किरदूर्ग एक भय मालिका भाग १

Submitted by रुद्रदमन on 29 August, 2023 - 02:43
थरार कथा

सकाळी अचानक दारावरची बेल वाजली! 
यशवर्धन राजे ला आश्चर्य वाटले की एवढ्या 
सकाळी कोण भेटायला आले असेल. तो अनिच्छेनेच बऱ्याच वेळाने अंथरुणातून उठला आणि दार उघडल्यावर त्याला उभा असलेला पोस्टमन दृष्टिस पडला. यशवर्धनने  रजिस्टरवर सही केली आणि पत्र हातात घेतले. पोस्टमन ने जाताना रागाने बघितले.
यशवर्धन  पत्र घेऊन पलंगावर बसला 
आणि शिक्क्यावरील गावाचे नाव वाचले, त्याच्या मनात आठवणींचा पूर आला. ते पत्र किरदुर्ग गावातील त्याचा मित्र सुधाकर चे होते आणि नाव वाचल्यावर कॉलेज चे दिवस आणि आज पर्यंतचा भूतकाळ त्याच्या नजरे समोर उभा राहिला.
यशवर्धन राजे हा फ्रीलान्स रिपोर्टर होता, उंच 
आणि देखणा होता, त्याच्या दैनंदिन 
कामकाजामधून वेळ काढून आहारनियंत्रण आणि व्यायामामुळे शरीर सुसज्ज  ठेवले होते. पहिल्या दृष्टीक्षेपात, कोणालाही वाटेल की तो एक मॉडेल असवा. त्याचे आई-वडील
गावात राहत असत. मात्र यशवर्धन कामानिमित्त 
शहरात एकटाच राहत असे, अध्यात्मिक कुटुंबात वाढलेल्या यशवर्धनला लहानपणापासूनच 
आध्यात्मिक पुस्तके वाचण्याची आवड निर्माण झाली. त्याने लहानपणी अनेक धार्मिक ग्रंथ वाचले आणि समजून घेतले आणि जसजसे तो मोठा होत गेला, तसतसे त्याचे विचार अधिकच गहन होत गेले. त्याचा देवावर 
ठाम विश्वास होता आणि या पृथ्वीवर देव जर अस्तित्त्वात आहेततर भूतही असायला हवेत. यामुळे त्याने त्याचाही मागोवा घ्यायचे ठरवले, त्या साठी त्याने सर्व ईच्छा शक्ती पणाला लावली, बरेचसे ग्रंथ अभ्यासल्या नंतर , अखेरीस  त्याने काही अघोरी साधूंची भेट घेतली. बराच काळ त्याने अघोरींच्या सहवासात घातला. त्यातीलच एका साधूने  त्याला आपले 
शिष्य करून घेतले आणि काळ्या शक्तींचा सामना करण्याचे अनेक मार्ग 
शिकवले. मोठी मोठी जंगले, डोंगर आणि त्यांच्या चालणाऱ्या यात बरेच दिवस निघून गेले. त्याचे स्वच्छंदी मन त्याला आता शहराकडे ओढत होते.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर थोडे दिवस त्यांची सेवा करून ,  यशवर्धन शहरात आला. अगोदर मिळवलेल्या जर्नालिझम च्या डिग्री मुळे त्याला एका वृत्तपत्रात काम मिळाले. मात्र, त्यांच्या उत्स्फूर्त स्वभावामुळे तो जास्त काळ नोकरीत राहू शकला नाही आणि खाजगी रिपोर्टर म्हणून काम करू लागला. त्याच्या कामाबरोबरच, त्याने आपले अध्यात्मिक कार्य देखील चालू ठेवले, 
जिथेजिथे काळ्या शक्तीचे अस्तित्व आहे 
त्याविरुद्ध लढा दिला. त्याने कधीही कोणत्या कामाचा मोबदला मागितला नाही. कारण त्याच्यासाठी पैसा हा कधीही महत्त्वाचा नव्हता, कारण न मागता त्याला भरपूर संपत्ती मिळत होती आणि उदारतेने ती सामाजिक कारणांसाठी दान करत होता . 
यश त्याच्या विचारातून बाहेर पडला त्याने सुधाकरचे पत्र 
उघडले. अनेक वर्षांनी आलेले सुधाकरचे पत्र पाहून यशवर्धनच्या मनात आश्चर्य आणि आनंद या  दुहेरी भावना भरून आल्या.
पत्रात गावाविषयी चिंता व्यक्त करत सुधाकरने त्याला गावी बोलावले असते.
जिथे गेल्या काही वर्षांपासून विचित्र घटना घडत आहेत. काही लोक बेपत्ता झाले आहेत, तर काहीना वेड लागलेले आहे , ते वेडे रात्री गावात भटकत असतात आणि दिवसा किरदुर्ग डोंगराच्या दाट 
झाडीत गायब होत आहेत. पत्रात बाकी काही जुन्या आठवणी आणि काळजीचा मजकूर होता.
यश ने पत्र वाचून झाल्यावर घडी करून बेडवर ठेवले. किचन मध्ये जाऊन कॉफी करून घेऊन, गावाविषयी विचार करत कॉपी पिऊ लागला.

