मोहम्मद रफी जन्मशताब्दी वर्ष आठवणी आणि अभिवादन

Submitted by रघू आचार्य on 21 December, 2023 - 14:00

मोहम्मद रफी !

भारतीय चित्रपटसंगीतात आधुनिक पार्श्वसंगीताचे शास्त्र विकसित करण्यात महत्वाचे योगदान असलेले आणि आता दंतकथा बनत चाललेले व्यक्तिमत्व. येत्या २४ डिसेंबरला रफीसाहेब ९९ वर्षे पूर्ण करून १०० व्या वर्षात पदार्पण करत आहेत. केलं असतं असं म्हणायला पाहिजे खरं तर. पण रफीचा आवाज अद्याप जिवंत आहे, एक तत्त्व जिवंत आहे तर रफी आपल्यात नाही असे कसे म्हणता येईल ? देह नाहीसा झाला. पण रफी म्हटल्यावर जी ओळख आहे तो आवाज मानवजात असेतो कधीच नष्ट होणार नाही.

किशोर कुमार आणि मोहम्मद रफी यांना पुरूष गायकात अफाट लोकप्रियता लाभली. मुकेश हे तिसरे नाव. त्यांचीही जन्मशताब्दी आहे. दुर्दैवाने तिघेही साठीच्या आतच गेले. मोहम्मद रफी यांची आराधना नंतरची काही वर्षे खडतर गेली. पण धर्मेंद्रने पसंती दिल्याने असेल "आज मौसम" या गाण्याने रफी आणि धर्मेंद्र परतले. धर्मेंद्रने त्या वर्षी नऊ हिट सिनेमे दिले ज्यात चार चित्रपटात धर्मेंद्राने चोराची भूमिका केली होती. असे म्हणतात कि अमिताभ बच्चन स्टार बनण्यापूर्वी लोफर , जुगनू मुळे राजेश खन्नाचे स्टारडम धोक्यात आले. आणि जंजीरने त्यावर शिक्कामोर्तब केले.

याच दरम्यान लैला मजनू सुपरहीट झाला, गाणी सुपरहीट झाली आणि लोफरने परतलेल्या रफींची सेकंड इनिंग सुरू झाली. ती नंतर बहरतच चालली होती. पर्दा है पर्दा, शिर्डी वाले साईबाबा अशी आधुनिक हिरोंना साजेलशी गाणी मोहम्मद रफी देऊ लागले.
पूर्वीची मोहम्मद रफीची गाणी आणि आताच्या काळातली गाणी पाहिली तर एकूणच संगीतालाच आव्हानात्मक दिवस सुरू झाले होते. हाणामारीच्या सिनेमातल्या देमार हिरोंना किशोर कुमार हा मॅनली आवाज वाटू लागला होता. यातूनच हाथ कि सफाईच्या वेळी विनोद खन्नाला किशोरचा आवाज त्याला न देता रणधीर कपूरला दिल्याचा राग आला होता. विनोद खन्ना सीनीअर असला तरी रणधीर कपूर हिरो म्हणून सिनीअर होता. त्याच्या नावावर जवानी दिवानी सारखे बरेच हिट होते. राज कपूरचा मुलगा होता. साहजिक त्याची स्टार व्हॅल्यू त्या वेळी विनोद खन्ना पेक्षा जास्त होती. विनोद खन्ना नुकताच काळे धंदे सोडून सभ्य व्यवसाय करायला लागला होता. अर्थातच पडद्यावर. त्यामुळे त्या वेळचा स्टार गायक किशोर कुमार रणधीरच्या वाटेला गेला. रणधीर आरडी बर्मन मैत्री जगजाहीर होती आणि आरडी किशोरकुमार मैत्रीही. त्यामुळे रणधीर कपूर किशोर कुमार हे काँबो बनलेलं होतं.

विनोद खन्नाची समजूत स्वतः प्रकाश मेहरांनी काढली. जर गाणंं आवडलं नाही तर पुन्हा रेकॉर्डिंग करूयात असं आश्वासन पण दिलं. विनोद खन्नाने नाईलाजाने होकार दिला. रेकॉर्डिंगला रफीला बोलवलं. रफीसाहेबांनी विनोद खन्नाशी गप्पा मारल्या. त्याचं व्यक्तीमत्व लक्षात आलं आणि त्याला अनुसरून त्यांनी आपल्या आवाजाचा टोन निश्चित केला. ते गाणं रेकॉर्ड झाल्यावर प्रकाश मेहरा यांनी ऐकलं मात्र, विनोद खन्नाला ते बोलावून घेऊन आले. त्याला गाणं ऐकवलं . विनोद खन्नाचा रूसवा कुठल्या कुठे पळून गेला. चाणाक्ष वाचकांनी बरोब्बर ओळखलं. ते गाणं म्हणजे "वादा कर ले साजना". प्रकाश मेहारांच्या हाथ कि सफाई या सुपरहीट चित्रपटाचे सर्वात हिट गाणे.

