रॉजर फेडरर...

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

रॉजर फेडरर... ग्रेटेस्ट एव्हर? हा विचार मायबोलिवरच नाही तर जगातल्या सर्व टेनिसप्रेमींच्या मनाला गेल्या काही वर्षापासुन चाटुन जात आहे. पण आपल्या लागोपाठच्या चौथ्या फ्रेंच ओपन फायनलमधे.. यंदाचे फ्रेंच ओपन(एकदाचे!) जिंकुन व पिट सँप्रासच्या १४ ग्रँड स्लॅमच्या विक्रमाची बरोबरी करुन.. त्याने आपल्या चाहत्यांनाच नाही तर त्याच्या कित्येक टिकाकारांना त्याचे उत्तर दिले आहे... पण माझ्यासारख्या असंख्य फेडरर चाह्त्यांच्या मते त्याने ग्रेटेस्ट एव्हर हा किताब केव्हाच पटकावला आहे...:)

माझ्या ख्रिस एव्हर्टच्या लेखामधे लिहील्याप्रमाणे कुठल्याही खेळात ग्रेटेस्ट एव्हर हा किताब वादाचा असु शकतो. पण माझ्या मते पुरुष टेनिसपटुंमधे मी फेडररलाच तो मान देइन्.(निदान मी पाहीलेल्या टेनिसपटुंमधे तरी.... मग त्यात बोर्ग्,कॉनर्स्,मॅकेन्रो,बेकर्,लेंडल,विलँडर,एडबर्ग्,सँप्रास,अ‍ॅगॅसी ,फेडरर व नादाल हे सगळे आले)त्याचे कारण एकदम साधे आहे.. माझ्या मते कुठल्याही खेळातल्या सर्वोत्तम खेळाडुमधे एक गोष्ट समान असते... ते जेव्हा त्यांचा खेळ खेळत असतात तेव्हा आपल्यासारख्या सर्वसामान्य पामरांना त्यांचा खेळ बघुन(उगाचच!) असे वाटु लागते... अरेच्या! यात काय आहे? हा खेळ खेळायला किती सोप्पा आणि सरळ आहे!मीसुद्धा असे सहज खेळु शकेन असा विचार(खर म्हणजे भ्रम!) आपल्या मनात येउ लागतो.टायगर वुड हे त्याचे उत्तम उदाहरण होय! तुम्ही कोणी जर टायगर वुडला गॉल्फ खेळताना पाहीले असेल तर तुम्हाला नक्कीच कळेल मला काय म्हणायचे आहे ते...

मी वर नमुद केलेले सर्व टेनिसपटुं हे टेनिसच्या इतिहासात गाजलेले व अतिशय गुणवान टेनिसपटु आहेत व होते यात वादच नाही ...पण फेडरर हा एकच असा टेनिसपटु आहे की जो मी दिलेल्या सर्वोत्तम खेळाडुच्या व्याखेत एकदम चपखल बसतो! त्याचे टेनिस बघताना सगळ्यांना असे वाटत असते की टेनिस खेळ हा किती सोप्पा आहे! त्याच्या कुठल्याही मॅचमधे तुम्ही त्याला बघा... ही हार्डली ब्रेक्स अ स्वेट! आणी... हा हा म्हणता... गेम, सेट अँड मॅच फॉर हिम!(आणि तेही स्ट्रेट सेट्स मधे... बहुतेक वेळा! हेही ध्यानात घ्या...)आणि तेच तुम्ही त्याच्या प्रत्येक विरोधी खेळाडुकडे बघा... ते दमछाक होत.. . फेडररने मारलेल्या फटक्यांच्या आवाक्यात जाण्यासाठी.. कोर्टच्या चारी दिशेने अक्षरशः पळत असतात.. बरेच वेळा तो असे प्रतिस्पर्ध्याना पळवत असताना.. त्याच्या प्रतिस्पर्ध्यांची आपल्याला खरच खुप दया येउ लागते.(खरे सांगा...अँडि रॉडिक फेडररबरोबर खेळत असताना.. तुम्हाला रॉडिकची अशी दया किती वेळा आली?:)त्यावेळी आपण मांजर आणि उंदिर यांच्यातला खेळ बघत आहोत असेच वाटते..

फेडररशी तुलना करताना मी वर नमुद केलेल्या खेळाडुंचे वर्गीकरण साधारणपणे ३ वर्गात करता येईल..