किरदूर्ग
डोंगराच्या नावावर असलेले किरदुर्ग गाव, घनदाट जंगलाच्या किरदुर्ग डोंगराच्या पायथ्याशी वसलेले होते, जवळच वाहणारी तुपा गंगा, निसर्गाची अनमोल देणगी.चार पाच हजार लोकवस्ती असेल गावाची! अश्या या निसर्गसंपन्न गावाच्या वातावरनात अचानक बदल झाला होता! काय असेल बदल? म्हणजे नक्की काय चालू आहे तिथे?
तिथे गेल्याशिवाय या गोष्टींचा उलगडा यश ला होणार नव्हता.
तसे ही सध्या त्याला रोजचे
त्याच त्याच रिपोर्टिंग मुळे बोअर व्हायला झाले होते. आयुष्यात काही तरी बदल म्हणून,
कॉफी संपे पर्यंत त्याने किरदूर्ग ला जायचे ठरवून टाकले.
खाजगी रिपोर्टर असल्यामुळे त्याला इतर कोणाची परवानगी घ्यायची गरज नव्हती , त्या पूर्ण दिवसात त्याची सर्व कामे त्याने आवरून घेतलीत, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी थोडे फार जुजबी सामान, कॅमेरा, आणि त्याची लायसन असलेली गन घेऊन यशवर्धन निघाला.
त्याने गुगल मॅप वर गावाचे नाव टाकले! गाव साधारण सहाशे किलोमीटर दूर होते. मनोमन सुखावला,  ड्रायव्हिंग हा त्याचा आवडता छंद, तो पूर्ण करण्यासाठी अनेकदा असाच एकटा कुठेही दूर निघून जाणे त्याच्या साठी नवीन नव्हते , आणि आज तर त्याच्या कडे कारण होते.
त्याला शहरामधून बाहेर पडायला बारा वाजलेत.
मुख्य हायवे ला लागल्यानंतर कुठे त्याला जरा बरे वाटले. पावसाळ्याचे दिवस होते, काळे ढग भरून आले होते, पण पाऊस सुरू नव्हता. रस्ता बऱ्यापैकी मोकळा असल्या मुळे आणि वातावरणात सुखद गारवा होता , त्याने गाडीचा स्पीड वाढविला. यंदा पाऊस वेळेवर आणि चांगला असल्यामुळे, आजूबाजूला हिरवीगार झालेली माळराणे, डोंगर बघून आज त्याला एक वेगळाच उत्साह जाणवत होता.
साधारण दुपार नंतर 4 वाजता, ऊन उताराला लागले होते, त्याला भुकेची जाणीव झाली. त्याने हायवे शेजारील एका हॉटेल मध्ये जेवण उरकले. तो पर्यंत त्याने तीनशे
किलोमीटर चा रस्ता पूर्ण केला होता.
थोड्या वेळात तो पुढील प्रवासाला निघाला.
वातावरण खूपच आल्हाददायक होते, संध्याकाळी सात वाजत आले होते, अंधार पडायला लागला होता, सूर्यनारायण तर केव्हाच लुप्त झाले होते. अजून ही पन्नास किलोमीटर दाखवत होते.
त्याने अंग मोकळे करण्यासाठी गाडी बाजूला घेतली. गरजेचा विधी पूर्ण करून, चेहेऱ्यावर पाणी मारले.तो पर्यंत पूर्ण अंधार पसरायला लागला होता. मनात अचानक एक चलबिचल व्हायला लागली. तो ड्रायव्हिंग सीट वर बसला आणि डोळे बंद करून घेतले, त्याने त्याच्या गुरूने दिलेले लॉकेट हातात पकडले, जे कायम त्याचा गळ्यात असत असे ! गुरुचे नामस्मरण केल्यावर त्याच्या मनावरील मळभ पूर्ण दूर झाले. आणि परत एकदा गाडी सुरू करून पुढे जायला सुरुवात केली. सर्वत्र भयाण काळोख पसरलेला असतो.
किर्र अंधाराला वेगाने कापत दोन प्रखर झोत पुढे जात असतात, त्यात यशवर्धन राजे बसलेला असतो , सफाईने रस्त्यावर तुरळक असलेले खड्डे चुकवत त्याचा प्रवास चालु होता.
त्याला नव्हते माहीत की तो एका मोठ्या संकटा कडे चालला आहे...
एक असा प्रवास जो एक विलक्षण रहस्याचा भेद करणार आहे...
काय असेल किरदूर्ग वर घोंघावणारे संकट?
एखादी अदृश्य शक्ती की अजून काही?
क्रमश:

