आ बैल मुझे मार

Submitted by सामो on 19 December, 2023 - 08:38

मला दोन प्रसंग सांगायचे आहेत. दोन्ही घटनांमध्ये माझी विचार करण्याची पद्धत बरोबर होती की चूक? मला आपले मत जाणून घ्यायला आवडेल. असे प्रसंग आपल्याला आठवले तर ते ऐकायला आवडतील. मला आपली उलट-सुलट मते ऐकायची आहेत. विशेषतः स्त्रिया या दोन्ही प्रसंगांकडे कोणत्या दृष्टीने पहातात, पुरुष कोणत्या दॄष्टीने पहातात. माझी टिकेस सामोरे जाण्याची तयारी आहे. Happy कारण मला शक्यता अशी वाटते की माझे थिंकिंग विशेषतः दुसर्‍या घटनेकडे पाहाण्याचे 'ट्विस्टेड' आहे. पण आपण आपल्या अनुभवांचे प्रॉडक्ट असतो. त्याला मी अपवाद नाही.
-------------------------------------------------
मी कॉलेजमध्ये असताना माझे लग्न ठरले. साखरपुडा झाला. नवरा जेव्हा जेव्हा जहाजावरुन, घरी परत येई, तेव्हा तो सहा सहा महीने घरी असे. आम्ही एकमेकांबरोबर फिरत असू, गप्पा मारणे, सिनेमे पहाणे वगैरे कोर्टिंग पिरीअड व्यवस्थित चाललेला होता. पण हा काळ आमच्याकरता गोड-गुलाबी असण्यापेक्षा, खूपसा एकमेकांच्या एजेस (दातेरी, टोकदार कडा) अनुभवण्याचाही होता. मी कदाचित रुक्ष होते, नवखी होते, मला कोर्टशिपची नैसर्गिक जाण नव्हती ना अनुभव होता. नवराही अतिआग्रही, प्रत्येक लहानसहान गोष्टीत मते मांडणारा व त्याच्या मताप्रमाणे सारे व्हावे अशी अपेक्षा ठेवणारा होता. माझा पिंड कथा कादंबर्‍यांवरती पोसलेला. तर त्याने मराठी कथा कादंबर्‍या औषधालाही वाचलेल्या नव्हत्या. त्यात एकमेकांच्या अवास्तव अपेक्षा. उदाहरणार्थ - मला वाटे त्याने फुले आणावीत, कविता म्हणाव्यात. तर तो मला परदेशी चॉकलेटस, टेडी बेअर, मेक अप आणून देत असे. मी कधीही मेक अप करत नसे तर तो विचारे तू कधी लिप्स्टीक लावत नाहीस का गं? अर्रे ममव कोणती मुलगी लिप्स्टिक लावून बसते? त्या काळी आमच्या मैत्रिणीत तर वदंता होती - पंजाबी स्त्रियांना विवाहोपरान्त, सिंदूर म्हणजे कुंकवाबरोबर लिप्स्टीक लावणे कंपल्सरी असते वगैरे. म्हणजे हे आमच्या खिजगणतीतही नव्हते की त्या स्त्रिया आकर्षक राहण्याचा प्रयत्न करत असतील. नवर्‍याच्या सर्व गप्पा करीअरविषयी असत तर मला गडकर्‍यांच्या कविता त्याला माहीत असाव्यात अशी अपेक्षा असे. तो होता कॉन्वेन्टचा तर मी पक्की पुण्यातल्या हुजूरपागेत तयार झालेले प्रॉडक्ट. तर असा हा तडजोडीचा कठीण काळ.
त्यावेळी हॉस्टेल मध्ये माझी एका मुलीशी ओळख तर होतीच पण काही काळाकरता मी तिच्यावरती विश्वास टाकलेला होता. मी तिला आमच्या सर्व तडजोडी सांगत असे व ती मला सहानुभूती दाखवत असे. घरी हे सर्व ऐकून घेतले जातच नसे. एकदा साखरपुडा झाला म्हणजे काळ्या पाषाणावरची रेघ होती. नो वन वॉज एन्टरटेनिंग माय कॉन्ट्ररी फीलींग्ज. तेव्हा मैत्रीण हाच पेंट अप इमोशन्सना रीलीझ करण्याचा मार्ग होता. एकदा मला 'आ बैल मुझे मार' हुक्की आली व मी, नवरा व ती मैत्रीण आम्ही टॅक्सीने व्हीटीच्या कामत रेस्टॉरंटमध्ये जायचे ठरविले. मैत्रिणीने काळा , पाश्चात्य पेहेराव केलेला होता, डिनर वेअर शक्यतो काळा असतो हे मला माहीत नव्हते. तिचा मेक अप परफेक्ट होता, मोजकेच पण डेलिकेट दागिने अंगावर होते. याउलट काहीही ड्रेस सेन्स नसलेल्या (अजुनही नाही & आय अ‍ॅम नॉट प्राऊड ऑफ इट) मी काहीतरी भारतिय पेहेराव केलेला होता. १००% ती मैत्रीण त्या ऑकेजनकरता सुंदर दिसत होती.
