अरेंज मॅरेज, अजुन एक किस्सा - ताटातलं वाटीत.. !

Submitted by छन्दिफन्दि on 15 June, 2023 - 02:58

“ट्रिंग ट्रिंग .. ट्रिंग ट्रिंग “
“मधुरा, डेस्क वरची रिंग कधीची वाजतेय. घे ना फोन. “
“हो हो “ म्हणत एका हाताने सेंड क्लिक करत दुसऱ्या हाताने तिने रिसिव्हर कानाला लावला.
“मधुरा ?”
“कोण बोलताय आपण ?” आवाज फारसा ओळखीचा तर वाटत नाहीये, ती मनाशी पुटपुटली.
“मी, मिलिंद. थोडं बोलायचं होत. स्वाद मध्ये येऊ शकाल का सहा वाजता?”

मिलिंद ?? ओह रविवारी बघायला आलेला. म्हणाव तर साधा म्हणावं तर तरतरीत अस काहीस मधलच व्यक्तिमत्व. तिने आवडलाय कि नाही ह्याचाही विचार केला नव्हता. आई बाबांच्या तगाद्यापोटी तुला हे कार्यक्रम करावे लागत होते.

तस तर आई-वडिलांनी पूर्ण मोकळीक दिलेली. पण अजुनही कोणी कधी क्लिक झाले नाही किंवा त्या दृष्टीने विचार केला नाही म्हणा पण आता तिच्यावर हे वर संशोधन करायचे काम लादल गेल होत. भानावर येत ती म्हणाली,
“का बर ?”
“भेटल्यावर सांगतो. प्लीज नाही म्हणू नको … “
त्याचा आवाज इतका प्रांजळ होता की पटकन तिला नाही म्हणवले नाही.

***

स्वादच्या बाहेरच मिलिंद उभा होता. फिक्कट निळा शर्ट, सडसडीत अंगकाठी, सावळा रंग बहुदा नियमित व्यायाम करत असावा. उगाच तिने डोकं चालवलं.

“दोन चहा “ तिनेच ऑर्डर दिली, “चालेल ना ?”
“हो हो “

“मला तुझ्याशी एक महत्वाचं बोलायचंय. रविवारी आपण भेटलो पण आपल्याला बोलायला जेम तेम अर्धा तास मिळाला. तरीही त्या अर्ध्यातासात मला जे जाणवलं त्यावरून तू थोडी स्पष्टवक्ती, सरळमार्गी , स्वतंत्र विचारांची मुलगी वाटतेस. आणि मनापासून सांगतो मला तू खरंच आवडलीस. “

“मी अजून तितकासा विचार नाही केला पण आतापर्यंत नाही म्हणायला कारणही नाही सापडलंय हे हि खरंच.“ ती मिश्किल हसत म्हणाली.

“तू तुला हवा तेव्हढा वेळ घे. पण तुझ्या कानावर घालायचं होतं. कदाचित माझे वडील गावाहून तुझ्या घरी फोन करतील… “ चहाचा घोट घ्यायच्या निमित्ताने तो मध्येच थांबला.

मधुराला त्याच्या चेहऱ्यावर सांगू कि नको हे प्रश्नचिन्ह अगदी स्पष्ट दिसत होत.
“किती विचार करतोस? सांग काय सांगायचं ते .. “ तिच्या तोंडातून नकळत बाहेर पडल.

चहाच्या वाफेने त्याच्या चष्म्यावर एक अस्पष्ट पडदा चढला. तो पुसायला त्याने चष्मा काढला. त्याचे बोलके डोळे, लांबसडक बोटे…
“हम्म हा अगदीच काही वाईट नाहीये. बोटांवरूनआठवलं की पेटी पण वाजवतो वाटतं? “ मधुराचं मन रविवारच्या भेटीची क्षणचित्रे आठवू लागल.

