एक नविन प्रयोग - पाक्षीक वृत्तपत्रिका

Submitted by माणूस on 10 June, 2009 - 10:49

काही दिवसांपासुन एक पाक्षीक पत्रिका सुरु कराविशी वाटत आहे. अर्थांजन हे ध्येय नाहीय, ध्येय आहे १० लोक एकत्र यावे व काही निवडक बातम्या, रामयण महाभारातील कथा किंवा असेच काहीतरी किमान १०० लोकांपर्यंत पोचवता यावे.

असे करण्यासाठी काय काय करावे लागते? ईटंरनेट publishing मधे मला जास्त स्कोप वाटत नाहीय, साधारण एक ते दोन पानांचे प्रिंटेड मटेरीअल दर १५ दिवसांनी काढण्यासाठी काय काय तयारी करावी लागेल ह्याचे उत्तर अपेक्षित आहे.

त्याच बरोबर कोणत्या प्रकारचे साहीत्य ह्यात असावे?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माणसा- उद्दिष्टात घोळ वाटतोय. रामायण महाभारतातील कथा ?
तुला नक्की कशासाठी पाक्षिक सुरु करायचय ?

Jana Dhara First Draft

हा एक draft तयार केला आहे... साधारण असे काहीतरी. try printing it, printout looks good.

आता ह्यातला सगळा मजकुर हा विकीपिडीया वरुन घेतला आहे, त्यामुळे विशेष असे काही नाहीय... पण हळू हळू content सुधारता येईल असे वाटतेय.

कधीतरी मीही हे केलंय. महाविद्यालयातले नियतकालीक असल्यामुळे सुदैवाने मलाही आर्थिक विभागाकडे पहावे लागले नाही. साधनेही मोफत होती. तरीसुद्धा काही गोष्टीं शिकलो त्या कदाचित तुम्हाला उपयोगी पडतील.

१. मला महाविद्यालय हे Captive Market होते. तरी सुद्धा सगळे आमचे नियतकालिक (फुकट असूनही ) वाचत नसत. तुम्हाला वाचक मिळवण्यासाठी कदाचित जास्त प्रयत्न करावे लागतील.

२. कुठलेही प्रकाशन्/मंडळ्/संस्था याचे सभासद/वाचक ह़ळुहळु कमी होत असतात. तुम्ही १०० पासून सुरुवात केली आणि तुम्ही काहीही केले नाहीत (आणि प्रकाशन उत्तम दर्जाचे असले )तरी ते काही दिवसानी ८० होतील. म्हणजे नुसता १०० आकडा ठेवायचा असेल तरी सतत वाचक वाढीसाठी प्रयत्न लागतील आणि तुम्हाला वाटते त्यापेक्षा जास्त वेळ त्यात जाऊ शकेल.

३. सतत तेच तेच काम करून कंटाळा येऊ शकतो आणि इतर संधीशी तुलना होऊ शकते. उदा. ४ महिन्यांनंतर जर असे वाटले कि दुसर्‍या छंदातून जास्त संधी/आनंद/पैसे मिळणार असतील तर ते का करू नये.

४. तुमच्या वाचकवर्गाला आवडेल तो मजकूर सतत देणे आणि त्यांना आवडेल त्या दर्जाला देणे सोपे नाही.

खरेतर हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तुमचे प्रकाशन कोणाला आणि का वाचावेसे वाटेल? त्याचे उत्तर इथे लिहिण्याचे कारण नाही तुम्हाला स्वतःला पटले तरी पुरेसे आहे. पण तुम्ही काहीही काढले तर लोक वाचतीलच असे नाही हे लक्षात घ्या.

यात तुम्हाला नाऊमेद करण्याचा हेतू नाही. जरूर सुरु करा, पण डोळे उघडे ठेवून त्यात पडा. माझ्याकडून शुभेच्छा.

धन्यवाद अजय...

