Submitted by धाग्या on 11 August, 2023 - 09:42
कधीकधी आपण एखादा व्यावसायिक दृष्ट्या फ्लॉप झालेला चित्रपट पाहतो आणि वाटतं, अरेच्चा इतका फ्लॉप होण्याईतकं काय वाईट होतं या पिक्चरमध्ये? चांगलाच होता की!
अशा चित्रपटांबद्दल इथे लिहा.
मला दिल से ठीक वाटला होता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुर्यवंशम आणि सूर्यवंशी चं
सुर्यवंशम आणि सूर्यवंशी चं नाव लोकं का घेइनात???
टेबल नंबर 21>>> मला पण
टेबल नंबर 21>>> मला पण आवडलेला.
हम अजुबा
हम
अजुबा
स्वदेश.
स्वदेश.
फ्रेम बाय फ्रेम, पण कमी वेळेत. ईथे शाहरुख ऐवजी खुद्द आशुतोष गोवारीकर आहे.
https://youtu.be/42qHcF39Kak
>>>>
अरे हे खतरनाक आहे.. सेम टू सेम
तुंबाड, स्वेड्स (Swades), भूत
हो, तो आशुतोष गोवारीकरचा पाहिला आहे. त्यात तो कर्नाटकात असल्यामुळे कावेरी अम्मा सूट होते. शाहरुखच्या उत्तर भारतीय गावात कावेरी अम्माचा accent खटकतो. ती कावेरी अम्मा तीच घेतली आहे, वेगळी चालली असती.
माझे काही आवडते फ्लॉप -
तुंबाड, स्वेड्स (Swades), भूत (rgv), yz (मराठी)
अरे हे तर गोल्ड आहे...
अरे हे तर गोल्ड आहे...
छपाक, दिल्ली बेली, हायवे (हिट
छपाक, दिल्ली बेली, हायवे (हिट का फ्लॉप नक्की माहित नाही), लुडो (?)
येस्स... दिल्ली बेली ! भारी
येस्स... दिल्ली बेली ! भारी आहे हा.
गुलाबो सिताबो - लॉकडाऊनदरम्यान प्राइमवर आला होता.
डॉन-2 हिट की फ्लॉप माहीत नाही
डॉन-2 हिट की फ्लॉप माहीत नाही. पण आज आता पाहिला. आणि आवडला.
आजवर उगाच आपल्याला आवडणार नाही असा विचार करून बघितला नव्हता.
अमिताभच्या डॉनशी याचा काहीही संबंध नसल्याने एका स्वतंत्र चित्रपट म्हणून बघता आला. शाहरूखची ॲक्शन आणि स्टाईल दोन्ही झकास.. पीसी सोबत केमिस्ट्री सुद्धा मस्त.. आणि कथेचा प्लॉट सुद्धा आवडला.
पाताल भैरवी सारखा विनोदी
पाताल भैरवी सारखा विनोदी चित्रपट होणे नाही.
काही जुने फ्लॉप पण मला
काही जुने फ्लॉप पण मला आवडलेले
गद्दार (१९७३) : नेहमीपेक्षा वेगळी स्टोरी. हाइस्ट जातकुळीतला (एक टोळी योजना आखून एक मोठा दरोडा घालते वगैरे). नेहमीच्या फॉर्म्युल्याप्रमाणे हीरो आणि खलनायक अशी ढोबळ विभागणी नाही. मधल्या अनेक छटा आहेत. एक खटकणारी गोष्ट म्हणजे द गुड, द बॅड अँड द अग्ली ह्या क्लिंट ईस्टवूडच्या गाजलेल्या सिनेमाचे पार्श्वसंगीत नि:संकोचपणे जसेच्या तसे ढापलेले आहे.