इकडे मिलिंदचाही धीर एकवटला.
“माझे आई-बाबा, विशेषतः बाबा थोडे जुन्या आणि कर्मठ विचारांचे आहेत. गावाच्या बाहेर स्वतः कधी पडले नाही पण मुलाला शिकवलं. तर त्यांना माझ्या लग्नात तो सगळं खर्च भरून काढायचा आहे. मला हे अजिबात मान्य नाही आणि ह्याची पूर्ण कल्पना आहे की शिकली सवरलेली, कोणतीच स्वाभिमानी मुलगी ह्याला तयार होणार नाही’. पण मग माझे वडील हे सर्व मान्य असणाऱ्या कोणातरी मुलीबरोबर माझं लग्न लावून देतील. मला तर अशा स्वतःची मते नसलेल्या मुलीशी लग्नच नाही करायचे. कल्पना आहे हे सगळं तुझ्या आकलनाच्या पलीकडचं असू शकतं. तुला मी आवडलो असेल तर प्लीज हो म्हण. माझे बाबा काही रक्कम मागतील, किंवा लग्न असं करून द्या तस करून द्या वगैरे म्हणतील. जे ऐकून तुम्ही रागवाल, संतापाल. पण खात्री बाळग मला ह्याची आधीच कल्पना होती म्हणून मी गुपचूप पैसे साठवूंन ठेवलेत. तुम्ही त्यांना हो ला हो करा. त्यांच्या सगळ्या अटी मान्य करा. मी साठवलेले सगळे पैसे त्यासाठी खर्च करेन पण त्यांना हे पैसे मी खर्च करतोय हे सांगू नका. कारण त्यांना समजावणे म्हणजे दगडावर डोके आपटणे आहे. “
एका दमात मिलिंद बोलून मोकळा झाला.

ही संध्याकाळ एक वेगळच वळण घेत होती. एखाद्या चित्रपटाच्या कथेत शोभून दिसेल असे काही प्रत्यक्षात घडत होते. आधी सहजच म्हणून भेटायला तयार झालेली मधुरा मिलिंदच्या त्या प्रांजळ बोलक्या डोळ्यांत, पोट तिडकीने बाबांच्या कर्मठपणा विषयी बोलण्यात , मुख्य म्हणजे धीर एकवटून हे सगळं काहीशा अनोळखी मुलीला सांगण्यात तिला त्याच एक हवंहवंसं रूप दिसायला लागलं.

“पण मग पुढे काय आणि कसं होईल ?” परत तिचं तोंड डोक्याच्या आधी धावलं.

“ आई बाबा गाव सोडून कधी शहरात येत नाहीत त्यामुळे तू काळजी करू नकोस. कधी गावाला गेलो तर माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला पश्चातापाची वेळ येऊ देणार नाही.” मिलिंद कळकळीने बोलत होता.

***
दोन महिन्यांनी
एकुलत्या एका लेकाचं लग्न धुमधडाक्यात आपण सांगितल्या प्रमाणे लावून दिल म्हणून खुश असलेले तिचे सासरे, भरगच्चं नोटांनी भरलेलं वरदक्षिणेच पाकीट बघून लाळ टपकत होते.

इकडे लालची सासऱ्याकडे बघत खुदु खुदु हसणाऱ्या मधुराला मिलिंद डोळ्यांनीच गप्प करू बघत होता.

तर मधुराचे आई-बाबा त्यांच्या लाडक्या लेकीचं अजब जावयाबरोबरच गजब लग्न बघत सुखावत होते.

तळटीप- ही गोष्ट एका कानगोष्टी करत ऐकलेल्या खऱ्या गोष्टीवर आधारित आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निर्णयाची किंमत मोजली ५ वर्ष (ऐन उमेदी्तली)>> समजतंय का काय लिहिताय! कोणी पर्सनल अनुभव लिहिला असेल तर त्यावर इतक्या खालच्या थराला जाऊन कमेंट!>>>> परत तेच चुकीचं interpretation
In the ideal situation she need not have to go through it, it s price that she needed to pay just because of this system it wasn't easy for her. And that's a shame
She deserved way better than this

त्या दुटप्पी वागण्याचा जास्त वैताग येतो. >>> तुमचे मुद्दे मांडून खाली बसा ना. पटवून देणे हा उद्देश का आहे ? मतभेदावर थांबता येतं. एकमेकांवर दोषारोप नकोत. ऑनर किलिंगच्या केसेस होतात. पण त्याची टक्केवारी सर्रास नाही हा मुद्दा असायला हवा. ऑनर किलिंग च्या केसच्या चर्चा होणारच. त्याने प्रोजेक्शन वेगळ्या पद्धतीने होते. सर्रास घडत असते तर कुणीही पळून गेले नसते. दुर्मिळ घटनांना सामाजिक रूढी समजले जाते.