या काळात रफीने ऋषीकपूरसाठी पण हिट गाणी दिली.
कुर्बानी मधे पुन्हा विनोद खन्ना साठी कुणाचा आवाज द्यायचा हा प्रश्न आला. कारण दुसरा हिरो खुद्द फिरोज खान. फिरोज खानने यापूर्वी किशोर कुमार आणि मुकेश असे दोन्ही आवाज वापरले होते. पण या चित्रपटात संगीतकाराने ठरवलं कि फिरोज खानला रफीचा आवाज वापरायचा."क्या देखते हो, सूरत तुम्हारी " हे गाणं होतं.
ज्या माणसाने आधुनिक पार्श्वगायनात लटके झटके, निसरडे स्वर आणले, आळोखे पिळोखे आणले तो स्वतः असताना कलाकारी आशा भोसलेने केली पण रफीने गाणे एकदम शिस्तीत म्हटले. कुठेच वरचे सूर नाहीत, व्हेरीएशन्स नाहीत, झटके नाहीत. संगीतकाराला कळेना. तेव्हां रफीसाहेबांनी सांगितलं कि शूटींग होऊन जाऊ दे, मग बोलू.

फिरोज खानवर गाणं चित्रीत झालं आणि मग सर्वांच्याच लक्षात आलं.
फिरोज खानची सवय होती कि तो हॉलिवूडच्या नायकांप्रमाणे तोंडातल्या तोंडात पुटपुटायचा. तो क्वचितच जबडा पूर्ण उघडायचा. गाण्यासाठी लिपसिंगिंग करतानाही त्याची हीच सवय होती. त्यामुळे गायकाने त्याप्रमाणे गाणं गायलं. झीनत अमान सुद्धा फार काही वेगळं करत नव्हती. पण किमान चेहरा बोलका असल्याने आशाने त्यात माफक कलाकारी केली.

अर्थात या गाण्यात झीनूबेबीचा त्या वेळचा पेहराव ( आता त्या ड्रेसला हॉट म्हणतात हे सांगितलं तर हसतील लोक. आताच्या पिढीला तर वाटेल "एव्हढे" कपडे घातलेल्या बाईला तुम्ही असे बोलायचा ? ) बघून क्या देखते हो या प्रश्नाला फिरोज खान जे उत्तर देतो, त्यावर झू ठा अशी एक ओळ हवी होती असे नेहमी वाटते. हा जोक इतक्यातच अन्यत्र मारलेला आहे, माजोफुगे वाटल्याने रिसायकल केला.

असे किस्से हजारो आहेत. रफींचा जीवनप्रवास मायबोलीवर येऊन गेलेला आहे.
कमेण्ट मधे आपण रफीची आवडती गाणी, त्यातली वैशिष्ट्ये, किस्से शेअर करत त्यांना अभिवादनही करू आणि हे जन्मशत्बादी वर्ष साजरे करूयात. असेच आणखी किस्से, संदर्भ कमेण्ट बॉक्स मधे येत जातील.

या वर्षात रफीसाहेबांच्या नातवाच्या रफी फाऊंडेशन तर्फे "सौ साल पहले" हा कार्यक्रम वर्षभर राबवला जाणार आहे.
https://www.google.com/search?q=rafi+centenanry+year+%2C+sau+saal+pehle+...

याबद्दलची अधिक माहिती.
https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/c...

या निमित्ताने षण्मुखानंद सभा, भारत सरकार, पोस्ट खाते यांच्या तर्फे जन्मशताब्दी वर्षाचा उद्घाटनाचा कार्यक्रम षण्मुखानंद हॉल मधे होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल या वेळी उपस्थित असणार आहेत. या प्रसंगी डाक खात्यातर्फे रफी यांच्या स्मरणार्थ पोस्टाचे तिकीट प्रकाशित केला जाणार आहे. तसेच पद्मविभूषण श्रीमती आशा भोसले यांना मोहम्मद रफी पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
https://allevents.in/mumbai/grand-inauguration-mohammed-rafi-birth-cente...
षण्मुखानंद हॉल मधे असा एक कार्यक्रम केल्याचे ऐकिवत आहे. सदर कार्यक्रमाला जमल्यास उपस्थित राहणार आहे. ही त्यांची अधिकृत वेबसाईट.
https://raficentenary.com/index.php/contact-us/

दास्तान ए रफी या नावाने रजनी आचार्य यांनी एक मेहनत घेऊन एक माहितीपट बनवला आहे. यात मोहम्मद रफी यांची दुर्मिळ माहिती आहे. रफी साहेब आणि सूफी फकीर यांचा नेमका किस्सा त्यांच्या भावाकडून ऐकायला मिळतो. अमृतसर जिल्ह्यातले त्या वेळच्या भारतात असलेले आता पाकिस्तानात असलेले सुलतान कोटला हे जन्मगाव, शाळा पहायला मिळते. शक्य झाले तर हा व्हिडीओ पहावा ही विनंती.
https://www.youtube.com/watch?v=akM5Ir1xamc

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही लता - रफी युगुल गाण्यांमध्ये मला लताबाईंपेक्षा रफी सरस किंवा सहज वाटतो. उदाहरणार्थ, धीरे धीरे चल चांद गगन में, तस्वीर तेरी दिल में.
तसेच, एहसान तेरा होगा मुझ पर किंवा ओ मेरे शाह - ए - खुबां ही गाणी दोघांच्याही आवाजात वेगवेगळी रेकॉर्ड केलेली आहेत. पण त्यातील रफी चे वर्जन मला जास्त भावते. विशेषतः वरच्या पट्टी मध्ये रफी खूप सहज वाटतो.

