मराठीतील सर्वोत्कॄष्ट पुस्तकं ( टॉप १०० - मस्ट हॅव बुक्स)

Submitted by केदार on 9 June, 2009 - 17:09

मॉडर्न लायब्ररी इंग्रजी पुस्तकांची नोंद ठेवते. तेथे वाचक आपल्या पसंती नोंदवू शकतात, क्रिटिक्स टॉप व रिडर्स टॉप असे कौल घेतले जातात. मराठीत "रसिक" व 'अंतर्नाद' ने तसा प्रयोग केला. पण तो २००६ साली झाला. त्यानंतर तसा प्रयोग कुणी केल्याचे माझ्या ऐकण्यात नाही.

मायबोलीवरही तसा प्रयोग घडू शकतो. म्हणून हा प्रपंच. तुमच्या दृष्टीने मराठीतील सर्वोत्कॄष्ट पुस्तकं कोणती आहेत?

संदर्भासाठी 'अंतर्नाद' मासिकाची २००६ साली असलेली टॉप २०.

कादंबरी (५)
१. श्यामची आई - साने गुरुजी
२. रणांगण - विश्राम बेडेकर
३. बनगरवाडी - व्यंकटेश माडगूळकर
४. ययाती - वि. स. खांडेकर
५. कोसला - भालचंद्र नेमाडे

कथा (४)
६. चिमणरावांचे चर्‍हाट - चिं. वि. जोशी
७. कळ्यांचे नि:श्वास - विभावरी शिरूरकर
८. तलावातले चांदणे - गंगाधर गाडगीळ
९. काजळमाया - जी. ए. कुलकर्णी

नाटक (१)
१०. सखाराम बाईंडर - विजय तेंडुलकर

कविता (४)
११. संपूर्ण केशवसुत - केशवसुत
१२. विशाखा - कुसुमाग्रज
१३. मर्ढेकरांची कविता - बा. सी. मर्ढेकर
१४. मृद्गंध - विंदा करंदीकर

समीक्षा (१)
१५. युगांत - इरावती कर्वे

चरित्रे/आत्मचरित्रे (३)
१६. स्मृति-चित्रे - लक्ष्मीबाई टिळक
१७. बलुतं - दया पवार
१८. आहे मनोहर तरी - सुनीता देशपांडे

संकीर्ण (२)
१९. व्यक्ती आणि वल्ली - पु. ल. देशपांडे
२०. माणसं - अनिल अवचट

ही झाली २००६ ची 'अंतर्नाद' प्रमाणे टॉप २०. पण तुम्हाला काय वाटते?
लिहा तर मग, तुम्हाला आवडलेली/ वाटलेली सर्वोत्कॄष्ट पुस्तकं. ती अगदी २०/२५ असायला हवी असे बंधन नाही, अगदी एखादे देखील लिहीता येईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१६. लक्ष्मीबाई टिळक चूकून अक्ष्मी झालेय?

ययाती - अजाबात नाही...

स्वामी, श्रीमानयोगी वगैरे नाहीत का यात?

अगदी अगदी. ययाति काय पुस्तक आहे का ह्या यादीत यायचे? आत्ताच मी तसे sgs ह्यांना विपूत लिहीले. Happy

सायो त्या यादीत नाहीत.
ही यादी व्यक्तीसापेक्ष आहे ह्यात वादच नाही, पण तरीही काही पुस्तके अफाटच असतात. वरची यादी व म टा ची यादी ही क्रिटिक्स पिक म्हणून चालू शकेल कदाचित. वाचकांची यादी महाराष्ट्रातल्या कुठल्याही लायब्ररीने बनवलेली नाही असे वाटते. (चु भू द्या).

ययाती मागच्याच आठवड्यात वाचले. अज्जिबात आवडले नाही.

खूप पूर्वी वाचलेलं ते आता आठवत नाहीये. बर्‍याचदा ठराविक वयात वाचलेली पुस्तकं आवडतात आणि मग आवडेनाशी होतात. त्यामुळे आता आवडेल, न आवडेल काही माहित नाही.

ययाति आहे तर ! Happy

बलुतंही एके काळी आवडले होते.
कोल्हाट्याचं पोर-किशोर शांताबाई काळे, कृष्णाकांठ-यशवंतराव चव्हाण, हीपण चांगली आहेत आत्मचरित्रे.

मृत्यूंजय,स्वामी,छावा या कादंबर्‍याही हव्यात पहिल्या शंभरच्या यादीत!

