मायबोली किंवा तत्सम संवादी संकेतस्थळांवर धागालेखकाने एखादा लेख टाकला तर त्या लेखावरील प्रतिक्रिया या चर्चा व गप्पा या स्वरुपात बनत असतात. त्यावर धागालेखकाचे नियंत्रण असतेच किंवा असावेच असे होत नाही. अन्यथा धागा वा! वा! छान छान! अशा त्रोटक प्रतिक्रियात वा केवळ वाचनमात्र स्वरुपात होतो. धागा भरकटण्याचे डेव्हिएशन किती व कसे असावे याचे साचेबद्ध उत्तर देता येत नाही. प्रत्यक्ष भेटीतही जेव्हा आपण अशा गप्पा मारतो त्यावेळी त्यात बराच विस्कळीत पणा येत असतो. ही काही विशिष्ट औपचारिकतेचे बंधन असणारी न्यायालयातील केस नसते. भरकटण्याचा धोका हा जिवंत धाग्यात असतोच. मूळपदावर गाडी आणावी लागते कधी कधी. कदाचित भविष्यात धागालेखकाला वाचनमात्र असे धाग्याचे स्वरुप ठेवण्याचा पर्याय देणे मायबोली प्रशासनाला गरजेचे होईल. तेव्हाच धाग्याचे भरकटणे थांबेल म्हणजे फक्त ब्रॉडकास्ट स्वरुप. वाचकांचा प्रतिसाद नाही.
प्रतिक्रियांमधे आलेल्या अनुषंगिक व समांतर गोष्टी या मुख्य प्रवाहाला पूरकच बनतात. विचारांची व्याप्ती वाढवतात. कधी कधीतर मूळ चर्चेपेक्षा उपचर्चा वा उपउपचर्चा याच अधिक उपयुक्त वा रंजक होतात. या मधे धागा निश्चित भरकटतो. पण त्या भरकटण्यातून काही वाचकांना आनंदही मिळतो व काही त्यांच्या दृष्टीने उपयुक्त असलेली माहितीही मिळते. आता लेखकाला आपल्या लेखावर वाचकांच्या कुठल्या प्रतिक्रिया याव्यात किंवा येवू नयेत यावर नियंत्रण नसते.पण कुठल्या प्रतिक्रियांना उत्तर द्यायचे व कुठल्या नाही याचे स्वातंत्र्य निश्चित असते. छापील नियतकालिकांमधे संपादकाला लेख व प्रतिक्रिया छापायच्या कि नाही याचे स्वातंत्र्य असते. संकेतस्थळावरही प्रशासकाला/संपादकाला संकेतस्थळाच्या धोरणात कुठले साहित्य वा प्रतिक्रिया बसत नसतील तर ते अप्रकाशित करण्याचा अधिकार राखून ठेवला असतो. फेसबुक सारख्या माध्यमात देखील काही अंशी फेसबुकचे नियंत्रण असते. पण माझी भिंत माझ्या गवर्या हा प्रकार तिथे दिसतो. मनोगत सारख्या काही संकेतस्थळावर धागाकर्त्याचे लेखन हे प्रशासका ने मंजूर केल्याशिवाय ते प्रकाशितच होत नाही. काही साहित्यिक पुस्तक प्रकाशित झाल्यावर त्याचे आकलन चर्चा प्रतिक्रिया समीक्षा सौंदर्य हे वाचकांवर सोपवून मुकत होतात. आता धागा भरकटला आहे का? त्यातील उपचर्चा, उपउपचर्चा या समांतर आहेत की अवांतर हे धागा लेखकाने ठरवायचे, वाचकांनी ठरवायचे कि संपादक/प्रशासकानी ठरवायचे हा ही चर्चेचा विषय होउ शकतो. एखा्दा अकॅडमिक लेख बिंदुगामी ठेवण्याच्या प्रयत्नात रिसर्च पेपर चा रुक्ष फील येतो. त्याची सामाजिक बाजू वा परिणाम हा समांतर पैलू त्या ठिकाणी समांतर न ठरता अवांतर ठरतो. संसदेतील वा टीव्हीवरील चर्चेतही वेळेच्या मर्यादांमुळे तसेच विस्तारभयामुळे सभापती वा ॲंकरला नियंत्रित कराव्या लागतात.
