
लहानपणी कार्यालयांत ‘'वाजंत्री बहु गलबला न करणे' झाले की सनईची कॅसेट लागायची. ती बिस्मिल्ला खान यांच्यासारख्या दिग्गजांची असणार याचे भान असण्याचे ते वय नव्हते आणि अतिपरिचयात अवज्ञाही असेल पण सनई शुभ प्रसंगी असते एवढीच तिची दखल. आम्ही लग्नाच्या वयात आलो आणि कार्यालयातही सनई वाजायचे बंदच झाले.
अचानक एक दिवशी 'ये जो देस है तेरा' ऐकले आणि काहीतरी हलले आत. तेव्हा समजले की व्हायोलिनसारखे भावनांचे कल्लोळ निर्माण करू शकते सनई
माझी काही आवडती गाणी ज्यात सनईचे सूर कदाचित प्रॉमिनंट नसतील पण जेव्हा गाण्यात ते येतात तेव्हा इतके चपखल बसतात की ते गाणे त्या सुरांचेच होऊन जाते.
सेहरामधले 'तक़दीर का फ़साना' आणि रामलाल यांची जीवघेणी सनई
'रुक जा रात' मधल्या इम्प्रेसिव्ह ऑर्केस्ट्रामध्येही शंकर जयकिशन टाळू शकले नाहीत ती सनई
कभी कभी मधल्या राखीच्या भावना व्यक्त करणारी
संजय लीला भन्साळीलाही लाल इश्क मध्ये सनईच्या मोह आवरला नाहीये.
बेसूर वैवाहिक जीवनाला सुरेल करणारे मोह मोह के धागे. तिथे सनईशिवाय काय चपखल बसणार?
‘रंगरेज़ मेरे’ मधले एकमेकांना छेडणारे सनई आणि सारंगीचे सूर - काहीसे अनवट कॉम्बिनेशन
बनारस आणि सनईचे अतूट नाते - रांझणा मधली मृदुंग आणि टाळाच्या सोबतीने येणारी सनई
‘भातुकलीच्या खेळामधली’ सनई
टाईमपास २ मधल्या ‘सुन्या सुन्या मनामध्ये’ गाण्यातली सनई
यंटम (असा चित्रपट आहे) मधले चिनार महेश यांनी संगीतबद्ध केलेले 'सॉन्ग ऑफ लाईफ'
बस्ता चित्रपटातील मंगलाष्टकात वाजवलेली सनई
थोडं पुढे मागे झालं असेल पण मी ऐकलेल्या पहिल्याच सुश्राव्य मंगलाष्टकाचा मानही यालाच मिळतो.
आणि या सर्वांपेक्षा वेगळी रॉकस्टार मधली सनई आणि गिटारची जुगलबंदी - डायकोटमी ऑफ फेम
रणबीर कपूरच्या अँग्स्टला काहीसे शांतवणारे पंडित बल्लेश यांच्या सनईचे सूर. एकेकाळच्या रॉकस्टार शम्मी कपूरला उस्तादाच्या भूमिकेत पाहणे हा सुखद धक्का
सनईचे सूर असलेली कोणती गाणी तुम्हाला आवडतात?
मस्त!
मस्त!
तकदीर का फसाना आणि ये जो देस है तेरा मधला चपखल वापर लक्षात आहे. मला शालू हिरवा मधली सुद्धा आवडते (ती सनई च असावी)
https://www.youtube.com/watch?v=c42zLVLNHdA
सनई म्हटलं की लगेच ठराविक
सनई म्हटलं की लगेच ठराविक गाणी आठवतात. पहिलं म्हणजे, गूंज उठी शहनाई मधील ' तेरी शहनाई बोले'. नवरंग मधलं ' तू छुपी है कहाॅऺ मैं तडपता यहाॅऺ' म्हणताना तर आपोआपच सनई चे सूर म्हटले जातात. ' चल उड जा रे पंछी कि अब ये देस हुवा बेगाना ' , ' चल रही सजनी अब क्या सोचे ' ( बंबई का बाबू) आणि ' बाबुल की दुवाऐं लेती जा' मधील सनईच्या आर्त स्वरांमुळे गाणी नुसती ऐकूनच भावना आपल्यापर्यंत पोहोचतात.
