रेल्वे अपघाताचं कारण

Submitted by पराग१२२६३ on 4 June, 2023 - 01:45

2 जूनला संध्याकाळी ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यामधल्या बहानगा बाजार रेल्वे स्टेशनवर एक मालगाडी आणि दोन प्रवासी रेल्वेगाड्यांचा विचित्र आणि भीषण अपघात झाला. त्या अपघातात 288 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 1,100 च्या वर प्रवासी जखमी झालेले आहेत. अलीकडच्या काळातला हा सर्वात भीषण रेल्वे अपघात ठरला असून विविध देशांकडून भारताला शोकसंदेशही पाठवण्यात आले आहेत.

नेहमीप्रमाणेच भीषण अपघात झाल्यावर त्याचं वार्तांकन आणि चर्चा आपल्याकडच्या सगळ्या प्रसारमाध्यमांमध्ये सुरू झाल्या आहेत. त्यात, सर्वात आधी Ground Zero वरून आमचे वार्ताहर कसं सटीक वार्तांकन करत आहेत, हेही सांगितलं जाऊ लागलं. त्याचवेळी हा अपघात कशामुळे झाला आहे, याचा निष्कर्षही ग्राफिक्समधून काढण्याची स्पर्धा या प्रसारमाध्यमांमध्ये सुरू झाली. त्या निष्कर्षांमध्ये सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे एकाच मार्गावर दोन गाड्या येऊन त्या आदळल्याचं, मानवी चूक असल्याचं वगैरे वगैरे सांगितलं जाऊ लागलं. तसंच कोरोमंडलला आधी हिरवा सिग्नल दिला होता, पण तो अचानक तिचा सिग्नल लाल केला गेला आणि त्यामुळं ती गाडी शेजारच्या लूप लाईनवर उभ्या असलेल्या मालगाडीला जाऊन धडकली असंही एक तथ्यहिन कारण सांगितलं जाऊ लागलं. माध्यमांमध्ये सांगितलं जात असल्याप्रमाणं अचानक सिग्नल लाल झाल्यानं कोरोमंडलनं इतक्या वेगानं मालगाडीला लूपवर जाऊन मागून धडक दिली असण्याची शक्यता वाटत नाही.

संध्याकाळी 6.55 ला कोरोमंडल बहानगा बाजार स्थानक ओलांडणार होती आणि बेंगळुरूहून हावड्याला जाणारी सुपरफास्ट एक्सप्रेसही हे स्थानक ओलांडणार होती. त्यामुळे तिलाही डाऊन मेन लाईनचा होम सिग्नल हिरवा मिळाला होता. एकाचवेळी या गाड्या विरुद्ध दिशेनं हे स्थानक ओलांडणार असल्यामुळे स्टेशन मास्तर आणि पॉईट्समन आपापल्या नियोजित जागांवर हिरवे सिग्नल हातात घेऊन दोन दिशांना उभे होते. दरम्यान, स्थानकात शिरल्यावर लगेचच कोरोमंडल रुळावरून घसरली होती, तेवढ्यात विरुद्ध दिशेनं हावडा एक्सप्रेस वेगानं स्थानक सोडत होती. यामध्ये हावडा एक्सप्रेसला थांबवण्यासाठी स्टेशन मास्टरला क्षणभरही वेळ मिळाला असण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळं ती गाडी कोरोमंडलच्या घसरलेल्या डब्यांवर जाऊन आदळली.

रेल्वेगाड्यांमध्ये न बसवल्या गेलेल्या कवच या धडकविरोधी यंत्रणेचाही मुद्दा प्रसारमाध्यमांनी लावून धरला आहे. पण या दोन्ही रेल्वेगाड्यांमध्ये कवच यंत्रणा जरी बसवलेली असती, तरी अशा प्रकारचा अपघात ती टाळू शकली असती असं वाटत नाही.

