
२०१५ ला अमेरिकेत आल्यावरची पहिलीच दिवाळी. गणपती होताच इंडिया बझार मध्ये रांगोळीचे रंग, पणत्या, फुलांच्या माळा छान मांडून ठेवायला सुरुवात झाली होती. तर Costco मध्ये Christmas सजावटीचे सामान आलेले त्यातून लाईटची माळ उचलली. आकाशकंदील काही कुठे दिसला नाही. हल्लीच म्हणजे गेल्या दोन तीन वर्षांतच इकडे पटेल ब्रदरस् मध्ये आकाशकंदील पण बघायला मिळू लागलेत.
असो! मी गिफ्ट wrapping चे पातळ paper आणले. आणि करांजांचे जसे जमतील तसे आकाशकंदील बनवले.
लांबलचक बाल्कनीमध्ये लाईटच्या माळा लावल्या आकाशकंदील लावले. पण बल्ब लावायला काही सोय नव्हती त्यामुळे मग ते तसेच टांगले.
लाडू, चिवडा केला. बाकी फराळ भारतातून आईने पाठवलेला. जो आजपर्यंत प्रत्येक वर्षी ती पाठवते आहे.
पहिल्याच दिवशी जोराचा पाऊस-वारा आला आणि सगळे आकाशकंदील पावसात भिजून पार चिपाड झाले. सगळी मेहनत पाण्यात गेली. त्यानंतर परत कधी आकाशकंदील बनविले नाहीत .बाकी यथासांग घरच्या घरी दिवाळी साजरी केली .
दिवाळी निमित्ताने एका हौशी पालिकेच्या पुढाकाराने दरवर्षी शाळेतल्या शिक्षिकांसाठी छान लंच आखले जायचे. माझे ते पहिलेच वर्ष होते. मेनू ठरला. सगळ्या बायकांनी पदार्थ आपापसात वाटून घेतले. काही पालकांनी गिफ्ट साठी वर्गणी दिली. प्रत्येकीने ५० माणसांना पुरेल एवढा पदार्थ करून आणायचा. मुख्य मेनू मध्ये शेवयांचा उपमा, लेमन राईस, पुरी, श्रीखंड, रसमलाई, बटाट्याची डोसा भाजी, इडली, चटणी,सांबार, सलाड, आणि डोसे असा जंगी बेत ठरला. गिफ्ट बॅगमध्ये मिठाई म्हणून एकीने बेसनाच्या वड्या करायच कंत्राट घेतल - जवळ जवळ दोन अडीचशे वड्या. कोणीतरी फरसाणची जबाबदारी घेतली
ही जी पुढारी पालक होती तिने मुख्य दिवशी डोसा बनविण्याचे कंत्राट घेतले. स्टाफरूम मधील स्टोववर दोन-चार तवे टाकून लाइव्ह डोसा काउंटर करण्याचा तिचा मानस मला तर अगदीच महत्त्वाकांक्षी वाटला. पन्नास एक लोकांसाठी डोसे करायचे म्हणजे काय खायची गोष्ट आहे का?
नंतरच्या काळात इकडे भारतीय ( आणि बांगला देशी) महिलांना दोन-तीन दिवस राबून ४०-५० माणसांचा स्वयंपाक लिलया करताना पाहिलंय, अगदी ३-४ कोर्स जेवण, दोन अडीचशे दहीवडे, तीन एकशे पेढे, एका माणसाला उचलवणार नाही येव्हढी मोठी पातेली भरून उपमा वगैरे वगैरे. आणि हे सगळं मुलांच्या शाळा-क्लासेसना सोडण-आणण, घरातील इतर काम सांभाळून. ह्या महिलांच्या दहा टक्केही क्षमता गेल्या आठ वर्षांत सुद्धा कमवता आली नसल्याने त्यांना दंडवत ठोकून हा लेख पुढे नेते.
माझ्या वाट्याला तसा अगदीच (वरवर) सोपा वाटणारा पदार्थ आला, तो म्हणजे चाट सलाड.
सलाड असले म्हणून काय झालं, मुंबईत असताना सातआठ माणसांच्या वरती स्वयंपाक करायची अजिबात सवय तर नव्हतीच पण मोठ्या प्रमाणावर काही केलही नव्हतं कधी. कारण कधी पाहुणे आले तर स्वयंपाकाच्या मावशी, प्रशांत कॉर्नर, गोखले उपहारगृह असे बरेच पर्याय असायचे ताट सजवायला.
घरात एवढी मोठी भांडीही नव्हती, आणि ते बनवलेलं सलाड शाळेत घेऊन कसं जाणार हाही एक प्रश्नच होता. ते सगळे प्रश्न माझ्या शेजजारणीने चुटकीसरशी सोडवले. ती आणि मी मिळून सलाड करायचे आणि तिच्या गाडीने ट्रे घेऊन जायचे ठरविले.
