भारतास हवा असणारा खलिस्तानी अतेरिकी निज्जर कॅनडा मध्ये मारला जाण्याअगोदर पासूनच भारतास हवे असलेले पण पाकिस्तान आणि कॅनडा मध्ये आश्रयास असलेले तब्बल १८ टॉप मोस्ट अतेरिकी un known व्यक्ती कडून संपवले गेले होते .
जून महिन्यात निज्जर वर हल्ला झाला , त्या बद्दल भारतावर आरोप करण्यासाठी कॅनडाचा पंतप्रधान जस्टीन ट्रूडो ला चार महिने लागले .
त्याच्या आरोपांना केराची टोपली दाखवल्या मुळे
आरोप करताना आक्रमक असलेला ट्रूडो आठ दिवसांत मवाळ झालेला दिसला .
इथे हिंसक कारवाया करून भारताच्या कानून के लंबे हाथ पासून कोसो दूर कॅनडा आणि पाकिस्तानच्या राजकीय छत्रछायेखाली हे अतेरिकी ऐश् करून समस्त भारतीयांना वाकुल्या दाखवत होते .
शिवाय ते अतेरिकी तेथील सार्वजनिक कार्यक्रमात मोठ्या दिमाखात सहभागी देखील होत होते .
या क्षेत्रातील जाणकारानुसार भारताची रॉ संघटना भाड्याचे हल्लेखोर घेवून या कारवाया करत आहे तर काहीच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानची आय एस आय त्यांना संपवत आहे .
एक मात्र नक्की जागतिक आर्थिक मदती कडे नजर लाऊन बसलेल्या पाकिस्तानला FATAF ग्रे लिस्ट मधून बाहेर पडण्यासाठी ज्या तरतुदी लावल्या गेल्या होत्या त्यात अतेरिक्यांच्या मुसक्या आवळण्याची देखील होती .
म्हणून कदाचित आय एस आय ने देखील पाकिस्तान मधील अतेरीकी संपवण्यास हाथ भार लावला असावा !
खरं खोटे कोणास ठाऊक , पण कॅनडा आणि पाकिस्तान मध्ये आश्रयास असलेल्या अतेरिक्यांना आपल्या कोर्टात आणून शिक्षा देणे भारतासाठी अवघडच झाले होते .
पण त्यांचा un known person काटा काढत आहेत यातच सर्व आले.
इस्रायलची मोसाद गुप्तचर संघटना इस्रायल विरोधी तत्वांना वेळीच वेसण घालते तशी वेसण रॉ ने घालायला सुरुवात केली काय ?
कॅनडा आणि पाकिस्तान मध्ये भारताची गुप्तहेर संस्था रॉ च्या कारवाया ? की अजून दुसरे काय ?
Submitted by फुरोगामी on 2 October, 2023 - 10:36
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
या सरकारने केलेली अनेक चांगली
या सरकारने केलेली अनेक चांगली कामे मला माहीत आहेत>>> कृपया इथे लिहा म्हणजे आम्हालाही सरकार चे कौतुक करत येईल.
या सरकारने केलेली अनेक चांगली
या सरकारने केलेली अनेक चांगली कामे मला माहीत आहेत>>> कृपया इथे लिहा म्हणजे आम्हालाही सरकार चे कौतुक करत येईल.
रघू आचार्य,
रघू आचार्य,
"मतभेद आहेत याबाबत सहमत" हे नोंदवून संयत वावर असलेल्या आयडी बरोबर अतिशय प्रगल्भपणे वाद संस्थिगत केल्याबद्दल आपले आपले कौतुक..
सकारात्मक प्रतिसादाबद्दल वीरु यांचेही कौतुक..
आणि भरत. यांचेही.
अजून एका पाकिस्तानी
अजून एका पाकिस्तानी अतिरेक्याची विकेट पडली !
गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हत्यांचं सत्र चालू आहे. पठाणकोट हल्ला, मुंबईवरील दहशतवादी हल्ला, दिल्लीतल्या संसदेवरील हल्ल्यात अथवा त्या कटात सामील असलेल्या दहशतवाद्यांच्या हत्या होत आहेत. सोमवारी असाच एक हत्येचा प्रयत्न झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. काही अज्ञात लोकांनी लष्कर-ए-तैय्यबा या दहशतवादी संघटनेतील अतिरेकी साजिद मीर याची हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मीर याला विष देऊन मारण्याचा प्रयत्न झाला असून तो सध्या व्हेंटिलेटरवर आहे.