सनई म्हंटले की स्व देस मधली
सनई म्हंटले की स्व देस मधली ये जो देस है तेरा मधले स्वर प्रकर्षाने आठवतात. अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी येते.
सनईचा वापर केलेले मराठी
nछान माहिती
छान माहिती. फुलले रे क्षण
छान माहिती. फुलले रे क्षण माझे गाण्यातलीही सनई मला आवडते.
बरीचशी गाणी चित्रपटात करुण प्रसंगी किंवा लग्नकार्यात वगैरे (अर्थात करुण प्रसंगी) वाजतात, त्यामुळे त्या आवाजाला कारुण्याची झालर आहे अशी समजूत आपल्या मेंदूने वर्षानुवर्षे करून घेतलेली असते. अश्या वेळी स्वदेसची सनई आपल्या पारंपरिक समजुतीला छेद देऊन जाते त्यामुळे सुखद अनुभव येतो.
तेरे सूर और मेरे गीत..
तेरे सूर और मेरे गीत.. लताबाईंच्या गळ्यात आहेच, पण चित्रपटाच्या नांवातंहि सनई आहे...
‘झुबैदा’मधलं ‘मेहंदी है
मस्त!
‘झुबैदा’मधलं ‘मेहंदी है रचनेवाली’
तकदीर का फसाना मधली सनई फारच
तकदीर का फसाना मधली सनई फारच सुंदर आहे. त्यावरून एक धागाही काढलाय.
चित्रपट संगीतातील सौंदर्यस्थळे - राग, ताल, म्युझिक पीसेस https://www.maayboli.com/node/79610
लिखनेवाले ने लिख डाले....
लिखनेवाले ने लिख डाले.... गाण्यातही सुरेख सनई वाजते.
छान धागा.
छान धागा.
<<त्यामुळे त्या आवाजाला कारुण्याची झालर आहे अशी समजूत आपल्या मेंदूने वर्षानुवर्षे करून घेतलेली असते. >> त्यामुळेच नव्हे पण लहानपणा पासुन सनई, व्हायोलीन वाद्ये ऐकायला आवडतात पण उदासही वाटते.
मलाही स्वदेस मधील सनई विशेष आवडते.
फारएण्ड, अनघा_पुणे, राज,
फारएण्ड, अनघा_पुणे, राज, भ्रमर, स्वाती_आंबोळे, हपा, मनमोहन, मामी धन्यवाद…
‘गुंज उठी शहनाई’ बिस्मिल्ला खान यांचीच. अप्रतिम हे वेगळे सांगणे नको.
‘शालू हिरवा’ येस्स.. किती दिवसांनी ऐकलं हे गाणं…’चल री सजनी’ही. ‘मेंहदी है रचनेवाली’ नी ‘फुलले रे’मधली सनई विसरलेच होते.
‘तू छुपी है कहां’ आणि ‘बाबूल की दुआएं’ मधली सनई अप्रतिम पण मला ती गाणी नाही आवडत.
@मामी>>> तुमचा धागा मस्त आहे.
लग्नकार्यात वगैरे (अर्थात करुण प्रसंगी) @हपा >>>>
‘यंटम’मधले अजून एक इंस्ट्रुमेटंल ’विंडस् ऑफ चेंज’ ऐका लोकहो. अचानक मराठी चित्रपटात २ सनई इंस्ट्रुमेटंल ऐकून आश्चर्य वाटले होते. कथानकानुसार हिरोचे वडील (सयाजी शिंदे) फेडिंग सनईवादकाची भुमिका करताहेत हे नंतर समजले.
>>>‘यंटम’मधले अजून एक
>>>‘यंटम’मधले अजून एक इंस्ट्रुमेटंल ’विंडस् ऑफ चेंज’ ऐका लोकहो. अचानक मराठी चित्रपटात २ सनई इंस्ट्रुमेटंल ऐकून आश्चर्य वाटले होते. कथानकानुसार हिरोचे वडील (सयाजी शिंदे) फेडिंग सनईवादकाची भुमिका करताहेत हे नंतर समजले.>>> हे क्लॅरियनेट वाटले
छान धागा, छान संकलन
छान धागा, छान संकलन
मनमोहन - सनई म्हंटले की स्व देस मधली ये जो देस है तेरा मधले स्वर प्रकर्षाने आठवतात. अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी येते.
