तुमचा आवडता/आवडती कॉमेडीयन कोण आहे?

Submitted by वर्षा on 1 February, 2024 - 22:09

स्टॅन्ड अप कॉमेडी बघता का?
तुमचा आवडता/आवडती कॉमेडी आर्टीस्ट / इन्फ्ल्युएन्सर कोण आहे?
मला अय्यो श्रद्धाचा कंटेंट आवडतो . कॉर्पोरेट विश्वावर विनोद करणार्‍या आणखी एकाचा हिंदी कंटेंट आवडला होता पण त्याचे आता नाव आठवत नाहीये. इथे अमेरिकेत झरना गर्ग बर्‍यापैकी प्रसिद्ध आहे असे दिसते.
त्यामुळे इंग्रजी/हिंदी/मराठीतील तुमचे आवडते कलाकार येऊ द्यात. रेको प्लीज. Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

तो विकी कोशल सारखा दिसणारा का? तो पब्लिक चा फार अपमान करतो..आवडत नाही फारसा..
>>>>
नाही विकी कौशल सारखा दिसणारा नाही.
मुनव्वर फारुकीसुद्धा आधी चांगला वाटायचा. पण त्याचा गोध्रा प्रसंगावरचा जोक ऐकला तेव्हाच खटकला होता. मग ऐकणे सोडून दिले. त्यानंतर कधी तरी त्यावरूनच कॉंट्रोव्हर्सी झाली.

अमित टंडनचा हा एपिसोड आवडला होता. एरवीही तो आवडतो.

राजु श्रीवास्तव, अमित टडन, अय्यो श्रद्धा, राहुल दुआ
ट्रेवर नोहा
द ग्रेट इनियन लाफ्टर चॅलेन्ज मधे बरेच चान्गले चान्गले लोक होते, कपिल शर्माही आवडला होता...आताही त्याचा शो आवडतो( सगळेच नाही पण काही काही एपिसोड आवडतात)

>> राजशेखर मामादिंना, हैद्राबादचा कॉमिक आहे. स्किट चांगले असतात.
Perhaps the best guy around. एकदम क्लीन कॉमेडी, कोणाचा अपमान न करता केलेलं crowd work, एकदम impromptu केलेले जोक्स. त्याचं लव लेटर टू मॉम एकदा पहा कधी पाहिलं नसल्यास.

त्याच्या व्यतिरिक्त झाकिर खान, गौरव कपूर, अभिषेक उपमन्यु हे देखील आवडतात.

जे कॉमेडियन crowd work च्या नावाखाली लोकांचा अपमान करतात किंवा स्वःताला समोरच्यापेक्षा जरा जास्त शहाणे समजतात ते डोक्यात जातात. उदा. तो कोणी गुजराल म्हणून आहे तो आणि बस्सी

लिली सिंग नाही बघत का कुणी? मला आवडते ती! ती आणि तिची केनेडियन पंजाबी फॅमिली, सगळ्या प्रकारचे स्टिरिओटाइप्स वगैरे. स्किट मधले सगळे रोल्स स्वतःच करणे हे तिनेच आधी सुरु केले बहुतेक. किंवा मी तिचे आधी पाहिले हे ही असेल. आता बरीच मोठी सेलिब्रिटी झाली आहे ती.हे काही फेवरेट्स
Passive Aggressive Thanksgiving Dinner
https://www.youtube.com/watch?v=XxJrDeK_8z4&ab_channel=LillySingh
My Mom's Morning Routine
https://www.youtube.com/watch?v=nNqop_MjFaM&ab_channel=LillySingh
When Parents Use Technology
https://www.youtube.com/watch?v=PSRNvNkThGk&ab_channel=LillySingh
Happy

लिली सिंग पाहिलंय तिचे काही videos अगदी अगदी झाले आहेत.
एक भारतीय संबंधी आहे तो फार भारी जमलाय.
आणि I burnt myself with curler वाला best

लिली सिंग +१
आणखी देसी मध्ये देवेन आणि त्याचे बाबा दोघे डॉक्टर, सुकेतु पटेल, रझा आणि पूजा एक पाकिस्तानी आणि इंडिअन कपल आणि त्यांचा मुलगा शेर आणि सगळं कुटुंब. एकेक आठवतील तसे लिहितो.