दिल तेरा दीवाना है सनम मध्ये माला सिन्हा बावरलेली आहे. समोर आक्रमक शम्मी कपूर आहे. हे लता रफी यांच्या गायकीतून दिसतं. त्या काळात गायक गाण्याची सिच्युएशन इ. समजून गायचे.

एकाच गाण्याची लता व पुरुष गायक अशी व्हर्शन असतील, तर त्यात पुरुष गायकाचं व्हर्शन अधिक वाजतं असं निरीक्षण आहे.

दिल तेरा दीवाना है सनम मध्ये माला सिन्हा बावरलेली आहे. समोर आक्रमक शम्मी कपूर आहे. हे लता रफी यांच्या गायकीतून दिसतं. त्या काळात गायक गाण्याची सिच्युएशन इ. समजून गायचे.>>
तसंही असू शकेल पण तरी अनेक गाण्यांमधे रफी सरस वाटला आहे.

आशाबरोबरचं राजकुमार चित्रपटातलं गाणं 'दिलरूबा', त्यात शेवटच्या ओळी मला वाटतं रफीने falsetto मधे म्हटल्या आहेत. जबरदस्त कमाल केली आहे!

काही लता - रफी युगुल गाण्यांमध्ये मला लताबाईंपेक्षा रफी सरस किंवा सहज वाटतो. उदाहरणार्थ, धीरे धीरे चल चांद गगन में, तस्वीर तेरी दिल में.>>
मला वाटतं तस्वीर तेरी गाण्याच्या वेळी लता-रफीमधे वाद झाला होता की ते कुठच्या पट्टीत गायचं ते. शंकर- जयकिशननी सांतितलेल्या पट्टीपेक्षा लताला वेगळी पट्टी हवी होती. गाण्याचे बरेच रिटेक झाले. कडव्यांमधे लताचा सूर खूपच वरचा पण ताणलेला लागला आहे तर रफीचा सहज वाटतो.

तसेच, एहसान तेरा होगा मुझ पर किंवा ओ मेरे शाह - ए - खुबां ही गाणी दोघांच्याही आवाजात वेगवेगळी रेकॉर्ड केलेली आहेत. पण त्यातील रफी चे वर्जन मला जास्त भावते. विशेषतः वरच्या पट्टी मध्ये रफी खूप सहज वाटतो.>>
लतानेच एका मुलाखतीत सांगितलं होतं की दोघांची वर्जन असतील तर तिला पुरुष गायकापेक्षा एक पट्टी वर गावं लागायचं त्यामुळे एहसान तेरा, अजी रूठकर या गाण्यात तिला कमालीचा टिपेचा सूर लावावा लागला होता त्यामुळे तिने शंकर-जयकिशनकडे तक्रारही केली होती.

मजा म्हणजे जिथे किशोर लताची सारखी गाणी आहेत (रिमझिम गिरे सावन, छोटीसी ये दुनिया, जीवनके सफरमे राही) तिथे दोन्हीही वर्जन समतोल वाटतात!

रफीसाहेब हे आपल्या आवाजाबरोबर आपल्या सुसंस्कृत, सुस्वभावीपणाबद्दलही प्रसिद्ध होते.
एक इंटरेस्टिंग आठवण.
अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट. मुंबईतील एका रेस्टॉरंट मध्ये महंमद रफीचे एक चांगले गाणे लागले होते. (बहुधा बैजू बावरातील मन तडपत हरिदर्शन को ). गाणे संपल्यावर त्या हॉटेलच्या गल्ल्यावर बसलेला माणूस उद्गारला "माxxxx (एक गलिच्छ शिवी)! क्या आवाज है साले की!"
कर्मधर्म संयोगाने ह्याच वेळी रस्त्यावरील सिग्नलपाशी एक कार थांबलेली होती. कारच्या ड्रायव्हरला हे ऐकू गेले आणि त्याचा पारा चढला. तो कारमधून उतरून बाहेर आला. त्या हॉटेल कर्मचाऱ्यांची गचांडी धरून भांडू लागला. "बदतमीज! गाली क्यू देता है?" वगैरे. मग थोडीफार मारामारी झाली. अचानक त्या कारमधून साक्षात महम्मद रफी उतरले आणि त्या कर्मचाऱ्यापाशी आले. तो कर्मचारी रफीला बघून भांडण विसरून भारावून जाऊन बघतच राहिला. मग रफी साहेबानी त्या ड्राइवरच्या वतीने माफी मागितली आणि मग सगळे विसरून ती कार प्रवासी व ड्रायव्हरला घेऊन निघून गेली.
हे घडल्यावर तो रेस्टॉरंट वाला उद्गारला "माxxxx (पुन्हा तीच शिवी!) ! ये कैसा इन्सान है ? गुस्ताखी मैने की और माफी उसने मांगी !"

अजून एक विशेष म्हणजे महम्मद रफीचा भाऊ त्यांचा ड्राइवर म्हणून काम करायचा!