साजिद मीर हा २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्यांपैकी एक होता. तो लाहोरच्या मध्यवर्थी कारागृहात असून त्याला जेवणातून विष देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. साजिद मीरवर विषप्रयोग झाल्यानंतर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयने त्याला तुरुंगातून थेट रुग्णालयापर्यंत एअरलिफ्ट केलं. त्याच्यावर सध्या बहावलपूरमधील रुग्णालयात उपचार चालू आहेत.
साजिद मीरवरील विषप्रयोगानंतर तुरुंगातल्या कैद्यांसाठी जेवण बनवणाऱ्या स्वयंपाक्यावर संशय व्यक्त केला जात आहे. तो सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हा एक खासगी स्वयंपाकी असून ऑक्टोबर २०२३ पासून तो तुरुंगातील कैद्यांसाठी जेवण बनवतोय.
साजिद मीर हा २६/११ च्या मुंबईवरील हल्ल्याचा कट रचणाऱ्या मास्टरमाईंड्सपैकी एक आहे. काही दिवसांपूर्वी त्याला लाहोरच्या मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आलं होतं. साजिद मीर हा अमेरिकेच्या मोस्ट वॉन्टेड यादीत आहे. साजिदचं वय ४० ते ५० वर्षांदरम्यान आहे. त्याच्यावर अमेरिकेने ५ मिलियन डॉलर्सचं (४१.६८ कोटी रुपये) बक्षीस ठेवलं आहे. जून २०२२ मध्ये त्याला टेरर फंडिंगप्रकरणी (दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरवल्याप्रकरणी) पाकिस्तानातील दहशतवादविरोधी न्यायालयाने शिक्षा सुनावली होती.
हा साजिद मिर मुंबई वरील हल्ल्यात निष्पाप लोकांना मारणाऱ्या अतेरिक्यांच्या सूत्रधार पैकी एक होता , म्हणजे आता तरी लीबरू नी समाधान व्यक्त करायला हरकत नाही ......
ते सर्व ठीक आहे पण समजा उद्या
ते सर्व ठीक आहे पण समजा उद्या पाकिस्तान ने आपल्यावर हत्येचा आरोप केला तर आपली प्रतिक्रिया जसी कॅनडा विरुद्ध होती तशीच असेल का?
अनिरूद्ध धन्यवाद.
अनिरूद्ध धन्यवाद.
सर्वात अगोदर म्हणजे भारतावर
सर्वात अगोदर म्हणजे भारतावर आरोप करायला पाकिस्तान कडे पुरावे पाहिजेत !
आणि दहशत वादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला भारतावर आरोप करण्यासाठी जागतिक पातळीवर स्वतःची पत वाढवावी लागेल.
सध्या पाकिस्तानची अवस्था म्हणजे कोणीही या आणि टपली मारा अशी आहे .....
सध्या पाकिस्तानची अवस्था
सध्या पाकिस्तानची अवस्था म्हणजे कोणीही या आणि टपली मारा अशी आहे .....
Submitted by फुरोगामी on 4 December, 2023 - 21:26
वरील वाक्य लिहून तुम्ही bullying चे समर्थन करत आहेत का ?
"सर्वात अगोदर म्हणजे भारतावर आरोप करायला पाकिस्तान कडे पुरावे पाहिजेत !"
आणि त्यांच्याकडे पुरावे मिळाले तर आपली किती नाचक्की होईल ह्याची कल्पना करा
एक बारकीशी शंका.
एक बारकीशी शंका. पाकिस्तानमध्ये अमुक मारला गेला, तमुक मारला गेला अशा रसभरित बातम्या भारतीय मिडियात येतात, तशा त्या पाकिस्तानी मिडियात येतात का?
---
कॅनडाच्या वेळी बांग्लादेश, श्रीलंका यांनी भारताला पाठिंबा दिला होता. अमेरिकेच्या वेळी दिला नाही. भारत आपल्याही देशात असले उद्योग करत असेल ( कोणता देश करत नाही म्हणा?) त्यापासून सावध राहायला हवं असं त्यांना वाटू लागलं असेल का?