मंडळी नुकतीच कुमार यांच्या धाग्यावर हा विषय आल्याने तो धागा भरकटण्याचा धोका निर्माण झाला म्हणुन मी स्वतंत्र धागा इथे चर्चेसाठी घेतला आहे. असे काही तांत्रिकदृष्ट्या करता येईल का की धागालेखकाला आपल्या लेखावरील प्रतिक्रिया ही प्रकाशित वा अप्रकाशित करण्याचा अधिकार असेल? आपल्याला काय वाटते?
धागा भरकटण्याचा धोका
Submitted by प्रकाश घाटपांडे on 27 June, 2023 - 10:01
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एखाद्या धागालेखकाला जर असे
एखाद्या धागालेखकाला जर असे वाटले की माझ्या धाग्याचा उद्देश फक्त लोकांना माहिती देणे हा आहे. मला फालतू प्रतिक्रिया नको आहेत तर त्याने काय करावे? >>> मला पण खूप वाटतं कि बजाजने आपल्या स्कूटर मधे बटण दाबल्यावर वरती येणारे पंख द्यावेत, ती हवेत उडावी. पण ग्राहक म्हणून मला काय वाटतं यापेक्षा बजाजला काय परवडतं हेच ते पाहणार.
"पर्यावरणाची अवांतरे" सारखे
"पर्यावरणाची अवांतरे" सारखे जनरल "धाग्याची अवांतरे १" असे तीन चार वाहते धागे काढावेत गप्पा वाले.
अवांतराची अवांतरे सुद्धा निघू
अवांतराची अवांतरे सुद्धा निघू शकेल.
एकुण धाग्यांपैकी
एकुण धाग्यांपैकी (राजकारणावरील सोडून) असे रानोमाळ भरकटलेले धागे किती टक्के आहेत? उत्तर नगण्य असावे.
हा वाटतो तितका गंभीर आणि सोडवण्यास उर्जा खर्च करावी असा प्रश्नच नाही. उगा
चर्वि(त?)चरणचर्वितचर्वण (हपा : धन्यवाद. लिहिलेलं बरोबर नाही समजत होतं, पण नक्की काय शब्द आहे आठवत न्हवतं. त्याची फोड केल्याबद्दल धन्यवाद... हेच ते भरकटणे असेल तर मला तरी ते जिवंत पणाचे लक्षण वाटते. आणि त्यानेच माबोवर यावेसे वाटते) करायचे असेल तर ठीक आहे, पण धागे भरकटण्यावर पुरेसा इलाज इथे अगोदरच लागू आहे असं बहुतेकांचं मत दिसतंय. अजुन तरी एकही प्रतिसाद अप्रकाशित करण्याची सोय लेखकाला असवी असा आलेला नाही यातच काय ते समजुन घ्या.प्रत्येक धागा थोडा का होईना,
प्रत्येक धागा थोडा का होईना, भरकटणार. किती भरकटावा, परत मार्गावर यावा की नाही हे धागालेखक आणि प्रतिसादकर्ते यांच्या अवधानावर अवलंबून(हुश्श. माझ्या किपॅड ला दम लागला इतके मोठे शब्द एकामागून एक लिहिल्याने.)
धागा थोड्या प्रमाणात भटकटणे हे धाग्याचे यश असते.म्हणजे धाग्याने लोकांना आजूबाजूला काही गोष्टींवर विचार करायला प्रवृत्त केले.