मोड आलेले मूंग, काबुली चणे, बटाटे, कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, गाजर, बीट, आणि चाट मसाला.
दोन मोठे बेकिंग ट्रे आणले. त्यात सलाड भरून वर गाजर, बीट किस, कोथिंबीर पसरवून छान सजावटही केली.
गाडीने शाळेत गेलो. ते जड ट्रे घेऊन स्टाफ रूम मध्ये पोहचलो तर सुंदर सजावट केली होती- पताका, रांगोळ्या, गिफ्ट बॅग..
वरून डोसे, चटणी, सांबार ह्यांचा सुगंध आमचीच भूक चाळवून गेला.
छान सजविलेल्या टेबलांवर सगळे पदार्थ विराजमान झाले. प्रत्येक पदार्थाच्या समोर त्याचे नाव आणि त्यातल्या जिंन्नसांची यादी ठेवली गेली. बरोबर बारा वीसला एकेक शिक्षक/ शिक्षिका यायला सुरुवात झाली. तसा इकडे डोसा काउंटरही सुरू झाला. ज्या रीतीने ट्रे खालती होत होते, डोसे केले जात होते त्यावरून त्या सगळ्या गोऱ्या मंडळींना ते पदार्थ खूपच आवडलेले दिसले.
कोणाला सलाड आवडले, तर कोणाला श्रीखंड-रसमलाई. पण सगळ्यात जास्त भाव कुरकुरीत डोसे खाऊन गेले. एका प्रामाणिक शिक्षिकेने तिला भारतीय पदार्थ जरा तेलकट किंवा मसाल्याचे वाटतात पण सलाड आणि श्रीखंड मात्र खूप आवडल्याचे सांगितले. मी पण मनातल्या मनात सुखावत, मीच ते बनवल्याचे अजिबात कळू दिले नाही.
तर एकाने इतका कुरकुरीत गरमा गरम डोसा किंवा तसा कुठलाही पदार्थ आधी कधी काही खाल्ला नसल्याची कबुली दिली.
पण ती पालक त्याच वर्षी भारतात निघून गेल्याने मग नंतर शाळेत कधी दिवाळी पार्टी झाली नाही.
त्यानंतरच्या दरवर्षीची दिवाळी साधारण अशीच गेली. इकडच्या मित्र-मैत्रिणी, हाताच्या बोटावर मोजता येण्याइतके नातेवाईक, यांच्याबरोबर दिवाळी नंतरच्या वीकएंड ना साजरी करत. इकडे वणवे, लाकडाची घरे यांमुळे क्वचितच एखादी पेटी फुलबाज्या लावल्या तरच अन्यथा फटाके अगदीच तुरळक. पणत्याही अगदी मोजक्याच, शास्त्रा पुरत्या. मग हवे तर LED दिवे लावा हवे तेव्हढे. त्यातल्या त्यात त्याच जरा हौसेनी रंगवायच्या. हळू हळू इकडे रुळताना मग दिवाळीला इकडच्याच गोतावळ्यातील अभारतीय लोकांना दिवाळी निमित्ताने त्यांना मनापासून आवडलेली चितळ्यांची बाकरवडी किंवा रसमलाई खिलविणे हेही सालाबाद झाले. यंदा आमच्या शेजारणीने मी झाड लोट करत असताना हटकले, “लायटिंग लागल म्हणजे दिवाळी आली वाटतं? Happy Diwali“ मग मीही संभाषण पुढे नेत, “ तुला भारतीय मिठाई आवडते का? मी दिली तर आवडेल का तुम्हाला? “
“आम्ही कधी खालीच नाहीये. तू दिलीस तर आम्ही खाऊन बघतो. पण आम्ही चॉकलेट नाही खात. “
“chickpea (बेसन), clarified बटर (तूप) , wheat (rawa) अस असतं. चालेल का?”
“हो चालेल चालेल.”
त्यामुळे ह्या वर्षी शेजारीच ( उतार भारतीय कुटुंब) नाही तर पाजारीही (अमेरिकन कुटुंब)दिवाळी फराळ दिल्यावर अगदी जुन्या मनातल्या दिवाळीच्या एक पाऊल जवळ गेल्यासारखं वाटलं.
एक वर्षी दिवाळीत DMV (डिपार्टमेंट ऑफ मोटर वेहिकल) च्या ऑफिसमध्ये गेले होते तिकडे बऱ्याच अभारतीय स्त्री कर्मचारी लेहेंगा किंवा साड्या नेसून आल्या होत्याआणि मीच नेहेमीच्या जीन्स-हुडी मध्ये होते. त्या ताड-माड उंच, धिप्पाड गोऱ्या- काळया बायकांना त्या पोशाखात बघून एकदम गंमत वाटली.
