साडी सेल मधली महिलांची मारामारी.

Submitted by ढंपस टंपू on 19 July, 2023 - 23:21

पावासाळ्यात साडी सेल हे दृश्य नेहमी दिसते. महिलांच्या कपड्यांचे सेल जास्त करून लागतात. पुरूषांच्या कपड्यांचे सेल पावसाळ्यात कमी दिसतात.

अशा सेल मधे साड्यांची हिसकाहिसकी, वादावादी हे नेहमी दिसते. काही काही बायका तर कुणाला काय वाटेल याचा विचार न करता दुसरीने हात लावलेली साडी ओढून घेतात आणि मी आधी घेतली होती म्हणून भांडण करतात. भाव खूप स्वस्त असल्याने गर्दी तुडूंब असते. पण या वातावरणामुळे अनेक सुशिक्षित महिलांना सेल मधे जाऊन साडी घ्याविशी वाटत नाही. मारामारी झाली कि त्याच्या बातम्या येतात. नेटवर तर येतातच. नुकतीच ही बातमी आली आहे.
https://lokmat.news18.com/viral/seeing-the-sale-of-sarees-the-crowd-of-w...

पुरूषांच्या सेल मधे पण असे घडते का ? तिथेही मारामार्‍या होतात का ? कधी पाहण्यात आले नाही. सेलच पाहण्यात न आल्याने अशी घटना घडली असेल तर माहिती नाही.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साडी सेल चं माहिती नाही पण ट्रायल रूम मध्ये 5 कपडे नेऊन एक कपडा ट्राय करून बाहेर जाऊन नवऱ्याशी त्याबाबत चर्चा करणाऱ्या बाईशी भांडण झाल्याचं अगदी रिसेन्ट आठवतंय Happy आम्ही दोघी एकमेकींचे खांदे धरून ट्रायल रूम मधून एकमेकींना बाहेर काढण्याच्या लेव्हल पर्यंत आलो होतो.स्टाफ रविवार असल्याने ट्रायल रूम बाहेर नसून दुसरीकडे बिझी होता.
व्हिडीओ चित्रित झाला नाही तर मारामारी करायला मलाही आवडेल.

एका पेज वर एका एका बॉयफ्रेंड वरून चार बायकांची मारामारीअशी बातमी होती. त्या पेजला येत असलेल्या जाहीरातींमुळे लिंक देता येत नाही.

कोणे एकेकाळी गार्डनच्या सेलमध्ये आवडलेली साडी पकडली,पण दुसरे टोक एका गुजराथणीकडे होते.मी तो नाद सोडला हे वेगळे सांगायची गरज नाही.नंतर परत कधीही सेलमध्ये गेले नाही.
पण ह्या बायका सेलमध्ये काय नी एरवी देखील घुसून ,आज नाही मिळाले तर कधीही नाही मिळणार hua आविर्भावात असतात.

मीअनु, Lol

ढमढम, तुम्हाला असे आगळेवगळे धागे कसे सुचतात हो?

काल अमेरिकेत तांदळाची टंचाई असल्याच्या बातम्या पसरल्या. जो तो खुळ्यागत भारतीय किराणा दुकानात जाऊन दोन दोन तांदूळ पिशव्या घेऊन जाऊ लागला. मीही गेलो होतो, इतकी गर्दी व चेंगराचेंगरी की मी येताना दोन तांदूळ पिशव्या व डोक्यात उवा घेऊन आलो. एकावर एक फ्री !

विकु Lol
आम्ही पण आणल्या, बासमतीच्या पिशव्या. आधी टॉयलेट पेपर, मग कणीक आता तांदूळ, आदिमानवासारखं वाटतय पण छोडेगा नहीं.

काल माझ्या न्यू जर्सीच्या मित्राने तिथल्या Coscto मधला व्हीडिओ काढुन शेअर केला. त्यात लोक रॅक्सवर चढुन राईस बॅग्ज अक्षरशः लुटताना आणि ढकलाढकली करताना दिसत आहेत.

