
नाचणी (पीठ नाही, अख्खी नाचणी) - दोन वाट्या
उकडा तांदूळ - दोन वाट्या
उडीद डाळ - एक वाटी
मेथीचे दाणे- अर्धा चमचा
चवीनुसार मीठ.
नेहमीच्या इडल्यांसाठी मी एक वाटी उडीद डाळीला चार वाट्या तांदूळ घेते. काही वर्षांपूर्वी आमच्या समोर एक तमिळ कुटुंब रहात असे. त्या काकूंच्या हातच्या इडल्या 'आहाहा' कॅटेगरीतल्या होत्या. सोबत चटणी किंवा सांबार, काहीही घेतलं नाही तरीही अतिशय चविष्ट लागायच्या. त्यांनी हे प्रमाण एकदा सांगितलं होतं आणि मी निष्ठेने (आणि प्रयोग करण्याच्या आळसाने) वर्षानुवर्षे याच प्रमाणाने इडल्या करते.
माझ्या अर्थातच त्यांच्यासारख्या भारी होत नाहीत, पण नक्कीच चांगल्या होतात. त्यांच्याकडे वेट ग्राईंडर होता, माझ्याकडेही आहे. डाळ-तांदूळ वाटून ठेवले की त्याच पिठाचे एकदा डोसे, एकदा इडल्या, पीठ उरलंच तर उत्तप्पे करते. डोशासाठी आणि इडलीसाठी वेगवेगळं प्रमाण घेण्याचे कष्ट घेत नाही.
डोसे-इडल्या दोन्ही छान होतात.
मात्र वाटलेलं पीठ मुळातच वेगवेगळ्या प्रमाणात पाणी घालून वेगवेगळं ठेवते. म्हणजे डोशासाठी जरा पातळसर करून एका भांड्यात, इडलीसाठी जरा घट्ट दुसऱ्या भांड्यात.
तुम्ही मिक्सरमध्ये डाळ-तांदूळ वाटत असाल आणि वेगळं प्रमाण घेत असलात तर तसंच घ्या. फक्त तांदूळ नेहमी जेवढे घेत असाल त्याच्या निम्मे घेऊन उरलेली नाचणी घ्या.
याचेच डोसेही छान होतात.
तुम्ही नेहमी इडल्या करत असलात तर कृतीत नवीन काहीही नाही. 
डाळ, तांदूळ, नाचणी वेगवेगळ्या भांड्यात भिजवून ठेवायचे. त्यातल्याच एका भांड्यात मेथीचे दाणेही घालून ठेवायचे. मी पाच तास ठेवते. तुम्ही नेहमी जेवढा वेळ ठेवता तेवढा वेळ ठेवा. नंतर नेहमीप्रमाणे वाटून घ्यायचं. मी तांदूळ आणि नाचणी एकत्र वाटते. त्यामुळे नाचणी चांगली वाटली जाते.
सगळं वाटून झालं की नीट एकजीव करून, चवीनुसार मीठ घालून फुगण्यासाठी ठेवून द्यायचं. शक्यतो रात्री. म्हणजे सकाळपर्यंत पीठ छान फुगतं. नाचणीमुळे पीठ लवकर फुगतं असा माझा अनुभव आहे. शिवाय सध्या उन्हाळा आहे. त्यामुळे पुरेशा मोठ्या भांड्यात पीठ ठेवलेलं चांगलं. नाही तर सकाळी उठल्यावर पीठ उतू गेलेलं दिसतं आणि वैताग येतो असा स्वानुभव आहे 
तर, पीठ पुरेसं फुगलं की डावेने हलक्या हाताने ते हळूहळू ढवळायचं. आतली थोडी हवा बाहेर जाते, पण पीठ चांगलं एकजीव, सरसरीत होतं. वाफवल्यावर इडल्या व्यवस्थित फुगतात. इडलीपात्रात पुरेसं पाणी घेऊन ते गरम करत ठेवायचं. इडलीच्या साच्याला प्रत्येक खळग्यात पुसटसा तुपाचा हात लावून त्यात पीठ घालायचं. पाण्याला उकळी आली की स्टँड आत ठेवून झाकण लावून बारा-तेरा मिनिटं इडल्या वाफवायच्या. वाफेच्या वासावरून समजतं, इडल्या झाल्या की नाही ते. झाल्या की स्टँड बाहेर काढून, तिरका करून आत साठलेलं वाफेचं पाणी काढून टाकायचं. प्रत्येक ताटली वेगळी करायची. थोड्या गार झाल्यावर इडल्या काढून घ्यायच्या. चटणी किंवा सांबाराबरोबर खायच्या 
फोटोत टॉमेटो चटणी आहे. नीधपची कृती आहे इथे. तशी केली आहे.