सिग्नल यंत्रणेतील बिघाड किंवा कवचचा अभाव यापेक्षा रुळांच्या, विशेषत: सांध्यांच्या नियमित देखभालीतील अभावामुळे झाला असावा असं वाटत आहे. हा अपघात झाला तो मार्ग दक्षिण-पूर्व रेल्वे विभागाच्या अखत्यारित येतो. या विभागात भारतामधली सर्वाधिक मालगाड्यांची वर्दळ होत असते आणि प्रवासीगाड्यांचीही संख्या लक्षणीय आहेच. त्यामुळे लोहमार्गांच्या देखभालीसाठी आवश्यक असलेला मोकळा वेळ अतिशय कमी मिळत असतो. त्याचा परिणाम रेल्वेच्या सुरक्षित वाहतुकीवर होत आहे. रेल्वेतून प्रवास करत असताना सांध्यांवर गाडी कशी हेलकावे खाते ते बऱ्याचदा मलाही प्रवास करताना जाणवतं. अलीकडच्या काळात रुळांची, इंजिनं-डब्यांच्या देखभालीपेक्षा, आधुनिकीकरणापेक्षा चकचकीतपणा आणि अनावश्यक बाबींवरील खर्चाचं महत्व वाढलेलं आहे. त्याचा परिणाम अशा प्रकारच्या अपघातांमधून दिसत आहे. गेल्या वर्षभरात गाड्या रुळावरून घसरून झालेल्या अपघातांची संख्या एकूण अपघातांमध्ये 77 टक्के राहिली आहे.

लिन्क
https://avateebhavatee.blogspot.com/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगले विश्लेषण केले आहे.
या जानेवारी महिन्यातील बातमी नुसार रेल्वेत ३.१२ लाख कामगारांची कमतरता होती आणि रूजू असलेल्या कामगारांवर कामाचा अतिरिक्त बोजा पडत होता. ही कमतरता अजुनही असेल तर मानवी चूक होण्यात हा सुद्धा एक फॅक्टर असू शकेल.

दरम्यान, स्थानकात शिरल्यावर लगेचच कोरोमंडल रुळावरून घसरली होती, तेवढ्यात विरुद्ध दिशेनं हावडा एक्सप्रेस वेगानं स्थानक सोडत होती. यामध्ये हावडा एक्सप्रेसला थांबवण्यासाठी स्टेशन मास्टरला क्षणभरही वेळ मिळाला असण्याची शक्यता कमी

आहे. त्यामुळं ती गाडी कोरोमंडलच्या घसरलेल्या

ही माहिती तुम्हाला कोठे मिळाली,मीडिया मध्ये जे अपघात चे फोटो दाखवत आहेत तिथे दूर वर कोठे च स्थानक दिसत नाही.
मालगाडी वर एक्स्प्रेस आदळली आणि त्या मुळे ती घसरली असे रेल्वे मंत्र्या न पासून सर्व मीडिया सांगत आहे ते चुकीचे आहे .
की तुम्ही जी स्टोरी इथे सांगून सर्वांना clean chit देत आहात ती माहिती चुकीची आहे .नक्की सत्य काय.

>> रेल्वेतून प्रवास करत असताना सांध्यांवर गाडी कशी हेलकावे खाते ते बऱ्याचदा मलाही प्रवास करताना जाणवतं.

+१११ मी फर कमी रेल्वे प्रवास केला आहे (भारतात). पण जेंव्हा केंव्हा केला आहे तेंव्हा तो वेग आणि ते हेलकावे आणि सतत येणारे रुळाचे आवाज यामुळे मला अखंड प्रवासात कधीच सुरक्षित वाटले नाही "अरे बापरे, इतक्या प्रचंड वेगाने पळत आहे गाडी. पण ते रूळ आणि ती चाकं आणि बाकी सगळ्या गोष्टी खरंच त्या दर्जाच्या आहेत काय? इतक्या जोराचे हेलकावे आणि आवाज का येत आहेत? तरीही इतका प्रचंड वेग कशासाठी?" अये प्रश्न सतत मनात येत होते. रेल्वे प्रवास मला कधीच सुरक्षित वाटला नाही (ज्यांना भारतीय रेल्वेवर प्रचंड प्रेम आहे व ज्यांना झुकझुक गाडीतून प्रवास करायला आवडते त्यांची माफी मागून). उदाहरणार्थ, गोवा एक्स्प्रेस ने एकदा पुणे ते गोवा प्रवास केला होता (बरीच वर्षे झाली). रेल्वेत रात्रभर अक्षरक्ष: भीतीने जागाच होतो. प्रचंड वेग, आवाज, हेलकावे इत्यादीमुळे अक्षरश: नॉसिया आला. आणि मग पुढे दोन दिवस आजारीच पडलो.