१: कलात्मक व नजाकती टेनिसपटु... या वर्गात बोर्ग, मॅकेन्रो,विलँडर व एडबर्ग बसु शकतील

२: पॉवर टेनिसपटु... या वर्गात बेकर व सँप्रास येतात

३: स्वेट अँड ब्लड टेनिसपटु... लेंडल( अ फिटनेस फॅनॅटिक व फिटेस्ट टेनिस प्लेयर ऑफ हिज जनरेशन!)कॉनर्स व अ‍ॅगॅसी हे या वर्गातले.. (नेव्हर से डाय व अल्टिमेट वॉरिअर्स!)

आता तुम्ही संभ्रमात पडला असाल की मी फेडररचे नाव या वरच्या तिनही वर्गात नमुद का केले नाही ? आणि खर म्हणजे यातच फेडररची खरी महानता आहे.. तो या वरच्या तिनही वर्गात सहज बसु शकतो.. ही इज रिअली अ फाइन अमाल्गम ऑफ ऑल ३ कॅटॅगरीज!.. त्याच्या खेळात कला व नजाकत याबरोबरच ग्रेट फिटनेस व जबरी पॉवर सुद्धा आहे(तो स्लिम पण मस्क्युलर तर आहेच बट ही इज ऑल्सो सपल अँड निंबल ऑन हिज फिट टु!) व २००६,२००७ व २००८ च्या फ्रेंच ओपन फायनलमधे नादालने जेव्हा त्याचा घाम गाळला... तेव्हा त्याने हेही दाखवुन दिले होते की व्हेन मेड टु स्वेट .. हि कॅन डु दॅट ऑल्सो! पण त्याच्या महानतेमुळे त्याला क्वचितच असा घाम गाळायला लागतो(नादाल बरोबरचे सामने हा त्याला एकमेव अपवाद आहे!). त्याची सर्व्हिससुद्धा एकदम फसवी आहे... त्याला सर्व्हिस करताना आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला असे वाटते की तो बूम बूम बेकर किंवा पिस्तोल सँप्रास किंवा गोरान इव्होनोव्हिक किंवा अँडि रॉडिकसारखी सर्व्हिस करु शकणार नाही..पण तुम्ही पाहिलेत तर तुम्हाला आढळुन येइल की सातत्याने त्याची सर्व्हिस ही.. त्या ग्रेट सर्व्हिस करणार्‍यांसारखीच... वेगवान व अचुक पडत असते. म्हणुनच त्याचा खेळ कधीच इतरांसारखा वन डिमेन्शनल वाटत नाही... आणि त्यातच तो आत्तापर्यंतचा(निदान माझ्या पाहण्यातला तरी!) सर्वोत्तम टेनिसपटु का आहे याचे उत्तर दडलेले आहे.

खर म्हणजे या वर्षी नादाल्-फेडरर असा फ्रेंच ओपन अंतिम सामना परत एकदा व्हावा अशी माझी मनोमन इच्छा होती.. पण सोडरलिंगने नादालला हरवुन सगळ्यांचीच निराशा केली... फेडररने जर नादालला रोलँड गॅरसवर हरवुन फ्रेंच ओपन विजेतेपद मिळवले असते तर त्यालाही बरे वाटले असते मला वाटते.. कारण फेडररच्या ग्रेटनेसबद्दल शंका घेणार्‍यांना बोलण्यास अजुन वाव आहे की जोपर्यंत फेडरर नादालला रोलँड गॅरसवर हरवत नाही तोपर्यंत त्याला सर्वांगीण व सर्वोत्तम खेळाडु म्हणता येणार नाही...

ते काही म्हणोत बापडे.... मला तुमचे माहीत नाही.. पण फेडररचा खेळ बघायला मिळणे व त्याची दैदिप्यमान व विक्रमी कारकिर्द्रिची वाटचाल आपल्या डोळ्यासमोर उलगडत असताना.. या जगात हजर असणे... हे मी माझे भाग्य समजतो.... जस्ट हॉप ऑन अँड.. एन्जॉय द राइड!:)

विषय: 
प्रकार: 

जबरी.. ! खरं तर मी काल प्रतिसाद लिहीला होता.. पोस्टच नाही केला की काय? Uhoh
मुकुंद, 'तुम्ही' 'फेडरर' वर लिहीले आहे आणि अजुन काहीच कसे प्रतिसाद नाहीत? कुठे गेले सगळे टेनिस प्रेमी? Happy
अँडी रॉडीकची दया येणे वगैरे अगदी पटलं.. इतका बिचारा वाटतो तो याच्या समोर! Lol

www.bhagyashree.co.cc

वा.. मस्त लिहिलय.. Happy

तुम्हाला रॉडिकची अशी दया किती वेळा आली?:) >>> अगदी अगदी... आधी मला त्याचा राग यायचा.. पण नंतर दया यायला लागली... Happy