Reza ani पूजा मध्ये reza ची आई इराणी, वडील आणि reza पाकिस्तान, पूजा india.
Mostlysane चे जुने videos.
Rj करिष्मा
Princy मिरची

मला कोणालाही खूप बघितलं की तोचतोचपणा लक्षात येऊन कंटाळा यायला लागतो >>> +१

पण प्रत्येकाचे काही स्पेसिफिक स्किट्स धमाल आहेत. वरूण ग्रोव्हरच्या सिक्युरिटी चेक बद्दल सुद्धा +१ त्याचे राजकीय स्किट्स सुद्धा मस्त असतात.

रसेल पीटर्स सुरूवातीला विविध देशांतील लोकांचे अ‍ॅक्सेण्ट्स असलेल्या कॉमेडीवर भर द्यायचा तेव्हा मस्त होता. पण नंतर त्याने फॉर्मॅट बदलला, विनोदाच्या नावाखाली भंकस चालू झाली.

ट्रेव्हर नोवा, स्टीव्हन कोलबेर, जॉन स्टुअर्ट, जॉन ऑलिव्हर ई सगळेच मस्त. बिल मार सुद्धा. साशा बॅरन कोहेनचे "अली जी" हे कॅरेक्टर. फिलोमिना कंक स्टॅण्ड अप कॉमेडियन नव्हे पण तिचेही नॅरेशन धमाल असते. साशा बॅरन कोहेनने इतकी अतरंगी कॅरेक्टर्स उभी केली आहेत, की परवा एका शो मधे एकाने जोक केला की अमेरिकेतील सध्याच्या रिपब्लिकन प्रायमरीज मधे जे उमेदवार होते त्यातला एक साशा बॅरन कोहेन होता हे निष्पन्न होणार आहे Happy

हसन मिन्हाज ऑ टा फे! त्याचं आवडलं नाही असं अजून तरी झालं नाहीये. >>> हो मलाही आठवत नाही.

बिल माहेर चा इरसालपणा फार आवडतो. त्याचे पुस्तकही मी घेतलेले ग्रंथालयातून.
बाकी अमित टंडन मस्त.

अय्यो श्रद्धा मला विशेष नाही आवडत.
झरना आवडते थोडीफार.
रसेल पीटर्स अजिबात डोक्यातच जातो. काय अपमान करतो तो.

रसेलच्या शोला अगदी २ र्‍या रांगेत होतो आम्ही. मी इतकी कॉन्शस झालेले. त्याला कळले त्याने आमच्या आजूबाजूचांची खेचली. कॉ न्शस झाले की माझी बॉडी लँग्वेज पाताळात जाते - एनीबडी कॅन मेक आऊट.

एके काळी विल्बर सर्गुणराजचे माहितीपूर्ण व्हिडिओ बघत होतो. टाईम स्क्वेअरला उभा राहून लोकांना लुंगी कशी नेसावी हे शिकवत होता. शिवाय इंडीयन पद्धतीचा संडास कसा वापरावा, इंग्लिश ब्रेकफास्ट टी म्हणजे नक्की काय असतं असं - म्हणजे फक्त एतद्देशीय नाही, तर विदेशी पामरांनही उपयोगी पडेल अशी माहिती त्यात असे. भरपूर मनोरंजन. नंतर कंटाळा आला.

तो अमेरिकेत जिथे तिथे पोहे घेऊन जाणारा एक इंदोरी माणूस होता, त्याचेही काही बघितले होते.

स्टँड अप काँमेडिअन्स किंवा अलिकडे निर्माण झालेले युट्यूब / ओटीटी वरचे कॉमेडीअन्स फारसे आवडत नाहीत. त्यांना फॉलोअर्स खूप आहेत. काहींचे एखाद दुसरे व्हिडीओ आवडले सुद्धा. बर्‍याच जणांची नावे पण लक्षात राहत नाहीत. नाव लक्षात न राहणे ही समस्या आहेच.

