माझी अमेरिका डायरी - इकडची दिवाळी ..

Submitted by मीस्वच्छंदी on 19 November, 2023 - 02:14

२०१५ ला अमेरिकेत आल्यावरची पहिलीच दिवाळी. गणपती होताच इंडिया बझार मध्ये रांगोळीचे रंग, पणत्या, फुलांच्या माळा छान मांडून ठेवायला सुरुवात झाली होती. तर Costco मध्ये Christmas सजावटीचे सामान आलेले त्यातून लाईटची माळ उचलली. आकाशकंदील काही कुठे दिसला नाही. हल्लीच म्हणजे गेल्या दोन तीन वर्षांतच इकडे पटेल ब्रदरस् मध्ये आकाशकंदील पण बघायला मिळू लागलेत.
असो! मी गिफ्ट wrapping चे पातळ paper आणले. आणि करांजांचे जसे जमतील तसे आकाशकंदील बनवले.
लांबलचक बाल्कनीमध्ये लाईटच्या माळा लावल्या आकाशकंदील लावले. पण बल्ब लावायला काही सोय नव्हती त्यामुळे मग ते तसेच टांगले.
लाडू, चिवडा केला. बाकी फराळ भारतातून आईने पाठवलेला. जो आजपर्यंत प्रत्येक वर्षी ती पाठवते आहे.
पहिल्याच दिवशी जोराचा पाऊस-वारा आला आणि सगळे आकाशकंदील पावसात भिजून पार चिपाड झाले. सगळी मेहनत पाण्यात गेली. त्यानंतर परत कधी आकाशकंदील बनविले नाहीत .बाकी यथासांग घरच्या घरी दिवाळी साजरी केली .

दिवाळी निमित्ताने एका हौशी पालिकेच्या पुढाकाराने दरवर्षी शाळेतल्या शिक्षिकांसाठी छान लंच आखले जायचे. माझे ते पहिलेच वर्ष होते. मेनू ठरला. सगळ्या बायकांनी पदार्थ आपापसात वाटून घेतले. काही पालकांनी गिफ्ट साठी वर्गणी दिली. प्रत्येकीने ५० माणसांना पुरेल एवढा पदार्थ करून आणायचा. मुख्य मेनू मध्ये शेवयांचा उपमा, लेमन राईस, पुरी, श्रीखंड, रसमलाई, बटाट्याची डोसा भाजी, इडली, चटणी,सांबार, सलाड, आणि डोसे असा जंगी बेत ठरला. गिफ्ट बॅगमध्ये मिठाई म्हणून एकीने बेसनाच्या वड्या करायच कंत्राट घेतल - जवळ जवळ दोन अडीचशे वड्या. कोणीतरी फरसाणची जबाबदारी घेतली
ही जी पुढारी पालक होती तिने मुख्य दिवशी डोसा बनविण्याचे कंत्राट घेतले. स्टाफरूम मधील स्टोववर दोन-चार तवे टाकून लाइव्ह डोसा काउंटर करण्याचा तिचा मानस मला तर अगदीच महत्त्वाकांक्षी वाटला. पन्नास एक लोकांसाठी डोसे करायचे म्हणजे काय खायची गोष्ट आहे का?
नंतरच्या काळात इकडे भारतीय ( आणि बांगला देशी) महिलांना दोन-तीन दिवस राबून ४०-५० माणसांचा स्वयंपाक लिलया करताना पाहिलंय, अगदी ३-४ कोर्स जेवण, दोन अडीचशे दहीवडे, तीन एकशे पेढे, एका माणसाला उचलवणार नाही येव्हढी मोठी पातेली भरून उपमा वगैरे वगैरे. आणि हे सगळं मुलांच्या शाळा-क्लासेसना सोडण-आणण, घरातील इतर काम सांभाळून. ह्या महिलांच्या दहा टक्केही क्षमता गेल्या आठ वर्षांत सुद्धा कमवता आली नसल्याने त्यांना दंडवत ठोकून हा लेख पुढे नेते.
माझ्या वाट्याला तसा अगदीच (वरवर) सोपा वाटणारा पदार्थ आला, तो म्हणजे चाट सलाड.
सलाड असले म्हणून काय झालं, मुंबईत असताना सातआठ माणसांच्या वरती स्वयंपाक करायची अजिबात सवय तर नव्हतीच पण मोठ्या प्रमाणावर काही केलही नव्हतं कधी. कारण कधी पाहुणे आले तर स्वयंपाकाच्या मावशी, प्रशांत कॉर्नर, गोखले उपहारगृह असे बरेच पर्याय असायचे ताट सजवायला.
घरात एवढी मोठी भांडीही नव्हती, आणि ते बनवलेलं सलाड शाळेत घेऊन कसं जाणार हाही एक प्रश्नच होता. ते सगळे प्रश्न माझ्या शेजजारणीने चुटकीसरशी सोडवले. ती आणि मी मिळून सलाड करायचे आणि तिच्या गाडीने ट्रे घेऊन जायचे ठरविले.
मोड आलेले मूंग, काबुली चणे, बटाटे, कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, गाजर, बीट, आणि चाट मसाला.
दोन मोठे बेकिंग ट्रे आणले. त्यात सलाड भरून वर गाजर, बीट किस, कोथिंबीर पसरवून छान सजावटही केली.

