Submitted by SharmilaR on 21 May, 2024 - 08:40
कवीची माफी मागून
मित्र???? (विडंबन)
पार्टी दे रे मित्रा कधी
त्या निमित्तानेच भेटत जा |
मनातलं वादळ तुझ्या
घरातच ठेवून येत जा||
रडगाणं तुझं आवर जरा
ते बंद दारामागे कोंबत जा ||
भार तुझा लखलाभ तुला
ते ओझं आमच्यावर नको जा ||
उरलेय थोडं आयुष्य अजून
तोंड बंदच ठेवत जा ||
भन्नाट हॉटेलिंग अन् नवीन डिल
आमचे जरा ऐकत जा ||
आणखीन ऐकायचं असेल तर
बिनधास्त फोन करत जा ||
ऐकवण्याची आमची मज्जा वेगळीच
तू आनंदाने ऐकत जा ||
चाळिशीच्या पलिकडले आपण
संपर्कात जरा रहात जा ||
पार्टीतले ड्रिंक चकणा
वेटरला ऑर्डर देत जा ||
खाण्यापिण्याची मजा सगळी
मैत्री त्याकरता मात्र जपत जा ||
आम्ही कसं मस्त जगतो
तसाच तूही मस्त जगत जा ||
पैसा जरा लागतो त्याला
पण तुझं रडगाणं मात्र दाबत जा ||
पार्टी दे रे मित्रा कधी
त्या निमित्तानेच भेटत जा ||
मनातलं वादळ तुझ्या
घरातच ठेवून येत जा||
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मित्र (मूळ कविता)
मित्र (मूळ कविता)
पार्टी नकोय मित्रा तुझी
येवून फक्त भेटत जा |
काय चाललयं मनात तुझ्या
भेटून फक्त बोलत जा ||
मोकळं सोड स्वत:ला जरा
कधीतरी मोकळं होत जा ||
हलकं वाटेल तुझच तुला
मन रिकामं करत जा ||
काय आहे आयुष्य अजून
निदान मनातले तरी वाटत जा ||
जुन्या आठवणी गप्पा गोष्टी
आमच्यात सुद्धा रमत जा ||
आले कधी वाईट विचार
बिनधास्त फोन करत जा ||
पहा किती फरक पडतो
आनंद जरा लुटत जा ||
चाळिशीच्या पलिकडले आपण
संपर्कात तेवढे रहात जा ||
काय हवं काय नको तुला
कुणाला तरी सांगत जा ||
मित्र असतात कशासाठी
मैत्री तेवढी जपत जा ||
आम्ही कसं मस्त जगतो
तसाच तूही मस्त जगत जा ||
पैसा नाही लागत त्याला
मनातले मात्र सांगत जा ||
पार्टी नकोय मित्रा तुझी
येवून फक्त भेटत जा ||
----------------------------
ही मूळ कविता कुणाची आहे हो?
ही मूळ कविता कुणाची आहे हो? मला परवा व्हॉट्सअपवर पुलंची म्हणून आली
>>> मला परवा व्हॉट्सअपवर
>>> मला परवा व्हॉट्सअपवर पुलंची म्हणून आली

एक्झिबिट नं. वन
एक्झिबिट नं. वन
ही मूळ कविता कुणाची आहे हो?
ही मूळ कविता कुणाची आहे हो? मला परवा व्हॉट्सअपवर पुलंची म्हणून आली Uhoh पुलंची नाही हे लगेच ओळखलं. >> मी शोधायचा प्रयत्न केला. एका site वर कविचं नाव होतं पण youtube वर आणखीन वेगळंच कुणी होतं.
म्हणून मग मी कविचं नाव लिहिलंच नाही.
मी वरचे विडंबन कॉपी पेस्ट
मी वरचे विडंबन कॉपी पेस्ट करून वपुंची कविता म्हणून पाठवतो आता !
लोहा लोहे को काटता है !
मला परवा व्हॉट्सअपवर पुलंची
मला परवा व्हॉट्सअपवर पुलंची म्हणून आली >> !!!!
वावे, ते एक्झिबिट "चुकीच्या नावाने आलेले फॉरवर्डस्" धाग्यावर टाकलं तर चालेल का?
दोनीही कविता छान. विडंबन
दोनीही कविता छान. विडंबन सहृदय केले असेल तर स्वतःचे स्थान निर्माण करते. ह्या विडंबनाबद्दलही असेच म्हणता येईल. हे विडंबन आहे हे सांगायची पण गरज नाही. तुमची कविता स्वतःच्या ताकदीवर उभी राहू शकते.
विडंबन आणि मूळ कविता दोन्ही
विडंबन आणि मूळ कविता दोन्ही छान..!