फल ज्योतिष याबद्दल बऱ्याच लोकांच्या मनात कुतूहल निश्चितच असते. त्याच्यावर विश्वास असणाऱ्या लोकांमध्ये तर याबद्दल खूप आकर्षण असते .
यासंदर्भात दोन-तीन विचार मला वाचकांसमोर ठेवायचे आहेत आणि त्यावर साधक अशी चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे.
पहिली गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते की फल ज्योतिष हे निश्चितच शास्त्रीय पद्धतीने भविष्याबद्दल केलेल्या तर्काचे मांडणी आहे. ज्या गोष्टींचा तर्क करण्यासाठी कुठलीही विचारसरणी, विज्ञान, शास्त्र किंवा पूर्वानुभव उपयोगी पडत नाही त्या गोष्टींच्या भविष्याबद्दल तर्क करण्यासाठी ही पद्धती अस्तित्वात आली असावी.
म्हणजे नेमके काय हे सांगण्यासाठी एक दोन उदाहरणे पुरेशी आहेत.
एक विद्यार्थी अतिशय हुशार आहे, परीक्षेसाठी त्याची तयारी पूर्ण झालेली आहे . त्याला आत्मविश्वासही आहे . पण परीक्षेला जाताना नेमकी त्याच्या सायकलला रिक्षाची धडक बसते , तो जायबंदी होतो आणि पेपराला दोन तास उशिरा पोहोचतो आणि एका तासात लिहिता येईल एवढं प्रश्नांची उत्तरे लिहून तो उत्तीर्ण होतो पण जो विद्यार्थी त्या विषयात प्रथम येण्याची क्षमता असलेला आहे तो कसाबसा पास होतो . हे अवास्तव कशामुळे घडले याचे उत्तर विज्ञान पुढील प्रमाणे देईल कि त्याला अपघात झाला, तो उशिरा पोहोचला, त्याने पूर्ण उत्तरे लिहिली नाहीत , वगैरे म्हणून!
पण ह्या मुलाच्या बाबतीतच नेमकं पेपराच्या वेळेलाच असा प्रसंग का घडला हा प्रश्न मानवी मनाला निश्चितच भेडसावणारा आहे . या घटनेकडे पाहण्यासाठी खरे ज्योतिषाचा आधार निश्चित घेता येत असतो.
म्हणजे पत्रिका पाहून कोणीतरी ज्ञानी माणूस हे आधीच सांगू शकतो की या मुलाच्या बाबतीत अशा तऱ्हेच्या घटना घडण्याची शक्यता आहे. हे जर आधीच ठाऊक झाले तर त्या मुलाच्या संदर्भात या घटना टाळण्यासाठी उपाययोजना काही हद्दीपर्यंत निश्चितच करता येतील.
आणखीन एक उदाहरण सांगतो .
जीवनाच्या प्रवासाला निघालेल्या मनुष्याला गाडीत बसल्यावर जर कोणीतरी सांगितलं की अरे मित्रा ही गाडी अशा ठिकाणी जाणार आहे जिथे खूप थंडी आहे , तर तो जाताना त्या थंडीचा सामना करण्यासाठी निश्चितच थोडीशी पूर्वतयारी करू शकतो. जसे की मधल्या कुठल्या स्टेशनवर त्याला शक्य असेल तर उतरून चांगले गरम कपडे, शाल अशा वस्तूंची खरेदी करणे वगैरे .. की ज्यामुळे त्याच्या पुढे येऊ घातलेल्या समस्येला तो चांगल्या रीतीने हाताळू शकेल.
हे उदाहरण शब्दशः न घेता मुद्दा समजावून सांगण्यापुरते घेतले आहे याची जाण ठेवावी.
त्यामुळे ज्योतिष ढोबळपणे आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्या किंवा चांगल्या गोष्टी यांचं थोडंसं निदान आधीच करू शकत असेल तर त्या दृष्टीने त्या गोष्टी हाताळण्यासाठी त्याकडे बघण्या इतपत सामंजस्य जर माणसाने दाखवलं तर ते शास्त्र निश्चितच उपयोगी ठरेल.
पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की कुठलीही गोष्ट प्रमाणात केली तर ती उपयुक्त असते ! प्रमाणामध्ये सर्व काही असावे.
फलज्योतिष या विषयावर विश्वास नसणाऱ्या लोकांनी कृपया कुठलेही प्रतिसाद देऊ नयेत.
मात्र याच्यात परम्टेयूशन आणि
मात्र याच्यात परम्टेयूशन आणि कॉम्बिनेशन्स अगणित असल्यामुळे ऍक्युरेट भाकीत करणं तितकंच अवघड निश्चित होत जातं. आणि त्यामुळेच शक्यता वर्तवण्यात चुका घडल्यास त्या शास्त्रावरचा विश्वास कमी होत जातो.>> चूक काय होते ते मी सांगतो.