गाडीने शाळेत गेलो. ते जड ट्रे घेऊन स्टाफ रूम मध्ये पोहचलो तर सुंदर सजावट केली होती- पताका, रांगोळ्या, गिफ्ट बॅग..
वरून डोसे, चटणी, सांबार ह्यांचा सुगंध आमचीच भूक चाळवून गेला.
छान सजविलेल्या टेबलांवर सगळे पदार्थ विराजमान झाले. प्रत्येक पदार्थाच्या समोर त्याचे नाव आणि त्यातल्या जिंन्नसांची यादी ठेवली गेली. बरोबर बारा वीसला एकेक शिक्षक/ शिक्षिका यायला सुरुवात झाली. तसा इकडे डोसा काउंटरही सुरू झाला. ज्या रीतीने ट्रे खालती होत होते, डोसे केले जात होते त्यावरून त्या सगळ्या गोऱ्या मंडळींना ते पदार्थ खूपच आवडलेले दिसले.
कोणाला सलाड आवडले, तर कोणाला श्रीखंड-रसमलाई. पण सगळ्यात जास्त भाव कुरकुरीत डोसे खाऊन गेले. एका प्रामाणिक शिक्षिकेने तिला भारतीय पदार्थ जरा तेलकट किंवा मसाल्याचे वाटतात पण सलाड आणि श्रीखंड मात्र खूप आवडल्याचे सांगितले. मी पण मनातल्या मनात सुखावत, मीच ते बनवल्याचे अजिबात कळू दिले नाही.
तर एकाने इतका कुरकुरीत गरमा गरम डोसा किंवा तसा कुठलाही पदार्थ आधी कधी काही खाल्ला नसल्याची कबुली दिली.
पण ती पालक त्याच वर्षी भारतात निघून गेल्याने मग नंतर शाळेत कधी दिवाळी पार्टी झाली नाही.

