चित्रपट कसा वाटला- भाग १०

Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53

चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...

चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

स्त्री २ बघितला. मला १ अजिबात आठवत न्हवता. पण दोन मधले संवाद आणि एकूणच सिनेमा जाम आवडला. ( चिकवा हल्ली वाचला न्हवता बरं झालं... इथे आवडला नाही दिसतोय) असले जोक मला प्रचंड आवडतात .. मी खुर्चीतून पडायचा बाकी होतो.
पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी, राजकुमार राव आणि अपराजित अपारशक्ती यांनी धमाल उडवली आहे. मेसेज पण चांगला दिला आहे. पूर्ण सिनेमात गाणी फार नाही आणि त्यांना सिनेमा संपल्यावर कसर भरून काढली हे पण आवडलं.

स्त्री2 पाहिला.ओके आहे.स्त्री 1 ला कसं तात्विक अधिष्ठान होतां ते सरकटा ला वाटलं नाही.पण चांगला आहे.लोक लहान मुलं पण घेऊन आले होते.सगळे हसत होते.

स्त्री -
अपराजित ऐवजी अपारशक्ती हवं. अपारशक्ती खुराणा. मला पहिला स्त्री आवडला होता. हा दुसराही बघायचा आहे. मला पहिल्या स्त्री मधले हे गाणे आवडले होते. सुरवातीला पंकज त्रिपाठी जे 'म्यूजिक' म्हणतो आणि
शेवटी पुरुषांना नाचवून ती राणी सारखी सिंहासनावर बसते. शिवाय तो वेश्येचा मुलगा असतो या माहितीचा तो सोडून कुणीही विशेष गवगवा करत नाही. एकदम कूल असतात तेही. त्रिपाठी समजूतदारपणा दाखवत 'किसी की माँ टीचर होती है किसी की डॉक्टर होती है वैसेही तुम्हारी तवायफ' म्हणतो. मजेदार केले आहे. Happy

Lion (Dev Patel, Nicole Kidman)-
बघितला आहे, छान आहे. खरी कथा आहे. शेरू-सरू नावाच्या छोट्या मुलाची जो हरवल्याने आई असूनही अनाथाश्रमात जातो आणि ऑस्ट्रेलियातली पालकांकडे दत्तक जातो. परत येऊन आईला शोधतो. छोटा सरू/ शेरू लायन होतो. कुठे कुठे इन्टेन्स आहे, जसे त्याच्या सोबत दुसऱ्या मुलाला दत्तक घेतात. तो मुलगा अनाथाश्रमात झालेल्या लैंगिक शोषणामुळे कधीही नॉर्मल आयुष्य जगू शकत नाही. त्याचा तो अविरत झगडा आणि सरूचे दचकत उठणे/ आईला शोधण्याची तगमग अंगावर आली. निकोलने केलेले आईचे कामही आवडले.

आणि अ‍ॅक्च्युअली ज्याच्या मुळे रामायण घडलं, त्याला म्हणे तुम्हे जिंदा रखना ही तुम्हारी सजा है, बाकीच्या यु टर्न वाल्यांना १० जणांना खचाखच संपवते. >>> हो ना.

लायन>>>> देव पटेलचा ना? नावाचा आणि कथेचा संबंध आहे ना… >> हो तोच.. संबंध शेवटी कळतो तसा पण कथेनुसार नाही असं म्हणायचं होतं.

स्त्री 1 ला कसं तात्विक अधिष्ठान होतां ते सरकटा ला वाटलं नाही>>> फार च बाई अपेक्षा Wink
ब्रह्मास्त्र बघ!

नको नको Lol
त्यापेक्षा भेडिया परत बघेन.

हसीन दिलरुबा बद्दल लिहिलेय का नाही आठवत नाहीये. पार्ट १- मसालेदार झणझणीत टाइप्स होता, वेगवान & कलाकार चांगले असल्याने आवडला होता, अचाट होताच अर्थात.
भाग २- ह्याचा मसाला एक्सपायरी डेट उलटून गेल्याने मजा नाही आली. इतके खून लीलया पचवतात वाह. काहीही कायच्या काय झालाय, मी तरी नेटाने पाहीला.

स्त्री 1 ला कसं तात्विक अधिष्ठान होतां
>>
कशाला पाहिजे ते??
मनोरंजनाच्या माफक अपेक्षा ठेवून पहा की

प्रत्येकाचं गोष्टीत तात्पर्य / शिकवण कशाला शोधायची???