मी एकदोनदा नाचणी आणखी आदल्या दिवशी भिजवून, मग मोड आणून ती डाळ आणि तांदुळाच्या बरोबरीने वाटून बघितलं. ते बहुतेक जास्त पौष्टिक असावं. पण मग टेक्श्चर बिघडलं. चिकट झालं प्रकरण.
वर लिहिलेल्या कृतीने छान मऊ होतात. नाचणीचा विशिष्ट गावरान स्वादही लागतो.
अमुपरी मस्त दिसतायत इडल्या!
अमुपरी मस्त दिसतायत इडल्या! आपल्या दोघींच्या ताटल्याही सारख्या आहेत!
पेजेसाठी लाल किंवा पांढरा उकडा तांदूळ वापरतात >> ओह! मला वाटलं मऊभात.
लोकहो ठिपके ठिपके दिसले तरी सालपटं वगैरे तोंडात येत नाहीत नाचणीची! मी वेट ग्राईंडरवर वाटते. मिक्सरमध्ये वाटण्याचा अनुभव नाही मात्र.
तांदळाचा इन्टेक कमी करायचा म्हणून नाही.
छल्ला, पूर्ण नाचणीची इडली करून बघितली नाहीये. ही करून बघितली. नाचणी पौष्टिक असते हे तर आहेच, पण मला चवही आवडली म्हणून करते
अमुपुरी छान दिसताहेत
अमुपुरी छान दिसताहेत
मी पण आज केल्या पीठ व नाचणीचे पोहे घालून मऊ लुसलुशीत झाल्या
वॉव! काय कलर आलाय मंजुताई!
वॉव! काय कलर आलाय मंजुताई!
मस्त.
चॉकलेट इडल्या!
अग! हे बघ !https://www
अग! हे बघ ! हे same to same तुझी रेसिपी आहे फक्त काही वाक्ये बदलली आहेत असे वाटले. तू आधी पोस्ट केले आहेस व नंतर लोकसत्ता ने
https://www.loksatta.com/recipes/healthy-breakfast-recipes-indian-how-to...
हेच लिहायला आलो होतो
हेच लिहायला आलो होतो
हेच लिहायला आलो होतो
हेच लिहायला आलो होतो
काय हे!
मी लष्करच्या भाकऱ्या धाग्यावर लोकसत्तेतल्या चुका लिहिते त्याचा राग आला की काय त्यांना
जोक्स अपार्ट, मी निषेध नक्की नोंदवणार आहे लोकसत्तेकडे!
आणि मी गेले कैक वर्ष लोकसत्ता
आणि मी गेले कैक वर्ष लोकसत्ता वाचलेला नाही खरं तर किंवा अगदीच किरकोळ काही वाचते.. पण आज मला कशी काय बुद्धी झाली तर अगदी google website वगैरे उघडूनवाचत होते तर हे आले समोर! निषेध नोंदवा, बहुतेक ते दखल घेतील असे वाटतेय. किमान माफी तरी मागावी व कबुल करावे ही अपेक्षा!
वावे.. Ok
वावे..
फारच अगावपणा आहे हा लोकसत्ता चा !!!
एकेकाळी जरा सेंसिबल पेपर समजायचे मी त्याला!
काय हे!!!
नक्की निषेध नोंदव
कमाल आहे ... निदान क्रेडिट
कमाल आहे ... निदान क्रेडिट तरी द्यायचं ,
आणि हे लोकसत्ता वाले माबो फॉलो करतात की काय ? त्यांना कशी मिळाली ही रेसिपी ?