आपण फक्त नवग्रहान्चाच विचार करतो. ह्या विश्वात कोट्यावधी तारे आहेत त्यांचे कोट्यावधी ग्रह आहेत, ग्रहांचे उपग्रह आहेत, त्यांचा पण विचार करायला पाहिजे ना, हा कोणी करत नाही हाच खरा प्रॉबलेम आहे.
त्यामुळे हे दोन ग्रह अशा अशा
त्यामुळे हे दोन ग्रह अशा अशा स्थितीत असताना असं घडण्याची शक्यता असते , त्यामुळे इतके वेळा असे घडले आहे म्हणून परत घडण्याची शक्यता इतके परसेंट आहे हे निश्चित सांगता येईल. >> नाही. जसा नवा नवा डेटा मिळत जाईल तशी शकत्या (टक्केवारी) बदलत जाईल.
मी जर रस्त्यात गाय दिसली तर काय काय होऊ शकते असा शक्यता मांडल्या आणि मग प्रत्यक्षात गाय दिसली की त्यातील काय काय घडले याच्या नोंदी करून यावरून त्यांची टक्केवारी मांडली तर कदाचित काही शक्यतांची टक्केवारी जास्त मिळेलही. याला पण प्रेडिक्टिव्ह ऍनालिस्टिक्स म्हणायचे का?
तसे तर कुठलेही क्रायटेरिया घेऊन अशी भाकिते टक्केवारी सह देता येईल.
हे बरोबर आहे की आज एखाद्या गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीशी संबंध वाटत नाही, कदाचित उद्या सरळ नाही अप्रत्यक्ष रितीने संबंध आढळेल. पण तो सुद्धा ठराविक काळा पर्यंतच असेल नंतर नसणार असेही होऊ शकते. (यात Spurious correlations सुद्धा मोडतील. (एक उदा. Beer diapers)) पण याचा अर्थ कुठलेही पॅरामीटर्स घेऊन त्यावरून केलेली भाकिते (टक्केवारी) शास्त्रीय आहे, आज नाही तर उद्या काहीतरी correlation सापडेल असे मानायचे का?
मी आधीच्या पोस्ट मध्ये जे उदाहरण दिले आहे, अशी कितीतरी वेगवेगळी पॅरामिटर्स बघुन हिस्टॉरिकल डेटा बेस तयार करून काही मिनींगफुल परेडिक्शन्स (शक्यतेच्या चांगल्या टक्केवारीत) करता येतील, त्याला प्रेडिक्टिव्ह ऍनॅलिटिक्स म्हणता येईल.
रस्त्यात गाय दिसली आणि
रस्त्यात गाय दिसली आणि एखाद्याची गाडी नेमकी तेव्हाच बंद पडली हा निव्वळ योगायोग असू शकतो. पण जर म्हटले की अमक्या रस्त्यावर अमावास्येला गाय दिसली तर त्या दिवशी त्या रस्त्यावर असणाऱ्या सगळ्यांच्याच गाड्या बंद पडतील असे भाकीत केले, तर ते निव्वळ थोतांड आहे हे सहज कळेल. आणि वर त्याला शास्त्र हे गोंडस नाव दिले तर "बाप दाखव नाही तर श्राद्ध कर" असे मत येणारच ना.
कुठल्या टेकनिकचा कुठल्या
कुठल्या टेकनिकचा कुठल्या कामासाठी उपयोग करायचा हा तारतम्य ज्याच्या त्याच्याकडे असतेच ना.
या धाग्याच्या विवेचनातच या शास्त्राचा कशासाठी आणि कसा उपयोग केला जाऊ शकतो याबद्दलच चर्चा आहे असे म्हंटले आहे.
<< त्यामुळे ज्योतिष ढोबळपणे आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्या किंवा चांगल्या गोष्टी यांचं थोडंसं निदान आधीच करू शकत असेल तर त्या दृष्टीने त्या गोष्टी हाताळण्यासाठी त्याकडे बघण्या इतपत सामंजस्य जर माणसाने दाखवलं तर ते शास्त्र निश्चितच उपयोगी ठरेल.>>
"ढोबळपणाने" , "थोडसं निदान" वगैरे शब्दांची नोंद घ्यायला हवी !!
केशवकूल यांनी वर कोट्यावधी
केशवकूल यांनी वर कोट्यावधी तारे (आणि त्यांचे कोट्यावधी ग्रह ) असे म्हटले आहे.
१०० अब्ज तर आपल्या मिल्की वे ( Milky Way) मधेच आहे. आपली सुर्यमाला त्या १०० अब्ज मधील एक.