मुख्य गोष्ट ही झाली की संपूर्ण संध्याकाळ ती तिच्या करीअरबद्दलच्या अ‍ॅस्पिरेशन्स विषयी बोलत राहीली. एकदा मला उद्देश्यून तिने 'सम पीपल लिव्ह इन आयव्हरी टॉवर' वगैरे शब्द वापरले. मला हळूहळू खूप न्युनगंड आला. मला असे वाटू लागले की नवरा तिच्याकडे जास्त लक्ष पुरवतो आहे. मला से जाणवले की शी वेपनाइझ्ड ऑल इन्फर्मेशन आय कन्फायडेड इन हर. शी पुट मी डाउन. तिने माझा विश्वासघात केला. मला कमी लेखले. तिने माझ्या होणार्‍या, नवर्‍याला इम्प्रेस करण्याचा आटोकाट आणि कदाचित यशस्वी प्रयत्न केला. पुढे म्हणजे त्या दिवसानंतर तिची-माझी मैत्री तुटली. पण मी धडा शिकले.
धडा हा शिकायला हवा होता की आपल्या प्रायव्हेट बाबी परक्याला सांगायच्या नाहीत. पण मी धडा हा शिकले की कोणत्याही मैत्रिणीवरती विश्वास टाकायचा नाही. नवर्‍याबरोबर, तिला घेउन बाहेर फिरायला जायचे नाही. आपली दोघांची प्रायव्हेट स्पेस शेअर करायची नाही. असो.
-----------------------------------
पुढे टेक्सासला माझी खूप आवडती फिलिपिनो मैत्रिण एलन, नवरा कॉकेशिअन. एलन अजुनही माझी मैत्रिण आहे. आम्ही दोघी धनु-सूर्य जातक. माझ्या आयुष्यातल्या लाडक्या मैत्रिणी धनु-सूर्य राहीलेल्या आहेत हां व एक मिथुन Happy तर काय सांगत होते धनु व्यक्तींना - भेटवस्तू देणे आवडते किंबहुना सर्वच अग्नी राशींना (मेष, सिंह आणि धनु) गिफ्टस देणे, सरप्राईझ गिफ्टस देणे आवडते. कपट नसते. थोडा नाईव्ह आणि उदार स्वभाव असतो. स्ट्रेट्फॉर्वर्ड असतो. छक्केपंजे स्वभावात नसतात. हां तर अशी एलनची व माझी मैत्री होती. एकदा मला एअरपोर्ट्वरती जायचे होते. मी टॅक्सीने जाऊ शकले असते पण एलनचा नवरा त्या बाजूने जाणार होता त्यामुळे, तिने मला सुचविले की तो लिफ्ट देईल. त्याने मला लिफ्ट दिली. कमीतकमी पाऊण तासाचा रस्ता होता. टेक्सासचे कंट्री म्युझिक प्रसिद्ध आहेच. त्याला संगीताची आवडही होती व जाणही आणि त्याने एक मस्त महागडी बुमबॉक्स टाईप म्युझिक सिस्टिम त्याच्या कारमध्ये बसवुन घेतलेली होती. ज्याचा बेस एकदम भारी होता. व रस्ताभर इतकं मस्त कंट्री म्युझिक वाजत होतं. एकदम अनवट, कंफर्टेबल प्रवास झाला. सांगायची गोष्ट ही की एलन आली नव्हती. तिला काहीतरी काम होतं. नंतर मला असे वाटले की तिने इतका विश्वास कसा टाकला? नवर्‍याला जर फ्लर्ट करावेसे वाटले असते मी जर नवर्‍याबरोबर फ्लर्ट केले असते तर असा विचार तिच्या मनात कसा काय आला नाही? की आपणच इतके अनअ‍ॅट्रॅक्टिव्ह आहोत की स्त्रिया डोळे झाकून आपल्या बॉयफ्रेन्डला, नवर्‍याला माझ्याबरोबर एकटे जाऊ येऊ देतात? तेव्हाही मी सुटलेलीच होते. ना जिम ना खाण्यावरती कंट्रोल. एकटी रहात असल्यामुळे तर मनमानीच. तेव्हा मला परत मनात न्यूनगंड दाटून अला. की आपण; मी तीशीत होते, 'हार्मलेस' वाटतो. आपण कुरुप आहोत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मैत्रिणीने काळा , पाश्चात्य पेहेराव केलेला होता, डिनर वेअर शक्यतो काळा असतो हे मला माहीत नव्हते.>>>> मल आता कळल..

