सावली

Submitted by विनोद इखणकर - श... on 30 July, 2024 - 00:48

शीर्षक :- सावली

कशी उन्हात सावली
जशी ममतेची माया
कधी कळेल कुणाला
अशी शीतल ही छाया

बाप बाप माझा असा
राब राबतो शेतात
त्याचं कष्टाचं जगणं
जातो भिजून घामात

माया वात्सल्याचा झरा
वाहे सुखी संसारात
लागे बापाचं काळीज
जशी नदी सागरात

अहोरात्र कष्टकरी
बाप माझा शेतकरी
त्याच्या मेहनती मुळे
मिळे सुखानं भाकरी

धरी नांगर शेतात
नसे काहीच पायात
पाय भरतं काट्यानं
तरी नांगर ओढत

उन्हातल्या सावलीला
कसा मायेचा पाझर
तसं बापाचं वागणं
घरा दारात वावर

कणा मोडला बापाचा
तरी राबतो शेतात
उभा आमच्या पाठीशी
दिसे विठ्ठल बापात

- विनोद नंदू इखणकर
(शब्दप्रेम) नाशिक
७३५०९७०२०१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार सुंदर अभिव्यक्ती!

(कविता कडव्यागणिक आशयदृष्ट्या पुढे पुढे जायला हवी, असे म्हणतात. )

सुंदर!

बेफिकीर,
माझी कविता आशयदृष्टया बरोबर आहे ना ?