हे सर्व ग्रह म्हणजे काय आहे काय ?आपल्या सुर्यमालेतील, मंगळ ग्रह हा Fe ( Iron), Nickel (Ni), Sulpher (S) ने बनलेला आहे, तर गुरु हा हेलियम ( He ) आणि हायड्रोजन ( H2). निव्वळ निर्जीव दगड किंवा वायूचे महाकाय वजन असलेले गोळे आहेत , त्यांचे पृथ्वीवर असलेल्या मानवाच्या आयुष्यांत फरक का आणि कसा पडेल ?
दोन व्यक्तींवर केवळ त्यांची जन्मवेळ वेगळी आहे म्हणून एव्हढ्या लांब असणारा मंगळ ग्रह वेगळे परिणाम करतो किंवा डायरेक्ट लग्नातच विध्न आणायची शक्यता असते याला कुठलाही पुरावा नाही.
५.५ ते ४० कोटी किमी अंतरावर असलेला निर्जीव दगड असा दोन लोकांत टोकाचा दुजाभाव का करेल? कुठल्या तत्वाच्या आधारावर?
१. चंद्रासारख्या उपग्रहाच्या
१. सूर्य-चंद्रासारख्या ग्रह ताऱ्यांच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वीवरच्या एवढ्या प्रचंड महासागरांनाही भरती ओहोटी येते ..
२. गोष्टी दिसत नाहीत म्हणजे त्या अस्तित्वातच नाहीत हे म्हणणे बरोबर नाही . आपण ते पाहू शकत नाही इतकंच आपण म्हणू शकतो. उदाहरणा दाखल शास्त्राने हे सिद्ध करून दाखवले की प्रकाश किंवा ध्वनी या लहरींमार्फत प्रवास करतात. या लहरी मानवाच्या ज्ञानेंद्रियांना दिसू शकत नाहीत म्हणजे त्या अस्तित्वातच नाहीत असं नाही . गुरुत्वाकर्षण हे डोळ्यांना दिसत नाही म्हणजे अस्तित्वातच नाही असे नाही.
३. तद्वतच ज्योतिष शास्त्र हे मानवाच्या पंचंद्रियांना न दिसणाऱ्या भविष्याचा वेध घेण्यासाठीचा केलेला प्रयत्न आहे.
पशुपत ओके. लेट्स ऍग्री टु
पशुपत ओके. लेट्स ऍग्री टु डिसऍग्री असे म्हणुन मी थांबतो.
तुम्ही खरंतर लेखातच ज्यांचा विश्वास नाही त्यांनी प्रतिसाद देऊ नये हे सांगितलंय पण प्रकाश घाटपांडे यांच्या वरील शेवटल्या प्रतिसादामुळे मी इथे लिहिले. मी केलेल्या पोस्ट्सवरून जर मला उद्देशून कोणी काही उत्तराची अपेक्षा ठेवुन विचारलेच तर त्या मुद्यापुरते उत्तर देईन, अन्यथा वाचनमात्र.
मानव , चर्चा ही नेहमी
मानव , चर्चा ही नेहमी स्वागतार्हच आहे .
पण त्यामध्ये मुद्दे असावेत, ते समजावून सांगण्याचा, आपली भूमिका विशद करण्याचा प्रयत्न असावा.
<< चंद्रासारख्या उपग्रहाच्या
<< चंद्रासारख्या उपग्रहाच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वीवरच्या एवढ्या प्रचंड महासागरांनाही भरती ओहोटी येते ..>>
------ हे सर्व १०० % predict करता येते, तपासता येते. पुन्हा पुन्हा तपासून पहाता येते.
चंद्र पृथ्वीवरच्या सर्व पाण्यावर सारखाच ( proportional to mass / distance square ) परिणाम साधतो. तो काही प्रत्येक H2O रेणूची जन्म वेळ बघत नाही. पॅसिफिक , अटलांटिक असा काही भेदभावही नाही. उद्या अजून नवीन एखादा महासागर तयार झाला तरी परिणाम proportional to mass / distance square या तत्वाने/ न्यायानेच होणार.
<< २. गोष्टी दिसत नाहीत म्हणजे त्या अस्तित्वातच नाहीत हे म्हणणे बरोबर नाही . आपण ते पाहू शकत नाही इतकंच आपण म्हणू शकतो. उदाहरणा दाखल शास्त्राने हे सिद्ध करून दाखवले की प्रकाश किंवा ध्वनी या लहरींमार्फत प्रवास करतात. या लहरी मानवाच्या ज्ञानेंद्रियांना दिसू शकत नाहीत म्हणजे त्या अस्तित्वातच नाहीत असं नाही . गुरुत्वाकर्षण हे डोळ्यांना दिसत नाही म्हणजे अस्तित्वातच नाही असे नाही. >>
------ गोष्ट दिसत नाही तरी त्याचे अस्तित्व पडताळता येते हे लक्षात घ्या.
electron मानवी डोळ्यांनी दिसत नाही, पण त्याचे अस्तित्व सर्व जग बघते , ते तपासता येते. कुणालाही तपासता येते, पुन्हा पुन्हा तपासता येते. हज्जारो उदारहरणे देता येतील.
