Astrophotography शिकायची आहे.

Submitted by बोकलत on 1 April, 2024 - 02:01

नमस्कार मित्रांनो. मला astrophotography शिकायची ईच्छा आहे. कसं सुरू करू कळत नाहीये. तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. धन्यवाद.

Group content visibility: 
Use group defaults

बराच चांगला कट्टा झाला आहे. सहा डॉप्सोनिअन आणि चार न्यूटोनिअन टेलिस्कोप आहेत. तंबू लावले आहेत.
.....
२५/२६ पहाटे चंद्र शनी,शुक्र जवळ येऊन हसरा चेहरा दिसणार होता. २५ला नव्हता. २६ला नक्की दिसणार म्हणून उत्कंठा होती. पण आभाळ नव्हेच तर पाऊसही पडला , चेहरा रडला.

धन्यवाद @ ऋन्मेऽऽष Happy
धन्यवाद @ srd. सकाळी चार साडेचारच्या आसपास शुक्र दिसत होता पण शनी आणि चंद्राचा पत्ता नव्हता. रात्री दोनच्या सुमारास पावसाचे जरा थेंब पडले पण लगेच बंद झाले. वातावरण ढगाळ होतं पण ३ नंतर मस्त आकाश दिसलं.

काल रात्री गावी लाईट गेली आणि ताऱ्यांची जी काय आरास समोर आली की ज्याचे नाव ते. सगळे फोटो आयफोन १६ प्रो. ३० sec एक्सपोजर.

अँड्रोमेडा गॅलॅक्सी
IMG_2106.jpeg

ओरायन नेब्युला
IMG_2110.jpeg

अति सुंदर फोटो. आइफोनच्या कॅमेऱ्याचीही कमाल आहे.

'९५ त्या अगोदर अँड्रोमेडा गॅलॅक्सी ओरायन M42 डोळ्यांनी दिसत असे डोंबिवलीतून. तर इतर चांगल्या ठिकाणांहून किती छान असेल.

_/\_ धन्यवाद Happy
लहानपणी लाईट जायची तेव्हा जे आकाश दिसायचं त्याला तोड नाही.

भुजला गेलो होतो तिथले फोटो. कॅनन ६d कॅमेरा. १६-३५ वाईड अँगल लेंस
स्टार ट्रेल पावणे दोन तासांचा
87f64c2b-6a89-4e25-9f2e-65c1a568628c.jpeg

मिल्की वे
71f37cc2-8822-41ca-8b5b-70b48cd8e24a.jpeg

Pages