आपल्या रोजच्या रुटीन मध्ये, घाई गडबडीत अनेक कचऱ्यात टाकण्या योग्य गोष्टी निर्माण होतात.त्यांच्या बद्दल हा धागा.
१. कचरा ओला+अधिक सुका मिश्र असेल (उदाहरणार्थ बिर्याणी पार्सल मध्ये बिर्याणी, प्लास्टिक पिशवीत ग्रेव्ही, दही,कांदा, लोणचे/ढोकळा समोसा बरोबर मिळणाऱ्या चटण्या/विकतच्या इडली डोसा पार्सल घेतल्यावर मिळणाऱ्या अनेक पिशव्या सांबार चटणी आणि लाल चटणी), तर वर्गीकरण कसे करता?घरात मदतनीस असेल तर त्यांना हे वर्गीकरण करायला कसे पटवता?
२. पर्सनल हायजीन च्या गोष्टी (प्लास्टिक टूथ ब्रश, इयर बड, हेअर कलर पाकिटात मिळणारे अनेक प्लास्टिक मोजे, रेझर्स) टाकताना काय करता? काही वेगळे रिसायकल चे विचार डोक्यात येतात का?(काही जण जुन्या झालेल्या बाद टूथ ब्रश ने बेसिन घासतात किंवा कंगवा साफ करतात.पण याने होणारा रियुज अगदी थोडा.) रेझर्स टाकताना कोणाला लागू नये कचरा स्टाफ ला म्हणून काही विशेष काळजी घेता का?पॅड वेगळ्या बॅग मध्ये टाकता का?(इथे 'सगळ्या बायकांनी कप वापरा' हे उत्तर अपेक्षित नाहीये.काही कारणाने वापरता न येणारे बरेच आहेत.
3. प्लास्टिक ला पर्याय म्हणून कंपन्या काचेच्या बाटल्या देतात.काच आमचे भंगारवाले घेत नाहीत.काचेच्या बाटल्या ग्लास यांचे टाकताना काय करता?काच फुटल्यास वेगळ्या पिशवीत टाकता का?
4. प्लास्टिक रियुज म्हणून सुचवलेले उपाय बरेचदा अगदी एखादा आयटम खपेल असे किंवा चार आणे ग्रेव्ही बारा आणे मसाला असे असतात.असे काही घाऊक उपाय हौसेने करता का?
5. काच/प्लास्टिक/इ कचरा गोळा करणाऱ्या संस्था आजूबाजूला आहेत का?जुन्या बॅटरी क्रोमा मध्ये त्यांच्या बिन मध्ये टाकता येतात.
6. घरातले सिंक मधले, बेसिन चे वाया जाणारे पाणी परत वापरात आणायला काही सोपे उपाय करता का?
ही एक लिमिटेड चिडचिड:
ही एक लिमिटेड चिडचिड:
काहीही कपडा किंवा पादत्राणे घेतल्यावर त्या जाड कागदी पिशव्या मिळतात.'एकवेळ प्लास्टिक द्या, पण ते ब्रँडेड पिशवीचे कागद नको ' असं नेहमी करायचं असतां.मग ते काउंटर वाले सुंदरे दात विचकून 'बॅग फ्री ऑफ कॉस्ट है' सांगतात.त्यांच्या डोळ्यांना धडधडीत दिसेल अशी कापडी पिशवीची घडी आधीच खिशातून काढून तयार असते.पण नाही.कस्टमर ची 'हे काय,घाबरून नाही काय म्हणता, फुकट आहे तुमच्या सारख्या फुकट्या लोकांसाठी, घ्या घ्या' म्हणून लायकी काढलीच पाहिजे.मग मख्खपणे 'फुकट असेल तरी नको' सांगून परत कापडी पिशवी पुढे करायची.त्यात बूट वाले असले तर ते खोकं नाकारलं की बऱ्याच 'रिटर्न एक्स्चेंज ला प्रॉब्लेम येईल बॉक्स नसेल तर' म्हणून धमक्या देतात.मग त्यांना परत मख्ख पणे 'जगबुडी आली तरी शूज एक्स्चेंज रिटर्न करणार नाही, बॉक्स आणि कागदी पिशवी देऊ नका'सांगायचं.