त्यानंतरच्या दरवर्षीची दिवाळी साधारण अशीच गेली. इकडच्या मित्र-मैत्रिणी, हाताच्या बोटावर मोजता येण्याइतके नातेवाईक, यांच्याबरोबर दिवाळी नंतरच्या वीकएंड ना साजरी करत. इकडे वणवे, लाकडाची घरे यांमुळे क्वचितच एखादी पेटी फुलबाज्या लावल्या तरच अन्यथा फटाके अगदीच तुरळक. पणत्याही अगदी मोजक्याच, शास्त्रा पुरत्या. मग हवे तर LED दिवे लावा हवे तेव्हढे. त्यातल्या त्यात त्याच जरा हौसेनी रंगवायच्या. हळू हळू इकडे रुळताना मग दिवाळीला इकडच्याच गोतावळ्यातील अभारतीय लोकांना दिवाळी निमित्ताने त्यांना मनापासून आवडलेली चितळ्यांची बाकरवडी किंवा रसमलाई खिलविणे हेही सालाबाद झाले. यंदा आमच्या शेजारणीने मी झाड लोट करत असताना हटकले, “लायटिंग लागल म्हणजे दिवाळी आली वाटतं? Happy Diwali“ मग मीही संभाषण पुढे नेत, “ तुला भारतीय मिठाई आवडते का? मी दिली तर आवडेल का तुम्हाला? “
“आम्ही कधी खालीच नाहीये. तू दिलीस तर आम्ही खाऊन बघतो. पण आम्ही चॉकलेट नाही खात. “
“chickpea (बेसन), clarified बटर (तूप) , wheat (rawa) अस असतं. चालेल का?”
“हो चालेल चालेल.”
त्यामुळे ह्या वर्षी शेजारीच ( उतार भारतीय कुटुंब) नाही तर पाजारीही (अमेरिकन कुटुंब)दिवाळी फराळ दिल्यावर अगदी जुन्या मनातल्या दिवाळीच्या एक पाऊल जवळ गेल्यासारखं वाटलं.

एक वर्षी दिवाळीत DMV (डिपार्टमेंट ऑफ मोटर वेहिकल) च्या ऑफिसमध्ये गेले होते तिकडे बऱ्याच अभारतीय स्त्री कर्मचारी लेहेंगा किंवा साड्या नेसून आल्या होत्याआणि मीच नेहेमीच्या जीन्स-हुडी मध्ये होते. त्या ताड-माड उंच, धिप्पाड गोऱ्या- काळया बायकांना त्या पोशाखात बघून एकदम गंमत वाटली.
बहुदा बे एरियात भारतीय लोकांच प्राबल्य असल्याने असेल परंतु इकडच्या बऱ्याच ऑफीसात, शाळेत म्हणजे कर्मचारी वर्गात दिवाळीच्या पार्ट्या होत असतात. ह्या वर्षी तर नासामध्ये ही पहिल्यांदाच छोटेखानी दिवाळी साजरी झाली हे एका नासा कर्मचारीच्या पोस्ट वरून कळले. Icecles ह्या आईसक्रीमच्या दुकानामध्ये दिवाळी स्पेशल “गुलाब जामून” फ्लेवरच ice-cream होतं.
Costco मध्ये त्यांच्या कीर्तीला शोभणारा भला मोठा साजूक तुपातल्या मोतीचुराच्या लाडवांचा बॉक्स मिळाला.
ह्या रेट ने बहुदा काही वर्षात Costco मध्ये दिवाळीत पणत्या, उटणे, आणि आकाशकंदील दिसले तरी आश्चर्य नको वाटायला.

ह्या वर्षीची दिवाळी तर झालिये, फराळही संपला असेलच! तो आमचा पण संपला. पण लगेच इकडे आमची आता Thanks Giviing सुट्टीची आणि ब्लॅक फ्रायडे सेलची तयारी सुरू झालीय.

IMG_20151117_111751501.jpg
--
IMG_20151117_114855917.jpg
---
IMG_20151117_114945081.jpg
--
IMG_20151117_114933238_HDR.jpg
--
IMG_20151117_115847606_HDR.jpg
--
IMG_20151117_122358301_HDR.jpg
--
IMG_20191025_201242266.jpg
--
IMG_20151105_225033175.jpg

--
IMG_20190929_103432082.jpg

---

IMG_20211104_191243575.jpg

---

IMG_20161030_202207876_HDR.jpg

--

download.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्या सेफ्टीसाठी नियम हवेतच कशाला ? ते आपल्याला स्वतःच कळले पाहिजे>>>>

सिट्बेल्ट व हेल्मेट पोलिसासाठी वापरायचे असतात असे समजणारा आपला देश. जिथे स्वतःच्या सुरक्षेबद्दल लोक जागरुक नाहीत तिथे दुसर्‍यांच्या सुरक्षेबद्दल ते कसे दक्ष राहतील? सिव्हिक सेंस नसलेला देश व समाज.

