पुणे अफाट, बेशिस्त आणि अनियंत्रित वाढतेय. आताच्या पुणेकरांना त्याचं विशेष वाटत नाही.
पण ज्यांनी जुनं पुणं अनुभवलं आहे त्यांना पुण्याचं हे रूप झेपत नाही. काहींना बदल हा नैसर्गिक आहे असे वाटते. अर्थात शहरात होणारे बदल नैसर्गिक कसे असू शकतात असा प्रश्न लगेचच विचारला जाऊ शकतो.
पेन्शनरांचे पुणे, विद्येचे माहेरघर,महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी इथपासून ते पेशवाईतली देशाची राजधानी अशी पुण्याची ओळख. माहितीच्या जालामुळे आता जुने फोटो उपलब्ध होत आहेत. आपल्या जन्माच्या आधी, बालपणी पुणे शहर कसे होते, आजूबाजूचा परीसर कसा होता हे पाहणे फक्त स्मरणरंजन म्हणून नाही तर माहितीपूर्ण सुद्धा आहे.
आताचा चांदणी चौक पाहिल्यावर १९९१ सालचा जुना चांदणी चौक पाहताना आश्चर्य वाटेल.
https://www.youtube.com/watch?v=q9kKhPjPd2Q
१९९१ सालच्या पौडरोड मधे २०२३ पर्यंत कसे बदल झाले आहेत ते पहा.
https://www.youtube.com/watch?v=JRWsWHunUuw
असेच उसासे सोडत इथे जुन्या आठवणींना जपूयात.
१९०७ साली एका विदूषकाचे अल्फोंसा ऑडी या प्रचिकाराने घेतलेले प्रचि.
२०० वर्षांपूर्वी पुणे
२०० वर्षांपूर्वी पुणे कॅण्टोन्मेण्ट
https://www.hindustantimes.com/photos/cities/a-walk-down-the-memory-lane...
शनिवारवाड्याचा जुना फोटो.
शनिवारवाड्याचा जुना फोटो. वाड्याच्या समोरच्या पटांगणात बाजार भरलेला दिसतो.
पर्वती टेकडी आणि तत्कालीन भवानी पेठ.
पुणे विद्यापीठाची इमारत बांधून तयार झालेली.
मेनस्ट्रीट, त्या वेळची मंडईची नवीन इमारत आणि येरवडा जेल, एस कोर्स .
पुणे रेल्वे स्थानक, बंड गार्डन, खडकवासला धरण
https://www.whatshot.in/pune/relive-the-olden-golden-days-of-poona-with-...
सर्व प्रचि प्रताधिकार असलेली आहेत. त्यामुळे लिंक देणे योग्य वाटते.
१९९१ म्हणजे "जुना काळ"
१९९१ म्हणजे "जुना काळ" म्हणावे लागेल असे तेंव्हा आणि नंतरही कधी वाटले नव्हते कारण जुने म्हणजे १९५०, १९०६० फार फार तर १९८० सुद्धा म्हणा वाटल्यास. पण ९० च्या पुढे जुने कसे?
पण आता आता मात्र खरंच तसे वाटू लागले आहे. परिस्थितीच इतकी बदलली आहे. पुण्यात इकडे कर्वे रस्ता, तिकडे नगर रस्ता, परत जुना पुणे मुंबई रस्ता या भागांत गेलं आणि मेट्रोची कामं बघितली की १९९० किती जुने झाले हे जाणवते.
मला आठवतंय. आणि ही आठवण मनात इतकी इतकी जिवंत आहे की अगदी काल घडल्यासारखेच. १९९५ च्या आसपास असेल. मी आणि माझा धाकटा भाऊ असे दोघेच पुण्याला राहणाऱ्या नातेवाईकांकडे आलो होतो. अगदी शाळकरी पोरसवदा वय होते. धाकटा तेंव्हा फार धडपड्या कडमडया होता. त्याने काढली नातेवाईक भावाची स्कुटर आणि मला म्हणाला चल बस मागे, येऊ फिरून. मी म्हणालो अरे नको लायसन्स नाही आपल्याकडे. तर म्हणाला अरे सिटीत नाही जायचे, नवीन पूल झालाय हलणारा, तो मला तुला दाखवायचा आहे, रहदारी अजिबात नाही तिकडे, कुणी ट्रॅफिक पोलीस सुद्धा नसतात.
