पाककृती स्पर्धा क्र. २ - लाल भोपळ्याची बाकर भाजी - आंबट गोड

Submitted by छल्ला on 25 September, 2023 - 02:08
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

लागणारे जिन्नस: 

साहित्य:
रसरशीत लाल भोपळा १ पाव,
फोडणीचे साहित्य, हिंग, मेथीदाणे १०-१२, खसखस चमचाभर, सुके खोबरे किसून २ चमचे , आले किसून चमचाभर, गूळ सुपारी एव्हढा, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या 2, कोथिंबीर.

क्रमवार पाककृती: 

१. प्रथम खोबर्‍याचा कीस व एक चमचाभर खसखस मंद आचेवर भाजून घेऊन मिक्सरवर भरड सर बारीक करून घ्यावे.
२. लाल भोपळ्याच्या साली न काढता थोड्या मोठ्या फोडी कराव्यात.
३. कढईमध्ये जरा जास्ती तेल घ्यावं.
४. तेल तापल्यावर मोहोरी, हिंग, मेथी दाणे दोन चिमटी, कढीपत्ता, लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे, हिरव्या मिरचीचे तुकडे, आले. खोबऱ्याचे वाटण, हळद आणि चमचाभर लाल तिखट घालून खमंग फोडणी करावी.
५. त्यावर धुतलेल्या फोडी घालून मीठ घालावे व नीट परतून घ्यावे.
६. फोडी छान परतल्या गेल्या की अर्थी वाटी अंदाजाने, गरम पाणी घालून, परत मिक्स करावे.
७. एक वाफ काढल्यावर, गुळाचा खडा घालावा, व पुन्हा झाकणावर पाणी ठेवून वाफ काढावी.
८. भाजी खूप गाळ शिजू देऊ नये.
८. गरमागरम चविष्ट भाजी गरम फुलक्या सोबत खावी.
Happy
bhaji prep2.jpgbhaji1 .jpg

वाढणी/प्रमाण: 
३ - ४ जणांसाठी
अधिक टिपा: 

फोडणीत दोन चार मिरे घातल्यास अधिक चविष्ट लागते.
थोडे तिखट फोडणीत घालावे व थोडे वरुन घालावे. म्हणजे रंग उठावदार येईल.
.

माहितीचा स्रोत: 
पारंपारीक (विदर्भातील नैवेद्यासाठीची भाजी !)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त भाजी मला आवडते. आपण आपले दाण कुट घालतो. पण सुखे खोबरे पण मस्तच लागेल. करून बघते.

सामो, तरी मी टाकते गूळ. मसाल्यांचा उग्रपणा कमी होतो.
जास्त गोडगोड वाटत असेल तर वगळू शकतो.
Happy

छान रेसेपी.

गूळ न घालता जास्त आवडेल मला Happy पण मग तो डीप ब्राउन कलर नाही येत ग्रेवी ला.

छान दिसतेय
पण भोपळा भाजी आवडत नाही
वडे आवडतात Happy

वडे म्हणजे - ते भोपळ्याचे घारगे का? गोड असतत >>> हो गोड असतात जरा.. चहा सोबत मी आवडीने खाणारा कदाचित एकमेव गोड पदार्थ Happy

एकदम नागपुरी स्टाइल तेलात तरंगतेय भाजी Happy मी नेहमी मृण्मयीच्या पद्धतीनं करते. बाकरची चव आवडते त्यामुळे या पद्धतीनं पण करेन एकदा.

मस्तच दिसते आहे. आमच्या कडे आमसूल घालतात यात. मंजूताईंनी लिहील्याप्रमाणे मी कधी कधी चिंच पण घालतो. आंबट गोड तिखट मस्त लागते ही.

मस्त दिसते आहे भाजी. नक्की करून बघणार. Happy
ते तयारीच्या ताटात लाल मिरच्यांच्या डाव्या बाजूला काय आहे? मेथीदाणे आणि मिर्‍यं का?

Oops ! लेखिकेच्या माबो आयडी मुळे गडबड झाली ना. : हाहा:
मी लाल भोपळ्याची भाजी - आंबट गोड असं वाचलं. इंटरेस्टिंग वाटली, म्हणून वाचली तर गोडासाठी स्वतः भोपळा आणि गुळाचा खडा दिसला, पण मग आंबटपणा कसा येणार, म्हणून चूक पकडली थाटात लिहायला सरसावले. लिहिणार कोणाला म्हणून पहिलं तर आयडी - आंबट गोड Lol

शुद्धलेखनाच्या चुका (esp हृस्व दीर्घ - यात देखील चूक आहे) माझ्या नाहीत. माझा कीबोर्ड मला योग्य शब्द टाईप करुन देतच नाही. Rather काही शब्द देखीप टाईप करू देत नाही. खुप प्रयत्न केले.

मीरा, Lol
मलाही वाटलेले की लोकांचं कन्फ्युजन होईल असे. !
स्वाती, हो मेथी दाणेच आहेत . आणि मिरे.