Submitted by पुरंदरे शशांक on 29 July, 2024 - 13:42
पाऊस असा बैरागी
पाऊस असा बैरागी
वेशीवर येतो नकळत
रवितेज प्रखरसे अडवी
बाहूते बळकट पसरत
मेघांचे कुंतल भाळी
नेत्रातून चमके वीज
हलकेच डफावरी थाप
चहू दिशात उमटे साद
गिरिशिखरे निथळुन काढी
दरिखोरी भिजवून जात
ओढ्यातुन खळखळणारे
गुढ गभीर अनाहत गीत
झोळितून उधळे मोती
फेकीतो स्वैर झोकात
ते दान अनामिक गहिरे
साठवी धरणी उदरात
दमदार पाउले टाकी
तरुवेली झुकवुनी जात
हळुवार चाल कधि याची
मोडेना ईवली पात
थेंबातुन टपटपणार्या
हाकारे अलख निरंजन
गिरगिरणार्या गिरकी
ओंकारा घुमवि चिरंतन
जाताना हलके हलके
उघडुनी इंद्रधनु तेही
दशदिशा झळाळुन जाता
पापणीत दाटी होई....
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर....
सुंदर....
खूप सुरेख. खरच अलख निरंजनाचा
खूप सुरेख. खरच अलख निरंजनाचा नाद घुमविणारा बैरागी! निर्मोही, मोत्यांचे दान देउन रिता होणारा.
अहाहा! कविता आवडेश
अहाहा! कविता आवडेश
आवडली..
आवडली..
नखशिखांत भिजण्याचा आनंद देऊन
नखशिखांत भिजण्याचा आनंद देऊन गेली ही रचना..!
निव्वळ अप्रतिम !!! दंडवत सर !
निव्वळ अप्रतिम !!! दंडवत सर !!
सुन्दर!
सुन्दर!
छान!
छान!
सुंदर..
सुंदर..
वा !
वा !
सुंदर.
सुंदर.
सुंदर.
सुंदर.
आज इथे आल्याचे चीज झाले