चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-९ - समुद्रकिनारा, जहाज, बोट, होडी

Submitted by संयोजक on 27 September, 2023 - 06:25

मायबोलीकरांनो, पिकनिकसाठी ठिकाण निवडताना समुद्रकिनारा हा नेहमी प्राधान्यक्रमात वर असतो. समुद्रकिनारी वाळूमध्ये आरामात बसून अथांग महासागर बघणे, तेथील आसमंतात दिसणाऱ्या सूर्यास्ताच्यावेळीच्या रंगछटा, त्या सागरातून प्रवास करणारी होडी हे सर्व बघितले तर सुट्टीचे सार्थक झाल्यासारखे वाटते. याच समुद्रकिनाऱ्याविषयी या झब्बूसाठी तुम्हाला प्रकाशचित्रे द्यायची आहेत.
तर चालू करा एक से बढकर एक प्रकाशचित्रे द्यायला.

खेळाचे नियम आणि अटी
१.प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सेल्फी विथ पेंग्विन!
पोलर लाईट्स. ब्राईटनेस एडिट करायचे राहून गेले. त्या वेळी सोय नव्हती. आता आहे तर वेळ नाही.
Screenshot_20230927_215730_Gallery.jpg

मध्यलोक, दोन्ही फोटो सुंदर.

ज्यांनी चमचमणार्‍या पाण्याचे फोटो टाकलेत त्या सर्वांना सॅल्युट ! मस्त टिपलेय.

रमड, हा दहा वर्षे आधीचा (वॉटरफ्रंटवाल्या फोटोच्या ) आहे. त्या वेळी एका महिन्यात परतलेलो. Happy

जी नको Proud
आंटी मत कहो ना (ओरिजिनल) फेम ती आंटी जोश्शीजी उच्चार मस्त करायची Proud

छान फोटो मध्यलोकजी. Lol

रमड - तुमचे स्किल बघून फोटो टाकायचा धीरच खचला. कसला क्लिक आहे हा.

जी नको Proud
आंटी मत कहो ना (ओरिजिनल) फेम ती आंटी जोश्शीजी उच्चार मस्त करायची >>> Lol

रमड - तुमचे स्किल बघून फोटो टाकायचा धीरच खचला. कसला क्लिक आहे हा. >> अगदी अगदी, फेसाळत्या लाटा, ढगांची चादर आणि त्याआड लपलेला सूर्य, सगळं कमाल

सध्या हाताशी वॅनकूवर टूर चे फोटो असल्याने तेच शेयर करतोय, इतर फोटो नंतर केव्हातरी
पण हा विषय अगदी मनापासून आवडता, हा विषय निवडल्यासाठी संयोजकांचे आभार

चलो वॅनकूवर Happy अप्रतिम फोटो आहे हा! सुंदर.

पण हा विषय अगदी मनापासून आवडता, हा विषय निवडल्यासाठी संयोजकांचे आभार >>> +१ अगदी अगदी.

समुद्र म्हटला कि समुद्राला असतात किनारे आणि किनाऱ्यावर असतात दीपस्तंभ, असाच एका कोपऱ्यात असलेला हा दीपस्तंभ
फोटोत "लायन्स गेट" पूल हि दिसतोय, त्यामुळे फोटो ह्या "समुद्रकिनारा, जहाज, बोट, होडी" ह्या उपक्रमात द्यावा कि "पूल" ह्यात ह्याचा गोंधळ होतोय Lol

PXL_20230904_062837752.NIGHT_.jpg

IMG_4874.jpeg
रेवदांडा, अलिबाग.

Pages