रेल्वे अपघाताचं कारण

Submitted by पराग१२२६३ on 4 June, 2023 - 01:45

2 जूनला संध्याकाळी ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यामधल्या बहानगा बाजार रेल्वे स्टेशनवर एक मालगाडी आणि दोन प्रवासी रेल्वेगाड्यांचा विचित्र आणि भीषण अपघात झाला. त्या अपघातात 288 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 1,100 च्या वर प्रवासी जखमी झालेले आहेत. अलीकडच्या काळातला हा सर्वात भीषण रेल्वे अपघात ठरला असून विविध देशांकडून भारताला शोकसंदेशही पाठवण्यात आले आहेत.

नेहमीप्रमाणेच भीषण अपघात झाल्यावर त्याचं वार्तांकन आणि चर्चा आपल्याकडच्या सगळ्या प्रसारमाध्यमांमध्ये सुरू झाल्या आहेत. त्यात, सर्वात आधी Ground Zero वरून आमचे वार्ताहर कसं सटीक वार्तांकन करत आहेत, हेही सांगितलं जाऊ लागलं. त्याचवेळी हा अपघात कशामुळे झाला आहे, याचा निष्कर्षही ग्राफिक्समधून काढण्याची स्पर्धा या प्रसारमाध्यमांमध्ये सुरू झाली. त्या निष्कर्षांमध्ये सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे एकाच मार्गावर दोन गाड्या येऊन त्या आदळल्याचं, मानवी चूक असल्याचं वगैरे वगैरे सांगितलं जाऊ लागलं. तसंच कोरोमंडलला आधी हिरवा सिग्नल दिला होता, पण तो अचानक तिचा सिग्नल लाल केला गेला आणि त्यामुळं ती गाडी शेजारच्या लूप लाईनवर उभ्या असलेल्या मालगाडीला जाऊन धडकली असंही एक तथ्यहिन कारण सांगितलं जाऊ लागलं. माध्यमांमध्ये सांगितलं जात असल्याप्रमाणं अचानक सिग्नल लाल झाल्यानं कोरोमंडलनं इतक्या वेगानं मालगाडीला लूपवर जाऊन मागून धडक दिली असण्याची शक्यता वाटत नाही.

संध्याकाळी 6.55 ला कोरोमंडल बहानगा बाजार स्थानक ओलांडणार होती आणि बेंगळुरूहून हावड्याला जाणारी सुपरफास्ट एक्सप्रेसही हे स्थानक ओलांडणार होती. त्यामुळे तिलाही डाऊन मेन लाईनचा होम सिग्नल हिरवा मिळाला होता. एकाचवेळी या गाड्या विरुद्ध दिशेनं हे स्थानक ओलांडणार असल्यामुळे स्टेशन मास्तर आणि पॉईट्समन आपापल्या नियोजित जागांवर हिरवे सिग्नल हातात घेऊन दोन दिशांना उभे होते. दरम्यान, स्थानकात शिरल्यावर लगेचच कोरोमंडल रुळावरून घसरली होती, तेवढ्यात विरुद्ध दिशेनं हावडा एक्सप्रेस वेगानं स्थानक सोडत होती. यामध्ये हावडा एक्सप्रेसला थांबवण्यासाठी स्टेशन मास्टरला क्षणभरही वेळ मिळाला असण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळं ती गाडी कोरोमंडलच्या घसरलेल्या डब्यांवर जाऊन आदळली.

रेल्वेगाड्यांमध्ये न बसवल्या गेलेल्या कवच या धडकविरोधी यंत्रणेचाही मुद्दा प्रसारमाध्यमांनी लावून धरला आहे. पण या दोन्ही रेल्वेगाड्यांमध्ये कवच यंत्रणा जरी बसवलेली असती, तरी अशा प्रकारचा अपघात ती टाळू शकली असती असं वाटत नाही.

सिग्नल यंत्रणेतील बिघाड किंवा कवचचा अभाव यापेक्षा रुळांच्या, विशेषत: सांध्यांच्या नियमित देखभालीतील अभावामुळे झाला असावा असं वाटत आहे. हा अपघात झाला तो मार्ग दक्षिण-पूर्व रेल्वे विभागाच्या अखत्यारित येतो. या विभागात भारतामधली सर्वाधिक मालगाड्यांची वर्दळ होत असते आणि प्रवासीगाड्यांचीही संख्या लक्षणीय आहेच. त्यामुळे लोहमार्गांच्या देखभालीसाठी आवश्यक असलेला मोकळा वेळ अतिशय कमी मिळत असतो. त्याचा परिणाम रेल्वेच्या सुरक्षित वाहतुकीवर होत आहे. रेल्वेतून प्रवास करत असताना सांध्यांवर गाडी कशी हेलकावे खाते ते बऱ्याचदा मलाही प्रवास करताना जाणवतं. अलीकडच्या काळात रुळांची, इंजिनं-डब्यांच्या देखभालीपेक्षा, आधुनिकीकरणापेक्षा चकचकीतपणा आणि अनावश्यक बाबींवरील खर्चाचं महत्व वाढलेलं आहे. त्याचा परिणाम अशा प्रकारच्या अपघातांमधून दिसत आहे. गेल्या वर्षभरात गाड्या रुळावरून घसरून झालेल्या अपघातांची संख्या एकूण अपघातांमध्ये 77 टक्के राहिली आहे.