हुंडा घेणे अयोग्य आहे. पण त्यामुळे सर्रास हुंडाबळी होत असेल असे समजणे हे पण चुकीचे आहे. रिस्कचा मुद्दा चुकीचा नाही. पण या केसमधे मुलाला त्याचा अंदाज असेल.

तेच पळून जाऊन लग्न करण्याबद्दल. एकदा लग्न करून आल्यानंतर काही काळाने धुसफूस बंद होते. आता गेल्या काही वर्षात वातावरण बदलले असेल तर कल्पना नाही.

“ वडीलांच्या कल्पना चुकीच्याच आहेत ना ? … असा विचार केला जातो.” आचार्य, तुमचा अँगल पटला नसला तरी समजला.

“ प्रेमविवाह सुद्धा फसवणूकच होईल या व्याख्येनुसार.” - हे कसं ते नाही कळलं.

घरातलं म्हातारं जुन्या वळणाचं आहे हे माहिती असतं. कित्येकदा घरातले लोक हसत पण असतात. मी एका मित्रासोबत टेंभुर्णीला मुलगी बघायच्या कार्यक्रमाला गेलो होतो. सगळं मनासारखं घडत होतं. पण मधेच मुलाचा आजा पचकला "आमचा मुलगा इंजिनीअर आहे, किती देणार ते सांगा". सगळे हसायला लागले. मुलाच्या काकाने म्हातारं आहे जुन्या वळणाचं, टेन्शन घेऊ नका असे सांगितले.

अशा माणसाची हुंड्याचे पैसे मुलीला देऊ का परवानगी काढून लग्न करण्यात अर्थच नाही.
प्रेमविवाहात पण अशा लोकांची संमती नाही म्हणून ते करायचं नाही हाच न्याय होईल ना ? कारण जर पळून जाऊन लग्न केलं तर ते अशा आई वडीलांची फसवणूक ठरते. आम्ही पळून जाणार आहोत हे जाहीर न करताच तर पळून जातात. म्हणजे खोटं बोलणं आलंच.

सतत दुसऱ्यांना तुम्ही काय करा किंवा कसं लिहा अस सेल्फ-सेंसोरींग करू नका. आचार विचार विहार स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे ह्याच थोड भान असू द्या

Submitted by छन्दिफन्दि
एकदम सहमत
तुम्ही तुम्हाला आवडेल तेच लिहा .

“ प्रेमविवाहात पण अशा लोकांची संमती नाही म्हणून ते करायचं नाही हाच न्याय होईल ना ?” - पण प्रेमविवाह सर्वसंमतीनं होतात कि. प्रत्येक प्रेमविवाह हा विरोध डावलूनच होतो असं नाही. पण चर्चेसाठी असे प्रेमविवाह जरी बघितले तरिही, जोडीदाराची फसवणूक न करता, परिणामांची जवाबदारी स्विकारून, विरोधाला न जुमानता लग्न केलं तर त्यात फसवणूक कुठे आहे?

आता महाराष्ट्रात हुंडा हा प्रकार बंद झालेला आहे.
त्या मुळे ह्या कथेत असा पण काही दम नाही.
मुलाचे आई वडील स्वतः चांगल्या आर्थिक स्थिती मध्ये असतात.
घर,स्थावर संपत्ती ही बापानेच कमावलेली असते आणि ती विकून बक्कळ पैसा येवू शकतो.
सुनेच्या दीन चार लाख रुपयाचे कोणाला कौ
इंटरेस्ट नसतो.
मुलांवर आई वडील करोडो रुपये खर्च करतात तेव्हा ती 30/40 हजार महिना कमावण्याच्या लायकीची होतात.

मुलांचा संसार नीट चालवा इतकीच अपेक्षा असते.
कथेतील एक पण प्रसंग आज च्या महाराष्ट्र च्या स्थिती शी जुळत नाही.

पण प्रेमविवाह सर्वसंमतीनं होतात कि. प्रत्येक प्रेमविवाह हा विरोध डावलूनच होतो असं नाही. >>> जिथे पळून जावं लागतं त्या बाबतीत.