युगान्त मी पहिल्यांदा वाचलेले तेंव्हा आवडले नव्हते.(मृत्यूंजय,राधेय आणि हे एकाच वर्षात थोड्याफार अंतराने वाचल्यमुळे असेल ! :)परत एकदा वाचावे लागेल)

द मा मिरासदार, शंकर पाटील , अनंत यादव ही नांवे तर वरच्या लिस्टमधेही दिसत नाहीयेत ! Uhoh

मृत्युंजय, छावा आठवत नाहीत आता. पण चांगल्याच आहेत बहुतेक.
युगान्तही आठवत नाही.

चांगला उपक्रम आहे... but how are you going to compile the list? going through all the messages here and categorizing them will not be possible.

मी एक स्प्रेडशीट तयार केली आहे, जी कोणीही edit करु शकेल. लिंक, जाणकार लोक नंतर ह्या स्प्रेडशीट मधे जावुन नंतर मग top n पुस्तके निवडु शकतील.

माणुस,

इथे हि यादी करण्याची सुविधा लवकरच दिली जाईल.

व्वा केदार सह्ही धागा Happy
मी तुम्ही लोकांनी इथे सुचवलेले / चर्चिलेले पुस्तकच नेहमी वाचतो , मला फार मदत होइल या धाग्याची Happy

या २० च्या लिस्ट पैकी ३-४ च वाचलीयेत आतापर्यंत .
-------------------------------------------------------------------------
हम ना समझे थे बात इतनी सी ... ख्वाब शिशे के दुनिया पत्थर की....

ह्याचा लवकरच व्ही एन सी होणार.. मी बाजूलाच राहतो Happy

कादंबर्‍यांमध्ये मराठी मधला सगळ्यात तगडा आणि प्रचंड आवाका असलेले पेंडसे दिसेनात कुठे ते? रथचक्र, तुंबाड, बापू ह्या कादंबर्‍या म्हणुन (तंत्राच्या दृष्टीने तसेच आषयाच्या) फार पुढे आहेत इतर अनेक मराठी कादंबर्‍यांच्या तुलनेत.

मृत्युंजय, राधेय, छावा, स्वामी - जी एं चे एक वाक्य टाकतो: मराठीमधल्या ऐतिहासिक विषयांवरच्या कादंबर्‍या ह्या गल्लीत घातलेल्या सत्यनारायणाच्या पुजेसारख्या आहेत. Happy कुणाला काय आवडेल, कुणाला काय.. काही लोकं विचारतात 'कोसला' काय आवडते, शी! असो.

२० पैकी १० पुस्तके वाचली आहेत.. नॉट बॅड..
पण मस्ट हॅव बुक्सची यादी केली तर त्यात हीच पुस्तके असतील असं मला वाटत नाही.. सद्ध्या वाचनाच्या नावाने आनंद आहे, त्यामुळे भर घालता येणार नाही.. पण आवडेल..

धागा मस्त आहे पण! एकदम मस्त डेटाबेस होईल एका ठिकाणी.. माणसासारखी स्प्रेडशीट दिली, तक्ता तयार झाला तर अजुन छान!

www.bhagyashree.co.cc

प्रवासवर्णन ही Category नाहिये का?
त्यात पुढिल पुस्तके असु शकतील

१. जावे त्यांच्या देशा - पु. ल. देशपांडे
२. पुर्वरंग - पु. ल. देशपांडे

~~~~~~~~~~~~~~
उद्या उद्याची किती काळजी बघ रांगेतून
परवा आहे उद्याच नंतर बोलू काही
चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही

अरूण अरे त्या कॅटगर्‍या त्यांनी केल्या. मी आपली लिस्ट उचलून तशीच लावली. ती लिस्ट मला तर फारच अपूर्ण वाटते.

टण्या हो सापेक्षता असल्यामुळे वाद होतील. Happy
भाग्यश्री, अ‍ॅडमिन त्यासाठी थोडी मदत करणार आहेत. मतदान नंतर होईल पण निदान पुस्तके तर सुचवू शकताच.

माझे काही. Happy

कोसला
रथचक्र
पडघवली
बनगरवाडी
माणसं
काजळमाया
पिंगळावेळ (खरे तर समग्र जीए Happy )
शाळा
माझी जन्मठेप
नटसम्राट

अजुन यादी करतो. Happy

अरे राधेय, स्वामी, कृष्णवेध, श्रीमान योगी, गारंबीचा बापु, वपुर्झा ही पुस्तकं कशी सुटली ह्यातुन??
-------------------------
खोल मनाच्या कुपीत जपले जीवाशिवाचे लेणे
तुझ्या पालखीपुढून गेले सहा ऋतुंचे मेणे.

http://www.maayboli.com/node/8242 इथे जा आणि आपले अनुभव शेअर करा.

हो रे केदार, बरोबर आहे तुझं. सर्वोत्कृष्ट अशी पुस्तकं निवडायची म्हटली ना, तरी यादी १०० च्या वर जाईल......... Happy
अगदी ज्ञानेश्वरी पासून शांता शेळक्यांच्या कवितापर्यंत आणि त्या कोणत्या तरी शास्त्रीबुवांच्या "माझा प्रवास" पासून मेघना पेठेंच्या कथांपर्यंत बघितलं तर मराठी सारस्वताचा आवाका बर्‍यापैकी विस्तारलेला आहे. सद्यस्थितीमध्ये प्रकाशित होत असलेली अनुवादित पुस्तके सुद्धा विचारात घ्यावी लागतील ना या यादीत ?????????? Happy