काही पुर्व कल्पना देतो, गेल्या महीन्या मधे एक दोन दिवसांचे शिबीर मी attend केले. तिथे दोन दिवसात बरेच काही शिकायला मिळाले. जवळ जवळ साधारण दोनेकशे लोक एकाच जागी बघुन बराच आनंद झाला. तसेच त्यांनी आखलेले कार्यक्रम, खेळ, स्पर्धा सर्व काही उत्तम होते.

i think this all was possible cause of constant efforts and good organization skills. Well yes, it was sister organization of RSS, so I guess one can expect all that.

माझी मराठी शब्दशैली काही ईतकी चांगली नाही, त्यामुळे मला निट शब्दात नाही सांगता येनार, पण ह्या सगळ्यातुन एक गोष्ट लक्षात आली की भारतात आपण ज्याला समाज म्हणतो ते नेमके काय. मायबोली वरच्या users चा देखील एक समाजच आहे, पण एक physical touch महत्वाचा आहे असे मला वाटते. त्यासाठीच कदाचीत आपण कधी कधी वर्षातुन एकदा भेटत असतो. माझ्या मते ह्या पत्रकातुन मी एक प्रकारचा physical contact, जरी in person नसला तरी साधु शकतो... arghhhh i dont know how to explain it, i might have used wrong words.

दुसरा हेतु हा आहे की सध्या internet वर बरेच साहीत्य आहे, पण एकही गोष्ट organized नाहीय. कुठे काय available आहे हे प्रत्येकालाच माहीत आहे असे नाही. one has to be really computer literate to know that yeah its out there. Its pull effect, with pushing content we can deliver more and organized material to users.

Third thing, mythological stories, i think this periodical should target teenagers. Along with hannah montana they should also be aware of those old stories.

I have no interest of making money out of it, neither doing it as hobby. have interest in building a good society and getting people together and so...

कल्पना आहे, की मी आपले उचलली जिभ, लावली टाळ्याला सारखे म्हणत आहे. किंबहुना माझ्या बहुतेक गोष्टी अश्याच असतात. it wont be possible to do all this by myself, will need huge planning and input from lot of people. may be the first issue will come after a year and last issue will come after few months from there on.... but it doesnt hurt to try it and see whats the effect.

अजय अतिशय उत्तम मुद्दे.. मस्त गाईडलाइन्स!
माणसा, पाक्षिक किंवा नियतकालिक (म्हणजे काहीही टंकलिखित) हाच मुद्दा डोळ्यासमोर का आला सांगू शकशील? नुसत्या पंधर्या दिवसातल्या बातम्या पुरवणे हा धागा होऊ शकत नाही कारण आता लोकांना दर सेकंदाला बातम्या मिळतात. मान्यवरांचे लेख, उहापोह सगळ यायला हवं असेल तर त्यात वेळ द्यायला हवा शिवाय खर्चिकही आहेच. पहिलं म्हणजे आपला उद्देश शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म नीट लिहून काढणे, स्कोप ठरवणे, ऑडियन्स ठरवणे हे अतिशय आवश्यक आहे. अशा सार्वजनिक कामात लोकांना सुरुवातीला फार उत्साह असतो पण तो टिकवून ठेवणे सोप्पे नस्तेच ह्याचा अनुभव तुलाही बरेचदा आला असेलच Happy शिवाय, बोल्लल्याप्रमाणे (काहीही कारण का असेना) लोकं वागतीलच असं नाही त्यामुळे मनाची नीट तयारी हवी, वेळ पडली तर एक हाती काम करायचीही.
तुझी कळकळ पटली, तुला मनापासून शुभेच्छा!

माणसा...... हे आजच पाहिले. मी पण ह्याच विचारात आहे. मला काही माबोकर पत्रकारांनी दिलेल्या माहिती प्रमाणे जिल्हा माहिती केंद्रात जिल्हा माहिती अधिकार्याकडे नोंद करावी लागते. मी त्या प्रोसेस मध्ये आहे.

भेटत रहा!

