पुन्हा पुन्हा पाहिले जाणारे सिनेमे

Submitted by रघू आचार्य on 10 September, 2023 - 00:05

एकदा हॉस्टेल वर दोन मुलं रात्री उशिरा आली. सीनियर पोरांनी विचारलं उशीर का झाला?"
त्यातला एक जण म्हणाला "शोले बघायला गेलो होतो"
पुन्हा सीनीयरने विचारलं "का ?"
दुसरा मुलगा म्हणाला " अजून पाहिलेला नाही म्हणून गेलो होतो"

तर त्या सीनीयरने उठाबशा काढायला लावल्या.
म्हणाला " शोले किती वेळा पाहिला एव्हढंच सांगायचं होतं. अजून पाहिला नाही हे सांगायला लाज वाटत नाही का ?"

तात्पर्य शोले हा असा सिनेमा आहे कि कधीही बघा, कुठूनही बघा, त्यात गुंतून जातो आपण.

असे अन्य काही हिंदी, इंग्लीश, मराठी सिनेमे असतील तर लिहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कारवा((दलकर सलमान चा)
नाना पाटेकर चा तिरंगा
अंगुर
गोलमाल(अमोल पालेकर चा)
छोटी सी बात
टोटल धमाल
वेलकम(1)
गोलमाल रिटर्न्स
रंग दे बसंती
दृश्यम
Znmd
फिर भी दिल है हिंदुस्तानी
फिर हेराफेरी
बीन
बीन्स हॉलिडे
जॉनी इंग्लिश रिबोर्न

चक्क आता एकही नाही. हल्ली इतकं काही पहायला उपल्ब्ध आहे एकच सिनेमा पुन्हा पुन्हा पहावासा वाटायची मानसिकताच बदलली आहे. आहे ते एकदाही पहाणे होत नाही तर ४-४ दा कसे पहायला होणार असे मनातुन वाटते व बेत बदलतो. (अपवाद फक्त ‘मंक’).

वेलकम १ दर वेळी त्याच उत्सुकतेने पाहिला तरी हसू येतं..
चुपके चुपके जुना (जास्त)& नवा पण ३ दा पाहीलाय
जिंदगी ना मिलेगी दोबारा (फ्रेश अनुभव दर वेळी)

घो मला असला हवा>>> मृ छान नाव सुचवलंस. नाही पाहिलाय. कोण आहे यात?

Aashu29, राधिका आपटे मुख्य भुमिकेत... मस्त आहे हा सिनेमा.. 'शेतात उगवलेली सुरमई' ... झीफाईववर आहे..परवा परत बघितला..इथे लिहिल्यानंतर..

सत्ते पे सत्ता
Harishchandrahi ची फॅक्टरी ..
मस्त मूवी आहे...नंदू माधव चा सहज सुंदर अभिनय फार आवडतो.

मस्त धागा

English-
ज्युलिया Roberts चे जवळ जवळ सगळे,
Steve Martin che father if the bride १&२, pink panther १&२
Mrs doubtfire
Princess diaries १&२

हिंदी
सर्फरोश, दिलं चाहता है, जो जिता...
खोसला का घोसला,
भेजा फ्राय १&२
अमोल पालेकर चे बरेचसे .. गोलमाल, chotisi बात त्यातल्या त्यात जास्त
मिली
बॉम्बे तो गोवा (थोडा पार्ट)
Yes boss ( juhi Sathi)

Hindi serial

साराभाई vs साराभाई

मराठी

मातीच्या चुली
वाळू, देऊळ, पोश्टर boys, चोरीचा मामला, दुनियादारी
निशाणी डावा अंगठा
काही राजकारणावर चांगले चित्रपट आहेत..
वजीर, सरकार नामा, मुक्त, रीमा लागू , मोहन जोशी , मृणाल कुलकर्णी hot कोणता. आठवत नाही.

English :
National treasure
Hindi: bollywood hollywood

ह्या लिस्ट मध्ये "गुंडा " चे नाव अजून कसे आले नाही.
मी आणि बायको हा चित्रपट कधीही केव्हाही बघतो, विशेष म्हणजे जर मूड थोडा खराब असेल तर नक्की बघतोच

सोबतीला रिपीट होणारे चित्रपट म्हणजे
देऊळ
अशी हि बनवा बनवी
चक दे इंडिया (शाहरुख इस जस्ट अमेझिंग)
बाहुबली २ (पहिला बंडल आहे)
जब वी मेट (करीन आणि शाहिद दोघांनी भारी काम केलंय)
दृश्यम (पहिला)

गुंडात काय पकाऊ आहे? इतके चांगले संवाद, काव्यमय ओळखपरेड, उडणारे पलंग, सायकलीमागे लपून गोळीबार चुकवण्याची कसरत - सगळं अचंबित करणारं आहे.