बहुदा बे एरियात भारतीय लोकांच प्राबल्य असल्याने असेल परंतु इकडच्या बऱ्याच ऑफीसात, शाळेत म्हणजे कर्मचारी वर्गात दिवाळीच्या पार्ट्या होत असतात. ह्या वर्षी तर नासामध्ये ही पहिल्यांदाच छोटेखानी दिवाळी साजरी झाली हे एका नासा कर्मचारीच्या पोस्ट वरून कळले. Icecles ह्या आईसक्रीमच्या दुकानामध्ये दिवाळी स्पेशल “गुलाब जामून” फ्लेवरच ice-cream होतं.
Costco मध्ये त्यांच्या कीर्तीला शोभणारा भला मोठा साजूक तुपातल्या मोतीचुराच्या लाडवांचा बॉक्स मिळाला.
ह्या रेट ने बहुदा काही वर्षात Costco मध्ये दिवाळीत पणत्या, उटणे, आणि आकाशकंदील दिसले तरी आश्चर्य नको वाटायला.
ह्या वर्षीची दिवाळी तर झालिये, फराळही संपला असेलच! तो आमचा पण संपला. पण लगेच इकडे आमची आता Thanks Giviing सुट्टीची आणि ब्लॅक फ्रायडे सेलची तयारी सुरू झालीय.

--
---
--
--
--
--
--
--
---

---

--

Submitted by राज on 29
Submitted by राज on 29 October, 2025 >>
पूर्ण क्लिप
https://youtu.be/2XBPZ1XZHew?si=etiC9_1y-8m1KY4u
तुम्ही हा असा द्वेष सपोर्ट करत असाल तर कठीण आहे.
>>धूळ भरलेले पाय हे गृहितक
>>धूळ भरलेले पाय हे गृहितक कश्याला?>> हे गृहितक नाही. गाडीतून फिरलात तरी गाडी वाले पार्किंगला दिल्यावर तरी चालताच ना. चप्पल असेल तर पायांना आणि चपलेला धूळ लागणार, बूट असल्यास फक्त बुटांना. मांडी घालून कुशन असलेल्या खुर्चीत बसतानाच्या क्रियेत ते पाऊल कुशनवर घासले जाते. चप्पल काढून पाय न धुता पुसता मांडी घालून बसायला गेले तर धूळ कुशनला लागणार. यात ओढून ताणून काही आणलेले नाही. घरी क्रिम कलरच्या कुशन असलेल्या खुर्चीवर सलग काही दिवस प्रयोग करुन बघू शकता.
भारतीय बैठकीबद्दल बोलायचे तर माझ्या आजोळी बैठकीच्या खोलीत छान लोड तक्केवाली पांढरी बिछायत असे. चपला बाहेर काढून मग पाय पायपुसण्याला पुसणे, जोडीला पॅसेजमधे रनर होते, त्यावरुन चालताना ते थोडी बहूत धूळ टिपायचे. मग पुन्हा एक पायपुसणे आणि मग बैठकीच्या खोलीत प्रवेश. तरी बिछायतीवरची चादर एक दिवस आड धुतली जायची. आम्ही मुले पुढल्या अंगणात अनवाणी खेळायचो तर प्रवेश मागल्या अंगणातल्या नळावर पाय धुवून पुसून मागल्या दाराने.
>>किती तो अपप्रचार<<
>>किती तो अपप्रचार<<
अमेरिकेत तुम्हि कुठे आणि किती वर्षं आहात>>>>>
तुम्ही जो फोटो शेअर केलात त्यात भारताविरुद्ध प्रचार दिसतोय. मी जन्मापासुन भारतातच आहे. तुमची अमेरिका असेल स्वर्ग, म्हणुन आमचा भारत वाईट नाही आणि एका अमेरिकनाने असला बोर्ड लावण्याइतका तर अजिबातच नाही.
वर एक मुद्दा आलाय..
वर एक मुद्दा आलाय..
गेल्या १० - १५ वर्षात हे सण/ उत्सव मोठ्या प्रमाणावर जाण्याचं वाढलेलं प्रमाण..
>>
१. एखादा समाज जेव्हा रुळायला लागतो त्याच हे लक्षण आहे. आर्थिक, सामाजिक स्वास्थ्य आल्यावर तो सांस्कृतिक गोष्टींकडे वळतो.
Spending power वाढली की इकडचे consumer market त्याला खतपाणी घालते.. तस ते अजून झपाट्याने वाढते.
काही उदाहरणं
इकडे एका काउंटी मध्ये २ -३ वर्षांपासून दसरा मेळावा होतो, रावण दहन वगैरे सर्व होते.
कौन्सिल मेंबर/इतर पॉलिटिकल लोकं सगळे येतात.. ( इकडेही वर बँक येतेच की..(?))
होळी Cupertino City council च्या बोटॅनिकल छत्राखाली organize केली जाते.
आता Hilton हॉटेल्स वगैरे ही जाहिरात करताना आम्ही बारात ही काढायची सुविधा देतो मुद्दाम सांगतात.
२. खूप जास्त ( डोळ्यावर येणारं / माज दाखविल्या सारख होतं का?