गुरुत्वाकर्षण डोळ्यांना दिसत नाही पण त्याचे अस्तित्व पृथ्वीवर कुठल्याही भागात मोजता येते. पुन्हा पुन्हा मोजता येते. परिणाम दिसतात.
तसे ज्योतिष बद्दल काहीच म्हणता येत नाही. दोन भिन्न गोष्टी आहेत. तुलना करता येणार नाही. एक शास्त्र आहे. दुसरे नाही.
<< ३. तद्वतच ज्योतिष शास्त्र हे मानवाच्या पंचंद्रियांना न दिसणाऱ्या भविष्याचा वेध घेण्यासाठीचा केलेला प्रयत्न आहे.>>
------- दुसरे काहीही म्हणा पण शास्त्र म्हणता येत नाही. शास्त्रामधे reproducibility, validity, proof लागतेच जे वर electron, किंवा गुरुत्वाकर्षणाच्या बाबतीत क्षणाक्षणाला दिसते.
Probabilistic Correlation आणि
Probabilistic Correlation आणि causal relationship यात फरक आहे. वरती मानव यांनी काहीसा हाच मुद्दा मांडला आहे. गणित ह्या दोन्हीत फरक करते. याशिवाय probabilistic prediction साठी किती मोठा sample size आहे, R value किती इत्यादी महत्त्वाचे विषय आहेत. माझ्या ओळखीत चार लोकांच्या बाबतीत correlation आढळलं म्हणून ते सरसकट सर्वांना लावता येत नाही. Sample set किती diverse आहे यावरून सामान्यीकरण करता येईल का हे ठरवावं लागतं.
गोष्ट दिसत नाही तरी त्याचे अस्तित्व पडताळता येते हे लक्षात घ्या >> हा पण उत्तम मुद्दा.
भरती आणि ओहोटी मुळे
भरती आणि ओहोटी मुळे सागरातल्या पाप्ण्याच्या विविध थेंबांचे भविष्य वेगवेगळेच असते की. काही थेंब नदीमध्ये परत फेकले जातात, काहींच्या प्राक्तनात बोटिंच्या प्राॅपेलरच्या चक्राचा सामना करणे लासेल.. तर काहींच्या नशीबात सुंदर शांत किनाऱ्यावर जाऊन ताडामाडाना न्हाऊ घालणे असेल.. ते तरी कुठे प्रेडिक्ट करता येते..
हेच सारे माडगूळकरांनी किती समर्पकपणे लिहिले आहे.
दोन उंडक्यांची होते सागरात भेट
एक लाट तोडी त्यांना पुन्हा नाही भेट..
आणि ज्योतिषाने सांगितलेल्या गोष्टीही खऱ्या ठरतात की ! ज्यामुळे त्याचे अस्तित्व निश्चित दृगोचर होते. मुद्दा तोच आहे की ते अचूकपणे जाणण्यासाठी खूप खोल अभ्यास हवा.
आणि हा मुद्दा बरोबरच आहे के यासंदर्भात डेटा कॅप्चर करून नीटपणे कंपाइल केला पाहिजे. जसजसा डेटा मोठा होईल तसतसे अधिक अचूक भविष्य जाणणे सोपे होईल
स्टॅटिस्टिक्स मध्ये
स्टॅटिस्टिक्स मध्ये प्रॉबॅबिलीटी आणि गेम थिअरी मध्ये क्लासिकल मॅथमॅटिक्स नसते. ते फक्त घडून गेलेल्या गोष्टींच्या माहितीच्या डेटावरच आणि लॉजिकल डिडक्शन वर अवलंबून असते.
आकाशातील अस्तित्वात असलेल्या
आकाशातील अस्तित्वात असलेल्या आणि आपल्या डोळ्याना दिसणार्या ग्रहतार्यांचा कसलाही परिणाम माणसावर होत नाही.
भारतात ज्योतिष विषय अभ्यासला गेला आणि त्याचे हेSS ढिगानी नियम लिहिले गेले ते साधारण दोन हजार वर्षांपुर्वी.
