुरुवातीचा.
ते या मुक्यापेक्षा बरेच चांगले असावेत.
एकटा जीव सदाशिव वरून गोविंदाचा जिस देश मे गंगा रहता है आला.
अंधेरी रात में दिया तेरी हात में ही घसरणीतली पुढची पायरी असावी.

{चावट असण्यापेक्षा जास्त भीती मी 'जसा आहे तसा' लिहिण्याची होती}
Lol डु आय काढून लिहा असं सुचवणार होतो. पण आता तो पर्याय नाही.

हो, छल्ला. पुन्हा नाही. वैचारिक लेखनच आवडते. हा उथळ टाईमपास आहे, निखळ करमणूक सुद्धा नाही. Happy

आता माबोचे स्टिम्युलेशन जरा कमी करून Morning walks, Jazz music, Anushka Shankar's sitar, sitting by the river, deep and meaningful conversation, books.... solitude वगैरे वाढवणार आहे. मलाही समाधान नाही मिळाले याने. गप बसून चांगले लिहेन. Happy

भरत, तुम्ही लिहिलेली एकही गोष्ट मला माहीत नव्हती. कामं करतकरत तासभर बघितला, लोळतलोळत टाईप केले. Lol
डु आय शक्य नाही, आहे तोच आयडी 'खूप' होतो. Happy

पिक्चरमुळे पोलिस हवालदारांना मामा म्हणायचा रिवाज सुरु झाला असे ऐकिवात आहे. >>> Lol

दादा कोंडके यांच्या मुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात घडून आलेले मूलगामी बदल, मूल्यवर्धन आणि आर्थिक क्रांती">>>
जळफळाट झालेल्या पैकी एक आहे>>>> Lol

आपल्या जनरेशन ने अजून पांचट पणाची किती लेव्हल्स पार केली असती>>> Lol

तू मिसले नाही रमड, मीच मुशो करताना घातलेली भर आहे. Happy

एखाद्याच्या चेहर्‍यावरची माशी उडत नाही म्हणतात तशी त्या गाडीच्या खिडकीतली दृश्येही हलत नाहीत बराच काळ, गाडी चालू असूनसुद्धा.>>>> Lol

ऋ, तू पण Lol

धन्यवाद सर्वांना. Happy

तेच तर. तुझी गडबड मग माझी गडबड, जसे काही दुसरे कामच नाही आपल्याला, काय तर दादा कोंडके आणि Lol

मलाही वाटले होते की मी मिसले.

आता माबोचे स्टिम्युलेशन जरा कमी करून >>> इथून पुढचे वाचले नाही. ते इथे जनरली म्हणतात ना "you had me at...", हे त्याच्या उलटे समज Happy खुद्द पुलंच म्हणून गेले आहेत की क्रिकेट मधे बोलरला प्रत्येक बॉलला विकेट मिळाली असती तर काही ओव्हर्स मधे मॅच संपली असती. हे त्यालाही माहीत असते पण तरीही बोलिंग करायचे तो थांबत नाही Happy

लाडू पांढरे शुभ्र? मला अंडी वाटली. >>> ते लाडू होते? मलाही अंडी वाटली. मी तेव्हा म्यूटवर पाहात होतो रेल्वेची वाट बघत.

बाय द वे, फर्स्ट क्लासचा डबा सहसा शेवटचा नसतो. पण असले डिटेल्स या पिक्चरला पेलणारे नाहीत Happy ते द बर्निंग ट्रेन, जब वी मेट ई ला ठीक आहे.

खुद्द पुलंच म्हणून गेले आहेत की क्रिकेट मधे बोलरला प्रत्येक बॉलला विकेट मिळाली असती तर काही ओव्हर्स मधे मॅच संपली असती.
>>>> बरं. Happy असे तुम्ही खेळायला बोलवता मग मला वाटते मी एकटीच सुधारून काय करू? Lol
ता. क. आता फक्त फ्रेंड्सचा उल्लेख राहिला आहे. Lol

Morning walks, Jazz music, Anushka Shankar's sitar, sitting by the river, deep and meaningful conversation, books.... solitude >>
अशा क्षुल्लक, फुटकळ आणि निरूपयोगी कामात वेळ घालवला तर मायबोलीचं कसं होणार ?
ए आये ! माबोलेकरांनी कुणाच्या तोंडाकडं बघायचं ?

Pages