असं वाटू शकतं.. तस होतही असेल.)
पण मग ते म्हणतात खाजगी संस्थेने केलं आहे त्यांना परवडत म्हणून ते करतात.
३. परेड , रॅली फक्त भारतीयच काढतात असे नाही.
चिनी नवीन वर्षाची खूप मोठी परेड असते, अनेक मोठ्या शहरांमधून.
Mexican festivals ,
Irish लोकांच्या परेड असतात .... अजूनही असतील..
**
आता का वाढलंय प्रमाण?
मुख्य सोशल मीडिया..
पूर्वी लग्नही बेताची, सुटसुटीत असायची.. आता लग्नही आठ आठ दिवस चालतात... ते उत्सवाचं ही झालं आहे.
लोकांकडे चिक्कार पैसा आलाय, शिवाय peer प्रेशर
अजून खोलात शिरलं तर अजून नीट करणं मिळतील.
>>तुम्ही जो फोटो शेअर केलात
>>तुम्ही जो फोटो शेअर केलात त्यात भारताविरुद्ध प्रचार दिसतोय. <<
भारताविरुद्ध प्रचार नाहि, अमेरिकेतल्या काहि मोजक्या, अतिउत्साहि भारतीयांकरता आहे ती सूचना. लोकल अथॉरिटीज कडुन परवानगी मिळाली याचा अर्थ आपण उत्सवाच्या नांवाखाली ध्वनीप्रदुषण, ट्रॅफिकजॅम करायला मोकळे, असा होत नाहि. अशाने जाणता-अजाणता, आपण इतरांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरत आहोत हा सिविक सेंस मॉब मेंटॅलिटिमुळे गायब झालेला आहे. असंतोषाचं हे मूळ कारण आहे...
>>तुम्ही हा असा द्वेष सपोर्ट
>>तुम्ही हा असा द्वेष सपोर्ट करत असाल तर कठीण आहे.<<
मूळात द्वेष कशामुळे निर्माण झाला याची कारणं शोधा. मुंबईत छटपूजेला झालेल्या विरोधाची पार्श्वभूमी जाणुन घेतलीत तर इथल्यांची बाजू समजेल. मुंबई प्रमाणेच इथल्या स्थानीकांची हि अस्तीत्वाची लढाई आहे. यातलेच काहि माथेफिरु पुढे डॉटबस्टर सारख्या चळवळी उभारतात. त्याला खतपाणी घालायचं कि नाहि हा विचार सूज्ञ भारतीयांनी करण्याची वेळ आलेली आहे...
>>>मूळात द्वेष कशामुळे
>>>मूळात द्वेष कशामुळे निर्माण झाला याची कारणं शोधा. मुंबईत छटपूजेला झालेल्या विरोधाची पार्श्वभूमी जाणुन घेतलीत तर इथल्यांची बाजू समजेल. मुंबई प्रमाणेच इथल्या स्थानीकांची हि अस्तीत्वाची लढाई आहे. यातलेच काहि माथेफिरु पुढे डॉटबस्टर सारख्या चळवळी उभारतात. त्याला खतपाणी घालायचं कि नाहि हा विचार सूज्ञ भारतीयांनी करण्याची वेळ आलेली आहे...>>> अॅब्सोल्युटली बरोबर
मुंबईकरांना जे बिहार्
मुंबईकरांना जे बिहार्यांबद्दल वाटतं, तेच गोर्या अमेरिकनांना भारतीयांबद्दल वाटत असेल ना?
मुंबईकरांना जे बिहार्
मुंबईकरांना जे बिहार्यांबद्दल वाटतं, >>> एक मुंबईकर म्हणून तुम्हाला बिहाऱ्यांविषयी काय वाटतं?
छट पूजा २०१३-१४ मध्ये ऐकलं
छट पूजा २०१३-१४ मध्ये ऐकलं होतं.
ह्या पोस्टमुळे जाऊन बघितलं.
सूर्य आणि सूर्याची बहीण छट माता (?) ह्यांची केलेली पूजा. पाण्यात ऊभे राहून पूजा करतात. बिहारी, बंगाली , नेपाळी ( ईस्ट इंडिया आणि नेपाळ मध्ये राहणारी लोकं)
ह्या वर्षी जुहू ते गिरगाव (?) पूर्ण समुद्र किनारा छट पूजेला आलेल्या लोकांनी गजबजून गेला होता..
ह्यावरून इतक्या मोठ्या प्रमाणावर बिहार aanibvar नमूद केलेल्या राज्यातील / नेपाळ मधील लोकं आहेत हे समजून येते.
Controversy अजुन सापडली नाही.. बहुदा मराठी/ जणांचा चां उद्धार करणाऱ्या नेत्यांनी इतके बिहारी का / कसे वगैरे मुद्दे उपस्थित केले असतील .. अर्थात एवढ्या सौम्यपण हे नक्कीच झाले नसेल .