लिन्क
https://avateebhavatee.blogspot.com/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बॅरियर गेट चा सेन्सर स्विच हा इंटरलॉकिंग सर्किटमधला फक्त एक भाग झाला. सिग्नल हिरवा होण्यास तो सेन्सर स्विच (तो लिमिट/प्रॉक्सीमिटी की जो काही प्रकारचा असेल तो) क्लोज होणे गरजेचे पण पुरेसे नाही. त्या सोबत सांधा मेल लाईनला जोडला आहे याचा सेन्सर स्विच, मेन ट्रॅक रिकामा आहे याचा सेंसर स्विच आणि अजून कुठले इंटरलॉकिंग स्विचेस असतील ते क्लोज हवेत.

बॅरियर गेट काम करत आहे पण त्याचा सेन्सर काम करत नसेल तर टेक्निशियन केवळ त्याचा सेन्सर बायपास करेल (लूप करेल किंवा किती व कोणत्या प्रकारचे सेन्सर आहेत बॅरियर गेटला त्या नुसार ते बायपास करेल.) तरी सुद्धा मग इतर गोष्टींची पूर्तता झाल्याशिवाय सिग्नल हिरवा होणार नाही.

पण बातमीत जे लिहिले त्याचा अर्थ असा की लोकेशन बॉक्स मध्ये केवळ बॅरियर सेन्सर नव्हे तर इतर सगळेच अथवा किमान सांध्याचा सेन्सर सुद्धा त्याने बायपास केला.
असे तो का करेल हा प्रश्न.
जर त्याने तसे केले तर मग त्याने ते परत काढल्या शिवाय सिग्नल लाल सुद्धा होणार नाही. पण बातम्यांमध्ये सिग्नल हिरवा होता पण तो काढुन घेतला म्हटले आहे. म्हणजे टेक्निशियनने आधी सगळे किंवा बॅरियर गेट आणि सांधा हे दोन सेंसर बायपास केले आणि मग काय वाटले कुणास ठाऊक ते परत काढुन घेतले?

Preplan सर्व असते कोणती गाडी थांवायला हवी कोणती गाडी पुढे जावून द्यायची .
हे अचानक ठरवले जात नाही.
पूर्ण प्लॅन पहिलाच असतो.
सांधे सर्व ठिकाणी नसतात जिथे असतात तिथे गाडी पोचते त्याचा अगोदर सांधे प्लॅन नुसार जोडले जातात किंवा वेगळे केले जातात.
त्याला वेळ घेतला जातो,खात्री केली जाते विविध बाकी यंत्रेने नी मिळालेली माहिती मॅच केली जाते.
एकच यंत्रणेवर अवलंबून राहिले जात नाही.
अशीच पद्धत असणार .
Multisecurity व्यवस्था असणार च .
एक fail झाली की दुसरी उपयोगी पडेल अशी व्यवस्था नक्कीच असणार
अचानक काही घडले तर मात्र प्लॅन बदलाव लागत असेल.

डेटा लॉगर सगळ्याच स्टेशनवर असतो, जिथे स्टेशन मास्टर असतो. त्यामधल्या नोंदीनुसार संबंधित इंजिनिअरनं सांगितलं आहे की, सिग्नल आणि सांधा व्यवस्थित काम करत होता.

डेटा लॉगर सगळ्याच स्टेशनवर असतो, जिथे स्टेशन मास्टर असतो. त्यामधल्या नोंदीनुसार संबंधित इंजिनिअरनं सांगितलं आहे की, सिग्नल आणि सांधा व्यवस्थित काम करत होता.

