डबल डेकर !! मुंबईची शान - ८६ वर्षांचा हा प्रवास अखेर थांबला!

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 September, 2023 - 15:11

पाऊस, मरीन ड्राईव्ह आणि एक मुंबईकर.. आमचे एक वेगळेच नाते असते. तिघातले दोघे उपस्थित असलो तरी मेहफिल जमते. सध्या पावसाचा सीजन असल्याने वारंवार तिथे जाणे होते. मोजून सांगायचे झाल्यास, गेल्या तीन महिन्यात पाच वेळा. मी आणि सोबत माझी दोन पोरे. त्यांनाही तिथल्या जादुई वातावरणाची आवड लागली आहे. कधीही ऊठा, जीन्स चढवा आणि निघा. कंटाळा येतच नाही. उलट आला कंटाळा की ऊठा आणि तिथला समुद्र गाठा. नुसता समुद्रच नाही तर त्या भोवती पसरलेला कट्टा, आणि त्या कट्ट्याभोवतीचा पट्टा, कितीही गजबजलेला का असेना कधी गर्दीचा वाटत नाही. मन रमतेच..

तर असेच गेल्या रविवारी तिथे चक्कर टाकणे झाले. सकाळचा पाऊस संध्याकाळी गायबला होता. पण दाटून आलेले ढग हळूहळू सूर्यकिरणांना रस्ता देत होते. जसे मावळू लागले तसे गुलाबी रंगाच्या छटा अश्या काही पसरू लागल्या की कुठलाही फिल्टर न लावता हे असे फोटो निघू लागले.

Marine drive pink sky.jpg

तिथे फोटो देखील कितीही काढा, मेमरी कार्ड भरते पण मन भरत नाही. पण नेहमीचे जाणे असल्याने मी जास्त फोटो टिपायच्या भानगडीत पडत नाही. मुलांच्या दंगामस्तीचे फोटो मात्र हौसेने काढतो. पण पोज देऊन फोटो काढले असे क्वचित होते. स्पेशली पोरगा कधी फोटोला पोज देतच नाही. मग कितीही स्पेशल डे, स्पेशल ओकेजन का असेना.. पण त्या दिवशी चमत्कार घडला !

त्या दिवशी पोराला ती दिसली. दिसता क्षणीच ती आवडली. खाली लालचुटूक पेहराव. आणि वर तेनु काला चश्मा जचदा ऐ.. बघताक्षणीच त्याच्या मनात भरली. धावत जाऊन तिला तो जवळपास मिठीच मारणार होता. पण तिच्या इतक्या जवळ जाण्यातला धोका ओळखून मी त्याला अडवले. तरी दुरून का होईना अनिमिष नेत्रांनी तो तिला न्याहाळतच होता. मग मी त्याला म्हंटले चल एक छानशी पोज दे. तुझा फोटो काढूया हिच्यासोबत. आणि घरी जाऊन मम्माला दाखवूया तुझी नवी मैत्रीण.. आणि काय जादू, दुसऱ्याच क्षणाला पोरगा पोज देऊन रेडी.. माझीच घाई झाली जे खिशातून चटकन मोबाईल काढत, केमेरा ऑन करत, दोघे व्यवस्थित दिसतील असा अँगल शोधून, ती तिथून निघायच्या आधी त्यांचा जोडीने फोटो काढावा लागला.

काही फोटो वरकरणी तितके स्पेशल वाटत नाहीत, पण त्यासोबत जोडलेल्या आठवणींनी ते स्पेशल बनतात..

हा त्यातलाच एक.. जो काही जुन्या आठवणींना उजाळा देऊन गेला.

Bus and Runu.jpg

येस्स! डबल डेकर बस!!
मुंबई बेस्टची शान!

जेव्हा इमॅजिका, एस्सेलवर्ल्ड असले अम्युजमेंट पार्क नव्हते तेव्हा मुंबईकरांची खरीखुरी जॉय राईड होती डबलडेकर बस.
अट फक्त एकच. वरच्या मजल्यावर जावे आणि ड्रायव्हरच्या थेट डोक्यावरची पहिल्या क्रमांकाची सीट बूक करावी. समोरची खिडकी सताड उघडी. तिथून जोरदार थंडगार वारा येऊन आपल्या चेहर्‍यावर आदळणार. बसचा वेग जितका जास्त तितकाच वार्‍याचा मारा सुखावणारा. जर सोबत पावसाचे तुषार असतील तर क्या बात.! स्वत: अनुभवल्याशिवाय या सुखाची कल्पना अशक्यच.