मुंबई प्रमाणेच इथल्या
मुंबई प्रमाणेच इथल्या स्थानीकांची हि अस्तीत्वाची लढाई आहे. >> हे विधान थोडं वेगळं करून समजून घ्यायला लागेल... दोन्ही बाजूंनी.
फक्त स्थानिकांना शांत ठेवण्यासाठीच नाही तर एरवीही NJ la झालेली फटाके घटना / किंवा त्यासारखे वर्तन अजिबात योग्य नाही.
पण ते अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांचे प्रातिनिधिक रूप नाही.. it was an outlier
कुठल्याही कारणास्तव racism/ harassment/ abuse याचे समर्थन होऊ शकत नाही.
डॉटबस्टर हा hate group NJ मध्ये १९७५-९३ दरम्यान active होता.
जर्सी सिटी मधून भारतीयांना ( कपाळावर बिंदी , डॉट असलेले) हाकलून द्यायचा त्यांचा हेतू होता. विशेष करून पटेल cha ह्यात उल्लेख आहे.
आता जवळ जवळ सर्व motels पटेल या मालकीचेवाहेत. आता जर्सी सिटी मध्ये भारतीय मेजोरिटी मध्ये असतील.
https://en.wikipedia.org/wiki/Dotbusters
राज, तुम्ही जो दुसरा मुद्दा
राज, तुम्ही जो दुसरा मुद्दा मांडला त्याच्याशी १०० टक्के सहमत. मी वर माझ्या एका प्रतिसादातही तेच लिहिलेय की ज्या समाजात जे चालत नाही ते तुम्ही तिथे जाऊन करु नका.
मुंबईतल्या बिहारी नेपाळी आणि इतर प्रजेबद्दल माझे हेच मत आहे की यांना इथे यायला जागा मिळाली म्हणुन ते आले. अ पासुन ज्ञ पर्यंत सगळी कामे मराठी किंवा स्थानिक प्रजेने केली असती तर बाहेरच्या लोकांना कामेच मिळाली नसती. ते दुसरीकडे गेले असते. मुंबईत आज रोज लोक येताहेत ते वेगवेगळे प्राधान्यक्रम घेऊन. काही जीव जगवायला येताहेत, काही त्यांच्या स्किल्सला योग्य ते एक्ष्पोजर मिळुन पैसा मिळावा म्हणुन, काहींना इथला नो नाक खुपसु समाज हवाय म्हणुन.
तसेच अमेरिकेचे. तिथे भारतीय गेले ते स्किल्ल्स घेऊन, मेक्सिकन येताहेत जीव जगवायला.
या सगळ्यांनी तिथल्या समाजाला त्रास होणार नाही हे बघणे हे बेसिक नागरिकशास्त्र आहे.
don’t be like indian, don’t make this india. - आई मुलाला म्हणते कुंभकर्ण होऊ नकोस तेव्हा ती मुलाला त्याचे भले सांगत असतेच पण त्याचवेळी कुंभकर्ण वाईट हेही अध्याऋत धरत असते. दुसर्याला चांगला सल्ला देताना इतरांना नावे का ठेवता? तेही सोशल मिडियावरच्या बायस्ड माहितीवर आधारुन??
आता जवळ जवळ सर्व motels पटेल या मालकीचेवाहेत. आता जर्सी सिटी मध्ये भारतीय मेजोरिटी मध्ये असतील>>>>
हे असे कोकणात बिहार्यांनी केले तर मला आवडणार नाही पण मी यासाठी बिहार्यांना झोडपणार नाही तर कोकणी माणसाला संधी घालवल्याबद्दल शिव्या घालेन. जो काम करणार तोच पुढे जाणार.
साधना तुमचा प्रतिसाद पटला.
साधना तुमचा प्रतिसाद पटला.
मला ते म्हणायचे आहे.. की इकडे ही demography kadhi बदलते... गोरे लोकं घरे विकतात ती भारतीय/ चायनिज ( एशियन लोकं) विकत घेतात. आम्ही इकडे गेल्या ६-७ वर्षांमध्ये इकडच्या किती communities बदलताना बघितल्या आहेत. हे लोकं तिकडे ge की शाळांचे रेटिंग बदलते... घरच्या किमती वाढतात..
ह्यामध्ये टाळी एका हाताने वाजत नाही.
अमेरिका immigrants चे राष्ट्र आहे.
अर्थात मुंबई सुद्धा अनेक वसाहतींनी बसवलेले शहर आहे... तिच्या प्रगती मागे हे वैविध्य आहे हे अमान्य करता येत नाही.
https://uk.news.yahoo.com/jd
https://uk.news.yahoo.com/jd-vance-totally-acceptable-want-211843082.html
Appearing on a right-wing New York Post columnist’s podcast, Vice President JD Vance spent part of the hour-long episode on immigration, casting aside traditional notions of the American cultural melting pot.