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरुवात आहे , दिर्घ कथा आहे , शक्यतो माझ्या बाजूने परिपूर्ण लिहिण्याचा प्रयत्न करेल. , पहिलीच कथा आहे माझी, कृपया काही त्रुटी आढळल्यास मार्गदर्शन करावे

पहिलीच कथा आहे माझी, कृपया काही त्रुटी आढळल्यास मार्गदर्शन करावे >>> हे मनापासून असावे अशी अपेक्षा !
लिखाणात कधी भूतकाळ तर कधी चालू / अपूर्ण भूतकाळ ( नेमके काय म्हणतात ?) वापरला आहे. अशाने वाचकांचा रसभंग होतो. शक्यतो पोस्ट करण्याआधी शुद्धलिखाण, व्याकरण हे एक दोनदा (किमान) तपासून घ्यावे. मायबोलीकर पहिल्या लिखाणाला नक्कीच सपोर्ट करतात. तुम्ही मार्गदर्शन मागितले तर मायबोलीकर नक्कीच हात पुढे करतील.

शुभेच्छा !

नक्कीच मि यावर काम करतो, सर या मद्धे कशा प्रकारे मि बदल करायला हवा, म्हणजे एकदा वाचून , तुम्ही यातील चुका निदर्शनास आनुन द्यावे, म्हणजे त्या सुधारुन , पुढील भाग लिहिता येईल

मी सुद्धा दोनच दिवसांपूर्वी माझी पहिलीच कथा मालिका
' सूत्रधार ' चे तीन भाग मायबोलीवर पोस्ट केले,आणि मायबोलीकरांकडून मस्त रसरशीत प्रतिसादसुद्धा आले.काहींनी अगदी हक्काने माझ्या चूका ही समजाऊन सांगितल्या. त्यामूळे मायबोलीकर नवीन लेखकांना प्रोत्साहन देतात यात काहीच वाद नाही. पुन्हा एकदा धन्यवाद मायबोलीकर.(आता फक्त इतकं छान लिहिणाऱ्या लेखाकांसमोर लिहिण्याचं दडपण वाटतं. इतकंच.)

