चवीच्या शोधात ..

Submitted by छन्दिफन्दि on 17 June, 2023 - 01:50

अमेरिकेला पहिल्यांदा जिथे राहायचो त्याच्या बरोबर समोरच्या कॉर्नरला McDonalds होत. अगदी इतक्या जवळ असूनही कधी जायचा प्रसंग आला नाही. "तिकडे veg काहीच नाही मिळत" पासून "अत्यंत सुमार दर्जाचे meat वापरतात, आरोग्याला हानिकारकच म्हणा ना !" पर्यंत अनेक सबबी समोर आल्या आणि दर्शन टळले .
मॅकडोनाल्ड'स चा पहिला परिचय झाला तो साधारण १९९६-१९९७ मध्ये. कॉलेज पासून काही अंतरावर वाशीजवळ कुठेसं आलं होतं. "McD ..McD केवढं ते अप्रूप " तेव्हा वाढदिवसाच्या पार्ट्या वडापाव/ दाबेली /समोसा/ आइस-क्रीम गेला बाजार पाव भाजी अशा असत. पण ग्रुप मधल्या कोणी बर्थडे पार्टी McD मध्ये द्यायची घोषणा केली. झालं बस वगैरे करून गेलो तिकडे. त्यांचा मॅस्कॉट, चकचकीत काचा, युनिफॉर्म मधले employees सगळंच जरा पॉश वाटलं . "Mc aloo टिक्की " आणि मिरिंडा (बहुतेक ते पण १ बाय २ असेल) घेतलं. lettuce , mayonese , एक टोमॅटोची चकती, दोन onion रिंग्स आणि patty. काहीतरी १०-१२रु ना असेल, म्हणजे वडापाव च्या चौपट महाग .
मग त्यानंतर निमित्ता निमित्ताने McD मध्ये जाणं होत राहिलं. शेवटचं, जेव्हा टाकून कस द्यायचं म्हणून नको असताना एकावेळी तीन Mc आलू टिक्की खाल्ल्यावर आता हार्ट बंद पडतंय का काय असं काहीसं वाटून जीव घाबरा घुबरा झाला ते.
Subway जरा उशिरानेच आलं . साधारण २००७-८नंतर. ब्रेड ह्या प्रकारची अत्यंत चाहती असल्यामुळे जवळच्या मॉल मध्ये सबवे आल्याचं ऐकताच लवकरात लवकर मोका साधून गेलेच तिकडे. येवढा मोठा फुटलोन्ग ब्रेड आणि त्यात आपण सांगू ते ते, काकडी, टोमॅटो पासून cheese पर्यंत हवं ते टाकून मिळालं . "गार असलं म्हणून काय झालं, काय फ्रेश आहे !", "बटर वगैरे unhealthy गोष्टी अजिबात नाहीत" "ब्रेड पण किती वेगळा आहे, फायबर पण खूप आहे " नेहेमीच्या सॅण्डवीच च्या तिप्पट किंमत मोजताना हि भलामण तर करायलाच लागली.
इथे अमेरिकेत आल्यावर कधीतरी (नाईलाजाने) subway मध्ये गेल कि जाणवतं "किती थंडगार आणि बेचव सॅण्डवीच आहे " "यार प्रीती सॅण्डवीचची एक शाखा इकडे काढायला पाहिजे काय मजा येईल. मस्त पुदिन्याची हिरवी चटणी लावलेलं, अमूल चीज घातलेलं, अमूल बटरवर grill केलेलं sandwitch खायला घालायला पाहिजे ह्यांना म्हणजे आपण सँडविच म्हणून काय खाऊ घालतो लोकांना हे कळून धाय मोकलून रडायला लागतील " आमचं स्वप्नरंजन चालू.
आता इकडे मात्र गजानन,राजमाता,कुंजविहारी,सागर, कॅनॉन, मामलेदार ह्यांच्या आठवणी( आणि चवी) उजाळत वडापाव, दाबेली, पाव-भाजी, मिसळ-पाव ह्यातलं काहीही तिकडच्या चवीच्या १०-२०% जरी जवळ जाणारं बनवणारं कोणी असल्याचा जरा सुगावा लागला की आम्ही मैलोन्मैल ड्राईव्ह करत जातो त्या चवीच्या शोधात...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हॉटेलवाले झणझणीत चवीचे पदार्थ का ठेवत नाहीत? गिऱ्हाईक येत नाही का? >>>
इकडे साधारण खूप फिक्कट म्हणजे कमी तिखट कमी मसालेदार पदार्थ खाल्ले जातात.
काही (दुर्मिळ )इंडियन हॉटेल्स मध्ये झणझणीत पदार्थ मिळतात.
चार एक पूर्वी इकडे अन्नपूर्णा हे एकच वडा पाव मिळणारे ठिकाण होते. पण अलीकडे मराठी पदार्थांची ७-८ हॉटेल्स झालीयेत

हॉटेलवाले झणझणीत चवीचे पदार्थ का ठेवत नाहीत? गिऱ्हाईक येत नाही का? >>> हे स्वराज वरती अदिति ने सांगितलेलं , त्यांच्याकडे तर खूप झणझणीत मिळत..

त्यांची कांदा भाजी आणि पीयुष खूप छान आहे>> कांद्याची पीठ पेरून भाजी करतात ती का? मस्त लागते. बरोबर भाकरी नाहीतर गरम पोळी, खर्डा.