हेच जेंव्हा युरोपात अनेकदा रेल्वे प्रवास केला तेंव्हा प्रचंड वेग असूनही ज्या स्थिरतेने रेल्वे तिथे धावते ते पाहून कमाल वाटली होती. इतका प्रचंड वेग असूनही रेल्वेत पाण्याचा पेला जरी भरून ठेवला तरी पाणी जराही हलणार नाही इतके रूळ स्थिर आणि समतोल असतात. (याचा अर्थ तिकडे अपघात होत नाहीत असे नव्हे. पण ती कारणे वेगळी आहेत)

Rwilway रूळ योग्य स्थिती मध्ये नसतील तर गाडी घसरणार.
पण ही पण मानवी चूक च आहे ,निष्काळजी पना च आहे.
Raily रूळ ठीक नसतील तर गाडी च वेग अत्यंत कमी त्या ठिकाणी हवा.
पण गाडी 120 च्या पुढे वेगात होती
म्हणजे परत मानवी चूक.
रेल्वे रूळ मध्ये थोडी तर गडबड असेल तर चाक रुळवर घासली जातात आणि आगी च्या ठिणग्या उडत असतात.
आवाज पण होतो.
ह्या वर चालकाने लक्ष देणे गरजेचे होते .तिकडे दुर्लक्ष करून गाडी वेगात चालवणे ही पण मानवी चूक च .
आणि तुम्ही सांगत आहात ती स्टोरी च रचलेली वाटत आहे.

सिग्नल सिस्टम मध्ये बिघाड हे कारण असू शकते.
पण
The preliminary probe report, a copy of which is available with The Hindu, says that the Coromandel Express was initially given the green signal to enter the Up Main Line, but the signal was then taken off. The train then entered the loop line instead, and collided with a goods train there, triggering the multi-train collision.

हे भलतेच. यासाठी सांधा बदलावा लागेल. किंवा आधी लुप लाईन साठी ठेवलेला सांधा बदललाच नसेल मेन लाईनकडे.
मग सिग्नल सिस्टम बिघाड ऐवजी चुकीचा सांधा जोडला राहणे हे कारण होईल अपघाताचे.

"तथ्यहीन कारण सांगीतले जाते" असे पराग यांनी म्हटले ते याच संदर्भात असावे.

<<दूर वर कोठे च स्थानक दिसत नाही.>>
हा अपघात स्थानकातच झालेला आहे. स्थानक म्हणजे केवळ फलाट नव्हेत. फोटो बारकाईने बघितले तर स्थानकातील पादचारी पूल दिसेल.
मला कोणाला clean chit द्यायची नाही. मी फक्त शक्यता मांडली आहे.

सांधे रूप लाईनचे जोडले गेले असते, तर सिग्नल हिरवा मिळाला नसता. लूपवर जाणारा सांधा जोडला की सिग्नल आपोआप पिवळाच मिळतो, हिरवा नाही.
<> रेल्वेच्या परिभाषेत सिग्नल ऑफ होणे म्हणजे सामान्य माणसाच्या भाषेत हिरवा सिग्नल.

मी ते बातमी संदर्भात म्हटले आहे की train went to loop line instead असे म्हटले तर त्यांनी चुकीचा सांधा जोडला होता हे कारण म्हणावे अपघाताचे.

डिफॉल्ट सिग्नल लाल. सांधा लूप लाईनला जोडला असेल तर तो पिवळा करता येईल, हिरवा नाही.
स्टेशन मास्टर आणि पॉइंट्समन गाड्या पास करायला तयारीत उभे होते म्हणजे सांधा मेन लूपला घेऊन गाडीला हिरवा सिग्नल दिलेला असेल.
बातमीत म्हटल्या प्रमाणे तो अचानक लाल केला तरी गाडी लूपवर जायला नको, सांधा सुद्धा बदलल्या शिवाय.

