लेखन उपक्रम २ - चरणस्पर्श - आशिका

Submitted by आशिका on 24 September, 2023 - 04:41

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं...

संमिश्र भावनांची सरमिसळ दिसत होती तिच्या चेहर्‍यावर. आनंद, उत्सुकता, धाकधुक, स्ट्रेस, अभिमान ... त्याला कल्पना होतीच. आतून तो बघत होता सगळं. बाकीचे आले, गाडीतून महत्वाची मंडळी आली. निरोपाचा क्षण जवळ येऊन ठेपला. विरहवेदना सहन करावीच लागणार जर पुढे 'सुखाचं चांदणं' अनुभवायचं असेल तर...निर्धार पक्का होता, 'उलटी गणना' सुरु झाली. तिचं रुप डोळ्यांत साठवत निघाला तो प्रवासाला. तिच्यासाठी कित्येक दिवस मैलोंमैल प्रवास करणार होता तो......

दिवसांमागून दिवस सरले आणि समीप ठाकला तो क्षण !! तिच्या हृदयाची धडधड वाढत होती....त्याच्या काळजीनं.....पुन्हा एकदा 'उलटी गणना' सुरु.... 'शून्य.शून्यचा' ठोका पडला आणि तिच्या सर्वांगातून आनंदाभिमानाची लहर सळसळत गेली.

कारण

त्याने 'चरणस्पर्श' केला होता .........चांद्रभूमीला !!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

प्राचीन - हो ना, मी पण वातच बघत होते की चांद्रयानाबद्दल कोणीच कसं लिहीलं नाही अजुन..... मग म्हटलं आपणच करावं ते काम.

धन्यवाद सर्वांना.

छान!