Vance agreed with host Miranda Divine when she said it “creates division and hatred” for people of other cultural backgrounds to move into a neighborhood after he gave an example in which “20 people” price out U.S. citizens by moving into “a three-bedroom house.”
“Their next-door neighbors are going to say, ‘Wait a second, what is going on here? I don’t know these people. They don’t speak the same language that I do,’” Vance said.
He went on to add: “It is totally reasonable and acceptable for American citizens to look at their next-door neighbors and say, ‘I want to live next to people who I have something in common with. I don’t want to live next to four families of strangers.’ And the fact that we had an immigration system that actually promoted that division is a real, real disgrace.”
छट पूजेबद्दल - प्लास्टर
छट पूजेबद्दल - प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचं विसर्जन समुद्र, तलाव, नदी यांत करण्यावर पर्यावरणाच्या कारणांवरून बंदी आहे. ते नियम वाकवले गेले. पण लहान मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांतच करा असा नियम होता. निर्माल्यही वेगळे ठेवले जावे, पाण्यात जाऊ नये असा प्रयत्न असतो. आता छट पूजा मात्र नदी, तलाव, समुद्र अशा ठिकाणी झाली. त्याला पर्यावरणाचे नियम आडवे आले नाहीत.
सत्ताधार्यांनी महानगरपालिकेकरवी छट पूजेसाठी सुविधा उपलब्ध केल्या. आमच्या मुख्यमंत्र्यांनी बिहारमध्ये जाऊन, पुढल्यावर्षी छटपूजा मुंबईत येऊन करा , असे आमंत्रण दिले.
मराठी बोलण्या / न बोलण्याच्या , शालेय अभ्यासक्रमात हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून जे चाललं आहे, ते आणखी वेगळं.
मला स्वतःला याबद्दल काही वाटत नाही. स्थलांतर, बदलती संस्कृती वगैरे सगळे मुद्दे समजतात. त्यांनी स्थानिक संस्कृतीशी जुळवून घ्यावं असं नक्कीच वाटतं. पण जनभावना तशी असेलच असं नाही.
शिवाय अमेरिकेत गेलेले सगळेच भारतीय स्किल्ड जॉब्समध्येच आहेत, असंही नाही. बेकायदा स्थलांतराचा मुद्दा आहेच. त्याचा फटका कायदेशीर स्थलांतरितांनाही बसेल. सध्याचे सत्ताधारी काय म्हणतात ते तुम्हांला माहीतच आहे. वर ताजं वक्तव्य दिलं आहे. आमचे सत्ताधारीही घुसपेठिये असा जप करतच आहेत.
अमेरिका बाहेरुन आलेल्या
अमेरिका बाहेरुन आलेल्या लोकांनी भरभराटीस आणलेला देश आहे. आणि हा काही आर्याण्च्या वेळचा इतिहास नाही तर गेल्या तिन चारशे वर्षांचा इतिहास आहे.
जेव्हा राज ठाकरे नुकताच बाहेर पडलेला आणि मनसे जोरात होती तेव्हा ऑफिसातले यु पी बिहारी या विषयाण्वर चर्चा वाद वगैरे करायचे. मीही यात अधुन मधुन पडुन यांना म्हणायचे की तुम्ही तुमच्या राज्यातले राजकारण बघा की. तुम्हाला इतकी सबसिडी मिळतेय ती तुमचे राजकारणी खाताहेत म्हणुन तुम्ही इथे येताय. घरी कोणी आजारी पडुन मेले तरी अंतरामुळे, तिकिटे लगेच न मिळाल्यामुळे, विमान प्रवास न परवडण्यामुळे धावत जाता येत नाही ह्या वाईट परिस्थितीत अडकलात.
यावर त्यांचे उत्तर हे असायचे की मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे, इथे भरपुर पैसा आहे आणि त्यामुळे सगळे इथे येणारच.
हेच अमेरिकेचे आहे. तिथे समृद्धी आहे त्यामुळे जगभरातले लोक जाणारच.
ज्यांना आपल्या नेबरहुडात अनोळखी भाषा बोलणारे लोक नकोत त्यांनी नेबरहुडात कोणी जागा विकायला लागला तर ती स्वतःच विकत घ्यावी. वान्सने अशा लोकांना आर्थिक साहाय्य करावे
उषा वहिनींकरवी निरोप पाठवा.
उषा वहिनींकरवी निरोप पाठवा.
छट पुजा झाल्यावर दुसर्यस
छट पुजा झाल्यावर दुसर्या दिवशी तिथे जावुन बघा. घाण करुन सोडली असते.
त्या दिवशी व त्याच्या आदल्या दिवशी रोजचे वॉक घेणारे पण बिचकतात कारण गुंड टाईप युपी लोकं तंबु ठोकुन असतात. आता ह्या सर्वांनी परवानगी घेतली असते का? बहुधा नसावीच.