या कागदी पिशव्या लोगो च्या असल्याने इतर कुठे वापरता येत नाहीत.त्याला नायलॉन लेस आणि मेटल रिव्हेट मारल्याने ते कंपोस्ट ला टाकता येत नाही.शिवाय वजन घ्यायला हवे म्हणून कागदी पिशवीवर प्लास्टिक कोट असतो.म्हणजे कंपोस्ट ची माँ भैन झाली.भाजी आणता येत नाही कारण तितक्या दणकट नसतात.काहीही क्राफ्ट करता येतनाही कारण लोगो असतो.
से नो टू पेपर बॅग हे सारखे करत राहावे लागते.
काहीही क्राफ्ट करता येत नाही
काहीही क्राफ्ट करता येत नाही कारण लोगो असतो. >>>> शक्यतो घेतच नाही. विकत घेतलेले कपडे घडी घालून तसेच गाडीपर्यंत नेणे वगैरे प्रकारही केले आहेत.
पण ज्या काही चुकार आणि बोरिंग पिशव्या घरी येतात त्यांची आतली बाजू बाहेर करून क्राफ्ट करतो आम्ही. कारण क्राफ्ट करून उरल्या सुरल्या वेळात जेवण झालेच तर होमवर्क करणाऱ्या जमातीत आम्ही मोडतो.
कधी तरी फारच छान पिशवी असेल तर आमची मदतनीस घेऊन जाते किंवा नीट घडी घालून ठेवून देते. काच सामान/सेल वगैरे डिस्पोज करायचे असेल तर अशा पिशवीत ठेवून वेगळे सफाई कामगारांकडे देणे, कधी जुने कपडे वगैरे काढायचे असतील वगैरेसाठी मी या पिशव्या वापरते.
इकडे प्लास्टिक कोटिंग, नायलॉन
इकडे प्लास्टिक कोटिंग, नायलॉन हॅण्डल, आणि रिवेट नसलेल्या कागदी पिशव्या मिळतात. तरी रिड्युस खाली नकोच सांगतो. फक्त जरा फॅन्सी कापडी पिशवी पायजेल. नाहीतर मॉल मध्ये भाजी घेतल्याचा लूक येतो.
फक्त जरा फॅन्सी कापडी पिशवी
फक्त जरा फॅन्सी कापडी पिशवी पायजेल. नाहीतर मॉल मध्ये भाजी घेतल्याचा लूक येतो.
>>> विमानतळावर फॉरिनर बॅकपॅकर्सना विठोबा टूथपेस्ट वगैरे लिहिलेल्या नायलॉनच्या पिशव्या चट्टेरी पट्टेरी पिशव्या घेऊन आरामात फिरताना पाहून आता मीही लाज सोडली आहे. बिनधास्त भाजीची पिशवी न्या. जेवढा जुनाट लुक तेवढी तेवढी ग्रंज स्टाईल.
जुनाट लुक चालेल हो!
जुनाट लुक चालेल हो! कोलंबियाचं जॅकेट आम्ही वॉलमार्टच्या बॅगेत कोंबतो. कसं दिसतं ते!
विठोबा दंत मंजन फॉरिणार च्या
विठोबा दंत मंजन फॉरिणार च्या हातात भारी वाटेल.
मी पण घेत नाही.किंवा कपडे हातात ठेवून गाडीत ठेवते.
आम्ही प्लेन पांढऱ्या स्टार बझार मधून मिळालेल्या कापडी पिशव्या घेऊन फिरतो.किंवा अगदीच जास्त सामान असेल तर एक बीच चं(समुद्र किनारा हां) चित्र असलेली चांगली कॅनव्हास पिशवी आहे तो नेतो.
पण घरच्यांवर फार लक्ष ठेवावं लागतं.
आम्ही ज्युटच्या ८-९ आणि घरी
आम्ही ज्युटच्या ८-९ आणि घरी खूप साऱ्या लहान मोठ्या कापडी पिशव्या शिवल्या आहेत. त्याच सगळी कडे घेऊन जातो. कापडी पिशव्यांची तर रुमला एवढी घडी होते.
मी पेपर बॅगचा विचार केलाच
मी पेपर बॅगचा विचार केलाच नव्हता. सरळ कचऱ्यात टाकायचो.
धन्यवाद me_anu !