त्रयस्थ पणे बघितल तरी
ही नायिका आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र, शिकलेली, स्वतः ची स्वतंत्र मते असलेली, आणि अर्थात रिस्क taker आहे. ती त्याला ताडत जात्ये, पारखत्ये. त्यामुळे हुंडाबळी खूप लांब राहिलं शी इज capable of handling the situation. That's my thought

प्रेयसी चे qualification वेगळे असते आणि बायको साठी qualification वेगळे असते.
त्या प्रेमाने .
प्रियकर चे qualification वेगळे आणि नवऱ्याचे वेगळे.
प्रेम विवाह ,प्रेम विवाह ह्या मध्ये अडकू नका.

नायिका शिकलेली आहे नोकरी करून पैसे कमावते .
आणि नायक काय अडाणी आहे आणि भीक मागून पोट भरत आहे का.
नायिका पेक्षा नायक नक्कीच जास्त शिकलेला आणि जास्त पैसे कमावणार आहे

पळून जाऊन केलेल्या प्रेमविवाहात घरच्यांच्या विरुद्ध सरळसरळ उभं राहणं असतं. इथे मुलगा ते धैर्य दाखवू शकत नाहीये.
छन्दिफन्दि, तुमच्या माहितीत असा प्रसंग खरोखरच घडला असेल आणि नंतर सगळं सुरळीत पार पडलंही असेल. (म्हणूनच तुम्ही ही गोष्ट लिहिली.) पण त्रयस्थपणे बघितलं तर मुलीने मोठी रिस्क घेतली असंच मलापण वाटतं. ठरवून केलेलं लग्न आहे म्हणून अधिकच. आधीपासूनची मैत्री असेल, प्रेमविवाह असेल तर विश्वास ठेवणं एक झालं आणि एकदोन भेटींमधे असा निर्णय घेणं वेगळं.

पळून जाऊन केलेल्या प्रेमविवाहात घरच्यांच्या विरुद्ध सरळसरळ उभं राहणं असतं. >> मान्य.

छन्दिफन्दि, तुम्ही वाळवी मला खूप ऊत्कृष्ठ वाटला हे आणि माझ्या या फसवणूकीवरची मते यांचा जो संबंध जोडला, वाळवीच्या धाग्यावरही जो प्रतिसाद दिलात, आणि इथेही जसे प्रतिसाद देत आहात ते बघून असे वाटते की आपण ही चर्चा फार पर्सनली घेत आहात. असे करू नका.

तुम्ही तुमची कथा पॉजिटीव्ह नोटवर संपवलीत.
पण वाचक तिथेच थांबले नाहीत.
का?
कारण .... and they live happily ever after असा विचार ते करू शकले नाहीत. पुडे हिचे काय होणार ही चिंता डोक्यात येतेच.

सौ बात की एक बात
मी एका मुलीचा बाप आहे. उद्या माझ्या मुलीच्या बाबत अशी केस घडत असेल तर मी बिलकुल अशी रिस्क घेणार नाही.
आणि ती का घेणार नाही याचीच कारणे माझ्या आधीच्या प्रतिसादात लिहीली आहेत.

21 वर्ष पूर्ण झाल्यावर मुलगा किंवा मुलगी स्वतःचा निर्णय घेवून विवाह करत असतील तर तो त्यांनी घेतलेला त्यांचा निर्णय आहे.
तेवढी निर्णय घेण्याची त्यांची क्षमता दोन्ही बाजू च्या पालकांनी मान्य केला पाहिजे .
हे योग्य समजू.
पण निर्णय मात्र लग्न करण्या पुरताच मुल मुली घेतात .
पण जबाबदारी घेण्याची अक्कल मात्र शून्य असते.
त्या साठी मग ह्यांना पालक लागतात.
राहण्यास घर पालकांचे .
घरातील सर्व साहित्य पालकांचे .
ही पण अपेक्षा ठेवतात.
हे दोन्ही परस्पर विचार च अयोग्य आहेत.
लग्न स्वतःच्या हिम्मती वर करत आहात तर जबाबदारी पण तुम्हालाच घ्यायची आहे.
काही बिघडले तर पालकांची मदत घेण्यास मात्र येवू नये.
ही पालकांची रास्त अपेक्षा असते. ह्यांची निवड चुकीची आहे आणि हे जोडपे सुखी राहू शकत नाही अशी पालकांना भीती वाटते म्हणून ते प्रेम विवाह ना विरोध करत असतात

