किरीट सोमय्या यांचा नवा आरोप

Submitted by ढंपस टंपू on 17 July, 2023 - 21:49

विरोधकांचा भ्रष्टाचार उकरून काढणारे अभ्यासू धडाडीचे नेते म्हणून किरीट सोमय्या हे देशाला आणि राज्याला परिचित आहेत. त्यांनी अनेक जणांवर आरोप केले. त्यामुळे त्या त्या नेत्यांची ईडी, सीबीआय, एसआयटी, इन्कम टॅक्स कडून चौकशी सुरू आहे. नंतर त्या नेत्यांवरच्या आरोपांचे काय झाले हे समजत नाही.

पण नबाब मलिक, छगन भुजबळ अशा नेत्यांना तुरूंगवास घडला आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांना भले भले टरकून असतात.
पण गेल्या काही दिवसात त्यांच्याकडून कुठलाही नवीन आरोप नाही कि जाहीर वक्तव्य नाही कि आधीच्या आरोपांबाबत खुलासे नाहीत. यामुळे त्यांच्याबद्दल काळजी वाटते. त्यांना उदंड आयुष्य लाभो व ही मोहीम अशीच चालू राहो या शुभेच्छा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दादा भाजप मध्य जॉईन होण्यासाठीची एक अट पूर्ण झाली. मुश्रीफ म्हणाले होते की त्यांना मंत्रीपद नाही मिळाले तरी चालेल पण सोमय्याचा बंदोबस्त करा. स्वतःच्या फायद्यासाठी आप्तस्वकियांचा बळी देण्याचा गूण फडनवीसांना गुणसूत्रातून आंदण मिळाला आहे.

नाय राजेहो त्याच काय झाल की किरकिर करत कागद फडकावत विरोधी पक्षातील नेत्यांवर आरोप केले की ते सरळ भाजपत जात्यात नि मंत्री व्हत्यात नी बिचाऱ्या सोमय्याले मंग मुग गिळून गप बसाव लागत आता त अजित पवारांवर सोमय्यांनी आरोप केले व्हते ते त सरकारले पाठींबा देत डायरेक उपमुख्यमंत्री च झाले नी मुख्यमंत्री शिंदेन कितीभी इरोध केला तरीभी त्यायच्या तोंडाचा घास पळवत अर्थ खातभी घेऊन गेले मंग कोनत्या तोंडान बोलत्याल बर सोमय्या नी काल त एका व्हिडीओन सोमय्याचे कपडेच फाडले पार नंगच केल ब्वा त्यायले तवा त्ये कोमात असत्याल जरा दोनचार दवाखाने तपासा म्हंजी कळल तुम्हाले.

8 तासाच्या क्लिप आहेत अजून खुप व्हिडिओ येणे बाकी आहेत >>>> लोकांना ईडी लावता लावता, बाबू ची सीडी मार्केट मध्ये आली Kirithub Lol

ट्विटर वर ती क्लिप पाहिली , काय बोलतोय ते काही केल्या कळेना , बहुतेक आवाज नाही !
एकंदरीत घाणेरडा प्रकार वाटला .
सोमय्या ची कारकीर्द संपल्यात जमा आहे .
नक्कीच फडणवीस नी त्याला खिंडीत घाटून चाप लावलेला दिसतोय .

किरीट सोमय्या - ब्राह्मणेतर
विनोद तावडे - ब्राह्मणेतर
पंकजा मुंडे - ब्राह्मणेतर
आप्तस्वकीयांचा घात करणे हे फडणवीस आडनावाच्या व्यक्तींची कोर कॉम्पीटँसी आहे. इतिहास चाळून पाहिल्यावर नाना फडनवीसाने काय केले हे लक्षात येईल. ह्या हरणटोळावर विश्वास ठेवून अजीत आणि गॅंग भाजप सरकार मध्ये सामील झाली.