माहितीपूर्ण आणि मनाच्या कोपऱ्यात हळुवारपणे जपलेल्या एका स्वर्गीय आवाजाच्या कारकीर्दीचा सुंदर आढावा घेणारा धागा. खूप छान लिहिलेत. प्रतिसाद सुद्धा एक से एक आहेत. वावे फारएण्ड इत्यादी सर्वच प्रतिसाद मस्त. ज्या मंदिरात खुद्द देवाचीच मूर्ती इतकी प्रसन्न, तिथे उदबत्त्या सुद्धा तशाच असणार ना? हरपा यांचा प्रतिसाद वाचताना तर रफींच्या गाण्याच्या मैफिलीत बसल्यासारखे वाटले.

>> रूख से जरा नकाब हटा दो मेरे हुजूर .. रूख से नंतर जो छोटासा पाॅज आहे नंतर एकदमच गाण आणी ठेका सुरू होतो

वाह! काय मस्त आठवणी. हे गाणे love at first sight आहे. लहानपणी पहिल्यांदा ऐकताना जे भाव मनात आले ते तसेच अजूनही येतात. अभी ना जाओ हे गाणे थियेटर मध्ये ज्यांनी ऐकले आहे त्यांना आवाजाचे स्वर्गीय सुख काय ते कळेल (तो सिनेमा रंगीत केल्यावर केवळ हे गाणे ऐकण्यासाठी सिटी प्राईड ला गेलो होतो)

दुखऱ्या मनावर हळूवार फुंकर घालावी तर ती रफींच्या आवाजानेच. "नफरत कि दुनिया छोडकर" हे "हाथी मेरे साथी" मधले गाणे. या गाण्यात सुरवातीला रफीसाहेबांनी उच्चरवात जो प्रील्युड गायलाय. बापरे! अंगावर काटा येतो ऐकताना. तो तसा गाणे कुण्णाकुणालाच शक्य नाही. "नफरत किऽऽऽ" ऐकले की काळजाला हात घालणारे सूर काय असतात ते अनुभवास येते Happy

>> एकूणच संगीतालाच आव्हानात्मक दिवस सुरू झाले होते. हाणामारीच्या सिनेमातल्या देमार हिरोंना किशोर कुमार हा मॅनली आवाज वाटू लागला होता.

ह्या काळात मी जन्माला सुद्धा आलो नव्हतो पण मनाने खूप कनेक्टेड आहे. आणि अगदी अगदी हेच लहानपणी मनात यायचे. रफी मुकेश यांच्या साजूक तुपातल्या आवाजातील गाण्यांचा काळ जाऊन किशोर-अमिताभ-विनोद यांचे रांगडे पर्व सुरु झाले होते, किंबहुना किशोरकुमार यांचा आवाज तेंव्हा उद्धट भांडखोर अरेरावी करणारा वाटायचा Lol (पण तो तसा नाही हि परिपक्वता खूप उशिरा आली) त्यावरून, तेंव्हा माझी आणि माझ्या भावाची खूप वादविवाद झडायचे. तो किशोरकुमारच्या बाजूने आणि मी रफींच्या.

खूप सुंदर लेख Happy

हरपा कि हपा ? मै तो हपा ही बुलाउंगा जी.

तर हपाजी हे बघाजी.
https://www.youtube.com/watch?v=jL-b7c8umIQ
यातले सगळे डोक्यावरून गेले. निवांत बघून सांगा. आणखी एक व्हिडीओ आहे. टाईप ऑफ गमकाज ( हिंदुस्थानी + कर्नाटकी).
सापडला कि देईन. तुम्ही त्याचे निरूपण करावे ही विनंती.
याबाबतीत अर्धवट असल्याने माघार. माझी मुलगी लहान असल्यापासून छडी घेऊन अलंकार शिकवायला बसवायची. मी निघून गेल्यावर शिक्षा द्यायची. त्या वेळी ऐकले असते तर बरे झाले असते असे वाटते. Lol

अ तुलजी , धन्यवाद. सुंदर प्रतिसाद..

तू कहाँ ये बता इस नशिली रात में, दिवाना हुआ बादल, इस रंग बदलती दुनिया में अशासारख्या काही सदा रोमँटिक गाण्यांना रफी शिवाय दुसऱ्या कोणाच्याही आवाजाची कल्पना करू शकत नाही.

अनघा Happy

जाग दिल ए दिवाना, ऋत जागी..
उंचे लोग मधलं चित्रगुप्तने संगीतबद्ध केलेलं आणि मजरूह लिहीलेलं हे गाणं फार सुंदर आहे. व्हिडीओ मुद्दामच पाहिला नाही. गे गाणं कुणावर चित्रित केलंय याचा अंदाज चित्र न पाहता आला नाही. पण व्हिडीओ पाहिल्यावर अगदीच सूट झालाय आवाज. जुन्या फिरोज खानला मुकेशच्या आवाजची सवय झाली आहे. मनहरचा आवाज बहुतेक धर्मात्मा मधे आहे.