अगदी अगदी साधना, समुद्रात जाऊ नका, धोका आहे म्हणून तो कोस्टल गार्ड अडवत असतो तर त्याच्यापासून लांब जाऊन लोक समुद्रात जाताना पाहिलेत गोव्यात.

लहानपणी अधून मधून ' न्यूयॉर्क मध्ये गणेशोत्सव' , ' लंडन मध्यें सत्यनारायण' अशा बातम्या वाचल्या की अभिमान वाटे' . Happy

आता तर गणपती विसर्जनाचेही खूळ आले आहे. दोन दोन फूट प्लॅस्टर च्या मूर्ती इथल्या pristine नद्या व समुद्रात विसर्जित केल्या जातात.

ज्या गोष्टी भारतात काही काळापूर्वी त्याज्य होत्या त्या समाजमान्य झाल्या आहेत. उदा: गणेशोत्स्वात अश्लिल गाणी, माडवात पत्ते व दारू.... मग यातीलच काही मंडळी परदेशात जातात, सरकारने आधीच सनातन धर्म, आपणच विश्वगुरु इ. भ्रामक वल्गना जगजाहिर केल्या असून त्या व्हल्नरेबल लोकांच्या मेंदूत ग्राह्य म्हणून ठासून भरल्या असल्याने माझी असंस्कृती म्हणजेच वैश्विक संस्कृती असा एक गोड गैरसमज झाला आहे, नव्हे उद्दाम समज झाला आहे आणि याची परिणिती ही आहे.... काही दिवसांनी याचा अजाणत्या व सूज्ञ परदेशीवासी भारतियांच्या सामाजिक जीवनावर भयान क होणार आहे.... ही शोकांतिका आहे

अमेरिकेतले भारतीय भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त तिथे रॅलीज काढतात आणि त्यात बुलडोझर (भारतातल्या मुस्लिमांच्या दमनाचे प्रतीक) मिरवतात. कित्ती छान!

अर्धी मायबोली तर परदेशात आहे. वर विकु, धनश्री, छंदीफंदी हेसगळे तिकडचेच ना???

मग
>>>>
अमेरिकेतले भारतीय भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त तिथे रॅलीज काढतात आणि त्यात बुलडोझर (भारतातल्या मुस्लिमांच्या दमनाचे प्रतीक) मिरवतात. >>>>>

हे त्यांच्या बद्दल लिहिलेय ना??

नसेल तर ते जसे यात नाहीत तसे इतर कित्येक नसतीलही. सगळ्याना एकत्रित धरुन कशाला झोडपताय??

विकु - इथे आता प्लॅस्टरच्या (प्लॅस्टर ऑफ पॅरिस म्हणायचे आहे बहुतेक तुम्हाला भारतात म्हणतात तसे) मुर्ती नसतात - बहुतांश मातीच्या किंवा पेपर मॅशेच्या असतात. दोन फुटांपेक्षा मोठ्या जवळजवळ सगळ्या पेपरच्या - म्हणजे पेपर मॅशे करून बनवलेल्या असतात. मी आमच्या इथे तरी तसे पाहिले आहे. आणि न्यू जर्सीतही तसेच असेल कारण मुर्ती इथे तिकडूनही येतात. काही मुंबईतून थेट येतात - विशेषतः पेपरच्या. गेल्या काही वर्षांत हा बदल झाला आहे.

Vijaykulkarni म्हणतात तसे गणपती/ गोंधळ किंवा दिवाळीची NJ ची दृश्ये ही सर्व मी इकडे( बे एरिया ) कुठेही पाहिलेले नाही किंवा ऐकलेही नाही.
आता Google search करून बघितले पण तास काही आढळत नाही.

खरं तर हा धागा दिवाळीचा आहे पण विषय निघालाय म्हणून हे सर्व डिटेल्स ..

इकडे महाराष्ट्र मंडळ ते रेडिओ जिंदगी ( फार मोठ्या प्रमाणावर असतात) सगळे सार्वजनिक गणपती एक फार तर दोन दिवसांचे असतात.
हॉल - शाळेचे, banquet भाड्याने घेऊन किंवा पार्क मध्ये परवानगी घेऊन केले जातात.