मी चौथीला असतानाच स्कॉलरशिपच्या एक्स्ट्रा क्लासमुळे स्कूलबस सोडून बेस्ट बस ने प्रवास करू लागलो. माझगाव ते दादर. थेट बसची फ्रिक्वेन्सी कमी म्हणून दादर ते भायखळा असा प्रवास करायचो. आणि तिथून दुसरी बस. तर या दादर ते भायखळा प्रवासात १ नंबरची बस डबलडेकर होती. भायखळ्यावरून माझगावला जाताना ३ नंबरची बस डबलडेकर होती. ईतक्या शेकडो नंबरच्या बस होत्या मुंबईत, पण आपण १ आणि ३ नंबरच्या बस ने प्रवास करतो हे तेव्हा स्पेशल वाटायचे. पण तरीही खरे कौतुक होते ते बसच्या डबल डेकर असण्याचे. त्यासाठी त्याच मार्गावरच्या ईतर बसेस सोडल्या जायच्या. चालती डबल डेकर बस धावत जाऊन पकडली जायची. घाईघाईत वर जायचो आणि तिथे कोणी आधीच बसले असेल तर त्याला कुठे उतरणार हे विचारून त्या सीटवर आपला क्लेम लावला जायचा. मोठा ग्रूप असला तर त्या सीट वरून भांडणे व्हायची. कंडक्टरकाका ओरडत राहायचे. आमची मस्ती चालूच राहायची..

त्याकाळी आम्हा मुलांच्या सुखाच्या कल्पनाही फार हलक्याफुलक्या असायच्या. छोट्या छोट्या गोष्टीतही फार आनंद मिळायचा. पण तरीही डबल डेकर बसची ती फ्रंट सीट स्पेशलच होती. त्या दिवशी मुलाला जेव्हा डबल डेकर बस बघूनच ईतका आनंद झाला ते बघून मनात विचार आला की पोरांना पहिल्या सीटवर बसायचा आनंद अनुभवायला मिळाला तर किती खुश होतील. लवकरच हा योग जुळवूया असे ठरवले आणि परवाच ही बातमी कानावर आली..

मुंबईची शान असलेली डबल डेकर बस आता बंद होत आहे.
किंबहुना दोनच दिवसांपुर्वी झाली आहे.
तब्बल ८६ वर्षांचा हा प्रवास थांबला आहे.
नव्वदीच्या दशकात तब्बल ९०० डबल डेकर बस मुंबईत धावत होत्या...
पण या १५ सप्टेंबर २०२३ रोजी आगरकर चौक ते सीप्ज रूट वर ४१५ क्रमांकाची शेवटची डिजेल डबल डेकर बस धावली.
शेवटचे या जुन्या डबल डेकर बस मध्ये कधी बसलो हे देखील आता आठवत नाही पण तरी मनात काहीतरी दाटून आले.

आणि हा एक आयकॉनिक फोटो गूगल करून आंतरजालावरून साभार.. जो आजवर मुंबईत न आलेल्यांनी देखील कित्येक चित्रपटात मुंबई दाखवताना पाहिला असेल. कारण व्ही.टी. स्टेशनप्रमाणे डबल डेकर बस सुद्धा मुंबईची एक ओळखच होती.

Bus 2.jpg

धन्यवाद,
ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१) चर्चगेट - > वर्ल्ड ट्रेड सेंटर / एन सी पी ए. मलाही वाटतंय त्या बसेसना नंबर नसावेत.

आठवलं हो. बेस्टला काही 'लो फ्लोअर बसेस' मिळाल्या होत्या (२०१२-१३). तशा पुण्यातही आलेल्या. शिवाजीनगर ते कात्रज धावत. त्याने मी सर्प उद्यान कात्रजला गेल्याचं आठवतंय.
तर या बसेसना 'फोर्ट फेरी' १ आणि २ नाव देऊन चर्चगेट/सीएसटी इथून त्या wtc किंवा एनसीपीए येथे राऊंड ट्रिप मारत. मी त्यातून गेलो तेव्हा दुर्दशा झालेली बसेसची. आतमध्ये धुरळा भरलेला. गिअरबॉक्सचा भयानक खडामघरर आवाज. हे शहरातल्या चांगल्या रस्त्यावर धावणाऱ्या बसेसची अवस्था!! त्याच वर्षी कर्नाटकात हंपी लखुंडी फिरलो होतो. त्याच बसेस तिथे होत्या. होस्पेटे ते हंपी अकरा किमि. दर दहा मिनिटांनी सुटत होत्या. गदग ते लखुंडी या अकरा किमिटरलाही दर अर्ध्या तासाने होत्या. चकचकीत,स्वच्छ. आवाज बिलकूल नाही. मी विचारले नवीन आहेत का तर सांगितलं की एक वर्षं झालं!!!.