कापडाची पिशवी एकदा वापरून
कापडाची पिशवी एकदा वापरून फेकली, तर त्याच्या पर्यावरणीय पाऊलखुणा कागदी पिशवीहून जास्त असतील. प्रत्येक गोष्ट अंतापर्यंत वापरणे, हा सोपा आणि योग्य मार्ग वाटतो.
https://www.packaging-gateway.com/features/sustainable-showdown-plastic-....
कापडाची पिशवी रियुज होतेच.पण
कापडाची पिशवी रियुज होतेच.पण त्या फेक नॉन वोव्हन प्लास्टिक च्या पिशव्या मात्र तुटतात, काहीही पुसायला उपयोगी पडत नाहीत.सध्या सगळीकडे कापडी पिशव्या म्हणून त्या देतात.
अर्थात जड नसलेल्या वस्तू, कागदपत्र ठेवायला उपयोगी पडतात.
https://www.amazon.in/AGRASHRI-Enterprises-Foldable-Compostable-Biodegra...
हो. बरोबर आहे.
हो. बरोबर आहे.
छान धागा आणि माहिती मिळत आहे.
छान धागा आणि माहिती मिळत आहे.
बिनधास्त भाजीची पिशवी न्या.
बिनधास्त भाजीची पिशवी न्या. जेवढा जुनाट लुक तेवढी तेवढी ग्रंज स्टाईल.>>>> मधे इथे कॉलेजियन मधे या पिशव्या स्टाइल फार पॉप्युलर झाली होती...आपली दोन बन्दाची साधी उभी पिशवी...ती एका शनिवारी कुठल्याशा इव्हेन्ट मधे मिळाल्यावर कन्या भयकर खुश झाली होती.
काहीही टेन्ड करण्यात या लोकाचा हात कुणीही धरणार नाही .. मधे ट्रेडरजो चा बारका टोट फेमस झाला होता $३ किमत फक्त...
https://www.traderjoes.com/home/products/pdp/mini-canvas-tote-bag-076747
पण लोकानी अक्षरश: झुबड उठवली मग काय आउट ऑफ स्टॉक...फोमो मधे काहिनी तो इबे वरुन $४०ला घेतला...कपाळ बडवती
इथे आयकिया ची झेब्रा सारखे
इथे आयकिया ची झेब्रा सारखे पट्टे असलेली सिंगल बंद पिशवी मिळते 150 की काहीतरी मध्ये. दणकट आहे एकदम.शिवाय क्रॉसवर्ड किंवा मिस्टर डी आय वाय मध्ये चांगले चांगले मेसेज किंवा चित्र असलेल्या जाड कॉटन पिशव्या मिळतात.
रमेश डाइंग किंवा मुख्य तुळशीबागेत 3 खण वाल्या नायलॉन पिशव्या मिळतात, फुलं फुलं वाल्या.
जेवढा जुनाट लुक तेवढी तेवढी
जेवढा जुनाट लुक तेवढी तेवढी ग्रंज स्टाईल>>>>+१००
आमच्या जुन्या जीन्स पँटच्या पिशव्या शिवून घेतल्या. एकदम दणकट बनल्या आहेत. शिवाय स्टायलिश पण दिसतात.
जीन्सच्या पिशवीची आयडीआ आवडली
जीन्सच्या पिशवीची आयडीआ आवडली. डीमार्टमधेही कधीतरी कॅनव्हासच्या पिशव्या मिळतात ज्या चांगल्या टिकाऊ असतात.
ओला कचरा बहुतेक वेळेस घरातच
ओला कचरा बहुतेक वेळेस घरातच जिरतो. Trust basket चे युनिट आहे त्यात जिरवणे. सुका कचरा प्रामुख्याने पार्सल मधे येणारे डबे , रद्दी , खोकी प्लास्टिक पिशव्या ई चा असतो. त्यात पण D mart च्या गहू अन तांदळाच्या ज्या जाड पिशव्या येतात पाच / दहा किलो च्या त्याची एक आयडिया केली होती. चौरस कापून स्वच्छ पुसून त्या पिशव्या जोडून टीप मारून घेतली . शेतात कापणी किंवा भाज्या वगैरे तोडल्यावर खाली अंथरायला वापरतो आहे. किती टिकेल काही कल्पना नाही. फुड ग्रेड पार्सल चे जे डबे येतात ते स्वच्छ धुऊन पुसून मी जवळ शेकडो पो भा केंद्र आहेत तिथे देऊन टाकते. अडीनडीला कुणाला कंटेनर हवा असेल तर वापरता येतील म्हणून. Online delivery साठी सर्व वस्तू एकाच वेळेस एकाच खोक्यात द्या ऊशीर झाला तरी चालेल असे नोंदवून ठेवले आहे. Zomato swiggy ला Dont Send cutlery टिक केले आहे.जुने कपडे आई कडे मदतनीस आहेत त्या घेऊन जातात. बाकी माॅलमधुन कपडे स्वताःच्या पिशवीत आणते. एक स्टायलिश गुलाबी पिशवी त्याच कामासाठी ठेवली आहे. पर्स , जिम ची सॅक, स्कुटी ची डिक्की यात सदैव एकेक पिशवी घडी करून ठेवलेली असते. जरा व्याप होतो काटेकोरपणे सगळेच बघायचा पण चलता है.
