माझं जगणं,भोगणं सारं कळुदे आधी माझं मला!
धाऊदे,दमुदे,पडूदे अन् सावरुदे आधी माझं मला!
सगळे आधार संपतील तेव्हा तूलाच साद घालेन मी!
तू माझ्या काळजीने मात्र मदतीच्या पुढे धावू नकोस!!
कळुदे झळ मला आयुष्यात येणाऱ्या ऊन पावसाची!
सोसुदे कळ मला घावावर घाव बसलेल्या वेदनांची!
प्राक्तनाला माझ्या आहे तुझी साक्ष हीच माझी श्रद्धा!
माझ्या थेंबभर श्रद्धेला तुझा कृपेचा सागर देऊ नकोस!!
सुखात रमलो जेव्हा त्याची सवय लागू दिली नाहीस!
दुःखात बुडालो तेव्हा जीवन नांव हेलकावु दिली नाहीस!
नको शुभाचा मोह नको अशुभाचा मोक्ष मला!
तुझं देवपण सुध्दा माझ्या अंगवळणी पडू देऊ नकोस!!
असुदे तुझं असणं मात्र सदासर्वदा माझ्या भवतालात!
होऊदे मला तुझी जाणीव माझा प्रपंच्याच्या जंजालात!
शोधत राहीन रोज मी तुला तू स्वतः माझ्याकडे येऊ नकोस!
माझ्या पात्रतेच्या आधी देवा देव होऊन मला पावू नकोस!!
देवाक काळजी
Submitted by संदिप न. डिचोलकर on 3 May, 2024 - 05:46
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
पटली.
पटली.
छान...
छान...
सुंदर....
सुंदर....
सुंदर
सुंदर
छान.
छान.
छान!
छान!
>>> शोधत राहीन रोज मी तुला तू
>>> शोधत राहीन रोज मी तुला तू स्वतः माझ्याकडे येऊ नकोस!
आवडलं.
छान!
छान!
सुंदर!
सुंदर!
शोधत राहीन रोज मी तुला तू
शोधत राहीन रोज मी तुला तू स्वतः माझ्याकडे येऊ नकोस!
माझ्या पात्रतेच्या आधी देवा देव होऊन मला पावू नकोस!!
>>सुंदर!
ए, डिचोलकर कि डिचोलीकर?
ए, डिचोलकर कि डिचोलीकर?
नितांत सुंदर भाव.
नितांत सुंदर भाव.
अप्रतिम
अप्रतिम