Submitted by धाग्या on 11 August, 2023 - 09:42
कधीकधी आपण एखादा व्यावसायिक दृष्ट्या फ्लॉप झालेला चित्रपट पाहतो आणि वाटतं, अरेच्चा इतका फ्लॉप होण्याईतकं काय वाईट होतं या पिक्चरमध्ये? चांगलाच होता की!
अशा चित्रपटांबद्दल इथे लिहा.
मला दिल से ठीक वाटला होता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मेरा नाम जोकर
मेरा नाम जोकर
मनोज कुमारचा रोल मस्त आहे. बालपणीचा अंक/ प्रवेशांक सुंदर !!!
https://www.youtube.com/watch?v=iFlRbk-GQmQ
रॉकेट्सिंग आवडला होता असे
रॉकेट्सिंग आवडला होता असे अंधुक आठवते. पीकू अर्धाच पाहिला आहे.
मेरा नाम जोकर, कागज के फूल व
मेरा नाम जोकर, कागज के फूल व शान हे प्रचंड गाजलेले फ्लॉप्स आहेत. यांच्या न चालण्याबद्दल खूप चर्चा व्हायची.
यातील शान अजूनही बघणेबल आहे. विशेषतः त्यातील अमिताभ.
१९८३ मधे अमिताभचे २-३ पिक्चर्स चालले नाहीत (नास्तिक, पुकार, महान) व त्याच वेळेस जितेंद्रचे काही चालले होते. आणि त्याचे सुपरस्टारपद गेल्यापासून कायमच राजेश खन्ना कमबॅक करणार अशा चर्चा होत. मग साधारण १९८४ मधे अमिताभचा "इन्किलाब", जितेंद्रचा "यह देश" व राजेश खन्नाचा "आज का एमएलए रामअवतार" असे तीन चित्रपट - तिन्ही राजकीय विषयांवर येणार, व जो जास्त चालेल तो सध्याचा टॉपचा अशी ही चर्चा फॅन्स मधे होत असे.
प्रत्यक्षात तिन्ही पडले
अरे हो की! पिकू मस्त होता.
अरे हो की! पिकू मस्त होता. आवडला होता खूप.
पिकू हिट होता राव. रॉकेट सिंग
पिकू हिट होता राव. रॉकेट सिंग पण above average होता.
रॉकेट सिंग मस्त होता.
रॉकेट सिंग मस्त होता.
पण बॉक्स ऑफिस वर धमाका करेल अशी केटेगरी नव्हती.
हसी तो फसी मस्त आहे.
हसी तो फसी मस्त आहे.
बल्फमास्टर अभिषेक बच्चन आणि
बल्फमास्टर अभिषेक बच्चन आणि रितेश देशमुख
९२११
हे वेगळेच पिक्चर होते.
ब्लफमास्टर मस्त आहे
ब्लफमास्टर मस्त आहे
जहरीला इन्सान १९७४: एक
जहरीला इन्सान १९७४: एक इन्टरेस्टिंग सिनेमा होता. ऋषी कपूर चे नेहमीचे साचेबद्ध काम नाही. हिरोला निगेटिव्ह दाखवला आहे.
दाक्षिणात्य सिनेमावर आधारित शोकांतिका म्हणता येईल.
हाही फ्लॉप.
जहरीला इन्सान १९७४: एक
जहरीला इन्सान १९७४: एक इन्टरेस्टिंग सिनेमा होता.
>>>
ओ हंसीनी फार आवडीचे गाणे
ब्लफमास्टर फ्लॉप होता का.. ?
ब्लफमास्टर फ्लॉप होता का.. ?
पिक्चर सुद्धा हटके आणि
गाणीही हटके होती त्यात
गुलाल (पीयूष मिश्राचा)
गुलाल (पीयूष मिश्राचा)
ब्लफमास्टर फ्लॉप होता का.. ?
ब्लफमास्टर फ्लॉप होता का.. ? माहित नाही असावा.
पिक्चर सुद्धा हटके आणि
गाणीही हटके होती त्यात >>>>>>>> अगदी अगदी
खोज - ऋषी कपूर, किमी काटकर
खोज - ऋषी कपूर, किमी काटकर आणि danee चा...ऋषी कपूर नी काय काम केलंय त्यात... जबरदस्त..
रात- मस्त horror मुवी
रात निव्वळ अप्रतिम होता.
रात निव्वळ अप्रतिम होता. फारसे बिभत्स काही न दाखवता नुसता डोळ्यांनी थरार मांडते रेवती & दिग्दर्शक.
aankhein अमिताभचा.
aankhein अमिताभचा.
द्रोहकाल: गोविंद निहलानी
द्रोहकाल: गोविंद निहलानी दिग्दर्शित classic सिनेमा. आशिष विद्यार्थिचा मला वाटत पहिला चित्रपट. अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतके प्रेक्षक होते
सारांश: ditto... बांद्रा टॉकीजमध्ये शेवटच्या रांगेत जेमतेम प्रेक्षक होते. तो tv वर लागला तेंव्हा जास्त लोकांनी पाहिला आणि मग तो गाजला.
मुक्ता: मराठी चित्रपट. चित्रा सिनेमाच्या बाल्कनीत फक्त आम्ही ४ जण होतो.
सामना: माझा सर्वात आवडत्या सिनेमापैकी एक. शालिनीताई पाटीलने सिनेमा विरोधी बोंबाबोंब केल्यामुळे तो लक्षात आला. अनेकदा पाहिला आणि दरवेळी अगदी थोडेसेच लोक असायाचे. बहुतेक ACत झोपायला यायचे. एकदा मागे बसलेला एव्हढा शिव्या घालत होता ... "साली कितनी देर ये documentary चाल रही है| खत्मही नही हो रही है" कारण..... त्याला वाटले सामना म्हणजे एखादा जीतूभाईचा सिनेमा असेल
पहिल्याच आठवडय़ात माचिस पाहिला तेंव्हाही थोडेसेच प्रेक्षक होते. तो नंतर mouth publicity मुळे चालला.