बाकी रद्दी अन प्लास्टिक भंगारवाल्याला देतो. त्याचे पैसे मुलीच्या गुल्लक मधे जातात.
खर ना जिथे खोकयाची गरज नाही तिथे टाळायला हवे. ऊदा टुथपेस्ट ला बाहेर एक खोक्याच्या कव्हर ची गरज काय?
जिथे ट्रक मधून मैलोन मैल
जिथे ट्रक मधून मैलोन मैल वाहतूक आहे तिथे सगळी खोकी टाळता नाही येणार, पण त्यातल्या त्यात कंपोस्ट फ्रेंडली खोकी बनवता येतील.
चांगल्या टिप्स सगळ्यांच्या.आमच्याकडे माय ग्रीन बिन चा हा आहे.
https://mygreenbin.in/product/grc50-frp-50-ltrs-1-no-with-10-ltr-microbes/
खोके रद्दीत टाकतो. खाकी
खोके रद्दीत टाकतो. खाकी पिशव्या , खोके रद्दीवाला बिनतक्रार घेऊन जातो.
जिन्स च्या पिशव्या मस्त!
जिन्स च्या पिशव्या मस्त!
जीन्स च्या अश्या पिशव्यांची
जीन्स च्या अश्या पिशव्यांची फॅशन मी शाळेत असताना होती. खूप म्हणजे अगदी टू मच टिकतात ह्या अशा पिशव्या.
त्या रुमाला एवढी घडी होणार्या सींथेटिक थैली १०० रुपयांना मिळायच्या २०१८-२०१९ मधे. आता काय च्या काय महाग विकतात.
या धाग्याच्या विषयामुळे
या धाग्याच्या विषयामुळे माझ्या घरातील वातावरण एकदम बिघडून गेले.
मी सोसायटीच्या ग्रुपवर नेहमी काही प्रबोधन,आवाहन,माहिती, प्रतिक्रिया या स्वरुपातील लेखन वा व्हिडिओ देत असतो. त्याच पार्श्वभूमीवर मी खालील एक पोस्ट टाकली होती. त्यामुळे घरातील वातावरण एकदम बिघडून गेले.
कचरा वर्गीकरणाबाबत सभासदांसाठी वेळोवेळी प्रबोधन ग्रुपवर केले जाते. ओला कचरा गार्बेज शूट मधून हिरव्या पिशवीतून टाकावा व कोरडा कचरा काळ्या पिशवीतून बेसमेंट मधे ठेवावा. हे वेळोवेळी आपण सांगत असतो. बर्याचदा मेड्स कोरडा कचरा गार्बेज शूट मधून टाकतात अशी तक्रार येत असते. मी स्वत:ही वेळोवेळी हे आमच्या कामवाल्या बाईंना सांगत असतो. अधून मधून त्या व्यवस्थित टाकतात की नाही यावर ही लक्ष ठेवत असतो. पण आज आमच्याच घरच्या लोकांनी कोरडा कचरा काळ्या पिशवीतून गार्बेज शूट मधून खाली टाकताना पाहिले. घरी ही मी वेळोवेळी या बाबत सूचना दिल्या होत्या.
म्हणजे हे काम किती अवघड आहे पहा. आपल्याच घरच्या लोकांना सांगितले तरी बाकीचे टाकतात मग आम्ही टाकले तर काय बिघडले अशी उत्तरे मिळतात. सध्या कामवाली बाई नाहीये. हा फक्त आमच्याच घराचा प्रश्न नसावा. या गोष्टी इतरत्र ही घडत असणार. काही तरी ठोस उपाययोजना करावी लागणार आहे. तूर्तास इतकेच
खरं तर हे मी घडल्यापेक्षा सौम्य लिहिले होते. पण हा घरचा आहेर घरातील वातावरण बिघडवणारा ठरला
(आमच्याही संलग्न
(आमच्याही संलग्न कुटुंबांमध्ये हे वर्गीकरण नीट केले जात नाही.)