इकडे बऱ्याच गोष्टी शेअर केल्यात एकेकानी .

हि पण एक त्यापैकीच, फक्त थोडी हलकी आहे .

आमच्या टीम मध्ये एका मुलाचं लग्न ठरलं. मुलगी त्याच्या गावाकडची.
तो पहिल्यांदाच परत घरी जाणार होता. त्याला म्हंटल काय तिला गिफ्ट वगैरे नेणारेस कि नाही.

पण तो बिचारा पूर्ण गोंधळलेला इकडची फारशी माहिती नसल्यामुळे.
मग दुसऱ्या दिवशी ऑफिस मधून निघून मी त्याला शॉपिंग ला घेऊन गेले. माझ्या आवडीची चांगली दुकाने दाखविली. माझ्या अनुभवाप्रमाणे (नवरा आणि बाबा) ह्याला काही विशेष रस नसेल आणि एखाद काही घेईल असे वाटल.
पण हा तर खूप काय काय घेत बसला.
काही वेळाने मलाच वाटायला लागलं ह्याला आवरा कोणीतरी, नाही तर त्याची आई ओरडायची "मेरे बच्चे का पुरा पैसा बरबाद किया .."
शेवटी मीच आवरत घेतलं...

सामो, तुझ्या लेखाचा टोन थोडा गंभीर आहे कारण त्यावेळी तुला खरंच तस वाटलं असेल. आणि तेच मनात राहील..

पण मला असही वाटत की दुसरी बाजू असतेच की. दोन लोक सहजच साधेपणाने वागत असतात त्यांना खरंच काही लेबल लावायची गरज नसते.

दोन व्यक्तींनी एकत्र प्रवास करणं, कॉफी - चहा - जेवण एखाद्यावेळी एकत्र करण म्हणजे लगेच त्यांच्यात काही चाललय, फ्लर्ट करतायत असं म्हणणं थोडं अवाजवी वाटत.

>>>>>>पण मला असही वाटत की दुसरी बाजू असतेच की. दोन लोक सहजच साधेपणाने वागत असतात त्यांना खरंच काही लेबल लावायची गरज नसते.
तिचं इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करणं खरच ऑब्व्हिअस होतं.
>>>>>साधेपणाने
नाही छन्दिफन्दि ती 'साधी' तर मुळीच नव्हती. हां तीसुद्धा तेव्हा तरुण आणि अप्रगल्भ असणार बट शी वॉज कॅटी. तिला विधीनिषेध नव्हता.
>>>>>>मल आता कळल..
काळाच पाहीलेला आहे पण निदान डार्क असतोच असे नीरीक्षण आहे.
---------
@झकासराव - प्रतिसाद आवडला. आभार

>>>>>>.अजिंक्यराव वाईट वाटलं तुमचा किस्सा वाचून.
होय मैत्रीला रामराम ठोकावा लागला हे वाईट झाले.