आनंद मिलिंद यांनी चित्रगुप्तच्या आठवणी सांगताना रफीबद्दल भरभरून बोलले आहेत.
चित्रगुप्त रेकॉर्डिंगच्या आधी रियाज ठेवत. ती पद्धतच होती. रफीसाहेब सकाळी आठची वेळ द्यायचे. पण लवकर आले तर दाराबाहेर थांबायचे आणि आठला दोन मिनिटं कमी असताना बेल वाजवायचे. दुसरी आठवण म्हणजे ते कधीच कुणाबद्दल मागे बोलत नसत. काम संपलं कि उठून जात. फॅमिली मॅन असा त्यांचा उल्लेख चित्रगुप्त यांनी केला होता.

चित्रगुप्त म्हणाले कि रियाज करताना रफी साहेब खालच्या पट्टीत गायचे. खूप स्लो गुणगुणायचे. शंका विचारायचे. असं वाटायचं कि हा गायक तर नवशिका आहे. दोन तीन वेळा हा प्रकार झाला कि मग माईक वर जात. तिथे वेगळाच इसम उभा असल्यासारखे वाटायचे. माईक मागच्या रफीबद्दल आदरयुक्त भीती असायची. कारण ते गाणं वेगळंच वाटायचं मग.

इथे ऐकू / पाहू शकता
https://www.youtube.com/watch?v=9n6hoIp6Quca

सुंदर चाल! हे गाणं पहिल्यांदाच ऐकलं.
फिरोझ खान म्हटलं की मला कुर्बानी किंवा RDX आठवतो. इतक्या सॉफ्ट गाण्यात फिरोझ खानला बघायची सवय नाही.

सकाळपासून रफीचे 'दिल की आवाज़ भी सुन' मनात घोळते आहे. 'मेरी नज़रों की तरफ देख'मध्ये किती आर्जव आहे. रफीच्या आवाजाचे एकाच शब्दात वर्णन करायचे झाले तर मी म्हणेन 'अर्नेस्ट'.

धन्यवाद अनघा.
माझे मन सुंदर गाणे दिले सकाळी सकाळी.

तस्वीर तेरी दिल में

म्हटलं कि चर्चा आठवते ती रफी लता वादाची आणि नंतरच्या अबोल्याची. या गाण्यावर पुष्कळ बोललं गेलंय. बहुतेक ठिकाणी लताबद्दल हटवादीपणा, संगीतकाराच्या कामात ढवळाढवळ असं बोललं जातं आणि मग लताबद्दल पूर्वग्रह तयार होतात. त्यातून अनेक जणांचा सूर असा आढळतो कि स्वतःच संगीतकाराच्या कामात ढवळाढवळ केली आणि वरच्या पट्टीत स्वतःच गडबडली.

कानाला लताचा वरचा सूर थोडा खटकत असला तरी ती बेसूर वाटली नाही. रफीचा आवाज सुद्धा कष्टाने नियंत्रणात ठेवल्याचे जाणवते. लता अनियंत्रित झालीये पण बेसूर झालीय असे म्हणणे टोकाचे वाटायचे. पण शास्त्रीय संगीताचे शिक्षण नसल्याने नेमके सांगता येत नव्हते. तो अधिकारही नाही. अर्थात अशाच अवस्थेत खूप जास्त बोलायची हिंमत येते Lol

या व्हिडीओत थोडे फार कळले असे वाटते. जाणकारांनी सांगावे.
https://www.youtube.com/watch?v=GjXkDYke-U8

हातातलं काम बाजूला ठेवून सगळं लक्ष देऊन ऐकायला लावणारी गीतं फार कमी असतात.
असं एक गाणं म्हणाजे बरसात की रात मधली ना तो कारवाँ की तलाश है ही कव्वाली. त्यातही त्यातला रफीने गायलेला शेवटचा ये इश्क इश्क है
हा भाग.
तो आवाज फार पवित्र, निष्कलंक, निर्मळ वाटतो.

हातातलं काम बाजूला ठेवून सगळं लक्ष देऊन ऐकायला लावणारी गीतं फार कमी असतात.
असं एक गाणं म्हणाजे बरसात की रात मधली ना तो कारवाँ की तलाश है ही कव्वाली. त्यातही त्यातला रफीने गायलेला शेवटचा ये इश्क इश्क है
हा भाग.
तो आवाज फार पवित्र, निष्कलंक, निर्मळ वाटतो.

जाग दिल ए दिवाना - आहा, काय सुंदर गाणे आहे.
अंगावर पीस फिरवून एखाद्याला जागवावे इतका हळुवार उच्चार केलाय रफीने 'जाग' या शब्दाचा...

जाग दिल ए दिवाना - आहा, काय सुंदर गाणे आहे.
अंगावर पीस फिरवून एखाद्याला जागवावे इतका हळुवार उच्चार केलाय रफीने 'जाग' या शब्दाचा >>> +१

कानात वाजू लागलेय गाणे. मस्त करंट दिला. धन्यवाद.

भरत, हे गाणे ऐकलेय. चित्रपट माहिती नव्हता.