मंजु इडल्या एक नंबर दिसतायत.
तिथे निषेधाची प्रतिक्रिया
तिथे निषेधाची प्रतिक्रिया नोंदवली आहे. बघूया.
अंजली आणि भरत, हे आवर्जून त्वरित लक्षात आणून दिल्याबद्दल मी मनापासून आभारी आहे.
नक्की निषेध नोंदव.... +१.
नक्की निषेध नोंदव.... +१.
या मी केलेल्या चाॅकलेट ईडल्या
या मी केलेल्या चाॅकलेट ईडल्या.
मी फक्त उडीदडाळ ऐवजी मटकी डाळ वापरली. आणि पिठात जिरे , कढीपत्ता हिरवी मिरची फोडणी मिसळून दोन तासानंतर ईडल्या केल्या.
वावे, तुम्हांला घाबरून
वावे, तुम्हांला घाबरून त्यांनी नाचणीऐवजी हा , ही , हे ही सर्वनामं वापरली नाहीत, हे काय कमी आहे? त्या लाइ फस्टाइल न्युज डेस्कच्या इतर न्युजवर नजर फिरवली तर हा ही हू चा भरणा आहे.
छान आहे पाकृ.
छान आहे पाकृ.
भरत, तुमचा प्रतिसाद वाचून मी
भरत, तुमचा प्रतिसाद वाचून मी (पाताळविजयममधल्या राक्षसासारखी) हीहीहाहाहाहा अशी हसले
निषेध!
निषेध!
त्यानिमित्ताने शुद्ध सकस काही लोकसत्ताला मिळालं.
भरत,
सगळ्यांच्या इडल्या सुरेख.
सगळ्यांच्या इडल्या सुरेख.
वावे लोकसत्ताच्या पेजवर निषेध नोंदवून आलीस बरं केलं.
Btw आमच्याकडे मऊभात म्हणजेच मी जास्त करून गुरगुरीत भात म्हणते तो मी वर लिहिलेल्याच तांदुळाचा करतात सासरी, माहेरी. पेजेसाठीही तोच. उकडा नाही वापरत.
सगळ्यांच्या इडल्या मस्त. मि
सगळ्यांच्या इडल्या मस्त. मि मिक्सर मध्ये वाटले सालपटे नाही आली तोंडात...
सगळ्यांच्या इडल्या मस्त. मि
सगळ्यांच्या इडल्या मस्त. मि मिक्सर मध्ये वाटले सालपटे नाही आली तोंडात...
मस्त दिसतायत इडल्या. इथे
मस्त दिसतायत इडल्या. इथे कदाचित मिळत असेल अख्खी नाचणी. बघायला हवी.
तिथे निषेधाची प्रतिक्रिया
तिथे निषेधाची प्रतिक्रिया नोंदवली आहे. बघूया. >>> कुठे नोंदवला निषेध? ट्विटरवर loksattalive ला टॅग करा आणि निषेध नोंदवा अधिक इथे लिंक डकवा....आम्ही येतो रिट्विट करायला...
तिथे कमेंट लिहिली होती, 'सेंट
तिथे कमेंट लिहिली होती, 'सेंट फॉर मॉडरेशन' असं आलं होतं तेव्हा. पण त्यांनी प्रकाशित नाही केलेली.
नवीन प्रतिसादकांना धन्यवाद!
छानच आहे रेसीपी. मागे
छानच आहे रेसीपी. मागे गणेशोत्सवा त मिलेट पदार्थ होते त्यात टाकायला हवी होती. बक्षिस मिळाले असते. मी सर्व मिळून एक इडली खाते त्यामुळे इतका खटाटोप शक्य नाही. पण त्या क्युट दिसत आहेत. घरगुती साम्बारा सारखी मजा नाही. त्याची पण रेसीपी लिहा.
आजच केल्या
आजच केल्या
ह्यात १ वाटी तांदूळ, एक वाटि नाचणी, अर्धा कप उडीद दाल, अर्धा कप मुगडाळ आणि चिमूटभर मेथ्या असं प्रमाण आहे. सोबत खोबरे -कोथिंबीरिची चटणी
Pages