लेखन उपक्रम २ - स्थळ! - मी मानसी

Submitted by mi manasi on 20 September, 2023 - 01:27

स्थळ!

बाकीचे अजून आले नव्हते गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं..

साडेसातची लोकल..
डोळ्यात राग उतरला..
कॉलेजला जाताना नेहमी पहायचा तो तिला. एकंदरच तिचं डॅशिंग व्यक्तिमत्व आवडायचं त्याला.
एकदा गर्दितून वाट काढताना नकळत त्याचा धक्का लागला. पण तिने परतून त्याच्या नाकावर जबरदस्त ठोशा मारला आणि पळाली.
तो धावला मागे. पण गायबच झाली. आणि आज पाच वर्षांनी दिसली. वाटलं जावं..

इतक्यात सगळे येताना दिसले. बाबा तिच्याकडेच गेले. बाबांनी त्याच्याकडे बोट दाखवलं आणि नंतर दोघं बराच वेळ बोलले. बोलताना ती त्याच्याकडे बघत होती. तो घामाघुम झाला..

बाबा आल्याआल्या म्हणाले,
“माझ्या एका कलीगची मुलगी. कशी वाटली? ती ओळखते तुला. विचारायचं?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol Lol Lol Lol मस्त!

सहीच!

Lol

@Sonalisl
@अन्जू
@आबा
आपले मनापासून आभार!

पहील्या रात्री तर ठोसा लगावणार नाही ना? हे आधी विचारुन घ्या.

सामो धमाल
अन तितकीच कथाही

@भरत
@बिपिन सांगळे
@rmd
आभारी आहे.