Station मास्टर तोंडी काय बोलत आहे त्या वर का अवलंबून राहावे त्याच्या वर का विश्वास ठेवा
तो डेटा खरेच सांगणार .
तो संग्रही ठेवला पाहिजे .
नाही तर जशा फाईल गायब होतात तसा तो डेटा पण delete होईल

सिग्नल हिरव्याचा लाल केला म्हणून गाडी लूपवर गेली असं माध्यमं सांगत आहेत. पण हिरवा सिग्नल असताना मेन लाईन सेट झाली होती आणि तो लाल केल्यामुळे लूप लाईन सेट झाली असं होतं नाही. त्यामुळे माध्यमांवर येतं ते सगळच खरं असतं, असं मानता येणार नाही.

मानव पृथ्वीकर यांनी ४ जून रोजी दिलेली ही लिंक उघडून वाचली.
https://www.msn.com/en-in/news/other/odisha-train-accident-official-flag...
आताचा अपघातही त्याच कारणाने झालेला दिसतोय. (इंडियन एक्स्प्रेसमधल्या बातम्यांनुसार)

रेल्वे हे स्वतःच्या तोंडाने सांगणार का आणि कर्मचार्‍याकडून ही चूक ( असे प्रकार वरचेवर होतात असं या बातमीत आहे) झाली आहे.
सीबी आय कडे गेलेल्या केसेस वर्षानुवर्षे पडून असतात. सीबीआय हो नाही काही सांगत नाही.

<< सीबी आय कडे गेलेल्या केसेस वर्षानुवर्षे पडून असतात. सीबीआय हो नाही काही सांगत नाही. >>

------- केसचा निकाल वर्षानुवर्षे पडून रहावा असे वाटते अशा ठराविक केसेस CBI कडे सोपवतात. त्यांनी हो / नाही असे काहीच सांगायचे नसते, केवळ वेळ काढायचा असतो. जनता विसरभोळी आहे.

<<आताचा अपघातही त्याच कारणाने झालेला दिसतोय.>>
हो रेल्वे मंत्र्यांनी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टम मधील दोष एवढे सांगितलं.
पण माध्यमात या दोषाबद्दल तो कसा घडला याबद्दल जी विधानं आहेत त्यात गोंधळ जाणवतो.

सांधा लूप लाईनला जोडला रहाणे परंतु तो मेनलाइनला जोडला आहे असा चुकीचा फीडबॅक इंटरलॉकिंग सिस्टम मधून येणे त्यामुळे स्टेशन वरील पॅनल वर तसे चुकीचे दिसणे हा दोष (यात टेक्निशियननेच लोकेशन बॉक्स मध्ये सांध्याच्या सेन्सरपण बायपास करणे ही शक्यता पण आली) किंवा आधी मेनलाईन जोडल्या गेलेला सांधा नंतर इंतरलॉकिंग सिस्टम मधील दोषामुळे परत लूप लाईन कडे जाणे आणि तसे होऊनही सिस्टम मधुन एरर अलार्म न येणे हा दोष / अशा प्रकारचे दोष असावेत.

समजा दोष समजला,दोषी पकडले. कोर्टात केस झाली.
तर काय शिक्षा होणार आहे.
दोन चार वर्ष .
ती पण 3rd ग्रेड कर्मचाऱ्याला.
300 वर लोक मेली आहेत तरी मनुष्य वधाचा गुन्हा तर दाखल होवू शकत नाही.
कर्तव्यात कसूर केली इतकाच गुन्हा दाखल होईल.
भारतात हाच तर घोळ आहे.
चूक सिद्ध झाली तर अगदी 3rd great कर्मचाऱ्य पासून वरिष्ठ अधिकर्या पर्यंत सर्वांना जन्मठेप तरी झालीच पाहिजे
तेव्हा परत कोणी निष्काळजी पना करणार नाही.
निष्काळजी पने गाडी चालवली हा गुन्हा.
दाखल करून चालक, गार्ड पण शिक्षेस पात्र आहेत

उंच इमारती मध्ये आग लागली की विझवता यावी म्हणून यंत्रणा बसवलेली असते.
ती कायद्याने बसवावी च लागते.
पण चालते की नाही कोणी बघत नाही.
ती यंत्रणा ऑपरेट करण्यासाठी स्किल स्टाफ कोणी कामावर ठेवत नाही
अशा किती घटना घडल्या आहेत.
प्रत्यक्षात आग लागली आणि ती आग विरोधी यंत्रणा च बंद आहे हे माहीत पडले
ना त्यांच्या कडे आग विझवणारा स्टाफ होता.

नंतर चोकष्या होतात पण बिल्डिंग च्य व्यवस्थापन वर केस चालून पाच सहा वर्षाची शिक्षा झाली आहे असे कधी घडत नाही.
आगी लागत च राहतात लोक मरत च राहतात.
भारतात ह्याला च कायद्याचे राज्य म्हणतात

Pages