कपिल शर्मा हे नाव लक्षात राहण्याचा प्रश्नच नाही. पण तो ऐन बहरात असताना सहकलाकारांचा अपमान, असभ्य विनोद, बॉडी शेमिंग हे प्रचंड खटकायचे. तरी पण त्याने मध्यमवर्गीय नजरेतून मांडलेले अफलातून निरीक्षण हे आवडायचे. अजूनही आवडते. पण आता फ्रेशनेस नाही राहिलेला.

शाळेत असताना जॉनी लिव्हरच्या ऑडीओ कॅसेट्स आम्ही चोरून ऐकायचो. पण जॉनी लिवर कधी कुणाचा अपमान करायचा नाही. त्याचा युएसपी हा मिमिक्री होता. विविध प्रांतातल्या, भाषेच्या लोकांचे निरीक्षण आणि त्यांची ढब यामुळे त्याचे नेहमी कौतुक वाटत आले आहे. भले त्याळा लोक चीप म्हणोत. त्याने ज्या वस्तीतून निरीक्षण केले ते अफाट आहे. कांजूरचा तो भाग पायी फिरल्याने कनेक्ट होता आले.

हल्ली कुठलाच कॉमेडीअन प्रभावी वाटत नाही. एके काळी मेहमूद तल्लख बुद्दीचा विनोदवीर वाटायचा. त्या काळात तो अफाटच होता. देवेन वर्मा हा अफाट विनोदवीर होता. कंबरेखालचे विनोद न करता हसवलेला. केश्तो मुखर्जी हा ही आवडता होता. जॉनी वॉकर ठीक ठाक. दक्षिणेचे योगी वगैरे कॉमेडीअन्स फार हिडीस वाटतात. ब्रह्मभट्ट चे विनोद बालीश असतात. हिंदीत गोविंदाने हसवले. मुन्नाभाई मालिकेत संजय दत्त आणि अर्शद वारसी दोघांनीच कॉमेडीअनची जबाबदारी पार पाडली.
अलिकडच्या काळातला वरूण शर्मा हा देवेन वर्माची आठवण करून देतो. पंकज त्रिपाठी,राजकुमार राव हे लीड रोल मधले कॉमेडीअन्स वाटतात. परेश रावल मधे कॉमेडीचे प्रचंड पोटेन्शिअल आहे. संजीवकुमारने जेव्हां विनोदी भूमिका केल्यात तेव्हां तो वेगळाचा वाटला. नोकर, अंगूर, पती पत्नी और वो अजरामर भूमिका आहेत...
आता ना सिनेमे आवडत, ना मालिका.

गंभीर म्हणून बनवलेले सिनेमेच खदाखदा हसवायचे दिवस आहेत. दाक्षिणात्य सिनेमांनी एके काळी प्रचंड करमणूक केली. कणेकरांनी हसवले. आता तो फॉर्मॅट पुन्हा कुणाला वापरता येणार नाही. खूप लवकर एखादी गोष्ट जुनी होण्याचे दिवस आहेत. हसवणे ही प्रचंड अवघड कला आहे. अशा काळात कॉमेडीअन म्हणून उभे राहू पाहणार्‍यांना सलाम !

पुढच्या काळात कुणी नावारूपाला आला तर अवश्य फॉलो करीन.

मराठीत लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण हे आवडायचे. त्यांचे विनोद आता नाहीत आवडणार. सुदेश भोसले ने वेसावकर म्हणून काही कॅसेट्स आणल्या होत्या. ते ही आवडले होते. पण जॉनी लिव्हरच्या झंझावातात वेसावकर मागे पडला. चिंचवडचा एक तरूण मुलगा गोसावी असं काहीसं नाव होतं. त्याने लता मंगेशकरचा आवाज अफलातून काढला होता. लता मंगेशकरांची मुलाखत त्यांचा पूर्ण आदर ठेवून विनोदी होती. असा प्रकार दुर्मिळच. तो मागे पडला.