Just so that story makes sense and is not a complete bullxxxx with few item numbers.

निव्वळ अमेरिकन प्रेक्षकांसाठी (कारण हा सिनेमा सध्या निव्वळ अमेरिकन थेटरातच बघता येतो)
अ‍ॅम आय रेसिस्ट हा सिनेमा अमेरिकेत नुकताच प्रदर्शित झाला. मॅट वॉल्श नामक कॉन्जर्वेटिव ने( आज ज्याला उजवा विचार समजला जातो) हा बनवला आहे. बोराट हा सिनेमा आठवत असेल तर साधारण त्याच धरतीवर हा बनवला आहे.
२०२० साली संत शिरोमणी महात्मा जॉर्ज फ्लॉइड नामक थोर माणसाची पोलिसांकडून हत्या झाल्यावर प्रचंड दंगली, जाळपोळ ह्यांचे पेव फुटले होते. काही विचारवंतांनी श्वेत वर्णीय असणे म्हणजेच रेसिस्ट अर्थात वर्णद्वेष्टा असणे असे समीकरण असे मांडले. महात्मा फ्लॉइड हत्येनंतरच्या दंगलीच्या आगीवर अनेक लोकांनी आपल्या पोळ्या भाजून घेतल्या. रॉबिन डिआन्जेलो, सायरा राव ही चटकन आठवणारी नावे.
ह्यांची कार्यपद्धती साधारण अशी, लठ्ठ रकमा घेऊन सेमिनार, वर्कशॉप, कार्यशाळा, जेवण (रेस टु डिनर) असे कार्यक्रम आयोजित करायचे जे बहुतेक वेळा केवळ श्वेतवर्णी लोकांनाच खुले असतात (पण हे रेसिज्म नाही!). ह्या कार्यक्रमात एकच अजेंडा असतो. काहीही विचार बाळगले तरी श्वेतवर्णी लोक रेसिस्ट असतात. जर तुम्ही हे नाकारत असाल तर तुम्ही नक्कीच जास्त रेसिस्ट आहात. मग आपण आपला वर्णद्वेषाचा अनुभव सांगायचा जिथे आपण वर्णद्वेषी होतो आणि ज्याची आपल्याला आज लाज वाटते आहे. मग दुसरा सदस्य आपला अनुभव सांगणार. मग काही श्वेतवर्णीय अश्रुपात करून आपले दु:ख मोकळे करणार. एकंदर गंमतशीर कार्यक्रम असतो. तथाकथित रेस एक्स्पर्ट मंडळी भक्कम पैसे मिळवतात आणि श्वेतवर्णीय आपण श्वेत वर्णी म्हणून जन्माला आलो हे कसे महापाप आहे ह्या दु:खाच्या कर्दमात भरपूर लोळून घेतात. (विन विन!)
तर अशा लोकांची टिंगल करणारा हा सिनेमा आहे. मॅट वॉल्श हा स्वतः ह्या अँटी रेसिस्ट स्क्वॉड अर्थात वर्णद्वेष विरोधी आघाडीत सामील व्हायचे ठरवतो. स्वतः पूर्ण पणे ह्या विचारात बुडून जातो. आपले पैसे देऊन असे अनेक वर्कशॉप, सेमिनार, डिनर ह्यात सहभागी होतो. काही वेळा वेगवेगळी सोंगे करतो. शेवटी तो स्वतःला त्यातला जाणकार बनला आहे असे कुठलेसे प्रमाणपत्र मिळवून स्वतः असाच एक कार्यक्रम आयोजित करतो. काही श्वेतवर्णी मासे त्याच्या गळाला लागतात! मग पुढचे सगळे सांगत नाही. इच्छा असल्यास स्वतःच बघा.
मॅट वॉल्श ने खूपच चांगले काम केले आहे. (दोन्ही अर्थाने, अभिनय आणि एक चांगला उपक्रम). ढोंगी रेस हसलर (वर्णद्वेष दलाल) मंडळींचे बिंग फोडले आहे. ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा विनोदी, उपरोधिक बोलतो तेव्हा त्याच्या चेहर्यावरील रेषाही हलत नाही. अशा मख्ख चेहर्याने केलेले विनोद जास्त भावतात. (आपला देवेन वर्मा साधारण ह्या प्रकारचे विनोद करायचा. लेस्ली नील्सन एअरप्लेन, लोडेड गन इ. सिनेमातला हा त्यातला मेरुमणी!)
ह्या सिनेमामुळे अनेक ढोंगी लोकांची दुकाने बंद होतील अशी आशा करू!