मला गाण्याचे analysis करता येत नाही पण अगदी soft आवाजात गाऊनही रफीच्या गाण्यातून आर्जव, आर्तता, उद्वेग वगैरे भावना सहज व्यक्त होतात. उदा: आपकी पेहलु में आकर रो दिए....फिर तुम्हारी याद आयी ऐ सनम (इतर गायकही आहेत)... तेरे मेरे सपने अब एक रंग है... मेरे मेहबूब कही और मिला कर मुझको... तुमसे कहूॅ एक बात परों से.... ऐ हुस्न जरा जाग तुझे इश्क जगाए... तुमने मुझे देखाची सुरवात अशी बरीच. चूक भूल देणे घेणे

बरसात की रात मधली ना तो कारवाँ की तलाश है ही कव्वाली >>
हा सिनेमा आणि त्यातील गाण्यांच्या लहानपणीच्या खूप आठवणी आहेत. आमच्या घरी ' बरसात की रात ' ची कॅसेट होती. त्यामुळे गाणी माहित होती. पण कधी बघितली नव्हती. पहिल्यांदा जेव्हा ही ' इश्क इश्क ' कव्वाली बघितली तेव्हा भारत भूषणला गाताना बघून ' अरेरे ' झालं होतं ...

रफीसाहेबांची सर्वच गाणी आवडतात... पण all time favt ३ गाणी -
१) संभल ए दिलं - साधना
२) दिलकी आवाज भी सुन - हमसाया
३) मैं जिंदगी का साथ निभाता चला गया - हम दोनो

निव्वळ सुंदर!!

गेल्या काही वर्षात आशा भोसले यांनी मोहम्मद रफी यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये करण्याचा सपाटा लावला आहे.
आज लता मंगेशकर, किशोरकुमार, रफी आणि अनेक गाजलेले संगीतकार यांच्यापैकी कुणीही जिवंत नाहीत. रफी, आशा यांच्या सुवर्णकाळातले चित्रपटसृष्टीतले दिग्गजही जिवंत नाहीत. दिलीपकुमार ९९ व्या वर्षी जग सोडून गेले. देव आनंद, राज कपूर हयात नाहीत.

थोडक्यात, आज अशी कोणतीही अधिकारी व्यक्ती हयात नाही जी आशाजींच्या वक्तव्यावर मतप्रदर्शन करू शकेल. आज हयात व्यक्तींपैकी आशाजींचा अधिकार मोठा आहे. म्हणूनच त्यांच्यावर जास्त जबाबदारी आहे.

आशाजी व्यक्तिशः मला लतापेक्षा जास्त आवडतात. लताचा आवाज हे आपल्या मनावरचं गारूड आहे. फिमेल सिंगरचा आवाज असावा तर असा हा संस्कार आपल्या मनावर झालेला आहे. पण अलिकडेच लताच्याच मुलाखतीमधे ऐकले कि त्यांना सुरूवातीला रिजेक्शनचा सामना करावा लागला होता, कारण त्यांचा आवाज खूप पातळ ( नाजूक ) आहे असे कारण देण्यात आले होते. पण लता मंगेशकर यांनी त्या नाजूक आवाजाला शक्तीस्थान बनवले.

आशा भोसलेंच्या आवाजात खूप ताकद होती. पडद्यावर जी अभिनेत्री असेल तिला त्यांचा आवाज परफेक्ट बसलेला आहे. मधुबालाला दिलेला आवाज तर अप्रतिमच. अच्छा जी मै हारी चलो मधे जितका देव आनंदला रफीने कमाल आवाज दिला आहे, तितकाच मधुबालाला आशाने.

इथे आशा जींच्या सामर्थ्यावर अजिबात टिप्पणी करायची नाही. त्या समर्थ होत्या आणि आहेतच. फक्त सहकलाकाराचे सामर्थ नाकारायची दुर्बुद्धी त्यांना वयाच्या या टप्प्यावर आणि ते हयात नसताना व्हावी याचे दु:ख जरूर आहे. आपल्याच आवडत्या कलाकाराने दुसर्‍या कलाकाराबद्दल असे वागावे हे वेदनादायी आहे.

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांना प्रश्न विचारला कि "रफी साहेब आणि तुम्ही आवाज बदलण्याबद्दल प्रसिद्ध आहात " यावर त्या म्हणाल्या कि " रफी साहेब अजिबात आवाज बदलत नसत, आवाज बुलंद होता त्यामुळे आपोआप कुठल्याही नायका सूट व्हायचा. मला मात्र अभिनेत्रीचं वय, रूप, पडद्यावरचं पात्र पाहून आवाज बदलावा लागायचा "

एकदा त्या म्हणाल्या कि "रफी साहेब स्वतःहून अजिबात इंप्रोव्हायझेशन करत नसत, संगीतकार सांगतील तेव्हढंच करायचं आणि चालू पडायच हा त्यांचा खाक्या होता"

इंडियन आयडॉलच्या सेटवर त्या म्हणाल्या कि "रफी साहेबांना शम्मी कपूर गाणं कसं म्हणायचं हे शिकवत असत. पण रफी साहेब शिकत नसत. मी लपून छपून ते ऐकलं आणि गाण्यात शम्मी कपूर यांना अभिप्रेत असलेले बदल केले, पण रफी साहेबांना ते जमलं नाही, गाणं झाल्यावर शम्मी कपूर चकित झाले होते "

या वक्तव्यांबद्दल स्पष्टीकरणं द्यावीत याचीही गरज नाही. संगीत शिकलेले असो वा नसो, कानसेन असणेही पुरेसे आहे.
रफी जन्मशताब्दीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला त्यांना बोलावले होते, पण त्या गेल्या नाहीत. तेव्हां त्या कार्यक्रमांना जाऊ शकत नसतील असे वाटले होते.

