मी साधारण २२ महिन्यांपूर्वी भारतात भाड्याने घर घेतले होते. २२ महिन्याचा करार होता आणि १ लाख डिपॉझिट. आता घर सोडल्यानंतर १० दिवसात डिपॉझिट परत करतो असं घर मालकाच्या मुलाने सांगितलं. सगळे व्यवहार जरी घरमालकिणीच्या नावावर होत असले तरी सगळ्या बोलाचाली तिच्या मुलासोबत होत होत्या. व्यवहार घरमालकाचा खात्यावर झाले आहेत. आता महिना होऊन गेला तरी पैसे देत नाही आहे. मधे खूप बोलल्या नंतर त्याने केवळ ५० हजार ट्रान्सफर केले पण आता फोन उचलत नाहीये आणि मेसेजेसला रिप्लाय ही देत नाहीये. मी आता अमेरिकेत आहे त्यामुळे जाऊन भेट घेणं शक्य नाही. २२ महिने मी स्वतः तिथे राहिले आहे.
आमचा करार मार्च मधे संपला होता परंतु आम्हाला एक महिना अधिक रहायची वेळ आली काही कारणाने तर मी त्याची त्या साठी प्रॉपर परमिशन घेतली होती. त्याने त्या साठी सहमती दिली होती आणि त्या एक महिन्याचा करार नाही पण हे सगळे पुरावे मेसेज मधे उपलब्ध आहेत.
शेजारच्यांकडून कळालं की त्याने already दुसरे भाडेकरू सुद्धा ठेवले आहेत.
आता हे पैसे परत मिळवण्यासाठी काय करावे लागेल?
घरमालक डिपॉझिट परत करत नसल्यास काय करावे?
Submitted by रीया on 26 May, 2024 - 02:04
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्राजक्ता, आत्ताचे भाडेकरू ओल
प्राजक्ता, आत्ताचे भाडेकरू ओल आलेल्या घरातच रहातायेत पण ते घर त्याने त्यांना पण रंग देऊन दिलं आहे. ते घर एक
महिना रिकामं होतं. वापरात नव्हत आणि रंग देताना त्याने फिक्सेट लावून तात्पुरती डागडुजी करुन दिलं आहे. . आता त्यांना एक दोन महिन्यात ती ओल दिसेल. लिकेज पूर्ण घरात, प्रत्येक खोलीत, प्रत्येक भिंतीला आहे. मी तेंव्हा फोटो शेअर केले नव्हते कारण लिकेज आहे म्हणून फोन केला तसा तो म्हणाला हो मला माहीत आहे.
मी सध्या भारतात नाही आणि आई वडिलांना त्रास देऊ शकत नाही. शिवाय मी मानसिकदृष्ट्या यासगळ्याला तोंड द्यायला खंबीर नाही त्यामुळे हतबल आहे.
रिया, बिग हग.
रिया, बिग हग.
डॅमेज दाखवून डिपॉझिट न देण्याच्या केसेस खूप आहेत.कदाचित डॅमेज 50के चे नसेल पण.त्याने हा मुद्दा आतापर्यंत नाही सांगितला म्हणजे त्याने पण कोणाचा तरी सल्ला घेऊन आता सांगितला.
ओल आलेली त्याचे फोटो काढून
ओल आलेली त्याचे फोटो काढून त्याला पाठवायला हवे होते. असो. आता सगळं त्या माणसाच्या तथाकथित चांगुलपणावर आहे. शक्य असल्यास त्या नवीन भाडेकरूंना ह्याबाबत अवगत करा, म्हणजे किमान त्यांना तरी पुढे असा त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागू नये
लिकेज आहे तर तो बांधकामाचा
लिकेज आहे तर तो बांधकामाचा दोष आहे. त्याचा ठपका भाडेकरूवर ठेवता येतो का? तुमच्या वकिलाने हा मुद्दा नाही काढला?
पण हा माणुस कसा आहे ते कळले. हे नाही तर दुसरे काही काढेल. किती लढा द्यायचा, मनस्ताप किती सहन करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे तेव्हा आता तुम्ही काय करावे याबद्दल फुस देणार नाही, शेवटी तुम्हाला निस्तरावे लागेल, खर्च करावा लागेल.
मनस्ताप करून घेऊ नका एवढेच सांगतो.
त्याने damage आहे हा शब्द
त्याने damage आहे हा शब्द एकदा जरी काढला असता तरी मी डिटेल्स मागून स्वतः सगळं पाहून आले असते. मी किल्ली ताब्यात दिल्यावर १५ दिवस तिथेच होते. ५० हजाराचं काय damage करणार आणि? त्याला पैसे खायचेच होते. दिमाग लगाके खेला लडका
आई वडिलांना त्रास देऊ शकत
आई वडिलांना त्रास देऊ शकत नाही. ...... १.
हे जास्त महत्त्वाचे आहे.
वाईट अनुभव आहे.
वर बिल्वाने म्हटल्याप्रमाणे त्या मुलाच्या आईला आणि आता जे भाडेकरु राहतात त्यांना फोन करून ही परिस्थिती सांग.
माझा अनुभव फार वेगळा आहे.भाडेकरूनी आमची 2 लाकडी कपाटे (जी नवीन होती) आतल्या बाजूने स्कू ड्रायव्हरने जोडून ठेवली होती.आतल्या दारांचा उपयोग मुलांसाठी ब्लकबोर्डसारखा केला होता.माझा मुलगाही तेव्हा लहान होता,पण त्यानेही कधी असे केले नव्हते.त्यांचे deposit देऊन टाकले होते.
लिकेज आहे तर तो बांधकामाचा
लिकेज आहे तर तो बांधकामाचा दोष आहे.