यातील प्रत्यक्षात घडलेल्या घटनांवर काही कॉमेण्ट इथे योग्य नाही. पण पिक्चर मजेदार दिसतोय. थिएटर मधे जाउन बघेन असे नाही पण स्ट्रिमिंग वर आल्यावर बघण्यात नक्कीच इंटरेस्ट आहे.

अरे बोराट सारखा असेल तर नक्की बघणार! चेहेर्‍यावरची रेषा न हलवता केलेले जोक आवडतातच.
स्ट्रीमिंगवर आला की सांगा. स्ट्रीमिंगवर आला नाही तर सगळी मिडिया डावी आहे अशी बोंब ठोकायची पोस्ट तयार असेलच तुमची.

प्रत्येकाचं गोष्टीत तात्पर्य / शिकवण कशाला शोधायची??? >> +१ आणि शिकवण हवी तर आहे की! आयटम साँग तसं एकच आहे आणि त्यात तमन्ना हॉट दिसते, पण ते सोडलं तरी कसले भारी जोक्स, काय डिलिवरी! हल्ली शुद्ध घी हिंदी अ‍ॅक्सेंट मला ब्रिटिश सारखाच गुदगुल्या करतो म्हणून पण असेल.

स्त्री 1 ला कसं तात्विक अधिष्ठान होतां >>
कशाला पाहिजे ते??
मनोरंजनाच्या माफक अपेक्षा ठेवून पहा की

प्रत्येकाचं गोष्टीत तात्पर्य / शिकवण कशाला शोधायची??? >>>

तात्विक अधिष्ठान शब्दशः घ्यायची गरज नव्हती. अनु यांना तात्पर्य / शिकवण हवी आहे असा त्यातून अर्थ निघत नाही असं मला वाटतं.
स्त्री मधल्या भूताच्या पुरूषजातीवर सूड उगवण्याच्या कृतीला तात्विक अधिष्ठान होतं (अर्थात कथेमधे , याचा अर्थ कथा खूप भारी आहे असाही नाही). सरकटा ला असं काही लॉजिकल एक्स्प्लेनेस्शन नाही असा त्याचा अर्थ असावा. स्त्री १ मनोरंजकच होता. गहन संदेश वगैरे काही नव्हतं.

हो अकच्युअली,मला नीट सांगता आलं नाही.तसंच म्हणायचं होतं.
पण स्त्री1 ला कसं एक डेफिनाईट तिचं दुःख आणि त्याच्यावर डेफिनाईट उपाय असणार होता.सरकटा ला तसा डेफिनाईट फ्लो नाही.

पण पिक्चर, संवाद धमाल होते त्यामुळे पैसे वसूल.ती तमन्ना सोडून बाकी सगळं आवडलं.'बिटस' वाला जोक द्व्यर्थी असला तरी भारी होता

मी पाहिला अ‍ॅम आय अ रेसिस्ट ! मजा आली.
> ह्या सिनेमामुळे अनेक ढोंगी लोकांची दुकाने बंद होतील अशी आशा करू!
निदान दोघांची तरी बंद झाली !

मराठी सिनेसुपरस्टार श्री स्वप्नील जोशींचा "बाई गं" नावाचा अप्रतिम सिनेमा रिलीज झालाय prime वर. इच्छुकांनी लाभ घ्यावा.
खर मी म्हणते प्रत्येकाने एकदा तरी बघावाच. दुःख वाटल्याने हलकं होतं म्हणतात.

>>स्ट्रीमिंगवर आला नाही तर सगळी मिडिया डावी आहे अशी बोंब ठोकायची पोस्ट तयार असेलच तुमची.
अहो, नेटफ्लिक्स आणि अन्य स्ट्रीमिंग कंपन्या कमालीच्या डाव्या विचारांच्या आहेत. त्याकरता मॅट वॉल्शच्या सिनेमाची गरज नाही. हातच्या कंकणाला आरसा कशाला? तुम्ही शहामृगासारख्या माना वाळूत खुपसून असे काही होतच नाही असे मानायचा निर्धार केलेला दिसतो आहे. चालायचेच!
हा सिनेमा जर कधी स्ट्रीमिंगवर आला तर तो मॅटची कंपनी डेली वायर (जिने हा सिनेमा निर्माण केला) तिच्या वेबसाईटवरच मिळेल बहुतेक. त्यामुळे आपल्याला तो बघायला मिळणे दुरापास्त आहे. बाकी कुणी ह्याला हात लावणार नाही असा माझा अंदाज आहे.