@रुद्रदमण, @विवेक नरुटे
तुम्ही सुरूवात छान केली आहे, मायबोलीकरांचा सकारात्मक प्रतिसाद तुम्हाला मिळाला आहे. तुमच्या कडून छान (आणि पूर्ण) कथा पुढे मिळत राहतील ही अपेक्षा आहे.
एक सुचवू इच्छितो..
इथे जसे सकारात्मक प्रतिसाद देणारे आहेत तसेच काही नवीन लेखकांना उगाचच उकसवणारे आहेत. कृपया कुठलीही टीका फार मनावर घेऊ नका, सल्ला योग्य असेल तर तशा सुधारणा करा. टिकांना प्रतिउत्तर देऊन, वाद वाढवून आपली शक्ती आणि वेळ वाया घावण्यापेक्षा तुमच्या कथेवर लक्ष केंद्रित ठेवा.

<<सर्वत्र भयाण काळोख पसरलेला असतो.
किर्र अंधाराला वेगाने कापत दोन प्रखर झोत पुढे जात असतात, त्यात यशवर्धन राजे बसलेला असतो , >>>

सर्वत्र भयाण काळोख पसरलेला होता.
किर्र अंधाराला वेगाने कापत दोन प्रखर झोत पुढे जात होते, त्यात यशवर्धन राजे बसलेला होता ,

चांगली सुरवात.. लिहीत रहा...

सुधारणा तर केली पण मनात भीती होती , की कोणाला आवडते की नाही, तरी ही अजून मनाला भेदेल असे लिखाण नाही जाणवले मला स्वतःला, पण असो सुरुवात आहे , तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शना मध्ये नक्कीच काही दिवसात प्रगती होईल... आल्यात त्या कमेंट बघून आता कुठे हायसे वाटले सर्वांचे मनापासून धन्यवाद

>>>> तरी ही अजून मनाला भेदेल असे लिखाण नाही जाणवले मला स्वतःला>>>>
हे एका चांगल्या लेखकांचं लक्षण आहे.
सुरुवात छान झाली आहे, तुम्हाला स्वतःला ह्यात काही कमी आहे हे जाणवत, म्हणजे पुढचे भाग अजून उत्तम होतील.

थोड स्पष्ट सांगायचं तर व्यक्ती आणि प्रसंग डोळ्यासमोर उभे राहत नव्हते पण शेवट
<<सर्वत्र भयाण काळोख पसरलेला असतो.
किर्र अंधाराला वेगाने कापत दोन प्रखर झोत पुढे जात असतात, त्यात यशवर्धन राजे बसलेला असतो , >>>
हा मात्र परिणाम कारक आणि उत्कंठावर्धक वाटला

टीप - पुन्हा थोड कथेच्या काळा (वर्तमान/भूतकाळ) कडे लक्ष असू द्या
कुठेतरी @आबा, @अश्र्विनिमामी ह्या युजर ने लेखनात सुधारणा होण्यासाठी नवीन लेखकांना मदत दिली होती त्यांच्याशी संपर्क करून बघा.

सर्वात महत्वाचं --- नकारात्मक आणि उकसवणाऱ्या टिकांकडे दुर्लक्ष करा

@अज्ञानी
दादा मी आहे शेतकरी। कॉलेज संपून 15 वर्ष झालीत, सहज एक विरंगुळा म्हणून मनातले विचार मांडतो आहे।

मी पण शक्यतो समजतील त्या सर्व चुका सुधारून परत पोस्ट करणार आहे,

Submitted by रुद्रदमण on 29 August

मला हे खरे वाटले म्हणून फक्त सुचवले. बाकी आपकी मर्जी !
लवकर २रा /पुढले भाग येऊ दे

@अज्ञानी भावा नक्कीच । प्रयत्न तर करतोच । बाकी खेड्यात राहिल्या मुळे आमचा सर्व भर गूगल मराठी टायपिंग वर, असो आपण चूक दाखवली त्या बद्दल धन्यवाद, पुढे पण असेच सहकार्य करा

आधीच्या कथेपेक्षा उत्तम लिहिण्याचा प्रयत्न सुरेखपणे यशस्वी झालाय.पुढील लेखनासाठी मनापासून शुभेच्छा.
पुढील भागांची आतुरतेने प्रतिक्षा.