>>> ते घर १५ वर्ष जुनं आहे. त्याने वकिलाला बरंच काय काय सांगितलं जे मी आता नाही लिहीत बसले त्यापैकी एक मुद्दा ‘किचन सिंक मधून लिकेज होऊन आमच्या ट्रॉलीला वाळवी लागली. हे लिकेज खरकट टाकल्याने लागली आहे, त्याचे ३५ हजार होत आहेत’ हा पण एक आहे. तिथे पण आधी पासूनच लिकेज होतं. ते त्याने तेंव्हा मान्य केलं होतं. त्याच्या आधीच्या भाडेकरूने ते केलं होतं असं तो मला म्हणाला होता.
आता खरच मी मनशांती चुज करते आहे कारण त्याच्याशी वाद घालण्यात अर्थ नाही हे कळलं आहे.
तो नोकरी करत नाही, घरात बसून रेंट वर च भागतं त्याचं त्यामुळे त्याच्याकडे खूप वेळ आहे या सगळ्यांसाठी.
50 K चे काय damge आहे?
50 K चे काय damge आहे?
आधी का नाही बोलला?
प्रूफ काय आहेत?
असो जास्त मनःस्ताप नकोच ह्या गोष्टींमुळे
आपले कष्टाचे पैसे कुठेतरी हरवले आणि एक अनुभव विकत घेतला असे समजायचे.
त्याच्या आत्ताच्या भाडेकरूंचा
त्याच्या आत्ताच्या भाडेकरूंचा नंबर माझ्याकडे नाही आणि बाबांना जाऊन सांगा म्हणणार नाही मी. जाऊ देत आधीच खूप त्रास झालाय सगळ्यांना घरात. कधी भेट झाली किंवा काही मार्ग सापडला तर कळवेन.
50 K चे काय damge आहे?
50 K चे काय damge आहे?
आधी का नाही बोलला?
प्रूफ काय आहेत?
असो जास्त मनःस्ताप नकोच ह्या गोष्टींमुळे
आपले कष्टाचे पैसे कुठेतरी हरवले आणि एक अनुभव विकत घेतला असे समजायचे.
>>>
हेच विचार येतायत मनात सकाळपासून. वकिलाचा माणूस त्याला म्हणाला की आधी का नाही बोललात हे. नोटीस का पाठवावी लागली पार तर म्हणे मी नेमका किती खर्च येतोय ते बघत होतो.
लिकेज आहे तर तो बांधकामाचा
लिकेज आहे तर तो बांधकामाचा दोष आहे. त्याचा ठपका भाडेकरूवर ठेवता येतो का? तुमच्या वकिलाने हा मुद्दा नाही काढला? >> जनरली बरोबर आहे. पण घरमालक म्हणू शकतो की हे राहात असताना लीक होऊ लागले व यांनी वेळेवर कळवले नाही. तसे काही प्रूफ नसेल तर तो हे क्लेम करेल.
मात्र एक महिन्यात तुम्हाला डिपॉझिट परत मिळाले नाही व ते का दिले नाही याची कारणेही दिली नाहीत - यावरही एखादा वकील केस करू शकतो. म्हणजे तुम्ही नुकसान केले असेल तर घराचा ताबा सोडल्यावर त्याने ते लेखी द्यायला हवे (किंवा इलेक्ट्रॉनिकली). भारतातही याला काही कालावधी असेल. वकिलाला माहीत असेल.
दुसरे म्हणजे त्या कामाला ५०,००० लागले, आणि मुळात ते काम केले गेले याच्या पावत्याही वकील मागू शकेल.
एखादा तयार वकील यातून बरीच खुसपटे काढू शकेल. पण वरच्या काही पोस्ट वाचता आई-वडिलांना त्रास होऊ नये म्हणून तुला त्याचा पाठपुरावा करण्यात रस नाही असे दिसते. तरीही वैयक्तिक मेसेजेस पाठवत त्या व्यक्तीला आधीच्या बोलण्याची आठवण करून द्यायची. तो सराईत असेल तर काही मान्य करणार नाही पण एखादेवेळेस काही उत्तर देईल की जे वापरता येईल.
आता याचा तुला उपयोग नाही पण इतरांकरता - भाडेकरूने राहायला सुरूवात केल्यावर ४-५ दिवसांत स्वतः सगळे चेक करून घरमालकाला कल्पना द्यायची असते - ती ही पुढे वापरता येईल अशा रीतीने (लेखी/मेसेजेस्/इमेल व फोटोही). असे अमेरिकेतील "लीज" अॅग्रीमेण्ट मधे सहसा असते. भारतातही असेल.
तरीही वैयक्तिक मेसेजेस पाठवत
तरीही वैयक्तिक मेसेजेस पाठवत त्या व्यक्तीला आधीच्या बोलण्याची आठवण करून द्यायची. तो सराईत असेल तर काही मान्य करणार नाही पण एखादेवेळेस काही उत्तर देईल की जे वापरता येईल.
>>>
हे केलं मी. त्याने मला ब्लॉक केलं आहे आता.
होणारा मनःस्ताप पाहता त्याची
होणारा मनःस्ताप पाहता त्याची फीस म्हणून ५०००० रूपयांवर पाणी सोडलेले बरे असेच वाटते.
केस करण्यात वेळ जाईलच, शिवाय पार्टी स्वतः हजर पाहिजे असा आक्षेप तो घेऊ शकतो.
ओल किती जुनी आहे हे पाहण्यासाठी जुन्या भाडेकरूंची साक्ष किंवा पूर्वी कधी एखाद्या मिस्त्रीला त्याने दाखवले असेल तर त्याची साक्ष असे पुरावे जमा करावे लागतील.