म्हणुनच त्याचा खेळ कधीच इतरांसारखा वन डिमेन्शनल वाटत नाही >>>> इतर म्हणजे कोण ?? माझ्यामते बेकर, सँप्रस, अगासी ह्यांचा खेळ पण वन डिमेन्शनल नव्हता... सँप्रस च्या बाबतीत काही जण आक्षेप घेतील की तो खूप मोनोटोनस खेळायचा म्हणून.. ( पण मला तसं वाटत नाही Happy ) आणि बेकर आणि अगासी तर नव्हतेच मोनोटोनस..

मस्त लिहिले आहेस मुकुंद Happy

छान लिहिले आहे मुकुंद... Happy
अजून थोडे सविस्तर लिहायला हवे होते असे वाटले...

रॉडिकबद्दल एकदम सहमत... अक्षरशः दया येते त्याची...

अडमा, मला सॅम्प्रासचा खेळ वाटायचा थोडा मोनोटोनस... नंतर नंतर असं झालं की तो सर्व्हिस करायचा आणि नेटवर यायचा... पॉईन्ट मिळाला तर मिळाला, नाहीतर नाही. रॅलीज व्हायच्याच नाहीत फारशा..

अगासीचा मात्र कधीच मोनोटोनस नाही वाटला.. Happy

हे फार पूर्वी असेच लिहिले होतेस जवळ जवळ ह्याच शब्दांत, मुकुंद! की माझ्याच डोक्यावर 'तेच ते' चं भूत बसलय Uhoh चांगल लिहिलयस अर्थात!

मुकुंदाख्यान ची सवय असल्याने की हे म्हणजे 'अध्यक्ष महाराज' अशी सुरुवात करुन एकदम 'जय हिंद ' म्हटल्यासारखं वाटलं Happy
सुरुवात झाली म्हणता म्हणता संपून गेला लेख

मस्त लिहीलं आहे!!! Happy Happy

जोपर्यंत फेडरर नादालला रोलँड गॅरसवर हरवत नाही तोपर्यंत त्याला सर्वांगीण व सर्वोत्तम खेळाडु म्हणता येणार नाही...
अनुमोदन... Happy

अर्रर.. माझ्या सगळ्यात आवड्त्या टेनीसपटुबद्दलचा इतका उत्कृष्ट लेख आणि मी आज पहातोय.. मुकुंद .तुम्ही फेडीच्या खेळाचे अगदी तंतोतंत वर्णन केले आहे... तो महान आहे आणि ग्रेटेस्ट एव्हर आहे यात वाद नाहीच...

नदालला हरवुन जरी त्याने हे विजेतेपद जिंकले नसले तरी नदालला हरविणार्‍याला सहजपणे हरवुन ते जिंकलय हे आपण विसरता कामा नये.. :)..

बाकी लेख मस्तच.. Happy

ओके आहे.
"फेडररच्या ग्रेटनेसबद्दल शंका घेणार्‍यांना बोलण्यास अजुन वाव आहे की जोपर्यंत फेडरर नादालला रोलँड गॅरसवर हरवत नाही तोपर्यंत त्याला सर्वांगीण व सर्वोत्तम खेळाडु म्हणता येणार नाही"

हे काय पटले नाही. असे असेल तर आत्तापर्यन्तच्या कोणत्याच खेळाडूला 'सर्वोत्तम' म्हणता येणार नाही. क्ले कोर्ट वर विजेतेपद मिळवले यातच सगळे आले. खरे तर सलग २० स्लॅम्समध्ये semifinal ला पोचणे ही फेडररची मोठी अचीव्हमेन्ट आहे. त्याचा उल्लेख आला नाही.

विलँडर, एडबर्ग नजाकती, बेकर पॉवर?? Happy अर्थात हे ते "सापेक्ष" की काय तसे असावे.

अजून थोडे सविस्तर लिहायला हवे होते असे मलाही वाटते. तो ख्रिस एव्हर्टवरचा लेख वाचून तसाच आनंद फेडररविषयी वाचून मिळावा असे वाटत होते.
ग्रेटेस्ट एव्हर हे मात्र पटले. Happy

मस्त लेख. पण खरच थोडा अजून सविस्तर पाहिजे होता....खरेतर फेडरर बद्दल कितिही लिहिले तरी ते थोडेच वाट्णार कायम!