मग काय. बसलो मागे आणि आम्ही नवीन पुलावर गेलो. केवढा मोठा पूल. आसपास कसलीही वस्ती नाही, पुलावर चिटपाखरू नाही. क्वचित एखादा ट्रक वगैरे यायचा आणि पुलावरून दण्णाट वेगात निघून जायचा. तेंव्हा तो पूल असा पूर्ण थरथरत असे. ते दाखवायला हा मला तिकडे घेऊन गेला होता. मला म्हणाला ह्याच रस्त्याने खूप खूप खूप पुढे गेले की तिकडे एनडीए आहे (तेंव्हा त्याला एनडीए चे प्रचंड आकर्षण होते).
तर मंडळी, हा पूल म्हणजेच बायपास रस्त्यावरचा "वडगाव ब्रिज" जिथे आज 24x7 वाहनांची मोक्कार वर्दळ असते व जो आज ट्रॅफिक जॅम साठी ओळखला जातो
काल पुण्यात होते, सासवडवरुन
काल पुण्यात होते, सासवडवरुन स्वारगेट हा प्रवास केला, स्वारगेटच्या समोर बसने सोडले. रस्ता क्रॉस करुन स्वारगेट डेपोत जायचे ह्या कामाला मला वट्ट १० मिनिटे लागली, त्या प्रयत्नात असताना कुठल्याही क्षणी बसच्या चाकाखाली किंवा कारच्या बॉनेटवर येईन ही भिती वाटत होती. आणि मी अशी भिगी बिल्ली बनुन जीव मुठीत धरुन रस्त्याच्या मध्यभागी उभी असताना पुणेकर मात्र रस्त्यावर गाड्या नाहीत असे गृहीत धरुन रस्ता ओलांडत होते. तो इवलासा रस्ता ओलांडायचा काहीतरी राजमार्ग असणार पण नवख्या माणसाला रात्रीच्या वेळेस तो दिसु नये याची सोय केलेली आहे.
चांदणी चौक आता पार ओळखु न येन्यापलिकडे गेलाय.
शनिवारवाड्याजवळचा कुठला तरी
शनिवारवाड्याजवळचा कुठला तरी घाट
१९९१ म्हणजे "जुना काळ"
१९९१ म्हणजे "जुना काळ" म्हणावे लागेल असे तेंव्हा आणि नंतरही कधी वाटले नव्हते >>>
function at() { [native code] }उलजी छान आठवण शेअर केलीत. १९९०च नाही २००३ पर्यंत ची जी आठवण आहे ती सुद्धा निवांतच आहे. सिंहगड रस्ता दुतर्फा झाडी असलेला, कोरेगाव पार्क येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या झाडीमुळे हिरवा बोगदा तयार झालेला असायचा. उन्हाळा कधी जाणवलाच नाही आणि पाऊसही लागला नाही.
चांदणी चौक आता पार ओळखु न येन्यापलिकडे गेलाय. >> +१
पुण्याची थेम्स नदी .
पुण्याची थेम्स नदी .
पुणे शब्द लिहिला की आपोआप
पुणे शब्द लिहिला की त्यांची आपोआप लिंक कशी काय होते?
पुणे म्हणले कि एक वेगळेच नाते
पुणे म्हणले कि एक वेगळेच नाते तयार होते. नुकतेच आज्जे सासु चे निधन झाले. वय वर्ष १००, सहज आमच्यात हा सम्वाद झाला कि अज्जीने पुण्याचे किति रन्ग पाहिले. आजच्या पिढि समोर 'आमच्या काळी अस न्हवत' हे म्हणन तस आढळून येत नाही. पण मला आठवतय हे मी किंव ९० च्या आधिच्या सगळ्यांनी ऐकले असावे. तस पुण्याची संस्कृती, मानपान्,खाद्य संस्कृती सगळ्यातच बदल झाला आहे.
कोथरुड, चांदणी चौक यातिल घड्लेले बदल अगदी जवळून पहिले आहेत.
योगायोगाने आजच 1991 मधल्या
योगायोगाने आजच 1991 मधल्या चांदणी चौकाचा व्हिडीओ पहायला मिळाला:
https://youtu.be/NEZjmPD0rI4
चांचौ चे हे रूप मी सुद्धा पहिल्यांदा बघितले
r/Pune reddit वर खराडी नको
r/Pune reddit वर खराडी नको रे बाबा म्हटलं आहे. 'नदी' आणि डास.