धागा भरकटू नये यासाठी ची अतिशय कठोर मापनपट्टी लावल्यास तो स्लीपरी स्लोप आहे.लोक अभिव्यक्ती विसरून एक शब्दी 'सहमत, वावा, +1' असे वेळवाचवू प्रतिसाद लिहायला लागतील.हे परत स्वतःच्या ब्लॉगवर लिहिण्यासारखं झालं.जे लोक 'मी माहिती द्यायला धागा काढला, त्यावर हवे नको कोणतेही प्रतिसाद नकोत' म्हणतात त्यांनाही असे धागे काढून काही काळाने 10000 प्लस च्या संकेतस्थळावर असून एकटं वाटायला लागेल.
माबो धागे थोडं, जास्त, बरंच जास्त या विषयांतरासह(पण गुन्हेगारी, मार्केटिंग,हेट स्पीच,धार्मिक तेढ निर्माण करणे, शिव्या आणि अश्या इतर सामान्यतः वर्ज्य मजकुराव्यतिरिक्त) लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य देऊन चालू राहावे ही सदिच्छा.
चर्वि(त?)चरण >> चर्वितचर्वण.
चर्वि(त?)चरण >> चर्वितचर्वण. चर्वित म्हणजे जे चावून झालेले आहे. चर्वण म्हणजे चावणे. चावून चोथा झालेल्याला पुन्हा चावत बसणे किंवा रवंथ करणे म्हणजे चर्वितचर्वण. हे अवांतराचा धोका पत्करून सांगतो आहे.
सदसदविवेकबुद्धी,
सदसदविवेकबुद्धी, नीरक्षीरविवेक असे शब्द टाकून कुणीतरी प्रतिसाद देईल ही अपेक्षा होती.
सदसदविवेकबुद्धी >>
सदसदविवेकबुद्धी >> सदसद्विवेकबुद्धी
सदसद्विवेकबुद्धी >>>
सदसद्विवेकबुद्धी >>>
धागा भरकटवण्याबद्दलची चर्चा त्या त्या धाग्यावर केली जाऊ शकते. प्रत्येक वेळी असे स्वतंत्र धागे काढण्यात काय हंशील नाय. ते काय सर्वकालीन सत्य असू शकत नाही.
त्यापेक्षा बॅकस्पेस ने होणारे घोटाळे अ नंतर त हे अक्षर टंकल्यावर येणारा अगम्य कोड, टंकल्यावर मजकूर वाटेल तसा जस्टिफाय मोड मधे जाणे, शब्द तुटणे यावर धागा काढा राव.
आणखी एक प्रतिसाद टंकून झाल्यावर तो अचानक सिलेक्ट होतो आणि पुढच्या कि स्ट्रोकने डिलीट होतो. रिकव्हर होत नाही. यावर पण उपाय पहावा. आधी वाटले आपलीच चूक असेल, पण इतर ठिकाणाहून सुद्धा सारखाच अनुभव आला.
सदसदविवेकबुद्धी,
सदसदविवेकबुद्धी, नीरक्षीरविवेक असे शब्द टाकून कुणीतरी प्रतिसाद देईल ही अपेक्षा होती>>>>>> मीच असे प्रतिसाद "इंटलेक्चुअली करेक्ट" रहाण्याच्या प्रयत्नात देत असतो. काही राजकारणी कसे पोलिटिकली करेक्ट रहाण्या चा प्रयत्न करतात तसेच काहीसे.

<< भरकटला तर भरकटू द्यावा.
<< भरकटला तर भरकटू द्यावा. सध्या जसे प्रशासक अपवादात्मक परिस्थितीत/ परिस्थिती अगदीच हाताबाहेर जाऊ लागली की हस्तक्षेप करतात ते मॉडेल सगळ्यात जास्त लोकशाहीवादी आणि सर्वांना समान न्याय, लेव्हल प्लेईंग फील्ड देणारे आहे.
लेखकाला/ लेखिकेला प्रतिक्रिया प्रकाशित/ अप्रकाशित करण्याचा अधिकार अजिबातच असू नये. तो एकदा आला की त्या साईट वरचा माझा (कदाचित अनेकांचा) विश्वास उडायला सुरुवात होते. >>
----- अमितव यांच्या प्रतिसादातल्या वरिल भागाशी सहमत.