या वयात मी त्यांच्या पेक्षा श्रेष्ठ होते हे सिद्ध करायचा आटापिटा का असावा किंवा एखादा राग असेल तर तो अजून बाहेर का पडावा हे समजत नाही. त्यांनी त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध करावं याची अजिबात आवश्यकता नाही. आशा ग्रेट होत्या, आहेत आणि राहतीलच. त्या कुणापेक्षा ग्रेट होत्या किंवा नाही याने काहीही फरक पडणार नाही. सुरूवातीला दुर्लक्ष करावे असे ठरवले होते. पण संधी मिळेल तेव्हां ही वक्तव्ये येत असल्याने अखेरच्या पर्वात केलेली ही वक्तव्ये कायमची राहतील ही भीती आहे. गालबोट नको लागायला.

https://www.youtube.com/watch?v=e2u-NL2xi1g

रघु आचार्य, हा धागा आजच वाचनात आला. छान लिहीले व माहीती दिली आहे प्रतिसादाही खुप मस्त आहेत व त्यातही त्याची खुप मस्त गाणी व आठ्वणी नमुद केल्या आहेत.

मोहम्मद रफी, किशोर कुमार, मुकेश व मन्ना डे या चार महान गायकांबद्दल काय लिहीणार? या चौघांच्या यशात त्या काळच्या गीतकार/संगीत कार यांचा सिंहाचा वाटा होता हे सगळे मान्यच करतील पण हेही तितकेच खरे आहे आणी सर्व मान्य करतील की या चौघांची एक स्वतःची शैली होती. त्यामुळे या चौघांचे स्वतंत्र “ फॅन ग्रुप्स“ नसतील तरच नवल. पण हे चौघेही जवळ जवळ समकालीन असल्यामुळे यांच्या फॅन ग्रुप्सचे “ ओव्हरलॅपींग“ झाले असेल तर त्याचेही कोणालाच नवल वाटायला नको.

माझ्या बाबतीत मात्र माझे माप नेहमी मोहम्मद रफी कडेच झुकले आहे. त्याचे कारण देण्याइतके संगीताचे ज्ञान माझ्याकडे अजिबात नाही.

पण मोहम्मद रफीच्या गाण्यात मला एक गोष्ट नेहमीच जाणवते आणी ती म्हणजे त्याच्या गाण्याच्या पट्टीची रेंज! त्याची पुष्कळ अशी गाणी आहेत की तो गाण्याची सुरुवात अगदी खालच्या पट्टीत सुरु करतो पण अगदी थोड्या वेळात त्याची पट्टी आकाशाला भिडली असते! तुम्ही जर अशी त्याची गाणी करिओकीवर गाण्याचा प्रयत्न कराल तर फ्या फ्या उडते! अश्या गाण्यांची खुप उदाहरणे देता येतील. पण बैजु बावरा मधल हे एकच गाणे पुरेसे आहे!

भगवान भगवान भगवान….

ओ दुनिया के रखवाले
सुन दर्द भरे मेरे नाले
सुन दर्द भरे मेरे नाले
आश निराश के दो रंगों से
दुनिया तूने सजाई
नैया संग तूफान बनाया
मिलन के साथ जुदाई
जा देख लिया हरजाई
ओ लुट गई मेरे प्यार की नगरी
अब तो नीर बहा ले (आ)
अब तो नीर बहा ले (आ)
ओ अब तो नीर बहा ले (आ)

त्या “अब तो नीर बहा ले” ला त्याचा सुर व पट्टी इतकी वर जाते की देवाच्या दगडी मुर्तीलाही पाझर फुटला तर नवल वाटणार नाही!

तसच ब्र्म्हचारी मधल्या “दिलके झरोके मे तुझको बिठाकर“या गाण्यामधेही तसेच आहे.

दिल के झरोखे में तुझको बिठाकर
यादों को तेरी मैं दुल्हन बनाकर
रखूँगा मैं दिल के पास, मत हो मेरी जाँ उदास

कल तेरे जलवे पराये भी होंगे,
लेकिन झलक मेरे ख्वाबों में होंगे
फूलों की डोली में होगी तू रुखसत,
लेकिन महक मेरी सांसों में होगी
दिल के झरोखे में ...

तो जेव्हा“ लेकिन झलक मेरे ख्वाबों में होंगे“ म्हणत असतो तेव्हा कुठल्या कुठे पोहोचलेला असतो त्याचा आवाज! अहाहा!

आणी काही काही गाण्यात तर तो गाणच इतक्या वरच्या पट्टीत सुरु करतो की विचारु नका! उदाहरणार्थ “ फर्ज“ मधल मस्त बहारों का मै आशीक“ हे गाण!

मस्त बहारों का मैं आशिक
में जो चाहे यार कारु कू कू
चाहे गुल्लू के साये से खेलूँ
चाहे कल्ली से प्यार कारु
सारा जहाँ है मेरे लिए मेरे लिए

तो जेव्हा “ मेरे लिए, मेरे लिए“ म्हणतो ते आठवा!