तेव्हा आजच्यासारखे प्रकाश व वायु प्रदुषण नसल्यामुळे आकाश स्पष्ट दिसत होते, भारतियांनी ग्रह-तारे फरक ओळखण्याइतपत प्रगती केली असावी. पहिली पत्रिका कोणीतरी कोणाचीतरी बनवली असणारच. तेव्हाच्या भारतीय कॅलेंडरप्रमाणे वेळ, तिथी लिहुन ठेवली असणार आणि हे आकाशाकडे पाहुन कंफर्म करताना इतर ग्रहांच्या स्थिती पण लिहुन ठेवल्या असणार. नंतर रिकामपणाचे उद्योग म्हणुन अभ्यास करताना अमुक ग्रहमान अमुक पत्रिकेत आले, त्या माणसाच्या आयुष्यात अमुक अमुक
घडले असे मांडुन अभ्यास केला असावा. अशा हजारो पत्रिका मांडुन त्यांचा त्या त्या माणसांच्या आयुष्यातील घटनांचा अभ्यास करुन निष्कर्ष काढुन नियम बनवले असणार. इथे ग्रह तारे प्लेस होल्डर सारखे वापरले गेले. प्रत्यक्ष ग्रह तारे काहीही परिणाम करत नाहीत.
मला या संदर्भात
..
असणार असणार.
असणार असणार.
>>कॉम्प्युटरच्या साहाय्याने
>>कॉम्प्युटरच्या साहाय्याने दहा पंधरा हजार वर्षांपूर्वी पर्यंत एखाद्या वेळी ग्रहांची काय स्थिती होती हे झटक्यात माहीत होणे आणि फलज्योतिष याचा काय संबंध? <<
अरेच्च्या, तुम्हिच वर लिहिलंय ना कि प्रिडिक्टिव अॅनलिटिक्स हिस्टॉरिकल डेटामधे पॅटर्न शोधुन निष्कर्श काढते, मग ज्योतिष पण तेच करते ना? एका विशिष्ट वेळी असलेल्या ग्रहांच्या स्थितीचा परिणाम काय होता, हा उपलब्ध डेटा एक्स्ट्रापलेट करुन अंदाज वर्तवणे हे दोन्हि (प्रिअॅ आणि ज्योतिष) करतात. मी वर लिहिल्या प्रमाणे ज्योतिषांकडे लिमिटेड डेटा असल्याने अंदाज बर्याचदा चूकु शकतो, पण पद्धत तीच. डेटा+अॅल्गरिथम रिफाइन केला कि अंदाज हि आपसुक बरोबर येतील..
हे समजायला इतकिहि कठिण नाहि. पण ते न समजुन घेण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे. बाय्दवे, एआय आणि अॅस्ट्रॉलजी यामधे साधर्म्य असल्याने चाललेलं संशोधनात्मक काम रोचक आहे.. लुक इट अप...
<< बाय्दवे, एआय आणि अ
<< बाय्दवे, एआय आणि अॅस्ट्रॉलजी यामधे साधर्म्य असल्याने चाललेलं संशोधनात्मक काम रोचक आहे..>>
राज याविषयी माहिती देणाऱ्या काही लिंक असतील तर द्या की
Astrology / ज्योतिषशास्त्र /
Astrology / ज्योतिषशास्त्र / फलज्योतिष वरती ह्या दोन लिंक्स इंटरेस्टिंग वाटल्या.
https://www.scientificamerican.com/article/is-astrology-real-heres-what-...
https://youtu.be/Dpk5QFt8h2w?si=gWRTgSK2v_QvWM-N
>>... माहिती देणाऱ्या काही
>>... माहिती देणाऱ्या काही लिंक असतील तर द्या की<<
भरपूर आहेत. एआय्+अॅस्ट्रॉलजी गुगल करा. अॅप्स देखील आहेत...
गुगल केले तर सगळ्या
गुगल केले तर सगळ्या ज्योतिषवाल्या साईट सापडल्या. त्या डिजिटली काही वर्षांपासून आहेतच. त्यामुळे ai काय करणार समजले नाही. आणि संशोधन सुद्धा सापडले नाही.
पृथ्वीवरच्या मानवी बाळाची
पृथ्वीवरच्या मानवी बाळाची जन्मवेळ, जन्मस्थळ आणि त्याच घटकेला मंगळ/ गुरु/ शनी या दगड / वायू युक्त गोळ्यांची स्थिती या डेटावरुन त्या मानवी जिवाचे पुढील सर्व भविष्य, आयुष्यातल्या घटना ठरत असतात त्यावर परिणाम करत असतात असे आहे का?
#अ जन्म भारतालतल्या एका लहान गावांत झाला. २८ वर्षानंतर ते मानवी शरिर कॅनडामधे रस्ता/ नदी ओलांडत असतांना अपघात झाला. व्यक्ती मृत पावली. आता त्या अपघाताला ग्रहांची स्थिती / जन्मवेळ ( काय होती , कशी होती) कारण ठरु शकते का? कुठल्या नियमाच्या आधारावर?