धागा भरकटला म्हणून बंद करु नये. बहुतेक वेळा धागा भरकटणे हे नव्या धाग्यांना जन्म देण्यासाठी हातभार लावणारे ठरते.
हे अवांतराचा धोका पत्करून
हे अवांतराचा धोका पत्करून सांगतो आहे.>>>>>>>>> धोका कसला हा तर मोका

हाच तो पॉईंट आहे. जिकडे चर्चा
हाच तो पॉईंट आहे. जिकडे चर्चा करुन झालेली आहे. नवं काही लिहिण्यासारखं नाही पण लोकांना लिहिण्यात रस आहे, मग जरा साईडलाईन बडबड चालू होते. या परिस्थितीत लेखकाकडे काही मुद्दा असेल तर तो/ ती चर्चेला वळण लावू शकते.
भरकटवण्याची कोणाला हौस नसते, ते होत रहाते. आता द्या काही वेगळा मुद्दा तुम्ही आणि लावा वळण. नाहीतर या धाग्याचं जीवितकार्य संपलं, समजुन (इतर धागे विणायच्या) कामाला लागा.
पण ग्राहक म्हणून मला काय
पण ग्राहक म्हणून मला काय वाटतं यापेक्षा बजाजला काय परवडतं हेच ते पाहणार.>>>> बजाजला धंदा करायचा आहे. त्याचा उद्देश नफा हा आहे. तो ग्राहकांना काय परवडत याचा विचार करणार. एखाद्या ग्राहकाने कस्टम डिझाईन सांगितले व ते तांत्रिक दृश्ट्या करुन देणे हे बजाज ला शक्य आहे व ग्राहक ही त्याची किंमत मोजायला तयार आहे तर बजाज नक्कीच तशी स्कूटर तयार करुन देईल.
<< त्यापेक्षा बॅकस्पेस ने
<< त्यापेक्षा बॅकस्पेस ने होणारे घोटाळे अ नंतर त हे अक्षर टंकल्यावर येणारा अगम्य कोड, टंकल्यावर मजकूर वाटेल तसा जस्टिफाय मोड मधे जाणे, शब्द तुटणे यावर धागा काढा राव. >>
---- अ function at() {
[native code]
}अ
मला वाटले होते "अ त " हा माझ्याकडे प्रॉब्लेम आहे.
Submitted by प्रकाश घाटपांडे
Submitted by प्रकाश घाटपांडे on 28 June, 2023 - 10:43 >>> दार्शनिक / रूपककथा यांची चिरफाड करायची नसते, त्यातलं मर्म समजून घ्यायचं असतं हे समजलं तर धागे भरकटत नाहीत हो

उदय , या प्रॊब्लेम मुळे मी
उदय , या प्रॊब्लेम मुळे मी कंटाळून अनेक प्रतिसाद रहित केले आहेत
अमित आणि प्र घा >>
अमित आणि प्र घा >>
रघू आचार्य बरोबर! अंदर की बात
रघू आचार्य बरोबर! अंदर की बात समझो हा मुद्दा आहेच. पण इथे असे कस्टम डिझाईन करणे मायबोलीला शक्य आहे का? अर्थात मायबोली सारख्या प्लॅट फॉर्म वापरायला मला पैसे द्यावे लागत नाहीत. पण जर मायबोलीने त्यासाठी "शास्त्रापुरती" सभासद फी आकारली तर किती लोक द्यायला तयार होतील?
एखाद्या धागालेखकाला जर असे
एखाद्या धागालेखकाला जर असे वाटले की माझ्या धाग्याचा उद्देश फक्त लोकांना माहिती देणे हा आहे. मला फालतू प्रतिक्रिया नको आहेत तर त्याने काय करावे?>>
फालतु प्रतिक्रिया असतील तर
१. प्रतिसाद कसा विषयाला सोडून आहे हे दाखवून देणे.