भाडेकरूने राहायला सुरूवात
भाडेकरूने राहायला सुरूवात केल्यावर ४-५ दिवसांत स्वतः सगळे चेक करून घरमालकाला कल्पना द्यायची असते
>>>
हे जे लिकेज आहे ते पहिल्या एका महिन्यात दिसणं शक्य नव्हत. डॉक्टर फिक्सेट का काही तरी केमिकल वापरून हे लिकेज तात्पुरतं काही महिन्यांसाठी बंद करता येतं हे मला तेंव्हा प्लंबरने सांगितलं होतं. नेमकं हे लिकेज सुरू झालं तेंव्हा पावसाळा सुरू झाला होता त्यामुळे सुरुवातीला खूप दिवसा तो बाहेरून लिकेज आहे असं म्हणत राहिला. जेंव्हा पाऊस थांबल्यावर ही लिकेज आलं तेंव्हा म्हणाला की हो बाथरूम मधून पण लिकेज आहे. फरशीच्या खालून ती लाईन गेली आहे. ते दुरुस्त करायचं तर फारशी फोडावी लागेल. मी म्हणाले मी फोटो पाठवू का तर म्हणाला नको मला माहीत आहे आणि की येऊन बघून जातो. मग नंतर माझं लग्न झालं, बायको प्रेग्नेंट आहे, मी बाहेर देशात आहे अशी कारणं सांगून आलाच नाही पण तो फोनवर स्पष्ट म्हणाला होता की मला लिकेज आहे ते माहीत आहे आणि त्याची तुला भरपाई करावी लागणार नाही हे मी सांगतो आहे तर विश्वास ठेव म्हणून मी पण फार वाढवलं नाही.
मी यातून हेच शिकले की जिथे पैसे येतात तिथे शब्दांवर विश्वास ठेवायचा नाही. काहीही होवो. आता भाड्याने रहायची वेळ येणारच नाही पण आलीच तर शहाणपणा आला.
भारतात खोट्या पावत्या तयार करणं अशक्य नाही. पावत्या तो देऊच शकेल आणि कदाचित त्याने काम करुन घेतलं ही असेल पण ते damage मी केलेलं नाही याचा काहीच पुरावा माझ्याकडे नाही. मिस्त्री माझ्या बाजूने साक्ष देईल का माहीत नाही कारण हा मनुष्य सोसायटीच्या बॉडीवर होता. त्याचे बरेच मित्रं आता बॉडीवर आहेत आणि मिस्त्री सोसायटीमधे नोकरीला आहे.
केस कोर्टापर्यंत गेली तर सगळं प्रूव करता येईल खरंतर पण ते करण्याची माझी तयारी नाही. मी भारतात असते तर नीट केस करुन सोक्षमोक्ष लावला असता पण आता उंटावरून शेळ्या हाकण्यात अर्थ नाही. माझीही मनस्तिथी सध्या याच्या नादी लागण्याची नाही. ऑलरेडी प्लेट मधे खूप काही आहे त्यामुळे हे अजून नको असं ठरवावं लागलं.
माझा अनुभव मुद्दाम इथे लिहिते आहे की वाचून कोणी एखादा तरी शहाणा होईल
मिस्त्री चे रेकॉर्डिंग केले
मिस्त्री चे रेकॉर्डिंग केले तर..
यावरून घेतलेला धडा:
यावरून घेतलेला धडा:
घर भाड्याने घेताना फोटो काढले तरी ते प्रिंट करून तारीख लिहुन, हे फोटो घराचा ताबा घेण्यापूर्वी घराची स्थिती कशी आहे याची नोंद करण्यासाठी काढले आहेत, यात दिसणाऱ्या स्थिती बद्दल भाडेकरुस जबाबदार ठरवता येणार नाही लिहून भाडेकरू, मालक व दोन साक्षीदारांची सही घेऊन ठेवावी.
पण तरीही पळवाटा काढणारे काढतातच वगैरे मान्य आहे, पण जे करतोय ते थोडी पुढची स्टेप घेऊन पाणी वाहुन जाण्याची शक्यता कमी करावी.
या व्यतिरिक्त पुढे काही आढळल्यास इमेल द्वारे कळवून ते म्हत्वाचे असेल तर रजिस्टर्ड पोस्टाने करार ज्या व्यक्तीच्या नावे आहे तिला उद्देशून त्या पत्त्यावर लेखी सूचना पाठवावी.
सगळा आर्थिक व्यवहार ज्या व्यक्तींच्या नावे करार आहे त्यांच्याच नावे आणि शक्यतो करारात नमूद केलेल्या बॅंक अकाउंटवर/मधुन करावा.
करारात सूचना देण्यास, पत्रव्यवहार करण्यास वापरण्याचा पत्ता, इमेल ऍड्रेस, व्हाट्सएप क्रमांक, फोन नंबर यांचा उल्लेख करावा. किती कालावधीत डिपॉझिट परत केल्या जाईल आणि त्यापेक्षा उशीर झाल्यास किती परंतु कायद्यने वाजवी टक्क्यांनी व्याज आकारले जाईल हे नमूद करावे. कुठलेही क्लॉजेस घालताना तर स्थानिक कायद्यास धरून आहेत ना हे पहावे.
या सगळ्याची फाईल (हार्ड व सॉफ्ट) मेंटेन करावी. (सगळं केलं होतं हो पण फोन पाण्यात पडला आणि गेला सगळा डेटा असं व्हायला नका.)
ही जाहिरात नाही ... अनुभव आहे
ही जाहिरात नाही ... अनुभव आहे
या प्रकरणात मदत नाही होणार कदाचित पण बाकी घरमालकाना / भाडेकरूंना मदत होऊ शकेल ...
'Housewise' ही एक कंपनी आहे जी End 2 End प्रॉपर्टी मॅनेजमेंट चे काम करते ...
जर मायबोली च्या धोरणात बसत नसेल तर प्रतिसाद उडवला तरी चालेल....
