चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-९ - समुद्रकिनारा, जहाज, बोट, होडी

Submitted by संयोजक on 27 September, 2023 - 06:25

मायबोलीकरांनो, पिकनिकसाठी ठिकाण निवडताना समुद्रकिनारा हा नेहमी प्राधान्यक्रमात वर असतो. समुद्रकिनारी वाळूमध्ये आरामात बसून अथांग महासागर बघणे, तेथील आसमंतात दिसणाऱ्या सूर्यास्ताच्यावेळीच्या रंगछटा, त्या सागरातून प्रवास करणारी होडी हे सर्व बघितले तर सुट्टीचे सार्थक झाल्यासारखे वाटते. याच समुद्रकिनाऱ्याविषयी या झब्बूसाठी तुम्हाला प्रकाशचित्रे द्यायची आहेत.
तर चालू करा एक से बढकर एक प्रकाशचित्रे द्यायला.

खेळाचे नियम आणि अटी
१.प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खासच. असं म्हणतात उत्तम फोटो हा पेंटिंग सारखा दिसतो आणि उत्तम पेंटिंग हे फोटोसारखे दिसावे.
अवल तुमचा फोटो चक्क पेंटिंग वाटतय.

धन्स अवल Happy
सगळेच फोटो सुंदर आहेत.
हा गणपतीपुळे समुद्रकिनारा

Screenshot_20230927-195636_Gallery.jpg

ओळखा लोकहो लोकेशन
पेन्टॅक्स, लेन्स असाही - जुना मॉडेल. इतर फोटोज वाईड अँगलने घेतलेत. ते इथे द्यावेसे वाटत नाहीत.
पेन्टॅक्सचे तीन रोल चोरीला गेले येताना.
AntMabo.jpg

माझ्याकडे डिजिटली सेव्ह केलेले होते. पण मध्यंतरी एसएसडी बसवताना त्या येडपटाने जुनी हार्ड डिस्क फॉर्मॅट मारल्याने आता एक एक स्कॅन करून टाकायची पाळी आली आहे. Lol

अवल, १०० मार्क्स! Happy

आचार्य, तुमचा उत्तर ध्रुव की काय? Wink
Btw, ६० डिग्री तापमान की कोन?

हिमालयाजवळ विमानातून घेतलेले असे फोटोज आणि समुद्रात ५० अंश ओलांडतानाचे फोटो सारखेच येतात. ६० अंशाला बदलते चित्र.

आचार्य, तुमचा उत्तर ध्रुव की काय >>> दक्षिण.

Pages