स्वतः दहा वर्ष झाले नवीन साडी घेऊन पण मला बघायला मजा येते.>>> +१
असच १० वर्षांपूर्वी एका साडी प्रदर्शनात,
एक अतिशय सुंदर हटके साडी होती, तो विक्रेता ती साडी मला उलगडून दाखवतोय, छान लाल chutuk चंदेरी, त्याला सुंदर पदर, blouse पीस etc. मनात तर भरली पण घ्यायचं काही ठरलं नव्हतं. आणि अचानक लक्ष गेलं, तर पलीकडे दोन बायका तितक्याच कुतूहलाने ही साडी बघत होत्या, आता माझं लक्ष साडीवरून त्यांच्या बॉडी लँग्वेज कडे.. बहुतेक त्या आता पुढे होऊन ती घेणार तेव्हा विजच्या वेगाने मी चुटकी सरशी ती युनिक वाटलेली साडी काही गरज नसताना उगाच घेतली.

ती शेवटची प्रदर्शनात / impulsively केलेली खरेदी.

क अतिशय सुंदर हटके साडी होती, तो विक्रेता ती साडी मला उलगडून दाखवतोय, छान लाल chutuk चंदेरी, त्याला सुंदर पदर, blouse पीस etc. मनात तर भरली पण घ्यायचं काही ठरलं नव्हतं. आणि अचानक लक्ष गेलं, तर पलीकडे दोन बायका तितक्याच कुतूहलाने ही साडी बघत होत्या, आता माझं लक्ष साडीवरून त्यांच्या बॉडी लँग्वेज कडे.. बहुतेक त्या आता पुढे होऊन ती घेणार तेव्हा विजच्या वेगाने मी चुटकी सरशी ती युनिक वाटलेली साडी काही गरज नसताना उगाच घेतली.

ती शेवटची प्रदर्शनात / impulsively केलेली खरेदी.
नवीन Submitted by छन्दिफन्दि on 23 July, 2023 - 22:46

नक्कीच सेलवाले अशा काही पगारी बायका पेरून ठेवत असणार, जास्त चिकित्सक बायकांना कॉम्प्लेक्स देऊन खरेदी करण्यास भाग पाडण्यासाठी

व्हिडीओ चित्रित झाला नाही तर मारामारी करायला मलाही आवडेल.>> अनू Rofl

छंदीफंदी, मला ती ईंग्लिश विंग्लिश मधली नवराई गाण्यातली लाल चंदेरी आठवली Happy बुंदे वाली

चुटकी सरशी ती युनिक वाटलेली साडी काही गरज नसताना उगाच घेतली.
>>>>

मनात भरलेले कपडे मग त्यावेळी गरज नसताना घेतले तरी हरकत नसते.
आज ना उद्या घेणारच असू तर तेव्हा मनात भरले नसतानाही मग गरज म्हणून नाईलाजाने आपण काहीतरी घेऊन येतो त्यापेक्षा हे बरे.

आता साडी नेसतच नसाल तरीही घेतली गेली तर गोष्ट वेगळी...

>>लाल chutuk चंदेरी

रेड कि सिल्वर असा प्रश्न पडलेला, तेव्ढ्यात चन्देरी हा रंग नसून साडीचा प्रकार आहे हे ज्ञान प्राप्त झाले!

नक्कीच सेलवाले अशा काही पगारी बायका पेरून ठेवत असणार, जास्त चिकित्सक बायकांना कॉम्प्लेक्स देऊन खरेदी करण्यास भाग पाडण्यासाठी>>> Biggrin Biggrin Biggrin Biggrin असेल असेल

रेड कि सिल्वर असा प्रश्न पडलेला, तेव्ढ्यात चन्देरी हा रंग नसून साडीचा प्रकार आहे हे ज्ञान प्राप्त झाले!>>>:D Lol Lol

मला ती ईंग्लिश विंग्लिश मधली नवराई गाण्यातली लाल चंदेरी आठवली Happy बुंदे वाली>>>>>तुम्ही म्हंटल्यावर मलाही.

मनात भरलेले कपडे मग त्यावेळी गरज नसताना घेतले तरी हरकत नसते.
आज ना उद्या घेणारच असू तर तेव्हा मनात भरले नसतानाही मग गरज म्हणून नाईलाजाने आपण काहीतरी घेऊन येतो त्यापेक्षा हे बरे.,>>>>> कोणे एके काळी असा विचार मी पण करत होते..
एव्हढया fancy वस्तू गरज वगैरे कधी नसतात हे ध्यान आता प्राप्त झालं आहे.

एव्हढया fancy वस्तू गरज वगैरे कधी नसतात
>>>
गरजा तर रोटी कपडा आणि मकान इतक्याच आहेत
पण हौसेला मोल नसते Happy