ढोल ताशा किंवा जी गणपतीची मिरवणूक असते ती हॉलमध्ये किंवा ग्राउंड मध्ये तिकडच्या तिकडे गोल सिम्बॉलिक केली जाते.

हे सगळं फक्त त्या जागेपुरतच मर्यादित असतं. या जागा तशा एका अंड्या असतात ऍटलिस्ट मी बघितलेल्या तरी त्यामुळे आजूबाजूला रहिवाशी नसतात.

बाहेर रस्त्यावर आवाजही येत नाही.

वारी -
वारी वरती पूर्ण एक लेट लिहिलाय तो तुम्ही बघू शकता भक्ती जीव आहे स्पेशली आता बेरीज ते ती परत रिझर्व पार्क आहे त्या पार्क मधल्या आतल्या ट्रेल वरून जाते. मी दोनदा अटेंड केली आहे रस्त्याच्या डिव्हायडरच्या फक्त एका बाजूलाच जरी दीडशे दोनशे तीनशे माणसं असली तरी फक्त एका बाजूलाच असतात. त्याचीही व्यवस्थित परवानगी काढलेली असते. बाकी सोहळा देवळात होतो आणि देवळाचे पुजारी वगैरे या सगळ्या सहभागी असतात आणि त्यांचे संमतीने हे सर्व होत असावे.

Mmba ते शंभर ढोलांचे ( ताशा ही ) असलेले मोठे पथक आहे. त्याची प्रॅक्टिस SJSU च्या कॅम्पस मध्ये केली जाते.

बाकी तुम्हाला मिरवणुक दिसली तर ती युनिव्हर्सिटी मध्ये निघते ती परत युनिव्हर्सिटीच्या आत मध्येच त्यांच्याकडे ते डेसिग्नटेड रोड आहे तिकडे असते.

***

बुलडोझर प्रकरण मला नवीनच कळले.. ते २०२२ मध्ये NJ la rally काढली त्यातील होते.

पण अजून असे काही कुठेच असल्याचे दिसून आले नाही.

Fremont ( बे एरियातील) independance day विषयी बरंच चांगलं (च) ऐकून आहे. कधी जायचा योग आला नाही.

Vijaykulkarni म्हणतात तसे गणपती/ गोंधळ किंवा दिवाळीची NJ ची दृश्ये ही सर्व मी इकडे( बे एरिया ) कुठेही पाहिलेले नाही किंवा ऐकलेही नाही.
आता Google search करून बघितले पण तास काही आढळत नाही.

खरं तर हा धागा दिवाळीचा आहे पण विषय निघालाय म्हणून हे सर्व डिटेल्स ..

इकडे महाराष्ट्र मंडळ ते रेडिओ जिंदगी ( फार मोठ्या प्रमाणावर असतात) सगळे सार्वजनिक गणपती एक फार तर दोन दिवसांचे असतात.
हॉल - शाळेचे, banquet भाड्याने घेऊन किंवा पार्क मध्ये परवानगी घेऊन केले जातात.

ढोल ताशा किंवा जी गणपतीची मिरवणूक असते ती हॉलमध्ये किंवा ग्राउंड मध्ये तिकडच्या तिकडे गोल सिम्बॉलिक केली जाते.

हे सगळं फक्त त्या जागेपुरतच मर्यादित असतं. या जागा तशा एका अंड्या असतात ऍटलिस्ट मी बघितलेल्या तरी त्यामुळे आजूबाजूला रहिवाशी नसतात.

बाहेर रस्त्यावर आवाजही येत नाही.

वारी -
वारी वरती पूर्ण एक लेट लिहिलाय तो तुम्ही बघू शकता भक्ती जीव आहे स्पेशली आता बेरीज ते ती परत रिझर्व पार्क आहे त्या पार्क मधल्या आतल्या ट्रेल वरून जाते. मी दोनदा अटेंड केली आहे रस्त्याच्या डिव्हायडरच्या फक्त एका बाजूलाच जरी दीडशे दोनशे तीनशे माणसं असली तरी फक्त एका बाजूलाच असतात. त्याचीही व्यवस्थित परवानगी काढलेली असते. बाकी सोहळा देवळात होतो आणि देवळाचे पुजारी वगैरे या सगळ्या सहभागी असतात आणि त्यांचे संमतीने हे सर्व होत असावे.