गुंडा अतिशय पकाऊ चित्रपट आहे.. उगाच भारी भारी म्हणून पसरवले गेलेले फॅड आहे... नका बघू...
>>>>
मला देखील असेच वाटल्याने मी देखील पाहिला नाहीये आजवर. मायबोली वा अश्या मराठी संकेतस्थळांवरच हे गुंडा पुराण ऐकण्यात आलेय माझ्या. बाहेर माझ्या ईतर मित्रांना ओळखीच्या पाळखीच्यांना माहीत सुद्धा नाही हा पिक्चर..

रंग दे बसंती परत परत बघते.त्याच्या जॅबी कोए रिऍक्शन्स पण.माणूस हा सोशल प्राणी आहे.रिएक्शन देणारे जरा चांगले व्यक्त होणारे असले(जॅबी अचारा सिंटेल किंवा अवर स्टुपीड रिएक्शन चे रिक आणि कोर्बीन अण्णा,तर मग त्यांच्याबरोबर बसून पिक्चर पाहिल्या सारखं वाटतं.तरी रिक आणि कोर्बीन खूप काहीही कंटेंट बघतात.या दोन्ही चॅनल्स ना मी परत परत कारवा आणि चाची 420 रिऍक्शन द्या असं सांगत असते.)
चाची 420 पण कितीही वेळा बघू शकते.

गुंडांच्या संवादात गूढ अर्थ आहेत. एका संवादात तर अर्थव्यवस्थेवर भाष्य केले आहे. पण नासमझ लोकांनी त्याला अश्लील ठरवले.
असा कल्ट क्लासिक भारतात निर्माण झाला यामुळे एकच म्हणावेसे वाटते.

इस धरती पे जिसने जन्म लिया ये सोच
ये सोच के मै इतराता हूं...
भारत का रहने वाला हूं, भारत कि बात सुनाता हूं.

एक Sir म्हणून Netflix bar आहे. तो पण बऱ्याच वेळा बघितलाय. खूप छान आणि संयत काम केलंय.

मला देखील असेच वाटल्याने मी देखील पाहिला नाहीये आजवर. मायबोली वा अश्या मराठी संकेतस्थळांवरच हे गुंडा पुराण ऐकण्यात आलेय माझ्या. बाहेर माझ्या ईतर मित्रांना ओळखीच्या पाळखीच्यांना माहीत सुद्धा नाही हा पिक्चर..
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 20 September, 2023 - 09:31

>>>
मायबोली वा अश्या मराठी संकेतस्थळांवरच हे शाहरुख प्रेम खूप ऐकण्यात आलेय माझ्या. बाहेर माझ्या ईतर अनेक मित्रांना ओळखीच्या पाळखीच्यांना शाहरुख कोण हे माहीत सुद्धा नाही.. Wink

YENTL - अतिशय 'फील गुड' सिनेमा.
एका YENTL नामक ज्यू स्त्रीने युरोपात, पुरुषाचा वेश घेउन पूर्ण केलेले शिक्षण आणि आकाशात घेतलेली झेप. कारण युरोपमध्ये स्त्रियांना पुस्तके वाचण्यास बंदी होती. त्यांनी फक्त चित्रे असलेली पुस्तके पहावीत अशी अपेक्षा होती.
असा पुरुषी वेश घेतलेला असताना, ती कोणा पुरुषाच्या प्रेमात पडते. एकदा तर एक स्त्रीच , YENTL ला पुरुष समजल्याने YENTL च्या प्रेमात पडते.

नानाचा थोडासा रुमानी हो जाए..
खूप वेळा पाहिला आहे. अजूनही पाहू शकेन. नानाचे काव्यात्मक संवाद, नायेकेचेही काव्यात बोलणे हे एका तरलतेच्या पातळीवर घेऊन जाते.

पहिल्यांदा टीव्ही वर पाहिला तेव्हा समज नसल्याने कंटाळून बंद केला होता. नंतर 1956 चा रेनमेकर पाहिला. खराब प्रिंट असून आवडला. थोडासा... याच्यावरून घेतला आहे हे समजल्यावर पुन्हा पाहिला. आवडला.

नंतर लक्षात आलं कि पाऊस पाडायचा वादा सोडला तर बावर्ची, रोटी, खूबसूरत हे याच थीमशी साधर्म्य असलेले सिनेमे आहेत.

Pages