-----------------

ऋ, ह्या व्हिडियो मध्ये ट्रेलर डबल बस आणि आयकॉनिक डबल डेकर बस ह्या दोन्ही आहेत.
https://youtu.be/W8r7aXqxReY?t=9

मुंबईत पण अशी मुंबई दर्शन ची नीलांबरी ओपन डेक डबल डेकर आहे ना अजून,>> ती पण बंद होणार आहे ७ ऑक्टोबर पासुन, बसचे वय १५ वर्ष झाल्यामुळे रस्तावर नाही चालवता येणार. सरकारचे नवीन बस घेउन यण्यासाठी प्रयत्न चालु आहेत.

आजीचा किस्स फार मस्त. >+१

नीलांबरी ओपन डेक डबल डेकर
ही जरी बेस्टची बस असली तरी ओनलाइन तिकिट किंवा खिडकीवर यावर घोळ आहे. बेस्टच्या साईटवर किंवा महाराष्ट्र टुरिझम यांचा संबंध नसून खाजगी टुरिझम साइटवर तिकिट काढावे लागते. खिडकीवर म्हणजे म्युझियमला जाणे आणि तिकिट मिळते का पाहणे म्हणजे वेळ वाया. बोरिवली/विरार/कल्याण वगैरे लांबून येणाऱ्या कुटुंबांनी सरळ मुंबईत येऊन एकेक ठिकाणी वेळ घालवणे उत्तम. गिरगाव चौपाटी, कमला नेहरू पार्क वगैरे.
त्या निलांबरीचे विडिओ यूट्यूबवर टाकलेले आहेत ते पाहिल्यावर कळेल की असं का म्हणतो.

ती पण बंद होणार आहे ७ ऑक्टोबर पासुन>>
>>>>>
ओह.. ही सुद्धा आम्हाला दिसलेली एकदा. तेव्हाही मुलाने हट्ट केलेला. पण असे डायरेक्ट जाता येता नाही, आधी तिकीट काढावे लागते सांगून त्याची समजूत काढलेली..
आता गूगल केले तर वरचा डेक १८० आणि झाली ६० असे तिकीट दर आहेत. तासभर प्रवास..

बोरिवली/विरार/कल्याण वगैरे लांबून येणाऱ्या कुटुंबांनी सरळ मुंबईत येऊन एकेक ठिकाणी वेळ घालवणे उत्तम.

+786

अशा सीटी टूर्सने जाताना उघड्या बस मधून शहर बघणे हा उद्देश असेल तरच करावे. काही दोन चार पॉईंट उतरुन बघता येतात. पण ती घेऊन जाते ती सगळी १५- २० ठिकाणं उतरुन बघणे शक्य होत नाही. गाईड सांगेल त्या मनोरंजक कथा ऐकणे, बस मध्ये बसून फोटो काढणे आणि हॉप ऑन हॉप ऑफ असल्याचा थोडाफार फायदा घेत तंगडतोड थोडी कमी करणे हेच करावे. पैसे वसुल करायला नाही तर आनंद घ्यायला आलो आहोत हे मनात मात्र कायम ठेवावे. आपण काटेकोर नियोजित केलेल्या अनेक गोष्टी गर्दी, ट्रॅफिक, विलंब इ. अनेक कारणांनी होणार नाहीत हा नियम असून त्या झाल्या तर तो अपवाद असणार आहे. गूगल मॅपवर अनेक ठिकाणं ठरवून ठेवावी, आणि आयत्यावेळी परिस्थिती नुसार काय करायचं आणि काय गाळायचं ते ठरवावं. त्यातही फार मजा येते.

डबलडेकरच्या आठवणी जागवल्यात. रस्त्यावरच्या प्रचंड गर्दीचा टॉप व्ह्यू आणि ड्रायव्हरच्या डोक्यावरची पहिली सीट दोन्ही फार आवडीचे, अनेकदा घेतलेला अनुभव.