किस्से / अनुभव इंटरेस्टिंग सामो.. तितकीच इंटरेस्टिंग चर्चा
आणि छान विवेचन केले आहे तुम्ही..

पहिला अनुभव - वरील सर्व प्रतिसादांना अनुमोदन.

पण तरीही त्या मैत्रीणीच्या बाजूने एकदा विचार करावासा वाटतो. तिची एक सामो नावाची मैत्रीण आहे. जी आपल्या लग्न ठरलेल्या पण लग्न न झालेल्या पार्टनर बद्दल सांगते की त्यांचे कसे काही जुळत नाही.
आता यात तिला वाटले चला हिची केमिस्ट्री त्याच्याशी जमत नाही तर आपण ट्राय मारुया.
त्यात तुम्हीच तिला सोबत नेऊन ती संधी उपलब्ध करून दिली.

जर पुढे जाऊन समजा तुमचे तुटले असते आणि त्यांचे जुळले असते. तर त्या मैत्रिणीची बाजू अशीच असती की त्याला ती नाही तर मी आवडले त्यात माझी काय चूक? त्या दोघांची केमिस्ट्री जुळत नव्हती, आमची जुळली तर आम्ही का आमच्या प्रेमाची कुरबानी द्यावी? आणि हे तिने तिच्या दृष्टिकोनातून मायबोलीवर लिहिले असते तर लोकांना ते पटलेही असते Happy

अजून एक विचार मनात आला तो असा की समजा हेच जर तुम्ही तुमच्या पुरुष मित्राला विश्वासाने सांगितले असते तर त्या केसमध्ये कदाचित त्याला चुकीचा सिग्नल गेला असता. त्यानुसार तो वागला असता. आणि तो तुमच्या मागे आला असता आणि तुम्ही म्हणाला असता की मी मित्र समजून तुला हे विश्वासाने सांगितले आणि तू असा निघालास Happy

असो. तुमच्या केस मध्ये ती चुकीचे वागली. त्याचे समर्थन नाही. पण कोणी कायमचे नीच, नालायक नसते. काही सिच्युएशननुसार सोयीनुसार लोकं तसे वागतात. आपल्याला त्याचा फटका बसू नये असे वाटत असेल तर आपली आपण काळजी घ्यावी हेच उत्तम.

हेच तुमच्या दुसऱ्या अनुभवाला सुद्धा लागू. पार्टनर वर विश्वास असणे ठिक. पण म्हणून दरवेळी माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे असे दाखवत तसे वागायची गरज नाही.

आता इथे पाऊण तासाचा ड्रॉप होता म्हणून ओके आहे. पण कोणी आपल्या पार्टनरला माझा तुझ्यावर विश्वास आहे म्हणत जा तिला गरज आहे तर रात्रभर सोबत दे म्हणाले, किंवा एक्स गर्लफ्रेंडला घरी पाहुणी म्हणून आलीय तर तिला ड्रॉप करून ये म्हणाले आणि त्यातून पुढे काही झाले तर ती आपलीच चूक ठरेल.

तसेच अश्या सिच्युएशन टाळल्या म्हणून काही लगेच एकमेकांवर विश्वास नाही असा निष्कर्ष काढणे सुद्धा चुकीचे आहे.
त्यामुळे जर तुमच्या पार्टनरने तुम्हाला काही गोष्टी अलाउड केले नाही तर लगेच याचा आपल्यावर विश्वास नाही, किंवा किती ते पझेसिव्ह असणे असाही विचार करू नका. कदाचित त्याचा तुमच्यावर विश्वास असेल पण थर्ड पर्सन वर नसेल. क्रिएट होऊ शकणाऱ्या सिच्युएशनवर नसेल.

तसेच दुसऱ्या केस मध्ये तुम्ही स्वतःबद्दल जो विचार केला त्याची गरजच नाही. तो मुळात त्या नवरा बायकोचा आपापसातला विचार आहे. आणि तो काहीही असू शकतो. तुम्ही का त्याचे लोड घेता. तो आपल्या अंगावर ओढवून घेता.