--
टॉक्सिक आयडीच्या नव्या पोस्टची गंमत नाही. कीव वाटली. भाजप एकेका भ्रष्ट नेत्याला ईडी सीबीआय करवी पायघड्या घालून आपल्या पक्षात घेतो. दहा वर्षे होत आली तरी गांधीं विरुद्धचे एकही प्रकरण , एकही आरोप सिद्ध होत नाही. तरीही हे तीच टेप निर्लज्ज कोडगेपणाने वाजवणार.
पुलवामा, देविंदर सिंग यांच्याबद्दलची पोस्ट झोंबल्यामुळे एकेरीवर यावं लागलं ना? उत्तम आहे. भाजप का हाथ बलात्कारियों, भ्रष्टाचारियों और आत्कंकवादियों के साथ.
बरं. रॉ स्थापन झाल्यापासून उत्तर अमेरिकेत तिचं प्रेझेन्स नाही, असं पहिल्यांदा घडतंय. मोदी है तो मुमकिन है. तर रॉची कामे तुम्ही स्वप्रेरणेने करायला घ्या.
आणि रास्वसं ज्याला आदर्श मानतो त्या हिटलरवरून दुसर्यांना बोलणं बंद करा.
----
नवे नवे ड्यु आय येऊन तेच मुद्दे लिहिल्याने त्याला बळ मिळते असे कोणी सांगितले?
पाकिस्तानची सध्याची अवस्था
पाकिस्तानची सध्याची अवस्था होण्याचे एक कारण पाकिस्ता नी राजकारण्यांनी आणि लष्कराने भारत नामे परकीय शत्रूच्या नावे राजकारण करून देशांतर्गत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. हे भाजप नेते सुद्धा म्हणतत. सुषमा स्वराज यांचं संयुक्त राष्ट्रांतलं भाषण आहे.
भाजपचे सध्या तेच करतो आहे. कृषी कायदे मागे घ्यावे लागले याचा डुख शीख लोकांवर धरून खलिस्तानचा बागलबुवा उभा करतो आहे. याच परिणाम म्हणून पंजाबात पुन्हा फुटीरतावाद उफाळला, तर त्याला भाजपच जबाबदार. देशहितापेक्षा सत्तेवर डोळा असलेलं पक्षहित महत्त्वाचं.
कृषी कायदे मागे घ्यावे लागले
कृषी कायदे मागे घ्यावे लागले याचा डुख शीख लोकांवर धरून खलिस्तानचा बागलबुवा उभा करतो आहे.
>>>> सरकार खलिस्तानचा बागुलबुवा उभा करतो आहे हे वाक्य चुकीचे आहे.
कॅनडामध्ये खलिस्तानच्या मागणीसाठी रेफेरंडम घेणे, ब्रिटनमध्ये भारतीय वकिलातीवरचा झेंडा हटवून खलिस्तानचा झेंडा फडकवणे, कॅनडामध्ये तिरंग्याचा अपमान करणे, खलिस्तानच्या मागणीसाठी काढलेल्या रॅलीमध्ये इंदिरा गांधीच्या हत्येचा चित्ररथ असणे, भारतीय हाय कमिशनमधील अधिकाऱ्यांचे डिटेल्स जाहीर करून, त्यांचा बदला घेण्याचे जाहीर आवाहन करणे, निज्जर हत्येच्या संदर्भात कॅनडियन सरकारमध्ये असलेल्या जगमीत सिंग यांनी मोदी यांना ट्विटरवर धमकी देणे, दिवाळी सेलिब्रेशनसाठी जमलेल्या भारतीय लोकांवर हल्ला करणे, देवळांची नासधूस करणे हे प्रकार तुम्हाला माहित नाहीत का?
कि हे प्रकार भारतात घडले नाहीत म्हणून या प्रकाराबद्दल सरकारने कारवाई करू नये असे तुमचे मत आहे?
कारवाई म्हणजे निखिल गुप्ता
कारवाई म्हणजे निखिल गुप्ता करवी झाली ती?
भारतात खलिस्तानला पाठिंबा दिसतो आहे का? अमृतपाल सिंगला अटक झाल्यावर काही प्रतिक्रिया उमटली का? तो अचानक कुठून आला असा प्रश्न पडतो का? उलट आंदोलक शेतकर्यांना खलिस्तानी म्हणून त्यांच्यावर देशद्रोहाचं लेबल लावल्याचे काय परिणाम होतील याचा काही विचार?
