लेखन उपक्रम २ - साथ - आशिका

Submitted by आशिका on 21 September, 2023 - 07:52

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले.....

आणि .....काही क्षणांतच त्याच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित झाल्या..अंगावार रोमांच उभे राहिले... केवळ तिच्या दर्शनाने !! नकळत त्याचा भूतकाळ नजरेसमोर रुन्जी घालू लागला. तिच्यासोबत व्यतीत केलेले मोहक क्षण ....! मूड कसाही असेना.... ती सोबत असली की कश्शाची गरज नसायची. आनंदाच्या प्रसंगी सोबत हसायला ती, दु:खद प्रसन्गी आधाराचा हात देणारी ती, नैराश्याच्या गर्तेतून बाहेर काढणारीसुद्धा तीच आणि उत्साहाच्या उधाणाला साजरं करायलाही तीच. कधी कुण्णाशी बोलू नये, कुण्णाला भेटू नये असं वाटत असतांनादेखील तिची मूक साथ मात्र हवी असायचीच त्याला. तर असं हे अतूट नातं..... तिला समोर पहातांच तो खेचला गेला तिच्या दिशेने,तिला मिळवण्याच्या प्रबळ इच्छेपोटी त्याने नोन्दवलीच आपली ऑर्डर---'एक गिला भेल देना'......

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त Lol

मला वाचताना आधी पाणीपुरी वाटली होती Lol

मस्त Lol

Lol

वाचताना आधी पाणीपुरी वाटली होती >>> मलाही

म्हणजे उपक्रम जाहीर झाल्यावर, मी विचार केला होता लिहायचा. पण जमलं नाही वेळेअभावी..

शशक छान जमलीये, आशिका