इथे स्वानुभव सांगायचा तर माझे लग्न ऑनलाईन चॅटिंग मधून जुळले. तेव्हा मी बॅचलर असताना एन नंबर ऑफ मुलींशी चॅटिंग करायचो. बायकोला त्याची भीती होतीच की परत याला मध्येच दुसरी कोणी भेटली तर.. त्यामुळे तिने लग्नाआधीच आपला पझेसिव्हपणा दाखवत माझ्या सगळ्या चॅट विंडो दारे खिडक्या बंद करून टाकल्या.. त्यामुळे मी आणखी कुठे न जाता आमचे लग्न झाले.

लग्नानंतर सुद्धा बरेच काळ तिच्या डोक्यात होते की आपले चॅटिंग वरून जुळले आहे तर याचे अजून इतर कोणाशी सुद्धा जुळू शकते. म्हणून तिचे माझ्या चॅटिंग वर लक्ष असायचे की हा कोणाशी बोलतोय. काही लपवत तर नाही ना आपल्यापासून.. खास करून माझे जुन्या मैत्रिणीशी अजून किती आणि कशा स्वरूपाचे बोलणे होते याची जमेल तितकी खबरबात ठेवायची. हे इथे बिनधास्त लिहायचे कारण हे की मला तेव्हाही तिचे हे वागणे काही चुकीचे वाटले नव्हते. संशयी किंवा माझ्यावर विश्वास नसलेले वाटले नव्हते. उलट तिच्या मनातली भीती जाऊन तिला शांत समाधानाने जगता यावे म्हणुन मी कोऑपरेटच केले होते..

ज्याचे परीणाम पुढे दिसू लागला. मी मायबोलीवर हा आयडी एका बॅचलर मुलाचा म्हणून घेऊन आलो तरी तिला कधी हा इथे येऊन काय करतो हे बघावेसे वाटले नाही.

आणि आता लग्नानंतर इतक्या वर्षानी तर तिला काही पडले नाहीये. इतकी ढिल देते, मला स्वताहून इतक्या सिच्युएशन क्रिएट करून देते की बरेचदा मलाच प्रश्न पडतो की अरे मी दोन पोरांचा बाप झालो तर आता मला कोण पोरगी भाव देणार नाही असे वाटते का हिला.. पण तसे बिलकुल नसावे.. तसेच असेही नाही की तिला माझ्यावर पूर्ण विश्वास आला असावा.. पण कदाचित काही काळ या चिंतेत जगल्यानंतर तिला नंतर असे वाटले असावे की छोडो यार जे व्हायचे ते होईल, कुठे सतत ती टांगती तलवार या रिलेशनच्या डोक्यावर ठेवणार. कारण त्या नादात आयुष्य एन्जॉय करायचं राहते Happy

@ऋन्मेष- एकदम छान प्रतिसाद आहे तुमचा. पहील्या प्रसंगातील विवेचन फार आवडले.
>>>>आणि आता लग्नानंतर इतक्या वर्षानी ...........आता मला कोण पोरगी भाव देणार नाही असे वाटते का हिला
हाहाहा मलाही नवर्‍याने थोडे तरी पझेसिव्ह असावे असेच वाटते.
>>>>काही काळ या चिंतेत जगल्यानंतर तिला नंतर असे वाटले असावे की छोडो यार जे......नादात आयुष्य एन्जॉय करायचं राहते Happy
तुम्ही कदाचित त्यांचा विश्वास कमावला असेल.

अनूभव प्रांजळ आहेत.

झकासराव ( माझ्या आवडीच्या विषयाला तुम्ही छेडलेत म्हणून लिहीतेय ) धनु सुर्य म्हणजे ज्या व्यक्तीचा जन्म डिसेंबर मधला असतो ती व्यक्ती धनू सुर्य म्हणवली जाते. कारण पाश्च्यात्त ज्योतिष्य शास्त्रात ज्या चंद्रापेक्षा सुर्याला महत्व आहे. सुर्य आणी चंद्र सतत फिरत असतात. सुर्य दर राशीत प्रत्येकी एक महिना मुक्काम करतो. डिसेंबर मध्ये तो धनु राशीत असल्याने धनु सुर्य. आणी आपल्याकडे मुल जन्माला आल्यावर चंद्र ज्या राशीत असेल ती त्या बाळाची/ बाळीची रास ठरते.