मी राहते त्या घरात पण लिकेज
मी राहते त्या घरात पण लिकेज चा इशू होता. दोन ठिकानी. एक मास्टर बाथरूम मध्ये. जी फारशी वापरली जात नाही. व मास्ट र बे डरूमची जी छोटी बाल्कनी आहे तिथे. इथ्ले वरून आलेले व पाउस आला तर ते पाणी साचून राहते. आमच्या खाली जो माणूस आहे तो महा कटकट्या म्हणून प्रसिद्ध आहे . त्याने ओनर ला तक्रार केलेली व फोटो पाठवले होते. मग तीन लोकांची यात्रा. मी सोसायटीतील जो प्लंबर कम अॅडमिन आहे त्याला बोलावून काय ते एस्टिमेट घेतले व ओनरला सांगितले काम करून घेतले व त्याचे फोटो दोघांना पाठिवले आणि खर्च पण केला २५०० - ३००० सुमारास होता. इतर काही बारके बारके खर्च जसे मध्यम्तरी इलेक्ट्रिकचा कपॅसिटर जो एक मजल्यावर व एक खाली सर्वांच्या बॉक्सेस आहेत तिथे आहे ते जळून गेले असायचे म्हणजे बिल्डिम्ग मध्ये लाइट पण मी अंधारात अशि परिस्थिती व्हायची. तेव्हा पण मी नाइट इले, चे बोट धरून ते काम करुन घेतले. हे खर्च मालकाला पाठवायचे किंवा भाड्यातून वजा करून भाडे द्यायचे लक्षात राहात नाही. पण माझा घर मालक त्रास देत नाही व घरी कुत्रा आहे तो पाळू देतो म्हणून मी ही थोडा बहुत खर्च आपण हून करते.
डिपॉझिट परत घ्याय ऐवजी चार महिन्याचे भाडेच त्यातून वळते करून घ्या असे सांगता येते का? पण हा रिटाय री वयस्क माणूस आह त्या क डे इतकी रोलिंग क्याश असेल की नाही माहीत नाही. प्रॉपर्टीचे मेजर इशू कळवावे लागतात हे बरोबर. सोडताना काय नाटक होते ते मी लिहिनच इथे.
लहान सहन खर्च आपण काही
लहान सहन खर्च आपण काही मालकाला सांगत नाही. उदा. एखादा स्विच खराब झाला. पण मेजर खर्च असेल तर मालकाला सांगून, त्याच्याच एखाद्या माणसाकडून करून घ्यावे. आपण खर्च करणार असू तर आधी खर्चाचा अंदाज देऊन ते पैसे तो देणार की भाड्यातून वळते करायचे हे आधी ठरवून घ्यावे आणि तशी लिखापढी ठेवावी
जवळपास 8 वर्षं आणि दोन ठिकाणी भाड्याने राहून आलेलं शहाणपण
डिपॉझिट असो वा उसने दिलेले,
डिपॉझिट असो वा उसने दिलेले, समोरच्या माणसाने परत करायचे नाही असे ठरवले, तर पैसे मिळवणे "अत्यंत " कठीण असते. तुम्ही कोणत्याही मार्गाचा अवलंब करा, काही फरक पडत नाही. समोरची व्यक्ती जितकी फाटकी, तितके पैसे काढणे अवघड कारण ते कोर्ट कचेरीला घाबरत नाहीत आणि तुम्ही त्यांच्या पेक्षा किती बिझी आहेत ते ओळखून असतात . आता तुमचे घराला लागलेली गळती असो वा नसो, त्याने दुसरे काहीतरी कारण काढले असते. इथे कोणाकडे वेळ जास्त आहे त्याला आडवेंटेज असतो. पैसे देणारा पाहिलेंदा कधीच पैसे देत नाही म्हणत नाही, देतो अडचण आहे, माझे पैसे अडकले आहेत, येणार आहेत, समोरचा वेळ लावतोय .... अशी कारणे देत असतो, तो खरंतर वॉर्निंग मेसेज असतो. अश्या वेळी तुम्ही मध्यस्थी मार्फत जरी त्याच्याकडे गेलात तर तो तुम्हाला चाय पाणी देऊन आपले रडगाणे गाऊन परत पाठवतो. असे तुम्ही २ वेळा परत आलात तर त्याला कळून चुकते कि आता पैसे नाही दिले तर चालतील. अश्या वेळी गोड बोलून पोस्ट डेटेड चेक घेता आला तर उत्तम. भले २-३ महिने पुढचा असू दे.( तुम्हाला सांगितल्याशिवाय टाकणार नाही याची हमी देऊन, मध्यस्थी व्यक्तीला मध्ये घालून ). तो चेक देत नसेल तर मात्र तेथेच घ्यायची असेल तर स्ट्रॉंग भूमिका घेता येते / अथवा आहे त्या पैश्यावर पाणी सोडून घरी येत येते.
मनस्ताप टाळण्यासाठी किती दिवस राहिलात त्याने ५०००० ला भाग आणि तेवढे भाडे जास्त दिले असे समजा. किंवा ते ५०००० मिळवण्यासाठी जितका वेळ आणि एनर्जी जाणार आहे तेवढे काम करून तुम्ही ५०००० मिळवू शकाल.