२. तरीही मुद्दाम/समज नसल्याने पिडत असेल तर तसे नमुद करून दुर्लक्ष.
मी प्रतिसाद whatsapp वर
मी प्रतिसाद whatsapp वर लिहितो आणि इथे कॉपी पेस्ट करतो.
या कामासाठी तिथे एक स्वतःचाच रफ ग्रूप बनवला आहे. सारे प्रतिसाद तिथे सेव्ह राहतात. लिहून वाचून एडीट करून शांत डोक्याने इथे टाकता येतात.
मोठ मोठाले धागे असे लिहितो. प्रतिसाद काय चीज आहे ..
हा उपाय कोणाला चालत असल्यास वापरा. सारे प्रॉब्लेम सुटतील
धागा भरकटण्याचा धोका ह्याला
धागा भरकटण्याचा धोका ह्याला धरूनच प्रतिसाद देतो.
माझी अशी सूचना आहे कि वेमाने
१) धागा भरकटवणारे कळीचे शब्द शोधून काढावे उदा, शाहरुख/शाहरुखखान/शाखा, भाजपा/बीजेपी, भविष्य, अंधश्रद्धा, प्रतिगामी,पुरोगामी, अंजीर, अत्तर ... असे अनेक शब्द आहेत कि ज्याचा वास आल्यावर लोकांच्या भावना उद्दीप्त होतात.
२)हे शब्द प्रतिसादात आले तर तो प्रतिसाद आपोआप डिलीट व्हावा.
३)ह्या शब्दांसाठी मवाळ असे प्रतिशब्द शोधून काढावे. उदा शाहरुख/शाहरुखखान/शाखा ह्या साठी "तो महान अभिनेता " इत्यादी.
ह्या साठी सॉफ्टवेअर बनवायला पाहिजे.
प्रघा >> अमितव यांनी थेट
प्रघा >> अमितव यांनी थेट उत्तर दिलेले आहे. मॉडरेशन ही व्यवस्था जिथे असेल तिथे फ्रीच काय पेड युजर्सने सुद्धा काही गोष्टी नियम म्हणून पाळायच्या असतात. सहकारी सोसायटी किंवा अपार्टमेंट मधे प्रशासक मंडळ निवडून दिलेले असते. त्यांचे काही निर्णय पटले नाहीत, किंवा मला विशिष्ट सुविधा हवी असा आग्रह धरणे व्यवहार्य नसते. एखादा मनुष्य जर स्वतः एखादे संकेतस्थळ चालवत असेल तर त्याला येणार्या अडचणींचा विचार करूनच तो सुविधा देणार. ज्या गोष्टी सहजशक्य आहेत त्यांची पूर्तता करावी अशी अपेक्षा ठीक आहे. पण त्यासाठी त्याच्याकडे मनुष्यबळ आहे का, त्याचे रोजचे व्याप काय आहेत हे पण बघावे लागेल. एखाद्याला भलती सलती सुविधा दिली तर त्याचे काय परिणाम होतील याचा अदमास सुद्धा त्यालाच घ्यावा लागेल.
शेजारचेच एक संकेतस्थळ आहे, आक्रमक भाषेत तिकडे मॉडरेशन चालते. न आवडणारे प्रतिसाद आणि युजर्स ब्लॉक होतात. समविचारी सदस्य तुटून पडतात. त्यामुळे तिकडे न फिरकणारे सदस्य मोठ्या संख्येने आहेत. कदाचित कोषात रमणे त्यांना मान्य असेल, पण त्यामुळे जर तिथे एखादा उत्तम धागा निघाला तरी त्याची रीच खूपच मर्यादीत होऊन जाते. सात ते आठ वर्षे त्या संकेतस्थळावर फिरकलेलो नाही.
हे जर प्रशासकांना हवे असेल तर मग चालतंय काय पळतंय की !