आता जेव्हा चान्स मिळेल तेंव्हा AC वाल्या डबलडेकरीत बसू.

मुंबई इज लव्ह !

आवडती सीट यावरून एक आठवलं. कर्नाटकात तीन चार फेऱ्या झाल्या २०१९ मध्ये तेव्हा तिकडच्या एसटीबसनेच फिरलो. अत्यंत हवेशिर,मोकळी स्वच्छ बस असते. ड्रायवरची बंदिस्त केबिन अशी नसते. त्यांच्या डाव्या बाजूस एक आडवी सीट असते ती महिलांची आवडती दिसली. तर मागची. म्हणजे रांगेत पहिली कुणाला नकोशी असते असं लक्षात आलं. पण आम्हाला तीच हवी असे आणि रिकामी असे. तिथे बसल्यावर पुढील दृष्य १८० अंशात पूर्ण पाहायला मिळे. घाटात फारच सुंदर. आणि तिथले घाटही हिरवे गार. दिवसा एक दोन तासांचे प्रवास असल्याने समोरच्या वाहनांचे प्रखर दिवे पाहायला लागत नव्हते.

.... इथपासून एसी डबलडेकर कशी डब्बा आहे आणि सामान्यांचे कसे हाल होताहेत अशी पोस्ट युनोहु आयडीकडून यायला अजुन किती वेळ लागेल?

मी युनोहू का?
आमच्याकडे सिंगल डेकर एसी बसेस आहेत. मला आवडतात. फक्त सहा रुपये तिकीट असूनही आमचा रूट बराच वेळ रिकामा जातो.
लोक तीस रुपये खर्चून रिक्षाने जातात.

रूट बराच वेळ रिकामा जातो.
लोक तीस रुपये खर्चून रिक्षाने जातात.

Submitted by भरत. on 18 September, 2023

6 रुपये तिकीट दर म्हणजे अंतर दोन ते तीन kilometer आहे.
वॉकिंग distance आहे तरी 30 रुपये खर्च करून लोक रिक्षा नी जात असतील तर हे गरीब नाहीत माजलेले आहेत.
तेथील बस सेवा कायम स्वरुपी बंद करावी.

देशात ज्या काही समस्या आहेत त्याला मूर्ख भारतीय जनता च कारणीभूत आहे.
ह्याचे हे उत्तम उदाहरण आहे.
लोक मूर्ख आहेत म्हणून system भ्रष्ट आहे आणि नेते स्वार्थी आहेत.
दोष जनते मध्ये आहे

फक्त सहा रुपये तिकीट असूनही आमचा रूट बराच वेळ रिकामा जातो. लोक तीस रुपये खर्चून रिक्षाने जातात.
>>>>
मी नवी मुंबईत राहायला आलो तेव्हा मलाही हे समजत नव्हते की ईथले मध्यमवर्गीय लोकं बस सोडून सरळ रिक्षाला एक्स्ट्रा पैसे का खर्च करतात. भले बसची फ्रिक्वेन्सी चांगली असली आणि घराजवळ स्टॉप असला तरीही रिक्षाला जास्त डिमांड असतो. असे का याचे नेमके उत्तर मिळाले नाही, पण नंतर मलाही ती सवय लागली.

बेस्टचे मध्यंतरी रेट्स कमी केले. मिनिमम तिकिटांचा पल्ला वाढवला.

बससाठी वाट बघायची लोकांची तयारी नसते.

पीक अवर्सला भरून जातात.

म्हणजे लोक श्रीमंत आहे.
बस बंद करून टाका.
रिक्षा वाले अजून लूट करतील..
तुमच्या विभागातील लोक ह्याच लायकीची आहेत.
खूप पैसे वाले आहेत

जनतेचे डायग्नोसिस पूर्ण झाले असेल तर रेमेडी सांगा आता.
अमिसलप्राईड , क्लोझापाइन, SSRI, aripirazole कोणते घ्यावे जनतेने, किती dose ?

