पाककृती स्पर्धा-३ - Milets पाककृती, ज्वारीचा उत्तप्पा - sadho

Submitted by sadho on 29 September, 2023 - 01:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. १ वाटी ज्वारी ( इथे सध्या मुलीकडे जर्मनीत आले असल्याने इथे Hirse नावाने जी ज्वारी (Sorghum Millet) मिळते ती वापरली आहे.)
२. १/२ वाटी उडीद डाळ.
३. अर्धा चमचा मेथी दाणे.
४. चवीनुसार मीठ.
५. उत्तप्पा घालण्यासाठी तेल.

क्रमवार पाककृती: 

१. ज्वारी, उडीद डाळ आणि मेथी एकत्र करून २ वेळा स्वच्छ धुवून घ्यावी आणि किमान ८ तास भिजत घालावी.
२. ८ तासांनी मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावी. हे मिश्रण उबदार ठिकाणी ठेवून आंबू द्यावे.
३. परत साधारण ८ तासांनी पीठ चांगले फुगले की त्यामध्ये मीठ घालून नॉन स्टीक पॅनमध्ये उत्तप्पा करावा.
४. एखाद्या चटणी / केचप बरोबर उत्तप्पा सर्व्ह करावा.

IMG_9422.jpegIMG_9419.jpeg

अधिक टिपा: 

१. ग्लुटेन फ्री किंवा वजन नियंत्रणासाठीच्या डाएट प्लॅनमध्ये हा उत्तपा बनवता येईल.

माहितीचा स्रोत: 
स्वप्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

मला वाटतं हे असं दिसणारं धान्य इथे ही मिळतं. तेच ज्वारी आहे हे माहित न्हवतं.
मिळालं तर नक्की करुन बघतो. फोटो मस्त आला आहे.

छान आहे रेसेपी.

थोडी उडीद डाळ/ पिठी टाकण्याची तुमची आयड्या योग्य आहे, हे सर्व प्रकारच्या मिलेट्समध्ये करता येते. त्याने ते जाडेभरडे कार्डबोडिय टेक्सचर थोडे सुधारते आणि पदार्थ खावासा वाटतो Happy