क्लिप्स पहिल्या नाहीत का कुणीच इथे? पूर्ण XXX शो आहे.
या पुढे कुणी 'लाव रे तो विडिओ' बोलला तर पहिला सोमैय्या पळून जाईल, जर जवळ कुठे असला तर

आज विधान परिषदेत ही तोच प्रकार घडला
https://www.youtube.com/watch?v=dvtZRABrpro&t=215s

3:35 विधान परिषद सभासद: लावा तो विडिओ
नीलम गोर्हे: नको... Lol

झम्पू - त्या यादी मधे मुक्ताईनगरचे एकनाथ खडसे यांचे नांव सर्वात पहिले यायला हवे. ३० पेक्षा जास्त वर्षे पक्ष वाढवण्यासाठी खस्ता खाल्ल्या आहेत.
भाजपाकडे सत्ता आल्यावर मुख्यमंत्री पदाचे ते प्रमुख दावेदार होते , नव्हे तेच मुख्यमंत्री होणार असेच वातावरण होते. पण स्वार्थी फडणवीसांनी त्यांना खड्यासारखे बाजूला केले गेले आणि आयत्या बिळावर नागोबा बनले.

खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करुन त्यांना अडकविण्यात आले आणि नंतर पक्षातून घालविले पण अजित पवार धुतलेल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत म्हणून भाजपा सरकारांत दोनदा उपमुख्यमंत्री.

खडसे Rofl
राष्ट्रवादीच्या मंचावर बसून भाजपाने राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली म्हणून गळे काढतायत यापेक्षा काय विनोदी प्रकार असू शकतो Wink
त्यांना 'मी'पणा नडला. पक्षापेक्षा मोठा व्हायचा कुणी प्रयत्न करत असेल तर त्याला भाजपा लगेच जमिनीवर आणते.आणि म्हणूनच भाजपात पक्षशिस्त टिकून आहे.

<त्यांना 'मी'पणा नडला. पक्षापेक्षा मोठा व्हायचा कुणी प्रयत्न करत असेल तर त्याला भाजपा लगेच जमिनीवर आणते.आणि म्हणूनच भाजपात पक्षशिस्त टिकून आहे.>

हं. फडणवीस मी पुन्हा येईन म्हणाले , त्यांनाही आधी जमिनीवर आणलं आणि मग लटकत ठेवलं. त्यांचा पुरेसा उपयोग करून झाला की त्यांचाही खडसे होईलच. सोमैया नाही झाला तर बरं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची अशी स्थिती झालेली पाहवणार नाही.

बाकी मोदी पक्षापेक्षा कधीचाच मोठा झालाय.

सोमैयाचा गेम फडणवीसांनी केला असं इथे भाजप समर्थकच म्हणतोय. आता अशा फडणवीसबद्दल त्यांच्या पक्षसहकार्‍यांना किती विश्वास वाटत असेल नाही?

फडणवीस पुन्हा आलेच होते पण उठांचा आत्मघातकीपणा नडला
फडणवीसांचे राजकीय भवितव्य उज्वल आहे.... त्यांचा खडसे नक्कीच होणार नाही. भलती स्वप्ने पाहू नका Proud

माझ्यामुळे पक्ष वाढला; माझ्यामुळे पक्ष आहे असे मोदी स्वतः कधीच म्हणत नाहीत. रादर सगळे मोठे नेते पक्षाने आम्हाला मोठे केले असेच म्हणतात.. हा फरक आहे खडसे आणि इतरान्मध्ये Wink

अमित शहा फडणवीसांना वापरून त्यांचा गेम करतोय हे दिसत नाही? Biggrin
शिंदेंना मुख्यमंत्री केलं तेव्हा फडणवीसांचा चेहरा बघितला नाही? वर जबरदस्ती उपमुख्यमंत्री केलं.
२०१४ सालातले फडणवीसांचे फोटो बघा आणि आताचे बघा. पार रया गेली आहे. पक्षातल्या लोकांचे काटे काढून बाहेरच्या - ज्यांच्यावर आरोप केले अशा लोकांच्या गळ्यात गळे घालणार्‍यांबद्दल महाराष्ट्र भाजप नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना किती आत्मीयता असेल ते सांगायला कशाला हवं?