#ब जन्म झाल्यानंतर २५ वर्षांनी त्या व्यक्तीच्या वैवाहिक जिवनांत मंगळ दगड अडथळे/ विध्ने आणू शकतो का?
वरिल डेटा आणि परिणाम #अ, #ब यामधे काही संबंध ( co-relation ) आहे आणि त्या आधारावर काढलेले अनुमान, भविष्य काही प्रमाणांत सिद्ध झाले आहे असे असेल तर असलेला डेटासेट वाढल्यावर अनुमानातली अचूकता ( accuracy ) वाढवता येईल. जेव्हढा डेटासेट जास्त असेल तेव्हढी अचूकता वाढेल. काही correlation आहे आणि ते सिद्ध झाले आहे असे असेल तरच AI ने अचूकता वाढविण्यामधे नक्कीच मदत होईल.
असलेल्या डेटामधे पॅटर्न शोधून निष्कर्ष काढायला काही तरी पॅटर्न असायला हवा. आता co-relation चा कुठलाही पॅटर्न नसेल तर कितीही डेटाचा महापूर ओतला तरी AI तंत्रज्ञान निरुपयोगी आहे. अपुरा डेटा आहे अशी समस्याच नाही आहे.
माझा काहीही अभ्यास नाही आणि
माझा ज्योतिषाची अभ्यास नाही आणि त्यातलं विशेष काळातही नाही.
पण उदय तुम्ही, किंवा वरच्या काही posts मध्ये
Predictive analytics, kinva data sets hyancha उल्लेख केलाय. पण ते वेगळं आहे. त्यात असलेल्या डेटा च पद्धतशीर अभ्यास करून , त्यावर परिणाम करणारे घटक ( parameters) यांच्यातील संबंध काढून , पॅटर्न s ओळखून मग regression/ prediction kele जाते.
मी जे बघितलं त्यावरून, ज्योतिषामध्ये ते लोक डेटा सेट्स cha अभ्यास करत नाहीत.. म्हणजे ते आधीचा डेटा बघत नाहीत. किंवा पॅटर्न / regression ह्यातील काहीही नसते.
ते लोकं, पृथ्वीवरील स्थान, त्यावेळची वेळ आणि तुम्हाला ज्या काळातील माहिती हवी आहे त्या दरम्याने त्यावेळची ग्रह स्थिती ह्यावरून काय ते सांगतात.
ही पोस्ट टाकली कारण मला जाणवलं ( उगाच (?) )संख्याशास्त्राच्या संज्ञा इकडे वापरल्या जातायत.
मी मध्येच चुकीची पोस्ट टाकली असेल तर sorry.
>>कुठलाही पॅटर्न नसेल तर
>>कुठलाही पॅटर्न नसेल तर कितीही डेटाचा महापूर ओतला तरी AI तंत्रज्ञान निरुपयोगी आहे. अपुरा डेटा आहे अशी समस्याच नाही आहे.<<
उदयशेठ, क्लियरली एआय हा तुमचा प्रांत नाहि हे वरच्या कामेंट वरुन ध्वनीत होतंय; आणि मी ते समजु शकतो. हरकत नाहि. मूळात एआय मॉडेल डेवलप करायला डेटाचा महापूर लागतो हि मिस्कनसेप्शन आहे. बाय्दवे, मी जात्याच आळशी असल्याने कुठल्याहि लिंक्स वगैरे देण्याच्या भानगडित पडणार नाहि. पण तुम्हाला खरंच इच्छा असेल तर फिचर एंजिनियरिंग आणि कोड रिफॅक्टरिंग (इन एमएल काँटेक्स्ट) यावर सर्च करा..
यु कॅन थँक मी लेटर...
<< मी जे बघितलं त्यावरून,
<< मी जे बघितलं त्यावरून, ज्योतिषामध्ये ते लोक डेटा सेट्स cha अभ्यास करत नाहीत.. म्हणजे ते आधीचा डेटा बघत नाहीत. किंवा पॅटर्न / regression ह्यातील काहीही नसते.
------- छन्दिफन्दि - संख्याशास्त्राच्या संज्ञांचा माझ्याकडून वापर झाला, त्यांचा संबंध नसेल तर टाळतो.
डेटा सेट चा अभ्यास करत नाही, आधीचा डेटाही बघत नसतील या माहिती साठी धन्यवाद. पण केलेले अनुमान बरोबर आहे, का नाही हे पण कुणीतरी बघायला हवे ना? म्हणजे अभ्यासाचा सस्केस रेट किती आहे हे कळणे महत्वाचे आहे.
