हिंदी चित्रपटसंगीताबद्दल गप्पा -२ पार्श्वगायक ही पद्धत रुळल्यापासून १९६० पर्यंतचा काळ.

Submitted by भरत. on 29 June, 2023 - 01:21

अनिल बिस्वास, नौशाद, सी रामचंद्र, एस डी बर्मन, शंकर जयकिशन, ओ पी नय्यर, मदन मोहन, सलिल चौधरी, रोशन , इ. संगीतकार

मन्ना डे, शमशाद बेगम , मुकेश ,रफी , तलत , किशोर, लता , गीता , आशा , सुमन कल्याणपूर इ. गायक

साहिर, शैलेंद्र, हसरत , शकील बदायुनी, राजेंद्र कृष्ण , कैफी आझमी इ. गीतकार.

गायकांची नावे जन्मवर्षाप्रमाणे घेतली आहेत. इथे ज्यांनी अधिक संख्येने चित्रपट केले त्या संगीतकारांची नावे घेतली आहेत. क्रम जशी नावे आठवली तशी .यादी परिपूर्ण असू शकत नाही. इतरांबद्दल प्रतिसादांत येईलच.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती पोस्ट वरच्या पोस्ट संदर्भात आहे हे तुम्ही चाणाक्ष असल्याने लक्षात आलेच असेल. Wink

आर डी, एस डी यांचे एखादे गाणे आधी ऐकले नसेल तरी म्हणजे पहिल्यांदा ऐकतानाही हे सचिनदा हे आरडी असे कळून येते. मदन मोहन यांच्या काही अनवट चाली ओळखू येतात. पण मदन मोहन ची सगळीच गाणी नाहीत ऐकलेली.
इतके दिवस विशिष्ट ठेका ऐकला कि ओ पी नय्यर हे डोक्यात घट्ट होतं. सलिल दांची रागावर आधारीत, काही सुरेल, अवीट गोडीची गाणी ऐकलेली. त्यामुळे चैन से हम को कही हे गाणे सलील चौधरींचेच असणार हा समज होता.

एकदा योगायोगाने अनिल विश्वास हे सलिलदा आणि ओपीं बद्दल बोलताना ऐकले आणि उलगडा झाला.
https://www.youtube.com/watch?v=Lapxb4RXUZ4

अनिल विश्वास इतर संगीतकारांबद्दलही बोललेत आणि छान बोललेत. मिळवून ऐकाच.

अनिल विश्वास - खेमचंद प्रकाश
https://www.youtube.com/watch?v=lEtjqtvFAVc

अनिल विश्वास - बर्मन पिता पुत्र
https://www.youtube.com/watch?v=hgBvWHcRXAY

अनिल विश्वास - खेमचंद प्रकाश - चितळकर मास्तर
https://www.youtube.com/watch?v=qVpXurDdeYQ

नौशाद चा इथे उल्लेख झालेला आहे. त्यामुळे अनिल विश्वास - नौशाद ची लिंक दिली नाही.

१९८३ चा चषक जिन्कून भारतीय संघ मुंबई विमानतळावर उतरला तेव्हा जो सत्कार समारंभ झाला त्यात पहिल्यांदा
कपिलचे भाषण झालं. त्यानंतर गावसकरने त्याच्या भाषणात पाकिस्तानातल्या कोणीतरी हा चषक आशियात आला याबद्दल आनंद
व्यक्त केला. त्यावर गावसकर म्हणाला होता की याला मी बापू नाड्कर्णीच्या एका शब्दात उत्तर देतो.

"बोडकं"

संगीतकार एस एन त्रिपाठी - संगीत सम्राट तानसेन मधली त्यांची गाणी सर्वांनी कधी न कधी ऐकलीच असतील.

१. झुमती चली हवा
२. सुध बिसर गयी आज , अपने..
३. हे नटराजा
यातली सर्वच गाणी एकत्रित रित्या ऐकण्यासाठी
https://www.youtube.com/watch?v=4QRTdduhl6E

संगीत सम्राट तानसेन, रानी रूपमती, जय चित्तोड अशा ऐतिहासिक चित्रपटांना त्यांचे संगीत होते. रानी रूपमती त्यांनी दिग्दर्शित केला होता. यातले एक गाणे ऐका. हे गाणे मोहम्मद रफी आणि कृष्णराव चोनकर यांनी गायले आहे. यात कृष्णरावांच्या पुढे रफी पडल्याचे जाणवते.
https://www.youtube.com/watch?v=ejt-0jMN7mM

यातल्याच झनन झन झनन झन झन बाजे पायलिया यात मात्र रफीने कमाल केली आहे. तितकीच तोलामोलाची साथ लताची आहे.
https://www.youtube.com/watch?v=suZPPgnsKhc

असे का ? कारण पहिल्या गाण्यात तानसेन आपल्या गुरूकडून गाण्याचे धडे घेत असतात. त्यामुळे गुरूपेक्षा शिष्याची गायकी थोडी कमजोर असल्याचे दिसले पाहीजे. असे बारकावे त्यांनी घेतलेले आहेत. (हा १९५९ सालचा आहे त्यामुळे तिकडच्या धाग्यावर असायला हवा होता).