>>> exactly हेच आधी म्हंटल असतं तर
तुम्हाला तुमच्याच बबलमधले प्रतिसाद अपेक्षित असल्याचं तुम्ही आधी सांगितलं नाहीत - उलट अगदी मागच्या पानापर्यंत तुम्ही ‘मतांतरं असायचीच, लगे रहो’ असं म्हणत होतात. नंतर अचानक त्या भावनेला वाळवी लागली. Proud

>>> मला तुमच्या anumodanachi आवश्यकता भासली नव्हती.
हे खरं नाही. तसं असतं तर तुम्ही लेख वहीत लिहून घरात ठेवला असतात - पब्लिक फोरमवर टाकण्याचा उद्देश इतरांचे अभिप्राय मिळावेत हाच असतो. तुम्हाला तर फक्त अनुमोदनाचीच अपेक्षा/आवश्यकता होती असं तुमच्या त्राग्यावरून दिसतं आहे. Proud

प्रतिकूल अभिप्राय उंटावरून शेळ्या हाकणारे आहेत म्हणालात. मला अनुकूल अभिप्रायांतसुद्धा वैयक्तिक अनुभव लिहिलेले दिसले नाहीत. इतकंच कशाला, मुळात तुमची कथादेखील कानगोष्टींवर आधारित म्हणजे उंटावरूनच लिहिलेली आहे की!
खुद ऊँट पर बैठनेवाले दूसरों के ऊँटोंपर पथ्थर नहीं फेंका करते - तो दुटप्पीपणा झाला. Proud

कोकणातल्या सर्व नद्या समुद्राला जाऊन मिळतात त्याप्रमाणे काहींचे कोणताही विषय हा मानवी पुनरूत्पादनाकडे (व्हाया चमचमीत रेसिपी) नेण्याचे कौशल्य वादातीत आहे. Proud

उद्या जर एसएससी कि आयसीएसई/सीबीएसई असा विषय आला तरीही एसएससी मधून शिकलेल्या मुलापेक्षा इतर दोन मधून शिकलेल्या मुलाला चांगले पॅकेज मिळू शकते ( आणि उलट). त्यामुळे त्याला मनासारखी मुलगी मिळण्याची शक्यता जास्त असा संबंध जोडला कि झाले. Lol

ह्या लेखिका बाईंचे वास्तव वेगळे असल्याने त्यांच्या लेखावर प्रतिसाद द्यायचे नाहीत. आपल्या टोकदार प्रतिसादामुळे कोणाचा लिहायच्या उर्मी विरू नयेत हीच सदिच्छा आहे. परंतु ह्या लेखावरील पहिली प्रतिक्रिया अगदी ओ नो असे कोन करेल अश्या उत्स्फुर्त पणातून दिली गेली. मी प्रथम पासूनच महिला आर्थिक सक्षमी करणा च्या बाजूने आहे. प्रेम लग्न संसार सासरचे काही ही होवो मुलगी आर्थिक बाबीं मध्ये सक्षम पाहिजेच. हे नॉन निगोशिएबल मला वाटत आले आहे. तिच्या कडे त्या साठी शिक्षण पाहिजे व शिक्षण पूर्ण झाल्यावर वर्क एक्स्पिरिअन्स पण हवा. मग लग्नाचे पुढचे पुढे. व हा अ‍ॅडल्ट मुला मुलींचा पूर्ण पणे वैयक्तिक निर्णय आहे व असला पाहिजे हे ही माझे मत आहे. त्यांच्या कडून होकार आला की पालक म्हणून आपण आपल्या ऐपती प्रमाणे किंवा थोडे लाड किंवा कौतूक म्हणून जास्त खर्च सोसून छान लग्न करून द्यायचे. व पुढे नव्या संसारात लागली तर व तेव्हाच मदत करायची असे मी ठरवले आहे. एका लाइन पुढे तुमचे पालकत्व दामटायचे नाही. हे नमनाला घडाभर तेल झाले पण वैयक्तिक वैचारिक बैठक स्प ष्ट केली.

अमितव, मी_अनु, बाई व रुनमेष प्रतिसाद आवडले. +७८६.

============================================================================
भारतातील हुंडा प्रति बंधक कायद्याची ( १९६१) पीडीएफ उपलब्ध आहे. ही लिंक
https://www.indiacode.nic.in/bitstream/123456789/5556/1/dowry_prohibitio...