<< ते लोकं, पृथ्वीवरील स्थान, त्यावेळची वेळ आणि तुम्हाला ज्या काळातील माहिती हवी आहे त्या दरम्याने त्यावेळची ग्रह स्थिती ह्यावरून काय ते सांगतात.>>
------ या वरुन भविष्यात अपघात होणार हे आधीच सांगू शकतो? वर हेडरमधे पण त्या मुलाच्या अपघाता संदर्भातली घटना टाळण्यासाठीच्या उपाययोजनेचा उल्लेख आहे.
अपघातासाठी मंगळ, गुरु यांची स्थिती कारण असेल तर पृथ्वीवर केलेल्या उपाययोजनांनी त्यांची स्थिती बदलता येते का ? हा केलेला उपाय त्या गोलांना कसा कळतो?
अपघातासाठी मंगळ, गुरु यांची
अपघातासाठी मंगळ, गुरु यांची स्थिती कारण असेल तर पृथ्वीवर केलेल्या उपाययोजनांनी त्यांची स्थिती बदलता येते का ? हा केलेला उपाय त्या गोलांना कसा कळतो? >>>

अपघात म्हटलं की बऱ्याचदा एखाद्याचा निष्काळजी पणा जबाबदार असतो.
-- या वरुन भविष्यात अपघात होणार हे आधीच सांगू शकतो?>
मला पण माहित नाही.
या विषयात माहिती असणाऱ्या याचे उत्तर देता येईल. जसे धागाकर्ता...
***
. पण केलेले अनुमान बरोबर आहे, का नाही हे पण कुणीतरी बघायला हवे ना? म्हणजे अभ्यासाचा सस्केस रेट किती आहे हे कळणे महत्वाचे आहे.>>>
तुम्ही म्हणताय तसे काही इकडे होत नसावं .
म्हणजे एखाद्या ज्योतिषाने भाकित केले तर ते खरे की नाही हे तो जातक च भविष्यात त्याला आलेल्या अनुभवावरून ठरवू शकतो.
जर एखाद्या चे भाकित बरोबर येत असेल तर लोकं त्याला/ तिला उचलून धरत असावेत.
म्हणजे शास्त्र म्हटले की जे standardization/ rules/ proofs/ theorms असतात तसे काही इकडे ज्योतिषात नसते.
म्हणून त्याला pseudoscience म्हणत असावेत.
राज मला काय म्हणायचे आहे ते
राज मला काय म्हणायचे आहे ते परत एकदा मांडायचा प्रयत्न करतो.
लोकांच्या भविष्याची वेगवेगळी पभाकिते कशावरून आहेत? तर ते जेव्हा जन्मले त्यावेळी ग्रहांची स्थिती काय होती (ती, वेगवेगळी असते) यावरून.
आज अवकाशात पृथ्वीच्या सापेक्ष मंगळ कुठे आहे, शनी कुठे आहे वगैरे याचा परिणाम माझ्यावर वेगळा आणि तुमच्यावर वेगळा. हा कसा प्रेडिक्ट करणार आहेत? तर जन्मावेळी एका क्षणी ग्रहांची स्थिती काय होती यावरून.
म्हणजे इनपुट पॅरामीटर्स दोनच जन्मक्षण (यात तारीख + वेळ) आणि स्थळ.
फक्त या दोन पॅरामिटर्स वरून ९ ग्रहांची किंवा अजुन शेकडो ग्रह ताऱ्यांची स्थिती किंवा अजुन काहीही गणित मांडले आणि जन्मक्षणा पासुन ते आता त्यांची स्थिती काय आहे यासाठी एआय वापरा, जेम्स वेब ते अजुन कुठले टेलिस्कोप्स इतर कुठले रिसिव्हर्स डिटेकटर्स सेन्सर्स वापरा, त्यांच्या स्थितीची/परिस्थितीची ऍक्युरसी वाटेल तेवढी (९९.९९९९९९९९९९) वाढवा ऍट द एन्ड तुम्ही जन्मक्षण आणि स्थळ हे दोनच पॅरामिटर्स वापरून तुमचे आणि माझे वेगवेगळे प्रेडिक्शन्स करत आहात. यात आधुनिक टेक्निक्स, टूल्स वापरले केवळ यासाठी त्याला प्रेडिक्टिव्ह सायन्स म्हणायचे का? म्हटलेच तरी त्यातून मिनींगफुल काही निष्पन्न होण्याची शक्यता वाटते का?
या दोनच ऐवजी इनपुट पॅरॅमिटर्स वाढवले आणि ते केवळ एका जन्मक्षणाचे नव्हे तर पुढलेही घेऊन - ज्यांची मी वरच्या एक दोन पोस्ट मध्ये सुचली तशी काही उदाहरणे दिली आहेत - ज्यांच्यावरून प्रेडिक्शन्स साठी काही दिशा मिळेल तर हो, त्याला प्रेडिक्टिव्ह सायन्स म्हणता येईल.