(n नंबर ऑफ अनुभव)
एक गम्मत सांगतो. मित्राच्या मुलाच्या गाडीचा अपघात झाला. समोरच्या व्यक्तीने सांगितले पोलीस केस करू नका / इन्शुरन्स पण राहू दे , गाडी दुरुस्त करून घ्या मी सगळे पैसे देतो. मुलगा घरी आला, नंतर गाडी दुरुस्त करून घेतली आणि त्याला फोन वर सांगितले. देतो देतो करत त्याची टाळाटाळ सुरु झाली. एक दिवस मित्राने मुलाला सांगितले, आज पैसे घेतल्याशिवाय घरी यायचे नाही, देत नाही तोपर्यँत त्याच्या कडे जाऊन बसायचे. तो जाऊन खरोखर त्याच्या घरी बसला, नंतर तर बाहेर पायरीवर जाऊन बसला. मग त्या व्यक्तीचा याला फोन आला मी बाहेर आहे उद्या ये म्हणून. हा म्हणाला मला घरातून बाहेर काढलंय पैसे नेल्याशिवाय घरी जाऊ शकत नाही, मी थांबतो इथेच. थोड्या वेळात त्याने घरी पैसे पाठवून दिले. याच्या एवढी सोपी पद्धत मी पण पाहिली नाही अजून.
माहितीपुर्ण धागा. रिया तुझी
माहितीपुर्ण धागा. रिया तुझी तळमळ आणि मनःस्ताप अगदी पोचला बघ. अशा वेळी आपण खरंच आई बाबांच्या तब्बेती & वयाकडे बघून कष्टांच्या पैशावर पाणी प्रीफर करतो.
पण लाईफ लेसन समज. त्या भामट्या माणसा ला ह्याचा पस्तावा किंवा कोणत्या मार्गाने काहीतरी नुकसान नक्की होईल. कर्मा हॅज टू पे ऑफ.
रिया मनस्ताप कळतोय. सरळ
रिया मनस्ताप कळतोय. सरळ मार्गी माणसांना फसवणूक, विश्वासघात झाला की किती त्रास होतो माहित आहे. प्रश्न कधी कधी ५०००० पेक्षा पण फसवल गेल्याच्या दुःखा चा असतो.पण सोडून दे विषय,कारण मी आधी लिहिलंय त्याप्रमाणे कोर्ट मध्ये व्हिक्टिम लाच जास्त पुरावे गोळा करावे लागतात त्याची फसवणूक झाल्याचे. पण आता नको विचार करू, तू आणि तुझ्या आईबाबा दोघांनीही डोक्यातून विषय बाजूला करा. लाख मोलाचं मनस्वास्थ नका घालवू त्या भामट्या पायी आता.
डिपॉझिट असो वा उसने दिलेले,
डिपॉझिट असो वा उसने दिलेले, समोरच्या माणसाने परत करायचे नाही असे ठरवले, तर पैसे मिळवणे "अत्यंत " कठीण असते......... 100% सहमत. आपलेच पैसे परत मागायला शेवटी भिकाऱ्यासारखे वाटायला लागते.
लेझीम पथक असेल तर रोज
लेझीम पथक असेल तर रोज संध्याकाळी प्राईम टाईम मधे तीन तास ढोल ताशे लेझीम असा खेळ करत दर पाच मिनिटांनी त्याच्या नावासकट त्याने कसे बुडवले याची कथा शाहीर थाटात सांगायची.
त्याला जी रं जी रं जी रं जी जी जी जी असा कोरस पण द्यायचा.
तीन चार दिवसात पैसे दिले तर बरं नाहीतर मग पुन्हा पुढच्या महिन्यात.
रिया, तु आता शांत झालेले
रिया, तु आता शांत झालेले बरे. तुला जो मनस्ताप होतोय व शारिरिक व मानसिक त्रास होतोय त्यापेक्षा ५०,००० जास्त आहेत का हा विचार कर. बाकी वर सगळ्यांनी चांगले सल्ले दिले आहेत. त्यावर शांतपणे विचार कर.
डिपॉझिट असो वा उसने दिलेले,
डिपॉझिट असो वा उसने दिलेले, समोरच्या माणसाने परत करायचे नाही असे ठरवले, तर पैसे मिळवणे "अत्यंत " कठीण असते. तुम्ही कोणत्याही मार्गाचा अवलंब करा, काही फरक पडत नाही. समोरची व्यक्ती जितकी फाटकी, तितके पैसे काढणे अवघड कारण ते कोर्ट कचेरीला घाबरत नाहीत आणि तुम्ही त्यांच्या पेक्षा किती बिझी आहेत ते ओळखून असतात .
++१००
आपल्या घरी पोलीस आले व त्यांनी आपल्याला चार चौघात पकडून नेले तर आपण लाजेने आत्महत्या करू , ते मात्रे पोलिसाकडेच तम्बाखू मागतील ! रक्कम किरकोळ नाही हे खरे आहे पण कधी कधी अक्कलखाती जमा करणेच इष्ट असते. ( अनुभवाचे बोल)
खरंय सगळे म्हणताय ते. स्वतःला
खरंय सगळे म्हणताय ते. स्वतःला शांत करायचा प्रयत्न करतेच आहे. खरं तर हा माणूस आधीपासूनच रेड फ्लॅग होता पण आम्ही अडला हरी म्हणून शांत बसलो. लिहायला सुरुवात केळी की त्याचे एक एक किस्से आठवतात. .आता आजारपणात गेले असते त्यापेक्षा इकडे गेले असं समजावून शांत करते आहे आई बाबांना पण.
अनुभव मात्र चांगलाच मिळाला. आता मला नाही वाटत जगात कोणाच्या नुसत्या शब्दांवर कधी विश्वास ठेवेन मी.
मला घरातून बाहेर काढलंय पैसे
मला घरातून बाहेर काढलंय पैसे नेल्याशिवाय घरी जाऊ शकत नाही, मी थांबतो इथेच. थोड्या वेळात त्याने घरी पैसे पाठवून दिले. याच्या एवढी सोपी पद्धत मी पण पाहिली नाही अजून.
>>>>
तो माणूस नेक होता. आमच्या केसमधला भामटा असता तर म्हणाला असता रहा मग बसून.