तर काही गाण्यात त्याच्या पट्टीचे इतके मस्त चढ उतार असतात की जिव ओवाळुन टाकावासा वाटतो अश्या गाण्यांवर! तशी १-२ गाणी म्हणजे “हसते जख्म” मधल तुम जो मिल गये हो… तो ऐसा लगता है हे गाण

तुम जो मिल गए हो तो ये लगता है
कि जहाँ मिल गया, कि जहाँ मिल गया
एक भटके हुए राही को कारवाँ मिल गया
तुम जो मिल गए हो तो ये लगता है
कि जहाँ मिल गया, कि जहाँ मिल गया

बैठो ना दूर हमसे, देखो ख़फ़ा ना हो
बैठो ना दूर हमसे, देखो ख़फ़ा ना हो
क़िस्मत से मिल गए हो, मिलके जुदा ना हो
क़िस्मत से मिल गए हो, मिलके जुदा ना हो

आणी दुसरे तसे गाणे म्हणजे तिसरी मंझील मधल “ तुमने मुझे.. देखा..” हे गाण!

तुम ने मुझे देखा, हो कर मेहर्बां
रुक गई ये ज़मीं, रुक गई ज़मीं
थम गया आसमां, जान-ए-मन जान-ए-जां) - २
तुम ने मुझे देखा

ओ कहीं दर्द के सहरा में, रुकते चलते होते
इन होंठों की हसरत में, तपते जलते होते
मेहर्बां हो गई, ज़ुल्फ़ की बदलियाँ
जान-ए-मन, जान-ए-जां
तुम ने मुझे देखा ...

तसच “ फिर वोही दिल लाया हुं“ मधल हे गाण सुद्धा

दूर बहुत मत जाइये, लेके क़रार हमारा
ऐसा न हो, कोई लूट ले, राह में प्यार हमारा

ल: पास रहो या दूर तुम, तुम हो साथ हमारे
देंगे गवाही पूछ लो, ये ख़ामोश नज़ारे

र: (नाज़नीं बड़ा रँगीं है वादा तेरा
ओ हसीं, है किधर का इरादा तेरा) -२
आँख मुड़ती हुई, ज़ुल्फ़ उड़ती हुई
फ़ासला क्यों है ज़्यादा तेरा
ल: ओ हमदम मेरे, खेल न जानो चाहत के इक़रार को
जान-ए-जहाँ, याद करोगे, इक दिन मेरे प्यार को

अशी त्याच्या किती किती तरी सुंदर गाण्यांची यादी देता येइल इथे पण जागा कमी पडेल!

जाता जाता मनाला धुंद करणारी त्याची अजुन एक दोन गाणी इथे नमुद करतो…

“अन्जाना” मधल हे गाण

रिम झिम के गीत सावन गाए गाए
भीगी भीगी रातों में
रिम झिम के गीत सावन गाए गाए
भीगी भीगी रातों में
होठों पे बात दिलकी आए आए
भीगी भीगी रातों में
ओ ओ ओ ओ ओ ओ
ओ ओ ओ ओ ओ ओ (ओ ओ ओ ओ ओ ओ)
तेरा मेरा पुछे नाता
बड़ी वो ये घटा घनघोर है
चुप हूँ ऐसे में कह दू कैसे
मेरा साजन नहीं तू कोई और है
के तेरा नाम होठों पे मेरे तेरे
सपने मेरी आँखों में
के रिम झिम के गीत सावन गाए हाए
भीगी भीगी रातों में

व “ प्यार का मौसम“ मधल हे गाण!

तुम बिन जाऊँ कहाँ? कि दुनियाँ में आ के
कुछ ना फिर चाहा कभी तुम को चाह के
तुम बिन

कितनी अकेली सी पहले थी यही दुनियाँ
तुमने नज़र जो मिलाई, बस गई दुनियाँ
दिल को मिली जो तुम्हारी लगन, दीए जल गए
मेरी आह से

( बाय द वे! हे गाण किशोर कुमारनेही म्हटल आहे पण मला मोहम्मद रफीचे व्हर्जन जास्त आवडते!)

तुम बिन हे गाणे रफीने गायला नको होत. माझी चूक असेल तर सुधारा पण ह्या गाण्यानंतर रफीची उतरती भांजणी सुरु झाली. तसेच अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना ह्यांनी एका पिक्चरमध्ये एकत्र काम केले. (नाव आठवले कि लिहून) तेव्हाही त्यांच्या चाहत्यांमध्ये "हाणामारी"झाली.

केशवकूल, तुमच्या मताचा आदर आहे .

पण कदाचित असेही असु शकेल की किशोरकुमारचे व्हर्जन देखणा व उमदा शशी कपूर गातो मुव्हीमधे तर मोहम्मद रफीचे व्हर्झन सदा एरंडेल घेतल्या सारखे रडके तोंड असलेला भारत भुषण गातो! त्याच्या सारख्या माणसाला एवढे रोमँटिक गाणे सुचतय व गाता येतय हे खुपच विसंगत वाटते Proud

मस्त प्रतिसाद मुकुंद! फक्त मला किशोर कणभर जास्त आवडतो आणि 'तुम बिन जाऊ कहां ' सुद्धा मला किशोरचं जास्त आवडतं.

Pages