माणूस,

ह्या निमित्ताने आपली ओळख झाली.
पहिले तुमचा टार्गेट ऑडियन्स ठरवावा लागेल. मग कंटेंट चे स्वरूप.
जसे विभागःराजकीय बातम्या, शास्त्रीय बातम्या, खेळ, प्रवास मुलांसाठी , स्त्रीयांसाठी चित्रपट नाट्य संगीत इत्यादी. ते व बातमीपत्राचे नाव नक्की झाले की फॉर्मॅट बनवावा लागेल.
मग त्यांचा कंटेण्ट सर्च करून व त्यावर प्रक्रीया करून( संपादकीय ट्रीट्मेन्ट.) तो लेआउट मध्ये बसवायचा.
व डिलिवरी. बाय इमेल. किन्वा मग तुमच्या तिथे पोस्टाने. हार्ड कॉपीज .
मी २००६ सालात असे बातमीपत्र बनवित असे की जे पॅरिस शहरातील हॉटेल वासियांना दिले जात असे.
३ वाजता माझी चेक्ड फाइल मॉरिशसला जायची व तिथून पॅरिसला. जितके अमेरिकन्/ब्रिटिश पाहुणे
असतील तितकेच प्रिन्ट्स ते काढून त्या तया पाहुण्यांना द्यायचे. त्यात लोकल कार्यक्रम ही असत.
हे सहा महिने चालले. मग माझ्या पेरेन्ट कंपनीचे ते काम सुटले .
मला कसटम कंटॅण्ट बनविता येते.
तुम्ही डॉलर मधे पैसे देणार का? की सेवा म्हणून मराठी समाजासाठी करायचे आहे ते सांगा. मंथली/
क्वार्टर्ली असेल तर मी मराठीत फुकट काम करेन.

हाना मोनटा ना चा पॉइट पट्ला.
आमच्या इथे रामायण वगैरे कथा व भारताचा इतीहास शाळेत अभ्यास क्रमातच आहे.
तसेच अमेरिकेतील मुलांना रेलेवंट इश्युज जसे
१) भारतीय इतीहास, शिवाजी महाराजांचया गोष्टी. रामायण महाभारतातील कथा. सीरीअल स्वरूपात.
२) अमेरिकेतील बाबी - जसे एकटे कसे राहावे. बेबीसीटर बाबत खबरदारी. मित्रमैत्रीणींच्या पालकांचे
डिवोर्स झाले तर काय सपोर्ट द्यावा.
३) गाडीत प्रवास करताना घ्यायची खबरदारी
४) ड्र्ग्स अल्कोहोल अब्युज न करण्यासाठी काय खबरदारी घ्यवी
५) पालकांना येणारे प्रशन.
६) घरी एकट्याने करता येणारे पदार्थ.
७) मराठी कविता वगैरे.

मला समजत नाहिये कि नक्कि काय अपेक्शित आहे? प्रत्येकाने आपापल्या परिने काहितरि त्या सलग्न बोलन्याचा प्रयत्न केलेला आहे परन्तु का कोनास माहित अस प्रतित होतय कि आपन ध्येयापासुन दुर जातोय. पैसे हये ध्येय नाहि, प्रसिद्धिची हाव नाहि, काहि लोकानी एकत्र यावे, जिथे संस्कृती एकत्र यावि, ना कि एकत्र यावि तर त्याचा प्रसार व्हावा, जिथ संस्कृती आनि शास्त्र हातात हात घालुन चालावित अस काहीतरी हातुन घडाव अशि काहितरि गोष्ट असावि.

ग्रामीण भागातील पोरांना फायदा होईल अश्या हेतुने असे पाक्षिक काढण्याची योजना आहे. तोवर उपलब्ध पेपरांतुन असे लेख लिहिले तर उत्तम. ह्याला मानधन मिळत नाही. वेळ द्यावा लागतो. अजय सरांनी सांगितलेले कानमंत्र ध्यानत ठेउन पुढे चला..........

मुळ लेखन http://bit.ly/CarrerPlan

http://www.deshdoot.com/images/eclassifieds/pan4_81257.jpg

Deshdoot_CarrerPlanning.jpg

छान