लहान सहन खर्च आपण काही
लहान सहन खर्च आपण काही मालकाला सांगत नाही. उदा. एखादा स्विच खराब झाला. पण मेजर खर्च असेल तर मालकाला सांगून, त्याच्याच एखाद्या माणसाकडून करून घ्यावे.
>>
हे आठवलं म्हणून लिहिते. त्याने आम्ही रहायला गेलो, अग्रीमेंट केलं तेंव्हा हा खर्च आम्हाला करायचा आहे हे कुठेही मेंशन केलं नाही. अर्थात आम्हाला करायचा नाही हे देखील कुठेही मेंशन नाहीये. जेंव्हा हे असे लहानसहान खर्च मी सांगायला लागले तेंव्हा तो म्हणाला हे खर्च तुम्हीच करायचे असतात हा नियम आहे. मी असा काही नियम नाही म्हणाले तर म्हणाला घर सोडून जा मग आता. मी त्या आधी घरावर साधारण ५ हजार खर्च करुन घेतले होते, आम्हाला सोयीस्कर पडतील असे तेंव्हा आता पॅकर्स आणि
मुव्हर्स वर घालवण्यापेक्षा आपण करू खर्च म्हणून करत राहिले. इव्हेंट्युअली त्या घरातले सगळे कमोड गळायला लागले. प्लंबर म्हणाला आधी पासूनच गळत होते, तुम्हाला देण्याआधी त्याने माझ्याकडून नुसतं सिमेंट लावून घेतलेलं पण मी त्याला सांगितलं होतं हे पुन्हा गाळणार आहे आणि पूर्णपणे रिप्लेस करावं लागणार आहे. मी त्याला फोन केला तेंव्हा तो म्हणाला प्लंबर काहीही सांगेल. तुम्ही राहात असताना ते गळायला लागलं आहे , तुम्हालाच दुरुस्त करावं लागेल. नाही तरी मी डिपॉजिट मधून कापुन घेईनच नंतर दुरुस्त तुम्ही केलं नाही तर. प्लंबरला म्हणाले तू त्याच्या समोर हे सांगशील का तर तो म्हणाला मला नका घेऊ तुमच्यात. प्रत्येकी ५ हजार घालवून तिन्ही कमोड मी रिप्लेस करुन घेतली. हे असंच एलक्ट्रिक पॉईंट्स , लॉक इत्यादी बद्दलही झालं.
हे सगळं सुरू होतं तेंव्हा माझी तब्येत बरी नव्हती, मुलगा लहान, आई बाबा वयस्कर त्यामुळे लगेच पुन्हा घर बदलणं अशक्य होतं.म्हणून आम्ही गप्प राहिलो. शेवटी झालं ते झालंच.
रीया, किती गं मनस्ताप! पण जाऊ
रीया, किती गं मनस्ताप! पण जाऊ दे , जे झाले ते झाले! तू तुझी तब्येत सांभाळ. काहींना सवयच असते लोकांना लुबाडायची. हा माणूस त्यातलाच दिसतोय. त्यातून तू परदेशात म्हटल्यावर त्याचे अजुनच फावले.
मधे कुणी एजंट नव्हता का? की
मधे कुणी एजंट नव्हता का? की तुम्ही त्याच्यासोबतच व्यवहार केला होता?
हा किस्सा माझ्यासोबत झालेला .
हा किस्सा माझ्यासोबत झालेला . आमची इमारत पुनर्विकासासाठी गेलेली. म्हणून भाड्याचे घर शोधत होते. ओळखीच्या काकांच्या मध्यस्थीतून घर मिळालेले होते. पण पावसाळ्यात जाम त्रास दिला त्या घराने. सारखी ओल आणि पावसाचे पाणी घरात . डास वगैरे होतेच नियमित . हे काही त्या काकांनी किंवा घरमालकाने सांगितलेले नव्हते . तरीही ११ महिन्याचे अग्रीमेंट असल्याने राहिलो होतो .
शेवटी घर सोडायचा निर्णय घेतला तो घरमालक काही डिपॉझिट द्यायला तयार होईना . का तर म्हणे आम्ही ११ महिने पूर्ण व्हायला १ महिना होता आणि आम्ही घर सोडत होतो . त्याने डिपॉझिट बँकेत ठेवलेले ठेवीच्या रुपात . त्याचा इंटरेस्ट बुडत होता .
आम्ही समजावून सांगितले , डासांचा , गळतीचा त्रास सहन करत राहतो आहे ते ही सांगितले . पण तो ऐकेना . शेवटी त्या मध्यस्थ काकांमार्फत आणि स्थानिक ओळखीतून दबाव आणला तेव्हा तो राजी आला. पण १० हजार रुपये कापलेच .
काकनी एवढे मिळतील ते पुष्कळ झाले असे सांगून पड घ्यायला लावली . आम्हीही कुठे ताणा म्हणून विषय सोडून दिला .
करारामध्ये 1 महिन्याची नोटीस
करारामध्ये 1 महिन्याची नोटीस देऊन (दोन्हीकडून) करार संपविण्याचे एक कलम असतेच
धागा आणि प्रतिसाद वाचले.
धागा आणि प्रतिसाद वाचले. वेदना पोहोचल्या.
असे प्रसंग घडतात आयुष्यात. आणि प्रत्येक वेळी कारण एकच असते की "कागदपत्रे ऍग्रिमेंट पुरावे यापेक्षा आपण कुणावर विश्वास ठेवला आणि समोरच्याने गैरफायदा घेतला" पैसे गेले ही एक वेदना पण ही betrayal ची यातना त्याहून जास्त असतो.