Mmba ते शंभर ढोलांचे ( ताशा ही ) असलेले मोठे पथक आहे. त्याची प्रॅक्टिस SJSU च्या कॅम्पस मध्ये केली जाते.

बाकी तुम्हाला मिरवणुक दिसली तर ती युनिव्हर्सिटी मध्ये निघते ती परत युनिव्हर्सिटीच्या आत मध्येच त्यांच्याकडे ते डेसिग्नटेड रोड आहे तिकडे असते.

***

बुलडोझर प्रकरण मला नवीनच कळले.. ते २०२२ मध्ये NJ la rally काढली त्यातील होते.

पण अजून असे काही कुठेच असल्याचे दिसून आले नाही.

Fremont ( बे एरियातील) independance day विषयी बरंच चांगलं (च) ऐकून आहे. कधी जायचा योग आला नाही.

इकडे गणेश विसर्जन लोकं आपापल्या घरी करतात. किंवा देवळात. त्याची खास सोय असते.

अजून माहिती खालील धाग्यावर मिळेल.
https://www.lokgeets.com/ganesh-idol-visarjan-san-francisco-bay-area-202...

खाजगी ग्रुप ( शाळेचा) पार्कात होळी करतो - भाडं असत, परवानगी घ्यावी लागते, रंग ठराविकच वापरता येतात, कार्यक्रमानंतर पूर्ण परिसर अगदी रंगासहित स्वच्छ करून दिला जातो.

होळी, वारी ह्या धाग्यांवर ही माहिती मी टाकली होती. परत टाकत आहे.

>> अमेरिकेतले भारतीय भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त तिथे रॅलीज काढतात आणि त्यात बुलडोझर (भारतातल्या मुस्लिमांच्या दमनाचे प्रतीक) मिरवतात. कित्ती छान!>> हे कुठे? न्यूयॉर्कमध्ये?
आमच्या टाऊनमध्ये गेली काही वर्षं झेंडावंदन होतं त्यात रॅलीजचा वगैरे प्रश्न येत नाही. बाकी दिवाळीत एका मोठ्या मैदानात टाऊनची रितसर परवानगी घेऊन फटाके लावले जातात. अर्थात इथे जी कल्चरल असोसिएशन आहे ते लावतात फटाके. लोकांना हातात देत नाहीत.
खरंतर ह्या सीझनमध्ये फायरवर्क्सवर बंदी घालायची गरज आहे. इतकी कोरडी पानं सगळीकडे पडलेली असतात त्यात फटाके लावणं रिस्की आहे.

फारेंड : I stand corrected, thanks.
आमच्या शहरात भारतीयांची संख्या प्रचंड असल्याने असेल, (महापौर निवडणूक जोशी व पटेल यांच्यात झाली).
निदान काही कुटुंबांना नदीत विसर्जन करताना पाहिले आहे. आषाढी वारी मात्र आदर्शवत असते. इतर कुणाला त्रास होत नाही.
आमच्या कम्युनिटीत दर वर्षी फटाके उडवू नका, आग लागेल, तुमचा इन्शुरन्स वाढेल अशी ईमेल तीनदा येते. ढिम्म !
फटाके साडे अकरा पर्यंत उडत होते. लोकांची चिडचिड झाली.

ज्या जर्सी सिटीचा व्हिडिओ व्हायरल झाला तिथे रात्री १० पर्यंत उडवले, पोलिस व फायर वाले येताच सारे दुसर्‍या गल्लीत गेले व तिथे उडवले.

अर्धवट माहितीवर सरसकट सगळ्यांनाच का झोडताय आणि वर हिंदुत्व वगैरे कशाला उगीच फरफटवत आणताय मग??? तिथे राहुन इथल्यांवर टिका करताय ते ठिक हो… संजय दृष्टीच लाभलीय. पण तिथल्यांवर टिका करताना तरी प्रत्यक्ष पाहुन करा.