सॉरी सामो. फार लांबवले मी हे.

@अज्ञबी (की अजनबी?), त्याच व्यक्तीशी लग्न केलं.

नवीन Submitted by सामो on 21 December, 2023 - 07:29

मग आता त्यांना त्याच्यासाठी टोमणे मारता कि नाही (हलके घ्या जस्ट किडींग)

Ok रश्मीजी
मी सूर्य चंद्र दोन्ही धनु
Happy

बर का सामो! पैल्या प्रसंगात ती मैत्रीण जर आदरवाईज तशीच आकर्षक दिसण्याच्या प्रवृत्तीची असेल तर तिची काही चूक नाही.

फक्त दिसण्याबद्दल नाही प्रघा. मला कमी लेखणे, माझ्या माहीतीचा गैरवापर करुन, स्वतः कसे शहाणे व महत्वाकांक्षी आहोत हे दाखविणे. असो अशा लोकांचे दात ईश्वर कधीतरी त्यांच्याच घशात घालतो.

म्हणजे तुम्ही तिला दीर्घायुष्य मागत आहात देवाकडून Wink
(बालपणानंतर म्हातारपणी होते असे, दात पडुन घशात.)

Happy मानव मिळू देत की दीर्घायुष्य. आय अ‍ॅम इन्डिफरन्ट. तिचे संस्कार, आयुष्य ती जाणो. आय हॅव्ह बेटर थिंग्ज टु टेक केअर ऑफ.

छान लिहिलं आहेस.
पहिल्या प्रसंगात मैत्रिणीला नेण्याचे प्रयोजनच कळले नाही. एकतर तुमचे लग्न ठरले होते.तुला अधिकृतपणे त्याच्याबरोबर फिरण्याची मुभा होती.चोरून boyfriend बरोबर पहिल्यांदा जायचे असेल तर सोबत म्हणून जिवलग मैत्रिणीला नेल्याचे किस्से ऐकले आहेत.
तर तुझ्याकडून वेडेपणाच झाला. हलके घे.कुठल्याही क्षणी आपण कसेही वागून जातो.

दुसऱ्या अनुभवात विशेष काही वाटले नाही.कारण मीही माझ्या नवऱ्याला, मैत्रिणीला स्टेशनवर पोहचव म्हणून सांगितले होते.वारंवार असते तर नसते सांगितले.

मला वाटते पहिल्यांदाच असे भेटायला जाताना थोडी anxiety असावी म्हणुन पाठराखण करायला मैत्रिणीला नेले असावे. पाठराखीण, chaperone असे शब्द आहेत. लेखिका नीट सांगू शकतील Happy

नो नो आम्हाला हॉस्टेलमधील खोली, एकांत, फिरण्याची मुभा सारे सारे काही होते. ती बया पाठराखिण नव्हती. बट ऑल्वेज द अ‍ॅप्रोच इस मोअर द मेरीअर.
सोशल सेटप मध्ये आपल्याला आपल्या पार्टनरचे वेगळे रुप पहायला मिळू शकते. गप्पा होतात. वादविवाद, विनोद आणि मौजमजेत 'कालो गच्छति धीमताम' त्यामुळे आम्हाला नेहमी मैत्रांचा सहवास आवडत आलाय. ही थीमच आहे. जितके अधिक कॉमन मैत्र तेवढी मजा जास्त.
तिलाही बॉयफ्रेन्ड होता. पण तेव्हा हे सुचले नाही की त्यालाही इन्व्हाइट करावे.

Oh is it! अच्छा Happy मग तर तिचा हेतू अधिक उघड आहे असे वाटतेय. कारण तुम्हाला सुचले नाही तिच्या बॉयफ्रेंड ला बोलवावे पण तिला तर सुचायला हवेत.

अगदी अगदी मनमोहन. अजुन एक ऑन स्पर ऑफ मोमेन्ट म्हणजे हा कामतला जायचा कार्यक्रम अचानक ठरलेला नसून १ -२ दिवस आधी ठरवुन केलेला होता.

Pages