त्यामुळे उदय, देवकी, मानव, विकु यांचे व तत्सम प्रतिसाद पटले. शक्य ते प्रयत्न केलेत तुम्ही. वकिलांमार्फत सुद्धा अप्रोच केलात. त्यांनी सुद्धा प्रयत्न करून "पुढे डेड एन्ड आहे" असे सांगितले. मला वाटते फारफार तर अजून एखाद्या वकिलाचे सेकंड ओपिनियन घ्या फार अपेक्षा न ठेवता. मिळाले पैसे तर उत्तमच अन्यथा नाद सोडून द्या. बरेचदा लेट गो मध्येच शहाणपण असते. या सगळ्यात तुमची काहीही चूक नाही त्यामुळे स्वतःला तर अजिबात कोसू नका. "उद्योग व्यवसायात मोठ्या झालेल्या सर्व व्यक्तींना याहून कित्येक पटीने वाईट अनुभव आलेले असतात, म्हणून तर ते मोठे होतात" असे विचार मनात आणले की मनास बरीच मलमपट्टी होते
इथे मांडलेत हे छान केलेत. नव्वद टक्के हलके झाले असेल ओझे.
एक मजेदार अनुभव.
एक मजेदार अनुभव.
देशी परदेशी प्रसिद्ध असलेल्या व्यक्तीचे आईवडील,कोकणातील आमच्या घरात रहात असत.एके दिवशी त्यांची पत्रे वाचनात आली.
"घराला पायऱ्या घालून घेतल्या.त्याचे इतके पैसे झाले.ते भाड्यातून वळते करण्यात यावे.""स्वयंपाकघरात उभा ओटा करून घेतला त्याचे 300 रुपये झाले.ओटा तुमच्याच घराला करून घेतला असल्याने त्याचे पैसे भाड्यातून वळते करावे."
भाडे 10 रुपये महिना होते.(वडलांच्या मामाने ठरवलेले).
पुढे ते घर त्यांनाच 25000ला विकले.
मजा म्हणजे कागदोपत्री आमच्याच नावे ते घर/जमीन बरीच वर्षे होते. नंतर नवीन मालकाच्या नवे चढवले.
मात्र ते घर विकल्यावर पपांनी ही सारी पत्रे फाडून टाकली.
भ्रमर, मधे कोणी एजंट नव्हता.
भ्रमर, मधे कोणी एजंट नव्हता.
जाई, अगदी अगदी पोहचली मला तुझी पोस्ट.
स्वाती ताई, अतुलदा खरंय.
मी झाले आता शांत. आता पैसे गेलेच आहेत. मी आता काही प्रयत्न करणार नाही पण पुढच्याच ठेच टाइप कोणाला उपयोग होत असेल तर राहू देत म्हणून धागा ठेवते.
ज्यांना ज्यांना उतू जायचं असेल इथे त्यांनी वापरा.
याच वेळी हे ही लिहिते की आधीच्या दोन घरमालकांनी काही त्रास दिला नव्हता. या घरात आम्हाला इतर मानसिक त्रासही खूप झाले. या वास्तूत आमच्या आधी जे राहून गेले त्यांच्या कहाण्या ऐकल्या तर त्यांनाही वेगळे वेगळे अप्रिय असे अनुभव आले होते. वास्तूला दोष देत नाही मी पण अशी अनेक दुखावलेली मने तिथे असतील पूर्वी तर औरा तयार होतोच. या आधीचं घर मात्र फार छान होतं. वाढलेलं भाडं परवडत नव्हत म्हणून आम्ही घर सोडलं पण आता वाटतंय सगळं मिळून खर्च कमीच झाला असता. पुढच्या वेळेला हा अनुभव कामी येईल.
किती बेकार लोकं असतात.
किती बेकार लोकं असतात. गोंदवलेकर महाराज म्हणतात परनिंदा व परधन हे विष्ठेसमान माना. परनिंदा १००% श्युअर आहे, मला वाटतं परधनही आहे त्यात.
काय तो माणुस माडी बांधणारे का एक लाखात पण खाल्ली माती.
फसवणूक किंवा अन्याय असे
फसवणूक किंवा अन्याय असे प्रसंग कुणाच्याही बाबतीत घडू शकतात. आपण इथे एकत्र येतो त्याचा काही तरी उपयोग व्हावा.
यासाठी स्वयंसेवी मदत गट स्थापन करूयात. जर कुणाच्याही बाबतीत अशी मदत लागलीच तर तिथे गटागटाने जाऊन दटावता यावे.
यासाठी पूर्वतयारी म्हणजे देहयष्टी विश्वासार्ह बनवणे. म्हणजे आपल्याकडे पाहिल्यावर समोरच्याला आपण कुणाचे देणे लागतो हा विश्वास आला पाहीजे. त्यासाठी मदत गटाने एकत्र जमून खालील सराव रोज केला पाहीजे.
१. वजन उचलणे. हळू हळू वजन उचलत २०० किलो पाचशे किलो हजार किलॉ पर्यंत नेले पाहीजे. यामुळे जॉन अब्राहम सारखे टरारबुंग स्नायू बनतील.
२. मार्शल आर्ट्स चे ट्रेनिंग - रोज कस्सून सराव करत किमान थर्ड डिग्री ब्लॅक बेल्ट मिळवायला हवा.
३. कुस्ती - मार्शल आर्ट्स सोबतच कुस्तीमुळे शरीर सडपातळ होणार नाही आणि ऐन वेळी उचलून आपटण्याची पाळी आल्यास कुस्ती कामाला येईल.
४. वसुलीची भाषा - ही एक विशिष्ट भाषा असते जी शिकण्यासाठी तज्ञांना पाचारण करावे
५. रोज दहा मैल पळणे - पळण्याचा सराव करताना विश्वविक्रमापेक्षा जलद कसे पळता येईल हे पहावे.