आत्तापर्यंत ऑफिशिअली भारताने
आत्तापर्यंत ऑफिशिअली भारताने कॅनडाकडे नाराजी नोंदवली आहे. शिवाय खलिस्तानी सपोर्टर्सच्या भारतातील मालमत्ता जप्त केल्या आहेत. मी या कारवायांविषयी बोलत होते.
पण तुम्ही सांगितले नाहीत कि मी लिहिलेल्या घटना बागुलबुवा आहे कि कसे ते?
उलट आंदोलक शेतकर्यांना खलिस्तानी म्हणून त्यांच्यावर देशद्रोहाचं लेबल लावल्याचे काय परिणाम होतील याचा काही विचार >>>
आंदोलक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मार्चच्या वेळी लाल किल्ल्यावर जे काही केले तो देशद्रोह, देशाचा/तिरंग्याचा अपमान नव्हता? बाकी भारतीय शीख लोकांवर डूख धरल्याचे काही उदाहरण?
तुम्ही माझे आधीचे प्रतिसाद
तुम्ही माझे आधीचे प्रतिसाद वाचले असतील तर राजनैतिक , कायदेशीर मार्गाने करायच्या कारवाया़ंबद्दल मी आधीच लिहिले आहे.
आता जसं आपण कॅनडाला खुनात भारताचा हात असल्याचा पुरावा मागतो, तसंच कॅनडा, अमेरिका या देशांनाही हे लोक भारतविरोधी कारवाया, दहशतवादी कृत्ये करीत असल्याचा पुरावा द्यावा लागतो.
अमेरिका आणि कॅनडाच्या मते हे लोक जे काही करतात - वक्तव्ये, निदर्शने हे फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन मध्ये येतं.
अमेरिकेने तसं स्पष्ट म्हटलं आहे. याशिवाय तिथल्या भारतीय वंशाच्या नागरिकांवरवर हल्ले केले तर तो तिथल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न. त्याबद्दल राजनैतिक माध्यमातून आपली काळजी, निषेध व्यक्त करण्यापलीकडे आपण काही करू शकत नाही. अमेरिकेने मात्र रॉच्या अधिकाऱ्यांना परत पाठवल़य.
ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यांवर वांशिक द्वेषातून हल्ले होत होते, तेव्हा आपण काय केलं होतं?
आणि हा धागा मुळात या देशांत होणाऱ्या भारतविरोधी लोकांच्या हत्याबंद्दल आहे.
अगदी भारत सरकारचा सहभाग नसला, फक्त नाव घेतलं असलं तरी हा प्रकार गंभीर आहे. सध्याचं सरकारही ही भारताची नीती कधीच नव्हती, आताही नाही, असंच म्हणतं.
लाल किल्ल्यावर जे झालं त्याचा उपयोग करेन आणि त्या आधीही राइट विंग इको सिस्टम संपूर्ण आंदोलनाला खलिस्तानी लेबल लावत होती.
राइट विंग इको सिस्टम संपूर्ण
राइट विंग इको सिस्टम संपूर्ण आंदोलनाला खलिस्तानी लेबल लावत होती >>
लाल किल्ल्यावर हे सिद्ध झाले नाही का कि आंदोलनात खलिस्तानी एलिमेंट्स घुसले आहेत? सर्वच आंदोलक खलिस्तानी नव्हते. पण आंदोलकांना खलिस्तानी सपोर्टर्सना ओळखता/बाजूला काढता आले नाही तर सामान्य जनता त्यांना वेगळे कसे काढू शकेल? सरकार डूख धरून भारतीय शिखांवर कारवाई करते आहे असे उदाहरण/बातमी माझ्या तरी पाहण्यात नाही.
उलट शिखांच्या वेगवेगळ्या उत्सवांसाठी/गुरुद्वाराच्या कामासाठी फंडस् देणे, मोठ्या सणांत आवर्जून सहभागी होणे हे प्रकार आंदोलनापासून वाढलेले आहेत. यात विधानसभेसाठी मते मिळवणे किंवा शेती कायद्यामुळे निर्माण झालेली नाराजी नष्ट करणे हे स्वार्थी हेतूही असतील.
धागा मुळात या देशांत होणाऱ्या भारतविरोधी लोकांच्या हत्याबंद्दल आहे >> मी धागा वाचते आहे आणि न पटणाऱ्या गोष्टींचा प्रतिवाद करते आहे.
पाकिस्तान मध्ये अजून दोन
पाकिस्तान मध्ये अजून दोन विकेट्स पडल्या !