=============================================================================

वैयक्तिक अनुभव लिहिते. मुलगी उपवर आहे. अजून वधुवर सूचक संस्थेत नाव नोंदवले नाही कारण नोकरीत स्थिर होणे चालू आहे. त्यात अ‍ॅडिशनल स्ट्रेस नको व तिने अजून नाव नोंदवाअयला होकार दिलेला नाही. ही कथा वाचून मी तिला विचारले की समजा असे स्थळ आले.
मुलगा चांग्ला आहे पण सासरा पैशाचा लोभी आहे तर मुलगा मी स्वतःच पे करतो म्हटला माझ्या अकाउंट मध्ये पैसे टाकतो व मी सासर्‍याच्या नावाने चेक काढायचा तर तुला चालेल का? तर तिचे उत्तर १००% नाही असेच आले.

अगदी दूरचे नातेवाईक असतील तरी सुद्द्धा इतर फॅमिली मेंबर च्या इच्छे नुसार किती तडजोड कराय्ची ह्याला मर्यादा आहेत. व एकदा एका खोट्याला ओके केले की पुढे काय काय विचारतील अशी शंका येते. शिवाय हे प्रेम लग्न पण नाही तिथे ही मी(स्वतं: ) नाहीच म्हटले असते कारण प्राय मरी रिलेशन शिप मध्ये फसवणूक अ‍ॅक्सेप्टेबल नाही. अ‍ॅरेंज्ड मॅरेज मध्ये तर अशी तड जोड करायची काहीच गरज नाही. हे तिचे मत व्यक्त झाले.

तिने अजून एक फंडा काढला: जर तो असे म्हटला की तू तुझ्या सेविन्ग मधून आत्ता दे मग मी तुला परत करतो. तर काय? मी काही माझे पैसे देणार् नाही वाट बघ. हे एक उदाहरण झाले पण नाते सुरू होतानाच बिग व्हाइ ट लाय ने सुरू झाले की पुढे काय काय करावे लागेल? परत असे ही नाही की एकदा पे आउट केले, की सासूसासरे परत काँटॅक्ट नाही. तुकडा पडला. कधी तरी हे बाहेर येउ शकते. मग रिलेशन शिप मध्ये क्लेश सुरूच होतील.
=================================================================================
आमची मते कथेतील विषया बद्दल आहेत. तुम्ही लिहीत राहा.

लिहा हो - तुम्ही पाहिलेलं वास्तव तुम्ही लिहा.

भरगच्च पाकीट बघून लाळ गाळणाऱा सासऱा, त्याचा मुखदुर्बळ जुगाडू मुलगा, पदराआड खुदुखुदू हसणारी सून आणि कशी का होईना, उजवली एकदाची म्हणून सुखावणारे तिचे आईवडील हे चित्र २०२३मध्येदेखील ज्यांना गोऽऽड वाटतं त्यांना त्यांचा बबल लखलाभ, आम्हाला आमचा! >>>> ह्या तुमच्या addtions घातलेल्या superiority complex लपकणाऱ्या reply la dilal Uttar ashe

जे reply tumhi शोधत आहात असा माझा अंदाज आहे ते इकडे नाहीत दुसऱ्या प्लॅटफॉर्म वर आहेत.

माझ्या माहितीप्रमाणे अनुमोदन म्हणजे परवानगी

आणि सोशल मीडिया वर मिळतात किंवा अपेक्षित सतत ते अभिप्राय तो एक हेतू असतोच पण लिखाण समान आवडीच्या लोकांबरोबर शेअर करावे असाही असतो.
त्यात सहवाचकांच्या परवानगीची अपेक्षा नसते.

लेखिका बाईंचे वास्तव वेगळे असल्याने >>> तुम्हाला कथेतील म्हण्याचे आहे का??

त्यांच्या लेखावर प्रतिसाद द्यायचे नाहीत. आपल्या टोकदार प्रतिसादामुळे कोणाचा लिहायच्या उर्मी विरू नयेत हीच सदिच्छा आहे.>>> त्याची काळजी नसावी!

परत परत तेच उगळण्यात काही अर्थ नाही तरीही सांगते.
प्रतिकूल मते याला विरोध नाही.
त्यात जे नाही ते आपल्या मनाने टाकून त्या swayanrachit कल्पना त्या कथेत आहेत असे भासवून त्यावर विटा रचत जाणे ह्याला आहे.