तुम्ही म्हणताय त्यात जर असे अनेक इनपुट पॅरॅमिटर्स घेऊन विविध आधुनिक टेक्निक्स, टूल्स वापरुन काही करत असतील तर अर्थात गोष्ट वेगळी, ते प्रेडिक्टिव्ह सायन्स मध्ये मोडेल. आणि त्यालाही फलजोतिष हेच नाव द्यायचे असेल तर होय बुवा, तशा फलजोतिष्याला प्रेडिक्टिव्ह सायन्स म्हणता येईल. (पण त्यात जन्मक्षणाच्या ग्रह स्थितींचा काही रोल असेल असेल असे वाटत नाही.)
(पण त्यात जन्मक्षणाच्या ग्रह
.....
प्रतिसाद देणाऱ्यांसाठी परत एक
प्रतिसाद देणाऱ्यांसाठी परत एक आठवण!!
मूळ पोस्टमध्ये "ढोबळ मानाने" हा शब्द वापरलेला आहे .
किंवा "घडू शकणाऱ्या गोष्टींचा निदान" असे म्हटले आहे याची नोंद घ्यावी.
आणि एक लिहायचे राहून गेले होते म्हणजे तथाकथित हे जे शास्त्र आहे ते तयार करताना जे नियम बनवले ते कसे बनवले असतील तर ते गोळा केलेल्या डेटाचा तयार केलेल्या पत्रिकेशी संबंध लावत लावत तयार केले गेले असावेत अशा अंदाज आपण लावू शकतो.
आणखीन एक स्पष्टीकरण अगदी
आणखीन एक स्पष्टीकरण !
अगदी आत्ताच्या प्रसंगात नेमके काय घडेल किंवा आज रस्त्यावरून जाताना अपघात होईल का नाही; इतक्या बारकाव्यापर्यंत हे भविष्य किंवा शक्यता वर्तवणे मला तरी अपेक्षित नाही. पण अशी अशी ग्रह स्थिती असेल तर एखाद्या माणसाला आयुष्यात सहज यश मिळेल किंवा एखाद्या माणसाच्या सर्व कामात काहीतरी काहीतरी विघ्ने येत राहतील असे तयार केलेल्या पत्रिकेतील ग्रहांच्या स्थितीच्या अनुसार सांगता येत असावे .
उदाहरणा दाखल माझ्या मित्राचा जीवनात घडणाऱ्या गोष्टींचा दाखला देतो. त्याच्या पत्रिकेतील ग्रहस्थितीमुळे त्याला असे सांगितले होते की त्याच्या जीवनात विक्षिप्त गोष्टी घडत राहतील ; आणि त्याचे दोन अनुभव त्यांनी आम्हाला सांगितले. ते असे की युनिव्हर्सिटीची पदवी परीक्षेची गुणपत्रिका त्याला पूर्णपणे रिकामी पण खाली रजिस्टरची सही शिक्का असलेली मिळाली होती. तसेच एकदा मुंबईच्या लोकल प्रवासात गैरसमजाने जमावाने त्याला पाकीट मार म्हणून धक्काबुक्की केलेली होती. अशा गोष्टी कधीतरी लाखात एखाद्यावेळेस घडतात, पण त्या बरोबर त्याच्याच आयुष्यात त्याला अनुभवायला मिळतात आणि हे त्याच्या पत्रिकेतील ग्रह स्थानात उधृत होते.
माधव म्हणतात तो प्रश्न माझ्या
मानव म्हणतात तो प्रश्न माझ्या मनात फार पूर्वीपासून आहे की एकाच क्षणी पृथ्वीवर शेकडो व्यक्ती जन्माला येतात. मग त्यांचा अभ्यास करून त्यांच्या जीवनातील प्रसंगांमध्ये काही साधर्म्य आढळते का याचा वेध घेतला गेला पाहिजे. बऱ्याच वेळा असे दिसून येते की परस्परांना अतिशय समूळ छेद देणारी आयुष्य ही माणसे पुढे जगताना दिसतात. मग याची कारण मीमांसा फलज्योतिष कसे देते?
बराच वेळा मोठ्या आपत्तींमध्ये एकाच वेळेला शेकडो लोक मृत्युमुखी पडतात, ते वेगळ्या वेगळ्या वेळी जन्माला आलेले ~वेगळेवेगळ्या पार्श्वभूमीचे असतात. मग त्या सगळ्यांच्या जन्म पत्रिकेमध्ये असा योग आढळून येतो का?
या गोष्टींचा वेध घेण्यासाठी मोठा डेटा आणि ए आय सारखे टूल त्याचा सिंथेसिस किंवा अनालिसिस करण्यासाठी वापरून मिळणारे परिणाम फलज्योतिषाला स्पष्ट दिशा देऊ शकतील.ई
Pages