शास्त्रीय संगीताचा हेवी बेस असलेली आणखी काही गाणी नंतर पाहूयात.

१९६१
एस एन त्रिपाठींचे जादू नगरीतले लताच्या आवाजातले निगाहों मे तुम हों हे खास गाणे
https://www.youtube.com/watch?v=RmpXXafBiCs

रफीचे ना किसी कि आंख नूर हूं हे गाणे आजही लोकप्रिय आहे. ते १९६० च्या लाल किला मधले
https://www.youtube.com/watch?v=u8EvjC6uRz0

लाल किला ची सर्वच गाणी
https://www.youtube.com/watch?v=eVGZutsd99A&list=PL3IktVe6Pi96524_WucG2O...

थाने काजलियो बनाल्यु, म्हारे नैना मे रमाल्यु - लता मंगेशकर
वीर दुर्गादास - १९६०
https://www.youtube.com/watch?v=QV9JFZ13rmY

आ लौट के आजा मेरे मीत हे त्यांचेच गाणे. वर रानी रूपमती च्या लिंकवर ऐकता येईल. ऐतिहासिक चित्रपटांना त्यांनी मुख्यत्वे संगीत दिले आहे.

जय चित्तोड मधले
ओ पवन वेग से उडने वाले घोडे हे वीररसाचे गाणे ऐका
https://www.youtube.com/watch?v=AKoVPX8ICQs

Rear Gems मधली दुसरी कॅसेट

दे दे मोरा कंगना - राजधानी १९५५ - हंसराज बहल

नदिया के पानी ओ रे नदिया के पानी सवेरा -१९५७ - सैलेश. चित्रण गाण्यातून वाहणार्‍या एनर्जीशी विसंगत आहे किंवा चित्रपट दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक यांच्यात मेळ नाही.

मुझे ना बुला - स्वर्णसुंदरी १९५८ - आदिनारायण राव
कुहू कुहू बोले कोयलिया हे रफीसोबतचं लताचं गीत याच चित्रपटातलं

तेरा खत लेके सनम - अर्धांगिनी १९५९ - वसंत देसाई.
दुसर्‍या कडव्या नंतर इंटरल्युडमध्ये अचानक पायात चपला आल्यात. Lol ध्रुवपद - कहीं पडते है कदम.

ऐ दिल ना जुबाँ ना खोल तू - नाचघर - एन दत्ता

तेरा जादू न चलेगा ओ सपेरे - गेस्ट हाउस -१९५९ - चित्रगुप्त. यातलं दिल को लाख सम्हाला जी हे जरा जास्त ऐकलंय.

तेरे तीर को हमने प्यार से - कैदी न. ९११ - १९५९- दत्ताराम

खोयी खोयी अंखियाँ नींद बिना - चाँद १९५९ - हेमंत कुमार

९ आँखों में तुझको छुपाके सनम - दिल भी तेरा हम भी तेरे १९६० - कल्याणजी आनंदजी . धर्मेंद्रचा पहिला चित्रपट

१० नैनो से नैनों की बात हुई - चंद्रमुखी - १९६० एस एन त्रिपाठी

११ रंग रंगीला साँवरा - बारूद -१९५९ - खय्याम

खय्यामच्या नेहमीच्या पठडीबाहेरचं संगीत. तालवाद्यांचा ठळक वापर. लोकसंगीताची शैली. द्रुत लय. कोरस. पण तरीही क्लास.

१२ मचलती आरजू खडी बाहें पसारे - उसने कहा था - १९६० - सलिल चौधरी

१३ इतना ना सता के कोइ जाने - बिंदिया -१९६० - इक्बाल कुरेशी. राजेंद्र कृष्ण यांचे शब्द किती क्युट!

१४ मोरी छम छम बाजे पायलिया - घुंघट -१९६० रवी
ताजमहल आणि अनारकली मधली बीना राय साडीत वेगळीच वाटते. चित्रपट संगीतावर लिहिणारे लोक रवीचा का अनुल्लेख करतात माहीत नाही.

Pages