ते जोशी आणि पटेल इथे जन्मुन तिथे फटाके फोडायला आणि इलेक्शन लढायला गेलेले नाहीत. ते रितसर तिथेच जन्मुन, तिथल्या शाळांत शिकलेत, तिथल्या संस्कारात, समाजात, नियमात वाढलेत. तिथे कसे वागायचे हे इथुन गेलेल्या मुळ भारतीय आणि म्हणुन तुमच्यामते बेशिस्त लोकांपेक्षा त्यांना जास्त चांगले माहित असणार.

मला प्रश्न पडतो जर का परदेशात रहायचे ठरवले आहे तर मग तिथे पुन्हा लिटिल इंडीयाच्या नावाखाली भारतातलेच जे काही बेशिस्त, सिविक सेन्स नसलेले वर्तन आहे ते रुजवायचा एवढा अट्टाहास कशापायी? गेल्या १०-१२ वर्षांत मला जाणवलेला बद्दल म्हणजे एकंदरीतच हिंदू धर्म- संस्कृतीच्या नावाखाली एक प्रकारचे बिनडोक शक्तीप्रदर्शन -माज दाखवणे फार वाढले आहे. बरे आठवणींशी जोडून रहायचे म्हणावे तर जे काही चांगले आहे ते जोपासा ना! सगळे वाईट आहे किंवा इथल्या रहाणीमानाशी मुळातच सुसंगत नाही/असुरक्षिता निर्माण करणारे आहे तेच सगळे करायचेय?
ते चपलेच्या धूळ भरल्या पायांनी येवून कुशन असलेल्या खुर्चीवर मांडी घालून बसायच्या हट्टा इतकेच हे देखील यडपटच!

? गेल्या १०-१२ वर्षांत मला जाणवलेला बद्दल म्हणजे एकंदरीतच हिंदू धर्म- संस्कृतीच्या नावाखाली एक प्रकारचे बिनडोक शक्तीप्रदर्शन -माज दाखवणे फार वाढले आहे>>>>

हे सगळीकडेच वाढलेय. लोकांना दुर गेले की सणांची, परंपरांची जास्त आठवण येते का माहित नाही. येत असावी बहुतेक. आणि ती साजरी करताना आपण फार मोठे पुण्यकर्म करतोय त्यामुळे आपल्याला त्या दिवशी सर्व नियम माफ असावेत ही अपेक्षा असते.

छट पुजा नावाचा प्रकार असतो हे १०-१५ वर्षांपुर्वी ऐकलेही नव्हते. नव्या मुंबैत तळी खुप आहेत. काही वर्षांपुर्वी पहिल्यांदा छट पुजेला सिडको भवनच्या बाजुच्या तळ्यावर गर्दी पाहिली तेव्हा काय झाले?? गर्दी कसली? हा प्रश्न पडला होता. एका वर्षी गुढी पाडव्यानिमित्त परेड असे सगळीकडे कागद लावलेले वाचुन बघुन हे काय आहे ते बघायला पाडव्यादिवशी सकाळी ८ वाजता मी दिलेल्या स्थळी गेले होते, तोवर तिकडे शुकशुकाट झाला होता.

परवा छट पुजेच्या दिवशी सावंतवाडीत एका जागी स्त्रियांची गर्दी पाहिली. व्यवस्थित रांग करुन रस्त्यातच एका बाजुला उभ्या होत्या, कुठेतरी जाण्यासाठीची तयारी होती. त्यांचा चेहरा, पेहराव व भांगातला सिंदुर भरायची पद्धत व रंग पाहता त्या स्थानिक मालवणी नव्हत्या हे उघड होते. नंतर माझी ट्युब पेटली की त्या छट पुजेसाठी गोळा झाल्या असणार आणि मोती तलावावर त्यांना नेण्यासाठी पुरुष मंडळींची धावपळ सुरु होती. अजुन एक दोन वर्षात मोती तलावपाळीवर मंडप टाकुन छटपुजा सुरु होणार बहुतेक.