फेडररसारख्या (ग्रेटेस्ट!) टेनिसपटुबद्दल हा लेख थोडक्यात आटोपुन सगळ्यांचा विरस केला याबद्दल क्षमस्व.. पण लेखाचे शिर्षक देण्यात माझी चुक झाली.. रॉजर फेडरर.... १४ स्लॅम्स अँड काउंटिंग! असे लिहायला पाहीजे होते. त्याची विक्रमी कारकिर्द्र अजुन अस्तास गेली नाही म्हणुन ख्रिस एव्हर्ट वर लिहीले तसे याच्या सबंध कारकिर्द्रिचा आढावा या वरील लेखात घेतला नाही. त्यामुळे नुसत्या आकडेवारीपेक्षा त्याच्या खेळाची तुलना इतर महान टेनिसपटुंबरोबर करायचा या लेखाचा हेतु होता..

रॉजर फेडरर निवृत्त! Sad

हे एक दिवस होणारच होते हे माहीत असुनही मला स्वतःची एक मौल्यवान गोष्ट हरवल्यावर जसे वाटेल तसेच काहीतरी वाटत आहे! Sad

फेडरर.. तुला मानाचा मुजरा! तुझा अप्रतिम खेळ बघताना तु मला व तुझ्या जगभरच्या चाहत्यांना जो आनंद देउन गेलास त्याबद्दल धन्यवाद! टेनिस ग्रँड स्लॅम टुर्नामेंट मधले असंख्य विकांत तुझा खेळ बघण्याने कायमचे माझ्या मनात घर करुन गेले आहेत. त्यात तुझ्यात व नदालमधे झालेले व तुझ्यात व जोकोव्हिक बरोबर झालेले अजरामर सामने मीच काय पण कोणताही टेनीसप्रेमी कधीच विसरु शकणार नाही!

अश्या या फेडररचा खेळ प्रत्यक्ष याची देही याची डोळा बघण्याचे भाग्य मला न्यु यॉर्क मधे फ्लशींग मेडोज ला २००४ यु एस ओपन क्वार्टर फायनल( फेडरर वि. अ‍ॅगॅसी) बघताना लाभले होते!( मला फक्त पहिले ३ च सेट बघायला मिळाले, ३ सेट नंतर पाउस आला व मग सामना स्थगीत होउन शेवटचे २ सेट दुसर्‍या दिवशी खेळले गेले होते ज्यात फेडरर जिंकला)

फेडररच्या निवृत्तीच्या बातमीमुळे १३ वर्षांपुर्वी त्याच्याबद्दल मीच लिहीलेला लेख पुन्हा एकदा वर काढावासा वाटला. टेनीस व फेडरर प्रेमींनी त्यांना भावुन गेलेल्या फेडररच्या आठ्वणी इथे लिहील्या तर या लेखाचे सार्थक होइल असे मला वाटते!

तर चला मंडळी.. येउ द्यात तुमच्या पोतडीतल्या फेडररच्या आठ्वणी!

मुकुंद , अगदी मनातले लिहिलेत . जोपर्यंत निवृत्ती ची अधिकृत बातमी येत नाही , तोपर्यंत कुठेतरी फेडरर ची मॅच बघता येईल अशी आशा असायची . तीही काल संपली . विम्बल्डन मध्ये 6-0 ने तो हरला तेव्हाच वाटले होते , असे कधीतरी होणार .

टेनिस मध्ये मध्यंतरी इंटरेस्ट कमी झाला होता , फेडरर आल्या पासून परत वाढला होता ..
मला आठवतंय लेले सरांनी एक आठवण लिहिली होती -
एका स्पर्धे मध्ये स्वतः टेनिस प्लेअर ने जाऊन प्रॅक्टिस साठी ग्राउंड बुक करण्याचा नियम होता , फेडरर ने जाऊन मला हे ग्राउंड प्रॅक्टिस साठी हवे आहे असे सांगितले आणि निघाला , आणि थोडे पुढे गेल्यावर परत मागे येऊन त्याने बुक करणाऱ्या माणसाला सांगितले - नाव सांगायचे राहिले , मी रॉजर फेडरर !

इतके यश मिळवून इतका डाउन टू अर्थ !!