सामना विषयी ची माहिती रोचक.
सामना विषयी ची माहिती रोचक. मनामध्ये विशेष स्थान असलेले जे मोजके चित्रपट आहेत त्यात सामना फार वरती आहे. माझ्या जन्माच्याही आधी येऊन गेल्याने थिएटरमध्ये पाहता येण्याची शक्यताच नव्हती. पण अलका थिएटर च्या कृपेने एकदा तो योग आला. थिएटरमध्ये पाहणे हा माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव. डॉ. लागूंचे "समस्त व्याघ्रमंडळी सुखी असोत" वाक्य, किंवा निळू फुलेंचे "महादू... अरे ती कुत्री का भुंकाय लागल्यात बघ जरा" असा सूचक संवाद
आहा! चित्रपटातली वातावरण निर्मिती काही प्रसंगातली केवळ अप्रतिम. पाहताना त्या वातावरणात विरघळलो. हा चित्रपट फ्लॉप होता यावर विश्वास बसत नाही.
>> "साली कितनी देर ये documentary चाल रही है| खत्मही नही हो रही है"
शक्य आहे तसे वाटणे. बिचारा चुकीच्या अपेक्षा ठेऊन आला असेल.
कार्तिक कॉलिंग कार्तिक
कार्तिक कॉलिंग कार्तिक
लक बाय चान्स
लज्जा
म्रुत्युदंड
चाय्ना गेट
सोचा ना था
समय
१६ डिसेंबर
पुणे ५२
पुणे ५२
सोचा ना था
सोचा ना था
१६ डिसेंबर
एन एच १७
हे ही चांगले होते
हायवे - आलिया भट्टचे काम पहिल्यांदाच पाहीले व आवडले. ये लांबी रेस कि घोडी है असे वाटले. सिनेमॅटोग्राफी मस्त आहे.
सामना - वेगळच जॉनर आहे.
सामना - वेगळच जॉनर आहे. आवडता सिनेमा आहे.
Kapoor and sons पाहिला
Kapoor and sons पाहिला
छान आहे
आधीच बघायला हवा होता.
टाळत होतो इतके दिवस.
कारण तेव्हा तो हिरो आवडायचा नाही. आता आवडतो.
सामना हा फ्लॉप सिनेमा असेल
सामना हा फ्लॉप सिनेमा असेल अशी कल्पनाही सहन होत नाही. पण शक्य आहे. काळापांढऱ्या रंगात, नेहमीचा फॉर्म्युला मराठी सिनेमा नाही. तमाशा लावणी केंद्रस्थानी नाही. विनोद सहजासहजी न कळणारा.
निळू फुले आणि श्रीराम लागू ह्या दोन दिग्गज नटांची अशी जबरदस्त जुगलबंदी होती की तो सिनेमा मी कितीही वेळा पाहू शकतो. खरे तर ह्या दोघांचाच सिनेमा आहे.
मला हा सिंहासनपेक्षा जास्त उजवा वाटतो.
कार्तिक कॉलिंग कार्तिक
कार्तिक कॉलिंग कार्तिक
लक बाय चान्स.... yesss. दोन्हीही भावंडांचे सिनेमा चांगले असतात. BOLLYWOOD CALLING ( अजून एक नंबर appreciate झालेला सिनेमा) प्रमाणे "आल emotions" वाले नसतात. गरज असलीच तरच शादी का गाना किंवा पंजाबी so called rap songs असतातच.
माझ्या top 10 मध्ये एक नंबरवर सायना and next सिंहासन आहे. जब्बारचे सगळेच चित्रपट छान आहेत. जुन्या "श्री दीपलक्ष्मी" दिवाळी अंकात निळूभाऊंची मुलाखत होती. तेंडुलकर पटकथा इंग्लिशमध्ये लिहीत. त्यातच सामना मधील हिंदुरावचे रांगड्या भाषेतले बेरकी संवाद त्यांना जे अपेक्षित होते ते कागदावर उतरत नव्हते. शेवटी मग तेंडुलकर निळूभाऊंना त्यांना काय हवे ते सांगत आणि निळू फुले त्यांच्या पद्धतीने म्हणत आणि मग improvise केले.
त्याच मुलाखतीत त्यांना विचारले की दिलीपकुमार,अमिताभ वगैरे बरोबर तुम्ही काम केले; तर तुमच्या दृष्टीने सगळ्यात मोठा actor कोण? उत्तर: डाॅ. लागू. ते पुढे म्हणाले की सामानाच्या वेळेस मी आणि जब्बार त्यावेळी नवीनच होतो. डॉ पिंजरा, नटसम्राट गाजवून आले होते. पण पूर्ण चित्रपटाचे shooting जस जब्बार सांगायचा त्याप्रमाणे डॉक्टर करत. कधीही त्यांनी शॉट बदलाला नाही की camera angle change केला नाही.
अवांतर झाल्याबद्दल क्षमस्व. काय करणार, सामना हा लाडका विषय आहे.
सामना हा फारच चांगला चित्रपट
सामना हा फारच चांगला चित्रपट आहे. तो फ्लॉप झाला होता हे ऐकून आश्चर्य वाटलं.
जजमेंटल है क्या
जजमेंटल है क्या
कंगना राजकुमार राव जिमी शेरगिल चा सिनेमा बरा होता पण बहुतेक फ्लॉप झाला होता
Pages