आखरी दाव (१९७५) सलीम जावेद ह्या जोडीने लिहिलेला सिनेमा. मूळ कथा भगवतीचरण वर्मा यांची आहे असे वाचले. पण जेम्स हॅडली चेसची आठवण येईल अशी काहीशी गोष्ट आहे. सलीम जावेद सारखे चलनी नाणे असून फार चालला नाही. पण एक वेगळी गोष्ट आहे म्हणून आवडला.
हलचल, धुंध (७० च्या दशकातील) हे अॅगथा ख्रिस्ती वगैरे प्रसिद्ध लोकांच्या कादंबरीवर आधारित सिनेमेही चांगले आहेत पण बहुधा फार चालले नाहीत.
मनोरंजन (१९७४) हाही एक फ्लॉप पण चांगला वाटलेला सिनेमा होता. शम्मी कपूरचे काम आवडले. कुठल्याशा फ्रेन्च सिनेमाची कॉपी आहे बहुतेक.
तो इर्मा ला डुस ( काय तो
तो इर्मा ला डुस ( काय तो उच्चार असेल तो !) ची कॉपी होती. धुंध बहुदा फ्लॉप नसावा.
भूवनशोम.
भूवनशोम.
Manoranjan big fan please
Manoranjan big fan please watch Sanjeev kumar comedy is pure gold. Zeenie looks fabulous
Songs are great and shammi kapoor amazing tole. Irma la deuce copy.
व्हॉट्स योर राशी..माझा गिल्टी
व्हॉट्स योर राशी..माझा गिल्टी प्लेझर आहे.
कॉमेंट्स वाचताना कौन , एक हसीना थी हे ही आठवले. प्रचंड आवडलेले. का फ्लॉप झालेत कोण जाणे..आणि पठाण सारखे हिट जातात.
सुनिल शेट्टी चा ये तेरा घर ये मेरा घर ही अॅड ह्या लिस्टीत. मालामाल विक्ली फ्लॉप होता का? मग तो ही.
तरी ही बाकी लॉजिक मांडून अ आणि अ प्रकारांसकट आवडलेला.
अमिताभ चा आंखे (अ आणि अ गोष्टींनी भरलेला पण तरीही आवडला होता, वेगळा होता)
अक्षय चा तस्वीर अक्षरशः काहिही लॉजिक होते. म्हणे फोटो बघून फोटोत शिरायचे कसब होते त्याच्यात, त्या क्षणी त्या वेळी प्रकट
अनेक वर्षांनी shendenaxatra
अनेक वर्षांनी shendenaxatra आयडी दिसले
लक्ष ऋतिक चा
लक्ष (ऋतिक चा )
<-- माझा गिल्टी प्लेझर
प्रेम रतन धन पायो
ह्यातलं चकली,चिवडा चं गाणं बघत चिवडा खायला आवडतं मला
सुनिल शेट्टी चा ये तेरा घर ये मेरा घर+११११.
तुमचा गिल्टी प्लेझर काय आहे? असा धागा काढा
आयो, जायो असे यमक घेत इतक्या
आयो, जायो असे यमक घेत इतक्या आर्त भावनिक सुरात प्रेम रतन धन पायो गायले आहे ( अय्यो साssमी या गाण्यात ती अल्लू अर्जुनचे पाऊल पडले तिथली धूळ उचलून कपाळाला लावते तसला अत्त्यार्त प्रेमाचा प्रकार) ते ऐकुन माझी तो चित्रपट पहाण्याची इच्छा कधी होणारही नाही.
आणि पठाण सारखे हिट जातात. >>
आणि पठाण सारखे हिट जातात. >> SRK !
अत्त्यार्त >> या शब्दाबद्दल
अत्त्यार्त >> या शब्दाबद्दल आणि इथल्या एडिटर मधे तो लिहीण्याची डेअरिंग केल्याबद्द्ल मानव यांना एक स्पेशल _/\_
गुगल इंडिक किबोर्ड फारेण्ड.
गुगल इंडिक किबोर्ड फारेण्ड.
मायबोली संगणकावर फक्त वाचतो, क्वचित एखादी कॉमेंट करतो माबो एडिटर वापरून.
पतियाळा हाऊस -
पतियाळा हाऊस -
आर्थिक सुबत्तेसाठी परदेशात गेलेली पहिली पिढी, त्यांच्या स्ट्रगलमधून निर्माण झालेला बिटरनेस आणि तिथेच वाढलेली दुसरी पिढी यांच्यातला संघर्ष. पंजाबीच पण केजोच्या/चोप्रा कॅंपच्या भव्य महालात राहणारे नाही तर साउथहॉल किंवा मॅंचेस्टरच्या करी माईलमधे दूकान/हॉटेल असणार्या फॅमिलीज, पहिल्या पिढीने आणलेल्या पत्र्याच्या ट्रंका ऍटीकमध्ये जपून ठेवणार्या, ब्लू कॉलर जॉब्स करणार्या व परंपरावादी, घेटो करून राहणार्या लोकांचे हे वास्तव आहे. ही कथा क्रिकेटीअर मॉंटी पनेसरच्या आयुष्यावर आधारीत आहे असे म्हणतात.
ऋषी कपूर ऍज अ टिपीकल पॅट्रिआर्क मस्तच आहे. अक्षय कुमारने मारधाड हिरोचा गिअर बदलल्याची निशाणी इथपासून दिसते. प्रॉडक्शनही त्याचेच आहे बहूतेक. टायटल ट्रॅकही चांगला आहे.
शाहरूख तर यातला आवडतोच. पण
शाहरूख तर यातला आवडतोच. पण यातले त्याचे कपडे विशेष आवडतात-> Costume Designer औस्कर विजेत्या भानु आथया आहेत.
सूर्यवंशी (आजही बघायला मजा
सूर्यवंशी (आजही बघायला मजा येते)
स्वदेस (हा खरंतर फ्लॉप कसा होऊ शकतो?)
अंदाज अपना अपना
दौड
लव्ह के लिये कुछ भी करेगा
बादशाह
झंकार बीटस्
जजंतरम ममंतरम जलपरी द डेझर्ट
जजंतरम ममंतरम
जलपरी द डेझर्ट मरमेड
(ह्याचे नाव विचित्र आहे पण चांगला सिनेमा आहे. दूरदर्शनवर लहानपणी बघितलेला.)
मेरा नाम जोकर आणि शान हे
मेरा नाम जोकर आणि शान हे फ्लॉप होते.
शानचे उत्पन्न अनेक चित्रपटांपेक्षा जास्त होते तरी ते सुपरहिट आणि शान फ्लॉप ठरला. कारण निर्मिती खर्च.
बादशाह >>> हा फ्लॉप होता का..
बादशाह >>> हा फ्लॉप होता का.. असेल तर आश्चर्य आहे.. धमाल पिक्चर आहे.. कित्येकदा पाहिला आहे.. स्पेशली क्लायमॅक्स पुन्हा पुन्हा बघतो.. शाहरुखने काय मस्त अभिनय केलाय नजरेतूनच..
Costume Designer औस्कर
Costume Designer औस्कर विजेत्या भानु आथया आहेत.
...
अच्छा बब्बन धन्यवाद
NH10: अनुष्का शर्माचा हा
NH10: अनुष्का शर्माचा हा सिनेमा फार तर सेमी हिट म्हणता येईल. पण एक वेगळी गोष्ट आहे. अत्यंत वेगाने घटना घडतात. भीतीदायक आणि उत्सुकता वाढवणारा सिनेमा.
खामोश (१९८६) : एक उत्तम रहस्यपट. दिग्गज नट आहेत. शेवट अगदी अनपेक्षित. पण बहुधा फ्लॉप झाला.
NH10: हो. धक्कादायक आहे पण
NH10: हो. धक्कादायक आहे पण चांगला आहे
Pages