किती तो अपप्रचार… इथे मायबोलीवरच कित्येक भारतात राहणारे समंजस विचारवंत आहेत. माबोवर इतके तर बाहेर किती? do your maths..

ते चपलेच्या धूळ भरल्या पायांनी येवून कुशन असलेल्या खुर्चीवर मांडी घालून बसायच्या हट्टा इतकेच हे देखील यडपटच!
>>>>>>>

धूळ भरलेले पाय हे गृहितक कश्याला?
त्या बाईची पार्श्वभूमी पाहता ती स्वतःच्या गाडीतून आली असावी.
तिथेही तिला चूक ठरवण्यासाठी स्टंटबाज ठरवायचा प्रयत्न चालू आहे.

असो,
दिवाळीचा धागा का इतका पेटला बघायला आलो तर हे सापडले म्हणून यावर कॉमेंट.

@ विषयावर बोलायचे झाल्यास,
भारतातल्या लोकांनाच शिस्त नसते असे नाही तर परदेशातल्या लोकांना सुद्धा शिस्त नसू शकते हे या निमित्ताने समजले.
बेशिस्त लोकांचा कुठला धर्म कुठली जात कुठला देश नसतो. ते सगळीकडे असतात Happy

फटाकेबाबत आजही माझे मत असेच आहे की ते फक्त लहान मुलांना वाजवू द्यावेत. मोठ्यांनी वाजवू नये. लहान मुलांचे बालपण संपले की त्यांनी सुद्धा सोडू द्यावे.
आणि हा नियम वैश्विक असावा. भारत असो किंवा अमेरिका किंवा पाकिस्तान.

स्वाती तुमची पोस्ट समजली.
पण त्यावरुन अमेरिकेत शिस्त आणि सिविक सेन्स असलेली माणसे रहातात असा गैरसमज पसरेल असं वाटलं. या धाग्याचा तो हेतू नसेल म्हणून थांबतो. अमेरिका बॅशिंग करायचं असेल तर मात्र भरपूर मट्रिअल घेऊन मी आलोच. Proud

परदेशातल्या लोकांना सुद्धा शिस्त नसू शकते हे या निमित्ताने समजले. >>>
इकडे बऱ्याच गोष्टी खटकणाऱ्या ही आहेत परंतु सामाजिक शिस्त अतिशय (?) चांगली आहे(भारतातून आल्या आल्या लगेच ठळकपणे ते जाणवते) .
रहदारी, स्वच्छता, रांगेने जाणे, कितीही उशीर होत असला तरीही लाईन कट न करणे( रांगेत मध्ये न घुसणे), वक्तशीरपणा वगैरे...
अर्थात तेथेही अपवाद असतातच... पण तरीही सर्वसामान्य पणे हेच बघायला मिळते.
मला वाटतं बहुतांशी पाश्चात्य, किंवा जपान, कोरिया , सिंगापूर वगैरे अनेक देशांत असेच चित्र असावे/ असते.

आपल्याकडेही आपण तसं करू शकतोच..
एकदा सकाळी लवकर बाहेर पडले, महानगर पालिकेची कर्मचारी व्यवस्थित सगळा रस्ता स्वच्छ करत होती..
म्हणजे ते रोज स्वच्छ करतात, पण ते स्वच्छ आपण ठेवतो का?
आपल्या हातून एखादा कागदाचा कापता पडला तर आपण उचलतो का..
नियम पाळतो का.. पाणी/ वीज जपून वापरतो का..
वगैरे विचार आपण करायला पाहिजेत..

त्याची जी शिस्त दिसते ती अशीच आलेली नाही. लहानपणापासून शाळेत मुलांना तस शिकवलं जातं, त्यांची जागा , परिसर स्वच्छ करणे .. कचरा गोळा करणे, रिसायकल करणे ..
आपल्याकडे आपण शाळेमध्ये हे संस्कार करतो का?
वर मुद्दा आला म्हणून हे अवांतर...

Pages