गोव्यात कोल्वा बीच आधी सुंदर असायचा. आता इतका घाण केलेला आहे. भांगात लाल सिंदुर भरलेल्या बायका ( ह्यावरुन नक्कीच युपी आहेत) काहीना काही विकत असतात. फळविक्रेते.. वगैरे.
केरळ्यात पण हिच परीस्थिती आहेच.
आता, काही म्हणतील गणपतीत नाही का आपण घाण करत?
पण अगदी मोजकी तुलना केली तरी ह्या पद्धतीत बकालपणा ज्यास्तच असतो गणपतीपेक्षा( अ. मा.म.)
थोड्या वर्षांनी ह्याच कारणाने तळी, जळी काय होते ते बघायचं.
राहता राहिले अमेरीकेतील भारतीय बेशिस्त विषयी:
सर्व साधारण भारतीय अमेरीकेत इतके बकालपणे साजरे नाहि करत. अपवाद आहेच.
पण थोड्या बेशिस्तांसाठी आपण चुकीचे रीप्रेसेंट करतो असे ठरवणे हे हि चुकीचेच आहे.
कारण अमेरीकेतील संधिसाधु( व्रण्द्वेष्टे, भारतद्वेष्टे,) लोकांना हे वरचे असे “अपवाद दाखवणे “ एक संधीच असते.
म्हणून करा कसेही साजरे असेही नाही. कारण, मला हे बाहेरून येणारे लोकं बेशिस्त असतील आणि माझे शहर्/गाव्/देश खराब करतील तर राग नक्कीच येइल.
बाब्या कार्टं कुसळ मुसळ
बाब्या कार्टं कुसळ मुसळ
कोल्वा गोवा सावंतवाडी माणगाव
कोल्वा गोवा सावंतवाडी माणगाव सगळीकडे परप्रांतिय राहतात कारण त्यांना पैसे कमवायच्या संधी मिळतात. स्थानिक सगळीकडेच झोपलेले असतात आणि अधुन मधुन जाग येते तेव्हा या बाहेरच्यांविरुद्ध बोंबा मारुन परत झोपतात. युपी बिहारी आता आले. महाराष्ट्रातल्या जुनाट खेड्यात जाऊन बघा, स्थानिक बोलीभाषा अस्खलित बोलणारा मारवाडी तिथे १०० वर्षांपासुन राहत असलेला आढळेल. इथे वाडीच्या बाजुच्या माणगावात सामोसे घेऊन जिपे केले तेव्हा मद्रासी सुब्रमनियम का अय्यप्पन असले नाव दिसले. मी लगेच विचारले तर म्हणे पन्नास वर्षे झाली इथेच राहतोय.
> गेल्या १०-१२ वर्षांत मला
> गेल्या १०-१२ वर्षांत मला जाणवलेला बद्दल म्हणजे एकंदरीतच हिंदू धर्म- संस्कृतीच्या नावाखाली एक प्रकारचे बिनडोक शक्तीप्रदर्शन -माज दाखवणे फार वाढले आहे.
भारताचे मुख्य न्यायाधीश गवई यांनी विष्णू या देवा विषयी काही विधाने केली. त्या विधानांचा भारतात निषेध करणे समजू शकतो, पण इथे अमेरिकेत टाईम स्क्वेअर मध्ये अतिशय खालच्या पातळीवरील व्यंगचित्रे भल्या मोठ्या स्क्रीन वर दाखवून देशाची इज्जत काढली या हिंदुत्ववाद्यांनी !
मुंबईत युपी बिहार बांगलादेशी
मुंबईत युपी बिहार बांगलादेशी वगैरे आले आणि झोपडपट्ट्या भरून राहू लागले याचे खापर आपल्या मराठी मुलांवर त्यांनी संधी घालवली असे फोडून मोकळे होऊ नका.
हे असे शहरावर अतिरिक्त ताण टाकून बेकायदेशीर पद्धतीने राहणाऱ्यांना पोसले गेले हे वोट बँकचे राजकारण आहे.
अशा लोकांशी स्पर्धा करायला चाळीत राहणाऱ्या मध्यमवर्गीय मुलांनी झोपडीत राहून कमी पैश्यात निकृष्ट दर्जाची सेवा पुरवायची अपेक्षा ठेवणे मला हास्यास्पद वाटते.
हे सिस्टीमचे अपयश असते. किंबहुना त्यांनी आपला राजकीय फायदा बघितला असतो.
मराठी पोराला वायरमन, रंगारी,
मराठी पोराला वायरमन, रंगारी, गवंडी असली कामे न करायला कसले डोंबलाचे सिस्टीम फेल्युअर लागते?? मी गेली ३० वर्षे नव्या मुंबईत राहात होते. ह्या सगळ्या असल्या कामांना कायम परप्रांतियच मिळालेले आहेत. एक मराठी रंगारी, आमच्या कोकणातला मालवणी, ओळखीच्या रेफरंसमुळे मुद्दाम शोधुन बोलवलेला. तोही हाताखाली कामाला सगळे बिहारी घेऊन आलेला. तो मराठी मजुरांबद्दल जे बोलला ते माबोवर हजारदा रिपिट करुन झालेय. मेबी सगळे मराठी एसी केबिनीत बसुन ऑफिसातली कामे करत असावेत. देव त्यांचे भले करो.