23 वर्ष उच्च शिक्षण पूर्ण होण्यास त्या नंतर नोकरी .
चांगली नोकरी लागे पर्यंत वय वर्ष 25 होते.
त्या नंतर तो किंवा ती मुलगी आर्थिक बाबतीत settle होणार.
घर घेणार.
गाडी घेणार.
बँक बॅलन्स तयार करणार .
तो पर्यंत वय 32 पर्यंत गेलेले असते.
मुलींची अपेक्षा.
नवरा उच्च शिक्षित हवा.
चांगल्या नोकरीला हवा.
कुटुंब पासून वेगळा हवा.
मुंबई ,पुण्यात फ्लॅट हवा.
गाडी असावी.
निर्व्यसनी असावा.
आता इतके सर्व स्वतःच्या मेहनतीवर मिळवण्यासाठी मुलाला आयुष्याची नोकरी लागल्या नंतर च 15 वर्ष तरी खर्ची करावी लागणार.
म्हणजे तो मुलगा ३५ ते ४० पर्यंत पोचलेला असणार
उतरत्या वयात लागला असणार त्या नंतर किती आयुष्य राहिले वीस एक वर्ष.
मुलींना काही करायचे नसते.
अहा स्वप्नातला राजकुमार तयार होई पर्यंत मुली चे वय पण तितकेच ३५ पर्यंत गेलेले असते .
म्हणजे उतरते वय च असते तिचे पण.
आणि त्या वयात पोचले आणि लग्न ठरण्याची शक्यता पूर्ण मावळली की सर्व अटी एक एक करत शिथिल होतात.
Expired date जवळ जवळ येत असते.
त्या मुळे उगाच मोठ मोठ्या आशा ठेवू नये.
२५ विशी लग्न करावे.
बेसिक गोष्टी बघून आणि लग्न करावे.
आणि ही अशीच जोडपी आयुष्यात सुखी होतात.
३५/४० मध्ये अती आशा ठेवून लग्न करणारे साफ वैवाहिक आयुष्यात फेल होतात.
त्यांची लग्न पण टिकत नाहीत.
वय वाढेल तसे जोश निघून जातो रिॲलिटी माहीत पडते आणि अती शहाणपणा निघून जातो.
सर्व च मुली किंवा मुल .
कंपनीचे सीईओ होत नाहीत .
ना आयएएस,आयपीएस होत.
ना उद्योगपती होत.

माझ्या एका मित्राचे उदाहरण आहे.
स्वतः डॉक्टर आहे.
अपेक्षा.
१) मुलगी खानदानी हवी.
२) सुंदर हवी.
३) उच्च शिक्षित हवी.
५), नोकरी करणारी हवी.
६) सू स्वभाव हवी.
पहिली दोन वर्ष अनेक मुली बघितल्या पण ह्या सहा अटी पूर्ण करणारी एक पण भेटलो नाही
काही तरी कमी असायचे
मग एक अट कमी.
परत त्या मध्ये एक वर्ष गेले .
मुलगी काही मिळाली नाही.
असे करत करत अशी वेळ आली की कोणतीच अट नाही पण मुलगी मिळाली तरी खूप झाले.
आणि मी असे ठरवले होते.
जी पहिली मुलगी बघेन मग ती कशी हि असू तिच्याशीच लग्न करेन .
आणि तसे केले .
सर्व काही सुखात आहे.
मुलींचं पण असेच होते वरील माझ्या डॉक्टर मित्र सारखे शेवटी.
टकल्या, कोणतेच चांगले गुण नसणार नवरा मिळतो.
आणि ते नाकारण्याची शक्ती पण उरलेली नसते.