आता पॅरानॉर्मल स्पेशल सीआयडीचे एपिसोड्स , सुराग मधला इस्पेक्टर भारत म्हणजे सुदेश बेरी हे पोट धरून हसवतात. वेगळ्या करमणुकीची गरज लागत नाही. काही काही युट्यूबर्स हाँटेड जागेला भेट देतात तिथे त्यांना भूत दिसते ते सुद्धा धमाल असते. आपण आपली करमणूक करून घेणे महत्वाचे असते.

मी हसवतो असा दावा करणारे फेल झाले तर पाणी कसं मार्ग काढतं तसा मार्ग काढावा लागतो.

चिंचवडचा एक तरूण मुलगा गोसावी असं काहीसं नाव होतं. त्याने लता मंगेशकरचा आवाज अफलातून काढला होता. >> मंदार चमत्कार?

अलीकडचे कोमेडियन आवडत नाहीत.
त्यात विकृत तन्मय भट चे paedophile ट्विट वाचल्यापासून तन्मय भट आवडतो असं कोणी म्हटलं की ती व्यक्ती पण विकृतच असेल असं वाटतं. या धाग्यावर कोणी लिहिलंय का त्याचं नाव?
बाकी सगळे कोमेडियन लय बोअर करतात.
त्यातल्या त्यात राहुल सुब्रम्हणयम आवडतो. वरून ग्रोव्हरचं जास्त काही बघितलं नाहीये पण त्याचं ते मोस्ट व्हायरल मोदी व्हर्सेस राहुल गांधी वालं स्टॅण्ड अप आवडतं. "उसकी कोअर कम्पिटन्सी है उसमे मत घुसो'वर दरवेळी हसायला येतं.
बाकी कधीही कंटाळा न येणारा स्टॅण्ड अप कोमेडियन एकच- पु लं देशपांडे!

जसपाल भट्टी
जॉनी लिव्हर
पंकज कपूर (ऑफिस ऑफिस )

पण महाराष्ट्रातल्या / भारतातल्या सध्याच्या एकजात मंत्री / संत्री / आमदार / खासदार / नगरसेवक यांच्या तोडीचा एकही विनोदवीर या आलम दुनियेत नाही सापडणार

मॅट स्टोन आणि ट्रे पार्कर (साऊथ पार्क)
बिल हेडर (SNL, साऊथ पार्क)
सेथ मॅकफरलेन
द लोनली आयलंड गट (खूप विनोदी गाणी आहेत.)
जिम कॅरी (त्याचे जुने स्टँड अप भारी आहेत. सिनेमे तर आहेतच.)

चिंचवडचा एक तरूण मुलगा गोसावी असं काहीसं नाव होतं. त्याने लता मंगेशकरचा आवाज अफलातून काढला होता. >
मंदार कारूळकर ना?

हो. मंदार कारूळकर. वर हपाने ध्वनीफितीचे नाव दिले आहे.

जसपाल भट्टी +१
जिम कॅरी एकाच सिनेमात आवडला. नंतर नाही आवडला.

धाग्या च्या राईट अप मधे स्टॅड अप लिहिले आहे.. फिबां चित्रपट कॉमिक चा तुम्ही उल्लेख केलाय, पण हल्लीवाले ही अनेक स्टँड अप वाले फार विनोदी आहेत..बहुतेक तुमच्या पाहण्यात आला नसेल.
डोळ्यात पाणी आणणारे विनोद च अस्सल आणि मार्मिक म्हणजे ठीक असे नसते.. हे माबो वरच आधी कळाले Happy

मला वरूण ग्रोव्हर, कुणाल कामरा दोघेही खूप आवडतात. रवी गुप्ताची पण ऑफिस कॉमेडी मस्त आहे.

प्रशस्ती सिंग/सिंह पण छान आहे. तिची बोलण्याची ढबच गमतीशीर आहे. यूपीवाले बरेच मित्र मैत्रिणी त्या स्टाईलमध्ये बोलताना बघितलेत. त्यामुळे अजून मजा वाटते.
अमित टंडन तर ऑलटाइम फेवरेट आहे.
आकाश गुप्ता पण छान आहे. त्याचा सरोजिनी नगर शॉपिंगवाला विडिओ तर भन्नाट आहे.

Pages