कारण परप्रांतीय कामगार
कारण परप्रांतीय कामगार स्वस्तात मिळतात. आणि ते स्वस्तात का मिळतात तर ते इकडे येऊन झोपड्यात राहतात आणि सार्वजनिक सोयी लुबाडतात त्यामुळे त्यांचे खर्च कमी असतात. थोडक्यात बेकायदेशीर पद्धतीने राहतात. या नादात शहराच्या सोयी सुविधांवर सुद्धा ताण पडतो. पण डोक्यावर राजकीय वरदहस्त असतो.
जाऊदे, आपल्यातल्या उणिवा न
जाऊदे, आपल्यातल्या उणिवा न बघता कायम इतरांनाच दोष देत बसणे हे सगळ्यात सोपे आहे.
दोष तर तुम्हीही मराठी मुलांना
दोष तर तुम्हीही मराठी मुलांना देत आहात
जे घडतंय त्यात कोणाचा तरी दोष आहे. आपण फक्त शोधतोय की कोणाचा आणि किती दोष आहे.
एकांगीच विचार करून तो कधीच शोधू शकत नाही.
या धाग्यावर भरपूर अवांतर
या धाग्यावर भरपूर अवांतर झालंच आहे. त्यातल्याच एका अवांतराचा धागा धरून
माज्या गावातली लोका आता अशी मराठी बोलतंत ह्या बघून माका काय वाटता हां, ते सांगूक शब्द गावनत नाय (मुंबईत जन्माला येऊन आणि राहून एवढंच मालवणी येतं. तेही लहानपणीच कानावर पडलं तेवढं)
https://www.loksatta.com/maharashtra/bjp-nominates-shraddha-sawant-bhosa...
श्रद्धा सावंत भोसले ह्या
श्रद्धा सावंत भोसले ह्या सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी आहेत (त्यांचा स्टाफ युवराणी म्हणतो). त्यांची मातृभाषा गुजराती आहे, मराठी नाही. त्या व युवराज लखम ट्रेंड शेफ आहेत आणि राजवाड्याचा एक भाग हॉटेल व रेस्तरांमध्ये बदलुन तो ते दोघे चालवतात. मी भेटलेय ह्या दांपत्याला. दोघेही अगदी साधे आणि आदबशीर आहेत. श्रद्धा भोसलेंचा सार्वजनिक जीवनातील वावर व वेषभुषा खुप साधी तरीही खानदानी अदब दाखवणारी आहे. उमेदवारीचे माहित नव्हते, वरचे वाचुन कळले.
अन्नपुर्णा कोरगावकर ह्या माजी नगराध्यक्ष भाजपकडुन उमेदवारीसाठी प्रयत्नशील होत्या. त्यांनी अपक्ष म्हणुन काल अर्ज भरला हे कळले होते पण भाजपाने श्रद्धा भोसलेंसाठी कोरगावकराम्चा पत्ता कट केला हे माहित नव्हते. ह्यांची कृषी साहित्याची दोन मोठी दुकाने वाडीत असल्यामुळे यांच्याशीही ओळख आहे. बघु काय होतेय पुढे.
मुंबईकरांना जे बिहार्
मुंबईकरांना जे बिहार्यांबद्दल वाटतं, तेच गोर्या अमेरिकनांना भारतीयांबद्दल वाटत असेल ना?
Submitted by भरत.>>>
फक्त बिहारी नाही पण भैय्या ह्या गटामध्ये जण गणले जाते...
त्यांच्या विषयी एक stereotype ( सर्वसामान्य ग्रह) की ते म्हणजे एक xxxवाला - रिक्षावाला, इस्त्रीवाला, भाजी वाला वगैरे..
पण वस्तुथिती तशी आहे का?
शिवाय हे स्थलांतर १९७० पासून रोखण्याचा प्रयत्न गेले कित्येक दशके होत आहे. त्याला किती यश आले. उलट वरचे ( छट पूजेचे आकडे/ चित्र काही दुसरेच सत्य सांगते.
राहता राहिला प्रश्न अमेरिकेतील ( गोऱ्याना ) भारतीयांबद्दल काय वाटतं.
मिश्र भावना ते कटू भावना यात राज्य/ प्रदेश / समाज यानुसार बदलणारा कट आहेच.
हा खालचा व्हिडिओ बघितला ( साधारण १८ मिनिटानंतर पुढे थोडा वेळ)
तर या प्रश्नाचे थोडेफार उत्तर मिळेल.
https://youtu.be/HaXprCqXwvA?si=7sodkao8CIHUpmbn
Pages