यु. के. अडचणीत?

Submitted by यक्ष on 3 November, 2023 - 13:10

वर्तमानात यु. के. बर्‍याच अडचणीतून जात आहे आहे असे यु. ट्युब सफरीतनं जाणवले. महागाई, टॅक्स चे ओझे न वाढ्णारे पगार ह्याने आंग्लबंधू मेटाकुटीस आलेले दिसतात...
चालू घडामोडीवर एक माहितीपुर्ण लिंन्क..
https://www.youtube.com/watch?v=dAzdBnJztn4
मा. श्री. विन्स्टन चर्चिल ह्यांचे भारताबद्दलचे विधान आठवतेय....
कालाय तस्मै नमः !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंग्लंडचा क्रिकेट संघ सुद्धा आज वर्ल्डकप मधून बाहेर पडला.
तळाला राहिले. नामुष्कीची वेळ. त्यांच्या देशात अशी परिस्थिती आहे. अश्या मनस्थितीत खेळताना त्याचा परीणाम खेळावर सुद्धा होत असेलच.

ऋषी सुनक साहेबांनी सासरेबुवांचा सल्ला मनावर घ्यावा आणि प्रथम स्वतः आठवड्याला सत्तर तास काम करायला सुरुवात करावी. त्यांनी स्वतः हे एक महिनाभर केल्यावर जनतेलाही आठवड्याचे सत्तर तास काम, तेवढ्याच पगारात करायला सांगावे. सौ सुनक सध्या काही करतात की आतापर्यत कमावलेल्या संपत्तीचा फक्त उपभोग घेतात याची कल्पना नाही. त्यांनी अमृतावहिनींकडून प्रेरणा घेऊन इंग्लंड वासीयांना प्रेरणा देण्यासाठी गाणी गावीत.

मला तर चार ओळींचा धागा लिहिताना लेखकच अडचणीत आल्या सारखं दिसतय Happy
कारण अशा कोणत्या अडचणी फक्त यू के पुढे आहेत आणि बाकीच्या प्रगत देशासमोर नाहीत ?

भारतीय वंशाचा माणूस तिथे पंतप्रधान आणि पाकिस्तानी वंशाचा माणूस ल़ंडनचा मेयर आहे. त्याचीच फळं भोगत आहेत असं चर्चिल म्हणतील‌

युके ची परीस्थिती सेवन्टीजमधे आणि अर्ली नाईटीजमधेही वाईट होती की. फक्त तेव्हा २४ तास न्युज आणि भरीला सोशल मेडीआ नसल्याने रोज उठून त्याबद्दल दळण दळणे होत नव्हते इतकेच. गेली जवळ जवळ तीस वर्षे इन्फेशन आटोक्यात असल्याने लोकांनाही परीस्थिती बदलू शकते याचा विसर पडला होता.

महागाई, टॅक्स चे ओझे न वाढ्णारे पगार ह्याने आंग्लबंधू मेटाकुटीस आलेले दिसतात...>> भारतातही सगळं काही आलबेल सुरू आहे, ह्या भ्रमात राहू नये. पगारवाढ फक्त सरकारी नोकरांना मिळतेय. प्रायवेट सेक्टरमधे तर अनेक कंपन्यांमधे महिन्याचा पगारसुद्धा वेळेवर होत नाहीये.
महागाई आपल्याकडेही वाढतेच आहे.