अ‍ॅम आय रेसिस्ट हा सिनेमा प्रदर्शित ज्या आठवड्यात प्रदर्शित झाला त्या सिनेमात पहिल्या पाचात होता. तरी कुठल्याही मुख्य प्रवाहातील समीक्षकाने त्यावर लिहिलेले नाही. कारण "असल्या" सिनेमावर लिहिले तर आपले पद धोक्यात येईल अशी भीती.
परंतु सुदैवाने समाजमाध्यमे, त्यावरील ब्लॉगर मंडळी, पॉडकास्ट असे अनेक मार्ग खुले असल्यामुळे काही प्रमाणात तरी हा सिनेमा यशस्वी झाला आहे. ह्याचे बजेट अगदीच कमी होते. मार्केटिंग वगैरे तर आणखीच कमी. त्यामुळे त्याचे यश अधिकच जाणवते.

चित्रपटक्षेत्रात डाव्या (किमान उजव्या नसलेल्या) लोकांचा भरणा जास्त हे भारत व अमेरिका दोन्हीकडे कॉमन दिसते. पण दोन्हीकडे हा ही एक ट्रेण्ड आहे की उजव्या कट्टर लोकांमधे ब्लेटंट अजेंडा चालवणारे एकतर्फी पिक्चर्स न काढता व्यवस्थित अभ्यास करून, "सहज चेक करता येण्यासारख्या" वस्तुस्थितीवर आधारित पण तरीही आपली "उजवी" बाजू मांडणारे चित्रपट फार दुर्मिळ आहेत.

डीईआय वर अनेक लोकांची दुकाने चालू झाली असतील हे सहज शक्य आहे. पण राइट विंग लोकांचा पिक्चर म्हणजे तो दिनेश डिसुझाचा "२००० म्यूल्स" चित्रपट व त्यावरचे नाट्य हेच जास्त ऐकले आहे.

हा राजकीय गप्पांचा धागा नाही. त्यामुळे राजकीय मतांबद्दल काही लिहीत नाही. हे फक्त पिक्चर नीट बनवण्याबद्दल आहे.

भारतात आपला अजेंडा सेट करण्यासाठी दृक श्राव्य माध्यमातून प्रयत्न करायचे असतात ही गोष्ट उजव्यांच्या लक्षात फार उशिरा आली असं मला वाटतं. तोपर्यंत बरेचसे टॅलेंटेड लोक डाव्या चळवळीच्या वळचणीत जाऊन बसले. म्हणजे मुद्दाम असं नाही. ती त्यांची स्वतःची मतं असू शकतात. पण कन्फर्मिटी हा एक भाग आहेच. किंवा डावं दिसणं हे डावं असण्यापेक्षा ‘इन थिंग’ असण्याच्या काळात हे स्वाभाविक होतं.
जे इंडीपेंडट आहेत ते एस्टॅब्लिश्ड सिस्टीमला हात लावायला बिचकतात. त्यामुळे विशाल भारद्वाज, विधू विनोद चोप्रासारखे एरवीचे दिग्गज अनुक्रमे हैदरसारखा एकांगी किंवा शिकारासारखा हास्यास्पद चित्रपट काढतात. उजव्यांकडे उरले सुरले हौशे नवशे असतात. ते स्वतःच्या कल्पनेच्या प्रेमात सहज वाहत जातात.

‘रंग दे बसंती’मध्ये अतुल कुलकर्णीच्या पात्राविषयीचे सुरूवातीचे जे समज आहेत ना ते उजव्या अजेंडाचे चित्रीकरण या बाबतीत अगदी प्रातिनिधीक आहेत.

डाव्या विचारसरानीचे असणे गुन्हा कोण म्हणतंय? चर्चा उजव्या विचारसरणीच्या लोकांना सेन्सिबल चित्रपट काढता येतात का याविषयी चालू आहे.

हैदर मला आवडलेला पण ते काश्मिर प्रकरण त्यात निट फिट झाले नाही.

डावे लोक लगेच ऑफेंड होतात हेमावैम.

Pages