लेखन उपक्रम २ - आर यू रेडी? - मॅगी

Submitted by मॅगी on 26 September, 2023 - 07:21

बाकीचे अजून आले नव्हते, गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले.

टीनेजर सावळी मुलगी, पिवळा स्वेटशर्ट, पाठीला काळ्या कार्टून म्हशीची कीचेन लावलेली सॅक. "आर यू रेडी टू गो?" तिने विचारले. "बसची वाट बघतोय." काही न सुचून तो म्हणाला. हल्ली स्ट्रेंजर डेंजर शिकवत नाहीत वाटतं. बसमध्ये त्याचं शेजारी लक्ष गेलं. तीच!

च्यायला! कार धड असती तर बसने यावं लागलं नसतं... "रेडी टू गो?" तिने सॅकमधली सुतळ गुंडाळत पुन्हा विचारलं.

तो वैतागून दुसऱ्या सीटवर बसला आणि स्टॉपवर उतरला. कंपनीत शिरल्यावर समोरच त्याचा फुलं, उदबत्त्या लावलेला फोटो होता. "आर यू रेडी टू गो?" तिने दारातून भराभर त्याच्याकडे येत विचारलं.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार भारीये हा दे धक्का!
मेंदूत रजिस्टर व्हायला १-२ मिनिटे तरी गेली माझा प्रोसेसर स्लो झालाय बहुधा Lol

Too good!
म्हशीची कीचेन लावलेली सॅक. - - इथे अडखळलेले, लगेच उलगडा झाला. छानच बसलीये कथा

Pages