लहान मुलांच्या साठी गणपती बनवा कार्यशाळा

Submitted by नितीनचंद्र on 15 September, 2023 - 11:10

मी सहा महिन्यांपुर्वी लोहोगाव मधे खेसे पार्क नावाच्या एरियामधे रहायला गेलो. मुलगी जावई जावयाची आई सोबत ५ वर्षांचा नातु यांच्या सोबत आता मी पत्नी आणि आई असे मोठे कुटुंब खेसे पार्क मधे रमलो.

रियान या माझ्या नातवाला घराच्या गच्ची मधून उडणारी कर्मशिअल विमाने दाखवणे, शाळेच्या बसस्टॉप वर नेणे किंवा आणणे या सोबत मी पण लहान मुलांच्या साठी असलेल्या अ‍ॅक्टीव्हीटीत रमु लागलो. कागदाचे विमान बनवणे आणि बनवायला शिकवणे, त्याची खेळणी बिघडली तर आधीच्या मशीनरी रिपेअर्स च्या नोकरीत ( मेन्टेनंन्स इंजिनीयरींग ) मिळालेल्या अनुभवाचा वापर करुन काही नव्याने शिकत आहे.

आजतर लहान मुलांच्या साठी गणपती बनवा कार्यशाळा कॉलनी मधला गणेश मंदीरात झाली. आपल्याला चांगली मुर्ती बनवता येत नाही हे पाहून रियानची चिडचीड होत होती. आजोबा तुम्ही सोंड बनवा असे सांगुन मला ही तो गुंतवत होता. मी ही मातीत हात घातले पण छे . बनवायला गेलो गणपती आणि झाल एलियन असे काहीसे होत होते.

हा अनुभव एक हजार मुले झटतात तेंव्हा एक कलाकार तयार होतो असे सांगून गेला. पण मजा आली.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults