लॅक्मे, ल'ओरीए

Submitted by Revati1980 on 9 August, 2023 - 11:13

बापरे ! कथा असेल तर छान जमलीय. पण सत्यकथा असेल तर हिमांशु खुप चुकीचा वागलाय. नात्यात प्रेम आणि सामंजस्य नसेल तर ते तसेही टिकणारे नसतेच त्यामुळे हिनाचा निर्णय योग्य वाटतो. पण... पुढचा काळ एकट्याने व्यतीत करणे ही खरी सत्व परीक्षा असेल.

एकूणच कथा जमलीये ..
पण स्त्रियांचे स्वातंत्र्य कसे आवश्यक आहे हे सांगण्याच्या नादात हिमांशूला (पुरुषाला) जरा जास्तच डार्क रंगात माखलाय असं नाही का वाटतं ?

स्त्रीयांचे स्वातंत्र्य हां मुद्दा फक्त नाही वाटत.
कुठल्याही स्त्री वरती हात उगारणे आणि लग्न केलंय म्हणजे ह्या गोष्टीचा सुद्धा हक्क असणे हां जो पुरुषीपणा दाखवण्याचा विकृत भाव आहे तो मुद्दा अधोरेखित करण्याचा प्रयत्न कथेमध्ये असावा असे वाटते.

<<एकूणच कथा जमलीये ..
पण स्त्रियांचे स्वातंत्र्य कसे आवश्यक आहे हे सांगण्याच्या नादात हिमांशूला (पुरुषाला) जरा जास्तच डार्क रंगात माखलाय असं नाही का वाटतं ?>>
घडलेली घटना आहे. २०११ ला हीनाचे लग्न झाले आणि २०१३ ला दोघे वेगळे झाले. हीनाने नंतर दुसरे लग्न केले. She is fine now.

पण आताची स्त्री छान दिसण्याकडे फारसे लक्ष देत नाही कारण आता स्त्री जुन्या बंधनातून बाहेर आली आहे.
>>> काहीतरी गल्लत होतेय... आताची स्त्री आणि पुरुष दोघेही छान दिसण्याकडे लक्ष देतात...

आताची स्त्री आणि पुरुष दोघेही छान दिसण्याकडे लक्ष देतात>>> जनरलायझेशन. काहींना हौस असते. काहिंना नाही, ज्यांना नाही त्यांना फोर्स करायचा अधिकार कुणालाच नाही. शिवाय डेली मेकप करायला बिझी शेड्युल मधे वेळ आहे कोणाला? हौस असेल त्या/ते करतात.

ब्रेक विंड बद्दल...च्रप्स, वेड पांघरून पेडगाव ला जायचा प्रयत्न मस्त आहे! नॅचरल गोष्टी जसे ढेकर, फार्ट घरा बाहेर घडले तर एक वेळ सॉरी म्हणू. घरात पण??? are you serious to justify that?

घडलेली घटना आहे. २०११ ला हीनाचे लग्न झाले आणि २०१३ ला दोघे वेगळे झाले. हीनाने नंतर दुसरे लग्न केले. She is fine now.>> आय होप ती आता स्वतःच्या घरात आरामात ढेकर देउ व पादू शकत असेल. इतके बेसन खाल्ले की दुसरे काय होणार?

मेक अप आपल्या सुखासाठी पण करतात काही जणी. बिकॉज आय अ‍ॅम वर्थ इट म्हणून. यु डोंट नीड अ गाय ज परमिशन.

आय होप ती आता स्वतःच्या घरात आरामात ढेकर देउ व पादू शकत असेल. इतके बेसन खाल्ले की दुसरे काय होणार?
>> लोल

Ashu29- मेबी her पार्टनर doesnt लाईक her to fart I’m front of him… she is exaggerating…

सॉरी अश्विनीमामी, हीनाला हा लेख दाखवला तेंव्हा ती म्हणाली मेकअप हे शीर्षक मिस् लिडींग वाटेल. तिच्या सूचनेवरून हे शीर्षक ठेवलेय!

गंधर्वगुंजनचे ही शीर्षक बदलले. ३० ऑगस्टला शैलेन्द्र यांचा जन्मदिवस होता म्हणून त्यानी लिहिलेल्या गाण्याचे शीर्षक ठेवले.

आता असे होणार नाही, I assure you!!!

आता असे होणार नाही, I assure you!!!>> मला काय फरक पडत नाही. नवीन काही असेल म्हणून उघडले जाते इतकेच.

मेबी her पार्टनर doesnt लाईक her to fart I’m front of him>>>> मग ही exaggerate च करण्या सारखी गोष्ट आहे. नंतर म्हणेल शौचाला ही जायचे नाहीस.

छान.
रच्याकने: सामोचं 'पादा पण नांदा' इथे लिटरली वाचुन फारच हसू फुटलं. Proud

खरी घटना असेल तर तिने पोलीस तक्रार करायला हवी होती किंवा त्याला दोन ठेवून द्यायला पाहिजे होत्या - नाठाळाचे माथी हाणू काठी.

मग पुढे सेपरेट होणे बरोबर आहेच...

त्या मुलीचे पालक ही धन्यवाद! आई, कारण आई पण त्यांच्या वर्चस्वाखाली इतकी वर्ष राहिली...

Ashu22 - मी इंग्लिश मध्ये लिहिले त्यामुळे तुम्हाला बहुतेक कळले नाही... In front of him म्हणजे त्याच्या समोर...
पादा पण जवळ नको... दुसरीकडे... आणि सांगून कशाला पाद ते हि बया .. जा कि दुसऱ्या रूम मध्ये आणि ब्रेक विंड...

दोन ठेवून द्यायच्या किती भारी वाटत असेल तरी अंदाधुंदी माजली असलेल्या देशांत असाल तरच फक्त नाठाळाच्या माथी काठी मारायच्या फंदात पडा. Retaliation च्या बाजूने कायदा नाही. सेल्फ डिफेन्स नक्कीच करावा. त्यात देता आली तर उत्तमच. पण सेल्फ डिफेन्स आणि नंतर नाठाळाचे माथी ठेवून देण्यात फरक आहे. तो सिद्ध झाला तर कदाचित कायदा फार मदत नाही करू शकणार. त्यामुळे सांभाळून.

हे मुख्यत्वे मुलांच्या मनावर बिंबवून ठेवावे.

टॉक्सीक संबंधातून बाहेर पडावे. हे इथे नायिका करते आहे.

विचारप्रवर्तक लेख आहे. केवळ नटणे-मुरडणेच नाही, काहीपण दुसर्‍यावर लादणे बरोबर नाहीच. आणि ते लादणे हा रिलेशनशिपचा पाया असेल तर त्यातून बाहेर पडणे उत्तम.

पावडर कुंकू करणाऱ्या बायका त्यांच्या शरीराचं भांडवल करतात कारण तीच एक ताकत असते त्यांच्याकडे. पुरुषांना पावडर कुंकू करायची गरज नाही कारण त्यांच्याकडे पैसा पद प्रतिष्ठा असते आणि त्या योगाने येणारी ताकत. >> ही दोन्ही वाक्ये पटली नाहीत, पण त्याचा दोष लेखिकेचा नाही, तर ती वाक्ये म्हणणार्‍या हीनाचा आहे. पावडर कुंकू लावणे - हे जर बाय चॉइस असेल तर त्यांना 'शरीराचं भांडवल' वगैरे लेबल लावणं हे फारच सरसकटीकरण झालं. मग त्या लॉजिकने, हिमांशू जर हीनाला पावडरकुंकू लावायची बळजबरी करत होता, तर हीनाच्याच शब्दात तो तिला "सौंदर्याचं गाजर लटकत ठेऊन तिला हवं ते हवं तसं करून घ्यायची आणि हिमांशूला मागे मागे फिरवायची/वश करण्याची" गुरुकिल्लीच देत होता. पण हे फारच हास्यास्पद होईल. यावर काउंटर आर्ग्युमेंट वरती च्रप्स यांनी केलं आहे "आताची स्त्री आणि पुरुष दोघेही छान दिसण्याकडे लक्ष देतात" हे लागू होईल.

मला वाटतं स्वतः काय केल्याने वा न केल्याने चांगले दिसू किंवा स्वतःला चांगले दिसण्याची गरज आहे का - या वैयक्तिक बाबी झाल्या. एखादवेळेस थोड्याफार सूचना आपण प्रेमाने करतो ते ही ठीक आहे. उदा. 'माझ्या मैत्रिणी घरी येतील तेव्हा फाटके बनियन घालून उकिडवा बसू नकोस' - असं काहीतरी हीनाने हिमांशूला सांगण्यात काही वावगं आहे असं मला वाटत नाही. पण स्वतःचं घर, जिथे फक्त आपलं माणूस घरात आहे, त्याच्यासमोर आपल्याला काहीही बोलायला आणि वागायला संकोच नसायला हवा, अश्या वेळी जर हिमांशू तिच्यावर कृत्रिम वागणुकीची जबरदस्ती करत असेल, तर चूक तिथे आहे. तो दोष हिमांशूचा आहे; इतर नट्टापट्टा करणार्‍या बायकांनी ह्यात काहीही घोडं मारलं नाहीये.

आता मी पण हिम्मत दाखवते आणि ..... >>> हे वाचून वाटले आता आई सुद्धा बाबांना सोडते की काय Happy

छान लेख, कथा, विचार.. प्रतिसादात चर्चाही छान

पुरुषांनाही बरेचदा अश्या रिलेशन मध्ये नाईलाजाने राहावे लागते. पण अश्या केसेस अर्थात तुलनेत कमी असतील.

चटकन आठवलेले उदाहरणं म्हणजे आमच्या ऑफिसमधील एक भांडकुदळ स्वभावाची बाई. नवरा कसा मुठीत आहे आणि ती त्याचे लाईफ कसे कंट्रोल करते याचे नेहमी कौतुक सांगत असते.

एका फ्रायडेला मी ट्राऊजरवर टीशर्ट घालून गेलो तर मला टोमणा मारून सांगत होती की तिच्या नवऱ्याने असे कॉम्बिनेशन घातल्यावर तिने कसे त्याला दमदाटी करत टीशर्ट सोबत जीन्स घालायला लावली.

आता हे तिने माझे कपडे बघून मलाही सुनावले असल्याने त्याच मस्करीच्या टोन मध्ये दोन गोष्टी मग मी सुद्धा तिला सुनावल्या.

१) ती स्वतः फेशन बाबत कशी काकूबाई आहे त्यामुळे तिने दुसऱ्याच्या कपड्यावर टिप्पणी करूच नये.
२) नवर्यावर अधिकार गाजवने हे तिला आयुष्यातील एक यश एक अचीव्हमेंट वाटत असेल तर ती विचारांनी देखील कशी काकूबाई आहे.

नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 1 September, 2023 - 00:1>>> हे अगदी सोपे करणे झाले (trivialization).

इथे ती सत्यकथा आहे. आणि तिचा शारिरीक आणि मानसिक छळ झाला होता. Domestic violence ची केस होती. हा गुन्हा आहे.

There is a difference between toxic and abusive relationships. In this case, it was an abusive relationship.
https://www.leahsefor.com/post/toxic-relationships-vs-abusive-relationsh....

त्या स्त्री चे सगळे विचार पटण्यासरखे आहेत असे नाही, परन्तु तिच्या बरोबर जे झाले ते (आधीच्या नवर्या बरोबर ते कोणत्याही
ग्राउन्ड वर योग्य किन्वा न्याय्य नव्हते.

एका व्यक्तीच माणूस म्हणून जगायच स्वातन्त्र्य हिरावून घेतले, आ णि त्यातुन ती कशी बाहेर पडली हा कथेचा गाभा आहे. तो सोडून उगाच फाटे फोडायचे किन्वा trivialize करायच. ह्या वळणाकडे धागा वळतोय असे वाटले.

तिचा शारिरीक आणि मानसिक छळ झाला होता. हा गुन्हा आहे.
>>>>

जिथे उघड्या डोळ्यांनी गुन्हा दिसतो तिथे न्याय मिळतो, गेला बाजार सहानुभूती तरी मिळते.
जिथे हे चटकन लक्षात येतं नाही, कोणाला सांगूनही पटत नाही, तिथे केवळ घुसमट नशिबी येते.

माझे एक नात्यातले काका मेल्यावर समजले की त्यांच्या बायकोने कसा त्यांचा छळ मांडला होता. तिचा भाऊ देखील कसा त्यांना मारहाण करायचा. तिचे बाहेर देखील एक अफेअर होते हे देखील नंतरच उघड झाले.
त्या आधी तो काका दारूडा होता आणि त्यामुळे त्यांच्या संसारात सुख नव्हते इतकेच जगाला माहीत होते. जगाचे सोडा. त्यांचे सख्खे भाऊ सुद्धा कधी मदतीला आले नाहीत. आणि मदतही सोडा. कुटुंबातून सहानुभूती सुद्धा त्या काकीना मिळायची आणि काकाला दारू सोडायचे उपदेश..

कुटुंबातून सहानुभूती सुद्धा त्या काकीना काकुंना मिळायची आणि काकाला दारू सोडायचे उपदेश..

स्त्रियांना अनेकदा चुकांचेसुद्धा कायदेशीर मार्गाने समर्थन मिळत राहते आणि त्यामुळे लिंग निरपेक्ष परिस्थितीचे अवलोकन जेथे खुंटत असेल तेथे निर्मळ निरपेक्ष न्याय हा कल्पनाविलास ठरतो.

छान लिहलंय.

कोणत्याही कारणामुळे दोघांपैकी कोणासाठीही ते नाते जर टॉक्सिक होत असेल तर त्यातून बाहेर पडणे दोघांच्याही हिताचे. एकमेकांसोबत खुष नाहीत? विषय संपला. आईवडीलांनी समजूत घालण्याचा प्रयत्न एका मर्यादेपर्यंत करावा जरूर, पण समजूतीची जबरदस्ती होऊ नये.

बरा आहे लेख..बरेचसे विचार काही पटले नाहीत.. असो.
इथे एक नमूद करावे वाटले लेखाच्या अनुषंगाने..
भारताची वीमेन एम्पावरमेंट अंदाजे १९% आणि मुस्लिम राष्ट्रे पाकिस्तान आणि बांग्लादेश यांची अनुक्रमे २०%आणि २५% आहे.

भारताची वीमेन एम्पावरमेंट अंदाजे १९% आणि मुस्लिम राष्ट्रे पाकिस्तान आणि बांग्लादेश यांची अनुक्रमे २०%आणि २५% आहे.
>>>>>

खरेच का?
असल्यास shocking आहे..
हे आकडे कसे आले बघायला हवे. तुम्ही कुठे वाचले?

https://youtu.be/t7dH3vvCv3M?si=DQpEGSkzeOwePqLl
होय ऋ खरं आहे..याने सांगितलेले.. भारताची १९% आहे.. पाकिस्तान आणि बांगलादेश पेक्षा कमी..आकड्यांचा संदर्भ शोधून देते थांबा..

Pages