>> जे नाही ते आपल्या मनाने टाकून त्या swayanrachit कल्पना त्या कथेत आहेत असे भासवून त्यावर विटा रचत जाणे >> कथा, कविता, लेख, नाटक/ चित्रपट इ. माध्यमं ही वाचकाने/ प्रेक्षकाने आपला स्वतःचा मानेच्या वरचा भाग वापरून एकेक बिंदू जुळवणे, जे शब्दांत मांडलेले नाही ते इन्त्रापोलेट आणि एकस्ट्रापोलेट करून पहाणे, ते आपल्या अनुभव विश्वाशी मेळ घालून रिलेट करणे या आणि अशा अनेक गोष्टी करून तो लेखनाचा ऐवज आपलासा करणे हे सगळं अपेक्षित असतं. मायबोलीवर तुम्हाला हा वरचा भाग शाबूत असलेला वाचक सापडला. Confirmation bias नसलेला प्लॅटफॉर्म मिळणे हे आजच्या काळात भाग्य आहे. फेसबुक आणि व्हॉट्सॲप जनता हे स्वरचित का काय म्हणताय तितका विचार नाही करत कारणं माहीत नसतील तर विचारा.
इथे असेच वाचक मिळणार तुम्हाला.

Chhandifandi move on dear. Don’t fight. You did not agree with the plot so why are you defending it?
Welcome all perspectives & stop responding.

वैयक्तिकरीत्या - मी त्या मुलीला तेथून ताबडतोब पळून जा. Run as fast as you can सांगेन. आजची तडजोड दोघांना चालेल अशी झाली आहे. उद्याची होईल का काय माहीत.

हा मुलगा आपल्यासाठी एवढं करायला तयार आहे ही एकच गोष्ट ती त्याच्या प्रेमात पडायला मला वाटत पुरेशी आहे. >>> या कॉमेण्टबद्दल आश्चर्य वाटले. तो मुलगा "तिच्यासाठी" काहीच करत नाहीये. तो स्वतःसाठी व वडलांसाठी करतोय.

पण सार्वजनिकरीत्या - र.आ. यांनी साधारण लिहीले आहे तसे. मला तिला हे अजिबात मान्य करू नको असे सांगायला काय जाते. एका कुटुंबाचा प्रश्न असेल तर टाळू शकतात. समाजात सगळेच तसे असतील तर एकदम बंडखोरी करायची, की कोठे तडजोड व कोठे ठाम राहून जमवून घ्यायचे हे त्यांनाच ठरवावे लागेल. त्यांचे प्रॉब्लेम्स त्यांनाच जास्त माहीत. Those who rebel, I will totally respect them, Those who don't, I will not judge them.

पुण्यामुंबईमधे अनेक कुटुंबांत हुंडा देणे घेणे प्रकार नाहीत. लग्नाचा खर्च दोन्ही बाजू समान वाटून घेतात. अजून गेल्या शतकात अडकलेले ३-४ तोंडाळ नातेवाईक सोडले तर "मुलाची बाजू" वगैरे टिमक्याही कोणी गाजवत नाही. हे गेली ३०-४० वर्षे होत आहे. पण सगळीकडे तसे नाही.

हुंडा कायद्याने गुन्हा असल्याने त्यावर हार्डलाइनर स्टान्स ठीक आहे. पण लग्नात मुलीला व मुलीकडच्या लोकांना कमीपणा देणार्‍या अनेक गोष्टी आहेत. त्या प्रत्येक गोष्टीबद्दल सगळेच बंड करून उठत नाहीत. हुंडा किंवा लग्नखर्चाचेही तसेच आहे. काही ठिकाणी अजूनही परस्परसंमतीने वधूपक्षाकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जास्त खर्च करण्याची मागणी केली जाते. याला माझे समर्थन वगैरे नाही. पण हे होते हे बघितले आहे. माझ्या एका मित्राने त्यांच्या समाजात तुम्ही हुंडा मागितला नाहीत तर तुमच्यातच काहीतरी गडबड आहे असे समजतात असे सांगितले होते - यातील त्याचा बायस धरूनही हे अगदी अशक्य वाटणार नाही अशा केसेस मी पाहिल्या आहेत.

बाय द वे या कथेत लग्नसमारंभ पार पडल्यावर ही अनेक दिवस हो किंवा नाही हे नक्की सांगत नसलेली मुलगी अशा रीतीने गटवल्याबद्दल एकमेकांना हाय-फाय करून त्या बापाने त्या मुलाला ते पैशाचे पाकीट परत दिले हा एक ट्विस्ट होऊ शकेल. नंतरच्या सीन मधे त्या पाकिटावर क्लोज अप नेऊन त्यात असलेले "पैसे" हे वर्तमानपत्राचे तुकडे होते असे निष्पन्न होते, असाही एक Happy

Pages