बजाज नक्कीच तशी स्कूटर तयार
बजाज नक्कीच तशी स्कूटर तयार करुन देईल.>> हो हो . त्या महान आणि जगप्रसिद्ध अभिनेत्याकडे अशी एक स्कूटर आहे असे ऐकले आहे.
ह्या शब्दांसाठी मवाळ असे
ह्या शब्दांसाठी मवाळ असे प्रतिशब्द शोधून काढावे. उदा शाहरुख/शाहरुखखान/शाखा ह्या साठी "तो महान अभिनेता " इत्यादी.
ह्या साठी सॉफ्टवेअर बनवायला पाहिजे.
>>>>
अभिनेता या ऐवजी सुपर्रस्टार हा शब्द सुचवतो.
का तो अभिनेता नाहीये अस
का तो अभिनेता नाहीये अस म्हणायचे आहे का?
अभिनेते खूप आहेत..
अभिनेते खूप आहेत..
सुपर्रस्टार तो एकमेव..
अभिनेता म्हणून त्याचे मूल्य मापन कराल तर त्याची महानता कशी समजेल.. बरेच लोकं हीच चूक करतात..
वेगळ्या धाग्याचा विषय आहे हा..
महानता >> महत्त्व
महानता >> महत्त्व
रघू आचार्य, विस्तृत प्रतिसादा
रघू आचार्य, विस्तृत प्रतिसादा बद्दल धन्यवाद! यावरुन एक आठवण आली. मिपा चे संस्थापक तात्या अभ्यंकर जेव्हा प्रतिसादाच्या वरुन होणार्या वादावादी बाबत जेव्हा संकेतस्थळाचे चालक या नात्याने भूमिका घेत त्यावेळी त्यांनी "चपला" हा शब्द प्रचारात आणला. म्हणजे ज्यांना इथले खुले धोरण मान्य नाही वा इथल्या प्रतिक्रिया पटत नाहीत त्यांनी चपला घालून बाहेर पडावे. त्यांना कसे ही करुन तुम्ही इथे लिहा असे आमंत्रण दिले नाही अशी कठोर भूमिका घेतली. त्यांचे अकाली निधन झाले नंतर हा भाग वेगळा. साधारण २००८-०९ ची गोष्ट आहे. मूळात मिपा हे मनोगताच्या शुद्धलेखनाच्या व मॉडरेशनच्या जाचातून वैतागून निर्माण केले होते. मनोगत, मायबोली,मिसळपाव, ऐसी अक्षरे काही काळ मी मराठी या संकेतस्थळांचे समर्थक एकमेंकांना डिवचत असत. आपापले पूर्वीच हिशोब चुकता करीत असत. माझे एक सायंटिस्ट मित्र गंभीर प्रकृतीचे लेखन करतात. एखाद्या सायंटिफिक जर्नल सारखे त्याचे स्वरुप असे. उत्तम माहितीचा समुच्चय त्यात असे. पण त्याला प्रतिसाद येत नसत. तेच त्यांनी मौजमजा या सदरात लेखन केले की मग प्रतिसादांची संख्या एकदमच वाढत असे. मी त्यांना सांगे कि तुमचे लेख वाचल्यावर माहिती मिळाली एवढेच वाचकाचे समाधान असते त्या मुळे प्रत्येक वेळी काय वा वा छान लिहायचे. शिवाय तुम्ही प्रतिक्रिया देताना संवादी सूर ठेवत नाही त्यामुळे वाचकही आत्मियतेने प्रतिक्रिया देत नाही. याचा अर्थ असा नाही कि तुमचे लेख दर्जेदार नसतात. शिवाय त्यांचे लेख ही संख्येने प्रचंड असत. असो या निमित्त आठवण आली म्हणुन लिहिले.
उपक्रम नावाचे एक संकेतस्थळ
उपक्रम नावाचे एक संकेतस्थळ होते. चर्चा कशी असावी याचा वस्तुपाठ तिकडे मिळायचा.
Pages