तुमचा "आकस" चांगलाच कळतोय Wink
त्यांच्या कर्तुत्वाच्या मानाने त्यांना सध्या काही तडजोडी कराव्या लागतायत हेही मान्य पण त्यांचा खडसे होणार नाही याची खात्री बाळगा Happy

द्वेष करायला दुसरा कुणीतरी माणूस पकडा नाहीतर कायम असेच चरफडत बसावे लागेल Rofl

तडजोडी Lol

द्वेष् कसला? हल्ली कीव येते त्यांची. सगळी घाणेरडी कामं करायला लागताहेत. शिंदेंनी मुख्यमंत्री झाल्या झाल्या विधानसभेत सांगितलंच होतं आणि हे कपाळाला हात लावून बसले होते. आता ज्यांना चक्की पिसिंग सांगितलं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसावं लागतं. छातीवर दगड ठेवावा लागतो.

त्यांचे २०१४ मधले फोटो , व्हिडियो बघा आणि आताचे बघा.

पक्षापेक्षा मोठा व्हायचा कुणी प्रयत्न करत असेल तर त्याला भाजपा लगेच जमिनीवर आणते.आणि म्हणूनच भाजपात पक्षशिस्त टिकून आहे. >>> तरीच भाजप सध्या पक्षाच्या नावाने मते मागण्या ऐवजी मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मते मागते. आणि पक्षशिस्ती बाबत बोलत असाल तर ईडी, सीबीआय, सेंट्रल व्हिजिलन्स चा कासरा हातातून जरा सुटू देत, त्यानंतर जमा केलेली(की झालेली?) बुणग्या आणि गारद्यांची टोळी किती पक्षशिस्त पाळते त्यावर नक्की सविस्तर बोलू आपण.

सोमैयाचा गेम फडणवीसांनी केला असं इथे भाजप समर्थकच म्हणतोय. आता अशा फडणवीसबद्दल त्यांच्या पक्षसहकार्‍यांना किती विश्वास वाटत असेल >>>>>>सोमात्या चे फालतु वागणे चव्हाट्यावर आणण्यात फडणवीसांचा हात भार असेल तर चांगलीच गोष्ट आहे .
हा पण सत्याचे प्रयोग करणाऱ्याचे समर्थन करणाऱ्याने उगाचच सोज्वळ असल्याचा आव आणू नये !

त्यांच्या कर्तुत्वाच्या मानाने त्यांना सध्या काही तडजोडी कराव्या लागतायत हेही मान्य पण त्यांचा खडसे होणार नाही याची खात्री बाळगा >>>>>>>
महाराष्ट्र राज्याच्या आत्ता पर्यंतच्या कारकीर्दीत भ्रष्टाचाराचा आरोप नसलेला एकमेव मुख्यमंत्री म्हणजे फक्त फडणवीसच .
पण जातीने ब्राह्मण असल्यामुळे फडणवीस वर शाब्दिक हल्ले करण्यात ब्रिगेडी टोळकीच पुढे असतात , ते ही पुरोगामित्वाच्या झुली पांघरून ....

फुरोगामीजी , मला सोमैयाच्या वागण्याबद्दल बरंवाईट काही वाटत नाही.
त्यांनी यात फडणवीसांना ओढलं यांची मात्र गंमत वाटते. तुम्ही म्हणताय हे फडणवीसांनी केल़ आणि सोमैया फडणवीसांनी सांगतात, चौकशी करा.
Rofl

धारावीची सोन्याची कोंबडी अंड्यांसकट अडानीला जाता जाता कोणी बहाल केली? गळ्यातली मोत्याची माळ काढून द्यावी इतक्या सहजतेने?

Pages