याप्रमाणे तयारी झाल्यावर कुणा मायबोलीकराला गरज पडली कि त्या विवक्षित स्थळी जाऊन संबंधित इसमास आपण रोजचे कमावलेले कसब दाखवून गर्भगळीत करून सोडावे. त्यामुळे तो लगेचच अन्याय दूर करण्यास राजी होईल. यासाठी क्र, १ ते ४ पैकी कोणताही सराव कामी आल्यास संकोच करू नये.
मात्र संबंधित इसम जादाच्या तयारीचा असेल आणि गर्भगळीत होण्याची पाळी आपणावर आली तर पाच अनु क ५ चा उपाय अंमलात आणण्यास अजिबात हयगय करू नये. विश्वविक्रमाचा सराव दुप्पट गतीने करताना संकोच करू नये.
चाट जिपीटी किंवा गुगल
चाट जिपीटी किंवा गुगल जेमिनीशी चर्चा केल्याने सुद्धा छान वाटते. कधीकधी मार्गही मिळू शकतो:
https://g.co/gemini/share/8c515c007742
<< मी झाले आता शांत. आता पैसे
<< मी झाले आता शांत. आता पैसे गेलेच आहेत. मी आता काही प्रयत्न करणार नाही पण पुढच्याच ठेच टाइप कोणाला उपयोग होत असेल तर राहू देत म्हणून धागा ठेवते. >>
------ आपल्याला पैशांपेक्षाही फसवणूक झाली याचे दु:ख जास्त असते.
माझी आर्थिक फसवणूक होते तेव्हा मी काही गोष्टींची उजळणी घेतो.
आपण एखादे पुस्तक पैसे मोजून विकत घेतो. पुस्तक वाचल्यावर ज्ञानांत भर पडल्याचे समाधान मिळते. पुस्तकाची किंमत मोठी असली तरी त्या किंमतीच्या कितीतरी जास्त पटीने ज्ञान मिळविल्याचा आनंद होतो. थोडक्यांत पैसा वसूल.
हा आर्थिक फसवणूकीचा अनुभव कडवट आहे पण तो तुम्हाला जीवनाचा एक महत्वाचा धडा शिकवून गेला. धडा शिकण्याची किंमत थोडी जास्त मोजावी लागली एव्हढेच.
मी ऑगस्ट मध्ये वेस्ट्र्न ला
मी ऑगस्ट मध्ये वेस्ट्र्न ला शिफ्ट झाले. इथे २.५ लाख डिपॉझिट द्यावे लागले. मुलुंडचे घर खाली करताना मालकाने आधी भरलेल्या डिपॉझिट मधून ऑगस्ट चे रेंट व रिपेअर्स, क्लीन अप व म्हातार्या कुत्र्याच्या शूच्या वासाचे पकडून काही कमी केले व १.३३ चा चेक्क दिला तो मी आठ पंधरा दिवसात भरला व क्लीअर झाला.
लेक जेन झी असल्याने कधीच चेक डिपॉझिट केला नव्हत्ता तिला व्हाइट डिपॉझिट स्लिप घरी घेउन यायला साम्गितले भरुन घेतली व मग तिने डिपॉझिट केला. शिफ्ट नंतर माझी तब्येत ढासळलेली. रिकव्हर व्हायला वेळ लागला पण पैशे पदरात पडले. सर्व शिफ्ट प्रक्रियेत बरेच पैसे खर्च झाल्याने हे जरा आधार झाले. मी लगेच शेअर्स घेतले. ओनरने जुन्या अॅग्रिमेंट वर एक लेगल टाइप मेसेज लिहून माझी सही घेतली आहे.
आता फक्त हिरवे पाकीट आणून त्यात इतक्या वरशांची सर्व बिले नोटिसा घालुन त्याला पाठ्वायची आहेत. फाइल करुन ठेवलेली आहेत.
किस्सा खलास.
वाह, पैसे मिळाले हे बरे झाले
वाह, पैसे मिळाले हे बरे झाले.किती होते आधीचे डिपॉझिट?
अभिनंदन अमा. आपले हक्कचे पैसे
अभिनंदन अमा. आपले हक्कचे पैसे मिळाले की जीव भांड्यात पडतो खरेच. एकटीने सर्व किती एफीशिअंटली मॅनेज करता. कुडोज.
त्यात इतक्या वरशांची सर्व बिले नोटिसा घालुन त्याला पाठ्वायची आहेत.>> हे जरुरी असते का?
Earlier deposit 2 laks. 5
Earlier deposit 2 laks. 5 years back. Lease was for two years first then renewed for further three years.
Aashu29 the data belongs to him. I have made online payments. I have no use of it now.
Mulund was lovely stay as very close to office. I have successfully done duty in lock down also. One year of lock down plus health issues aging all in that place. Girl finished college and got a job. So I would say many life goals completed.
चांगले मिळाले मग रिफंड
चांगले मिळाले मग रिफंड
आता कुठे आलात अमा?
आता कुठे आलात अमा?
Bhramar hi Andheri West.
Bhramar hi Andheri West.
१.३३ चा चेक्क दिला तो मी आठ
१.३३ चा चेक्क दिला तो मी आठ पंधर.... भरपूर कापले की!
असो.तुम्ही खुशाल तर जग खुशाल.गुड लक!
तसे बरेच कापले अमा पण ठीक,
तसे बरेच कापले अमा पण ठीक, मुंबईचे रेटस हाय फायच. मुलुंड मला खूप आवडतं विशेषत: ईस्ट. खूप आठवणी आहेत.
अंधेरीला शिफ्ट झाल्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा. मुलीबरोबर छान एंजॉय करा. अजून महागडया एरियात गेलात.
200000 - 42000 rent for
200000 - 42000 rent for August which I asked him to adjust - cost of repair of flat - cost of colouring. - cost of clean up due to dog pee smell. Also I couldn't clean up flat due to health issues. And he has promised to payout further oncecall is settled keeping only 10 k or so for his trouble.
Pages