कंपता दिवा

Submitted by अभिषेक_ on 26 November, 2023 - 11:15

या कंपत्या दिव्याला
कुणी तेल द्याल का रे?
उजळेन मग असा की
हे लाजतील तारे!

ना आस मज घडाची
तिळभरही फार आहे,
पुन्हा प्रकाशण्याचा
माझा विचार आहे!

फडफडलो मी जरीही
विझणार आज नाही,
अंधार झटकल्याची
ही एक मुक्त ग्वाही!

दिलेत वादळांचे
त्यांनी मला इशारे,
वणव्याचे रक्त माझे
मज जोर देती वारे!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सामो.
>>निरबल से लडाई बलवान की.
मस्त गाणे आहे!