>>>>>अमिसलप्राईड , क्लोझापाइन, SSRI, aripirazole कोणते घ्यावे जनतेने, किती dose ?
घेउन टाका कॉकटेल. एक ना एक तरी निशाण्यावरती लागेलच. Wink

लोकांची वृत्ती रोज बघत आहे.
6 रुपये बस तिकीट 15,रुपये रिक्षा ..
चालत 25 min..
मी बस नसेल तर सरळ वॉकिंग.
रिक्षा नाही.
लोकांची वृत्ती.
1) बस तिकीट १" रुपयांनी वाढले तरी हीच रडणारी लोक १५ रुपये देवून जातात..
मंजे ही श्रीमंत लोक आहेत.
२) अर्जंट ह्या जगात काहीच नसते आपल्याला उशीर झालेला असतो.
३) बस लाईन मध्ये उन्हात एक तास उभे राहतील पण बस मध्ये १५ min Ac मध्ये उभे राहणार नाहीत..म्हणजे ही जनता किती हुशार असेल .

मस्त लेख! तू असेच लेख लिहित जा. जॉनर आहे तुझा हा. बॉय नेक्स्ट डोअर.
ॠ च्या फोटोतली डबल डेकर नाही घेतली कधी, पण खालच्या नेहमीच्या घेतल्यात. कायम गर्दी च्या वेळी प्रवास करत असल्याने बस मधे किमान घुसता आल्याचंच पुरेसं असायचं. वरची सीट वगैरे अपेक्षा नाही.
मुलं मात्रं नेहमी त्याच सीट वर बसायला कल्ला करतात Happy

धन्यवाद आशू Happy

कायम गर्दी च्या वेळी प्रवास करत असल्याने >>>> हा एक महत्वाचा मुद्दा असतो. जो बस नाही तर ट्रेनला सुद्धा लागू. माझे नशीब चांगले जे मी नेहमी उलट्या दिशेनेच प्रवास केला. त्यामुळे प्रवासाचे सारे अनुभव सुखद आणि आरामदायक होते. पण तेच गर्दीतून प्रवास करणारे बोलू शकत नाही. त्यामुळे बरेचदा अश्या दोन्हीकडच्या लोकांना एकमेकांचे अनुभव रीलेट होत नाहीत.

डब्बल डेकर बस मध्ये सर्वात धोकादायक म्हणजे चालत्या bus मध्ये चढणे.
दरवाजा चा मागील दांडा पकडुन बस मध्ये चढलात तर तुमचा तोल गेलाच म्हणून समजा.

हो खरे आहे.. त्या मागच्या दांड्याला पकडून जर ट्रेन सारखे चढायला गेलो तर भेलकांडायला व्हायचे. अनुभवाने शिकायची गोष्ट होती ती Happy

चालत्या डबलडेकर bus मध्ये चढणे.
दरवाजाचा मागील दांडा पकडुन बस मध्ये चढणे

असे केल्यास डबल तिकिट लागते.

छान लेख. व फोटो. ह्या डबल डेकरच्या मनोरम्य आठवणी आहेत. एकदा वडिलांसोबत लहान पणी मुंबईला आलो होतो. बीडीडी चाळीत कोणी
दुरचे नातेवाइक होते त्यांच्याकडे गेलो. तिथे त्या काकूने कश्याला हात लावायचा नाही अशी सक्त तंबी दिल्याने वैतागून कॉटवर गप्प बसले होते. मग बोलणे चहा झाल्यावर वडिलांचा हात धरून बाहेर. तिथे वडिलांनी तो क्वालिटी आइस क्रीमचा बॉल मिळायचा व्हॅनिला आइसक्रीम चा तो घेउन दिला व आम्ही बस स्टोप वरुन डबल डेकर मध्ये बसलो. त्यांना कुठेतरी जायचे होते. वर एकदम पुढे बसलो आम्ही दोघेच तिथे होतो. बाहेर बघत बघत ते बॉल मधले आइसक्रीम खाल्ले. वन ऑफ माय बेस्ट मेमरीज. पुढचे मागचे काही माहीत च नाही. इतके लहान वय होते.

दुसरी आठवण म्हणजे १९९७ मध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये नोकरी करत होते तेव्हा. व्हीटीला उतरुन पुढे लायन्स गेट परेन्त बसने. तर नवीनच होते डबल डेकर मध्ये चढल्यावर एकदम वर जावे की खालीच बसावे लक्षात येइना तोपरेन्त माग ची गर्दी कोकलायला लागली त्यात एक जण मोठ्याने मित्राला म्हणाला, बाईंनी सेंट्रल व वेस्टर्न दोन्ही जाम केला आहे. !!! मग पटकन वर चढले व वर जाउन बसले.

Pages