~~~~~~~~~~~~~~
उद्या उद्याची किती काळजी बघ रांगेतून
परवा आहे उद्याच नंतर बोलू काही
चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही

नविन ऐतिहासीक मधले मला आवडलेले शहेनशहा. औरंगजेबावर आहे. अप्रतिम आहे. Happy

एक होता कार्व्हर का नाहीये असे मी विचारण्यापेक्षा आठवण करतो. Happy आणखी यादी देतोच.

कोणत्या तरी शास्त्रीबुवांच्या "माझा प्रवास"
>>>>>>>>>>>>>>
अरुणराव, मी अजून कुठलेही पुस्तक वा प्रवासवर्णन लिहिलेले नाही Proud

तू म्हणतो आहे ते पुस्तक गोडसे भटजींचे, 'माझा प्रवास'

यामधे दुर्गा भागवत याची पुस्तके पण हवीतच
व्यासपर्व!!
--------------
नंदिनी
--------------

ज्ञानेश्वरी, गाथा, दासबोध
प्रेषित, वामन परत न आला, २०५०, अंताजीची बखर, संभव, चानी, कोंडुरा, रारंगढांग, शीतयुद्ध सदानंद, कळ, मी उत्सुकतेने झोपलो, हे ईश्वरराव हे पुरुषोत्तमराव (शाम मनोहरांची अनेक), अनिल बर्वेंचा एक कथासंग्रह (नाव विसरलो Sad ), सिंहासन, मुंबई डायरी,
दुर्गाबाईंचे साहित्य
आयदान, झोंबी, उचल्या, बलुतं,
तुळजाभवानी, गावगाडा, लोकसत्तेला दंडसत्तेचे आव्हान,

  ***
  A falling leaf
  looks at the tree...
  perhaps, minus me

  सुधीर गाडगीळचे पिकलं पान
  एकटा जीव
  मधे एका खवय्याचे आत्मचरीत्र (??? नाव आठवले की लिहीतो. नॉनव्हेज खाणार्‍यांना पर्वणीच) वाचले होते ते पण जबरीच.
  मधुबालाचे पुस्तक मात्र मिळाले नाही. मधे कुणीतरी .pdf पाठवली होती पण अर्धवट होती. Sad
  आत्मचरीत्र सहीच असतात नाही? टेट्रापॅकवाले, विठ्ठल कामत वगैरे छानच आहेत.
  मतकरींचा एक कथासग्रह होता त्यात ती जबरी 'भोजन' का 'अतिथी' कथा होती. अप्रतिम.

  केपी, ती अतिथी कथा.. क्लक क्लक आवाज करत खाणारी खानावळीतली बाई वगैरे वर्णने बहुतेक त्याच गोष्टीत होती. त्याचा शेवट होता, 'आणि यजमानांनी हात उचलला..' जबरी कथा आहे ती..

  कथासंग्रहाच नाव माहीत असेल तर टाका प्लीज .
  -------------------------------------------------------------------------
  हम ना समझे थे बात इतनी सी ... ख्वाब शिशे के दुनिया पत्थर की....

  'अनुवादीत कथा-कादंबर्‍या' असाही विभाग नाही केला.

  'सेकंड लेडी'चा रविंद्र पिंगे ह्यांनी केलेला अनुवाद अत्युत्तम आहे.

  वर सर्वांनी उल्लेखलेल्या पुस्तकांबरोबर मला एम. टी. आयवा मारु हे अनंत सामंत ह्यांचं पुस्तकही टॉप-१०० मध्ये घालायला आवडेल.

  जीडी मी आता तेच लिहायला आलो होतो Happy
  टण्या, केपी, दोन वेगळ्या कथा आहेत. एक आहे 'पंगत' आणि एक आहे अतिथीवाली. दोन्ही भारी आहेत, पण पंगत केवळ सर्राट आहे !

   ***
   A falling leaf
   looks at the tree...
   perhaps, minus me

   पंगत केवळ सर्राट आहे ! >>>
   यस्स स्लार्ट्या!! त्यातल्या यजमानाचे वर्णन अभेद्य आहे. Happy

   Pages