बेपत्ता

Submitted by अपूर्व जांभेकर on 5 July, 2023 - 06:04

...गंमत म्हणून पावसाच्या पाण्यात त्याने सोडलेली होडी,
'नाव' घेऊन परतली...
पुढे मजकूर लिहिला होता...

'गेली अनेक वर्षे बेपत्ता...
आढळून आल्यास, हीच ती व्यक्ती, असा गैरसमज, कृपया करून घेऊ नये.
एकदा हरवलेली माणसे सापडतीलंच, इतकंही लहान राहिलं नाही हे जग,
चेहऱ्यातील साम्य, उरले असलेच(?!), तर समजावा; निव्वळ योगायोग’!

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Use group defaults