>>>>>
अगदी +७८६
बाहेर राहणार्यांना कदाचित हे आणखी प्रकर्षाने जाणवत असेल.
@रेव्ह्यू >>> मी फारसे
@रेव्ह्यू >>> धन्यवाद. मी फारसे क्लॅरनेट ऐकले नाही. थोडंफार ऐकलेय ते पाश्चात्य. त्यामुळे फारसे समजत नाही मला. फक्त क्लॅरनेटच्या नोट्स शार्प वाटतात आणि सनईच्या सुरांत एक गोलाई जाणवते. आता ऐकल्यावर या गाण्यात सुरुवातीचा मुखडा सनई असू शकते आणि मग (अंतरा) क्लॅरनेट असे वाटते.
तुम्ही काही गाणी सांगा ना क्लॅरनेटची.
>>>>>>त्या आवाजाला कारुण्याची
>>>>>>त्या आवाजाला कारुण्याची झालर आहे अशी समजूत आपल्या मेंदूने वर्षानुवर्षे करून घेतलेली असते.
मला तरी सनईचे सूर नेहमी मंगलच वाटत आलेले आहेत. हां ती सारंगी वगैरे करुण वाटते.
ती सारंगी वगैरे करुण वाटते.>>
ती सारंगी वगैरे करुण वाटते.>>>
कारुण्य तर स्थायीभाव आहे सारंगीचा कारण बहुतेकदा सारंगी असलेली गाणी तवायफच्या संदर्भात असतात. पण प्रसंगी टिझिंग क्वचित रोमॅन्टिकही वाटते.
>>>>>>कारुण्य तर स्थायीभाव
>>>>>>कारुण्य तर स्थायीभाव आहे सारंगीचा कारण बहुतेकदा सारंगी असलेली गाणी तवायफच्या संदर्भात असतात.
अगदी हेच्च!!!
@सामो : विपू पहा.
@सामो : विपू पहा.
सावरिया मध्ये माशा अल्ला ह्या
सावरिया मध्ये माशा अल्ला ह्या गाण्यात शेवटी येणारी खूप खूप आवडते. २.२१ नंतर पहा
https://www.youtube.com/watch?v=q5Mecg0ycWk
सनई म्हंटले की स्व देस मधली ये जो देस है तेरा मधले स्वर प्रकर्षाने आठवतात. अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी येते. >> अगदी अगदी. अमेरिकेत शिफ्ट झाल्यावर सुरवाती-सुरवातीला हे गाणे खूप डोळ्यात पाणी आणत असे आणि घरची आठवण करून देत असे.
सनईचे सूर नेहमी मंगलच वाटत
सनईचे सूर नेहमी मंगलच वाटत आलेले आहेत >> हो बरोबर आहे, पण मी लग्नाला मंगल प्रसंग न म्हणता करुण प्रसंग म्हटल्याने ते त्या सदरात पडलं.
माझेमन, विपू जस्ट पाहीली.
माझेमन, विपू जस्ट पाहीली. ऐकते
हाहाहा.
------
खरच काय सुंदर पिस आहे गं. यु मेड माय व्हॅलेन्टाईन डे इव्हन मोअर गुलाबी
चुकुन अवीट गोडीच्या धाग्यात
चुकुन अवीट गोडीच्या धाग्यात पोस्टला होता हा प्रतिसाद. फार अस्थायी नव्हता म्हणा
पहेली सिनेमातले आधि रात जब चांद ढले और कोइ ना हो पिछवाडे मे हे गाणं. यात जेव्हा राणिच्या बिदाई ची वेळ येते तेव्हाचं कडवं माझं सर्वात फेवरेट आहे ( गुडीया पटोले मोरे पासून). पहिली २ कडवी स्किप करून मी हे कडवं डायरेक्ट ऐकतो. या कडव्याच्या शेवटी (साधारण ४:५४ मिनिटापासून) असलेले सूर बहुतेक सनईचेच आहेत आणि माझे फेवरेट आहेत.
https://www.youtube.com/watch?v=0XFFOBzJ3aw
आ_रती >>> माशा अल्ला मस्तच.
आ_रती >>> माशा अल्ला मस्तच. मलाही आवडतो तो स्कोअर.
प्रवीणपा >>> गाणे छान आहे. मी पहिल्यांदाच ऐकले. सनईही सुंदर.