मानवी हक्क चळवळी च्या कथित स्पोकपर्सन चे दुःख काही केल्या कमी होताना दिसत नाही .
टन्नू ने भारताच्या पार्लमेंट
टन्नू ने भारताच्या पार्लमेंट वर हल्ला करण्याची धमकी नुकतीच दिली आहे .
त्याने पूर्वी भारतीय दुतवासातील अधिकाऱ्यांना टार्गेट करण्याची धमकी देखील दिली होती .
अशा व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य हक्काची काळजी घेतली पाहिजे असे भरत ना कसे काय वाटू शकते ?
मुंबई बॉम्बस्फोट मध्ये भारतास
मुंबई बॉम्बस्फोट मध्ये भारतास हवा असलेल्या दाऊद वर पाकिस्तान मध्ये विषप्रयोग झाल्याची बातमी खरी की खोटी हे माहीत नाही , पण त्याला नैसर्गिक मृत्यू आला तर ते मात्र समस्त भारतीयांसाठी वाईट असेल !
आश्रय दिलेली दहशतवादी कुत्री डॉलर च्या आमिषाने स्वतः पाकिस्तानच संपवत असावा अशी शंका कधी कधी मनात येते.
भारतात दहशत वादी कारवाया करणार्या या आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांना पकडण्यात अमेरिकेची मदत मिळेल या आशेने या पूर्वीच्या सरकारने पुरावे दिले होते , तरीहि बरेचसे अतेरिकी पाकिस्तान च्या मदतीने तिकडेच कोणीही वाकडे करू शकत नाही अशा आविर्भावात जगत होते .
पण आता त्यांची संक्रात आलेली दिसते.
निजार हत्या संदर्भात तीन
निजार हत्या संदर्भात तीन भारतीय नागरिकांना एडमंटन ( अल्बर्टा ) येथे अटक करण्यात आली आहे. तीन ते पाच वर्षांपासून हे तिघे कॅनडामधे रहात होते. त्यांनी कॅनडां मधे प्रवेश कसा मिळविला, आणि अटक होण्यासाठी एव्हढा मोठा विलंब का असे अनुत्तरित प्रश्न आहे.
https://www.bbc.com/news/world-us-canada-67836968
चौकशी अनेक स्तरावर सुरु आहे, अजून काही लोकांना अटक होणे अपेक्षित आहे.
येथील भारतीयांसाठी हा प्रश्न तसा नाजूक आहे. जस्टिन ट्रूडो यांनी संसदेत जाहिर केले त्याच वेळी या हत्ये संदर्भातले पुरावे त्यांच्याकडे होते. सर्व नसतील पण महत्वाचे पुरावे भारतीय अधिकार्यांना वेळोवेळी देण्यात / दाखविण्यात आले होते असे कॅनडा सरकारचे म्हणणे आहे. भारताला असे कुठलेही पुरावे कॅनडाने दिलेले नाही असे भारताचे म्हणणे आहे.
Diplomatic संवाद काय होत असतात हे बाहेर कळायला मार्ग नाही. पुरावे " माहित नसल्यामुळे " हत्या चौकशी संदर्भात कुठलेही सहकार्य करण्यास भारत सरकारचा नकार होता ( तसा स्टँड घेतला होता).
काही गैरसमज दूर करावे असे
काही गैरसमज दूर करावे असे वाटते.
(अ)कॅनेडीयन लोक भारतीय लोकांना त्रास देतात, येथील मंदिरांवर सुनियोजित रितीने हल्ले करतात, काळे फासतात, मॉल मधे भारतीयांवर हल्ले करतात.... असे काही प्रकार होत नाही.
मी भारतीय आहे म्हणून कॅनडामधे मला (अजून तरी) कुठलाही त्रास झालेला नाही. हल्ले होतात पण त्यात रँडमनेस आहे.
(ब) मागच्या सप्टेंबर मधे जस्टिन ट्रूडो ने भारत सरकारचे एजंट आणि निज्जर हत्या संबंध जाहिर केल्यानंतर त्याची लोकप्रियता मोठ्या प्रमाणांत घसरली आहे.
ट्रूडोची लोकप्रियता आहे तिथेच आहे, आधी २८.५ % होती, नंतर २८.३ % खालावली ( टक्केवारी अशीच टाकली आहेत, कुठलाही आधार नाही).
Pages