कोणाला 'ओला' कचरा म्हणून लिटरली ओला प्लास्टिक चा चिंच चटणी डबा थेट न उघडता ओल्या कचऱ्यात टाकताना पाहून वैताग येतोच. किंवा अगदी इमानदारीने कोणी कचरा वर्गीकरण करून 2 पिशव्या ठेवल्या, आणि कचरेवाल्याने त्या वेळ वाचवायला उघडून त्यातला कचरा एकत्र केला की वाटायचं ते वाईट वाटतंच.ज्या कचऱ्याच्या ट्रक जवळून आपल्याला 2 सेकंद गेल्यावर जीव नको होतो त्या ट्रकने कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांबद्दल वाईट वाटतंच.त्यातल्या त्यात त्यांच्या कचऱ्यात आपला फक्त कोरडा कचरा, (ओला कचरा कंपोस्ट करणे), नीट वर्गीकरण केलेला, त्यात बायोहॅझर्ड कचरा वेगळा(नॅपकिन्स आणि डायपर) मार्क करून देणे, फुटलेल्या धोकादायक काचा शक्यतो बोथट करून वेगळ्या पिशवीत नीट दिसतील अश्या टाकणे इतकं प्रत्येक जण आपापल्या पातळीवर करू शकतो. सगळे करणार नाहीत, पण किमान वर्गीकरण करणाऱ्या लोकांचं प्रमाण वाढत जाईल.
अवांतरः मी जिथून चालत जाते तिथे एक मोठं इंजिनिअरिंग कॉलेज, त्याचं हॉस्टेल आणि बाहेर फुटपाथवर टपऱ्या आहेत.या टपऱ्या वापरणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि टपरी चालकांनी मिळून कॉलेजची कुंपण भिंत आणि फुटपाथ यांच्या मध्ये एक 6 फूट जाळी कुंपण घातलेली लॉन ची पट्टी आहे त्याचं गुटखा पाकिटं, पाण्याच्या बाटल्या, बिस्कीट पुडे रॅपर्स टाकायचा खुला कचराडबा केलाय.रोज जाताना वाईट वाटतं, संताप येतो.पण या खुल्या कचराकुंडीत आपण भिरकळलेली पाणी बाटली किंवा च्युइंग गम रॅपर नसावं इतकंच करू शकतो.
टपऱ्या फुटपाथवर असणं आपण केव्हाच चालवून घेतलंय. त्या अतिक्रमण झाल्यावर 2 दिवस जातील, मग परत येऊन पुढच्या अतिक्रमणापर्यंत तश्याच राहतील हेही आपण चालवून घेतलं.पण किमान त्यांनी त्यांच्यामुळे झालेला कचरा योग्य जागी बंद कुंडीत टाकावा इतकंही कोणी त्यांना सांगत नाही?अगदी खंडाळा लोणावळा च्या रम्य दऱ्या पण स्टॉलस नी टाकून दिलेल्या पाणी बाटल्या दाखवतात.
मला तर वाटतं आता जी बाळं आहेत ती प्लास्टिक बाटल्या ढीग आणि गुटखा पाकीट रॅपरलाच निसर्ग समजत असतील.
आता जी बाळं आहेत ती प्लास्टिक
आता जी बाळं आहेत ती प्लास्टिक बाटल्या ढीग आणि गुटखा पाकीट रॅपरलाच निसर्ग समजत असतील+1
जसे अभयारण्यात सहलीसाठी गेलेल्या मुलांना पक्षी म्हणजे कावळा आणि प्राणी म्हणजे माकडेच फक्त दिसतात.
अवांतर - गाड्यांनी नियम तोडले तर सीसीटीव्ही माध्यम वापरून दंड आकारला जातो तसे निसर्गरम्य परिसरात ड्रोनच्या माध्यमातून अश्या ठिकाणी असलेल्या स्टॉल्सना दंड ठोठावला तर जरा चपराक बसू शकेल असे पाहिलेले दिवास्वप्न कधी सत्यात येईल का !!
Pages