अपघाताच्या फोटोवरून गाड्या एकाच मार्गावर समोरासमोर येऊन एकमेकांवर आदळलेल्या वाटत नाहीत. पण चानेलवाल्यांना काहीही सांगण्याची सोय आहे.

रेल्वे मंत्र्यांनी सांगितलेलं कारण electronic interlocks failure. या बद्दल फेब्रुवारीमध्ये संपर्क क्रांती एक्सप्रेसचा अपघात चालकाच्या सतर्कतेमुळे टळल्यावर साऊथ वेस्टर्न रेल्वेने तेव्हाच धोक्याचा इशारा दिला होता असे खालील बातमीत म्हटले आहे.

https://www.msn.com/en-in/news/other/odisha-train-accident-official-flag...

सरासरी पॅसेंजर गाड्या साईड ला काढल्या जात नाहीत.
कारण त्यांचा वेग प्रचंड असतो आणि त्या वेळेत पोचणे गरजेचे असते.
मेन लाईन त्यांच्या साठी मोकळी केली जाते.
मालगाडी,लोकल ट्रेन त्या साठी साईड ला काढल्या जातात. थांबवल्या जातात.
मालगाडी जी पुढे चालली होती ती मागून येणाऱ्या पॅसेंजर गाडी साठी साईड ला काढली असेल.
ती मालगाडी पूर्ण पने main लाईन सोडून साईड ला गेली नसेल तिचे काही डब्बे main लाईन वर च असतील.
त्याच वेळेस वेगात पॅसेंजर गाडी आली आणि त्या मालगाडी ला मागून धडकली ही एक शक्यता आहे.
दुसरी शक्यता
मालगाडी साईड ला करण्यासाठी जी पटरी जुळवली होती ती तशीच राहिली आणि signal असल्या मुळे पॅसेंजर गाडी पण साईड ला गेली आणि मालगाडी ला धडकली.

<<ती मालगाडी पूर्ण पने main लाईन सोडून साईड ला गेली नसेल तिचे काही डब्बे main लाईन वर च असतील.>>
हे शक्य नाही.
<<मालगाडी साईड ला करण्यासाठी जी पटरी जुळवली होती....>>
हेही शक्य नाही. कारण अशा परिस्थितीत सिग्नल पिवळा राहिला असता, हिरवा नाही. त्यामुळे कोरोमंडलचा वेग कमी झाला असता.

सिग्नल दोष त्यालाच म्हणतात.
अपघात झाला गाडी आदळली म्हणजे दोष कुठे तरी असणार.
दोष नसेल तर अपघात झालाच नसता.
आणि सिग्नल मध्ये दोष निर्माण च होणार नाही .
ह्याची १००% शक्यता नक्कीच नाही.
तुमच्या मता प्रमाणे गाडी पटरी वरून अचानक उतरली बाकी कोणताच दोष कोणत्याच यंत्रणा न मध्ये नव्हता
अपघात म्हणजे फक्त योगा योग .
हे गृहितक खरे मानले तरी तरी .
गाडी रुळावरून अशीच सहज सोपी घसरणे शक्य नाही.

पराग नी जसे लिहाल आहे तशीच बातमी लोकमत मध्ये पण आली.
अपघात फक्त योगायोग कोणी दोषी नाही.
1) १३० च्या वेगात जर गाडी रुळावरून उतरली तर काय घडेल .
अचानक ब्रेक मारल्या सारखी स्थिती निर्माण होइल
फिजिक्स चे नियम काय सांगतात.
वेग च वर्ग प्लस वजन बरोबर एनर्जी असे सूत्र आहे.

१३० च वेग अधिक गाडी चे वजन किती मोठी energy निर्माण होईल गाडी फक्त कलांडणार नाही तर हवेत उडेल, बाजू ची पटरी सोडून पण लांब जावून डब्बे पडतील.
इतकी ऊर्जा निर्माण होईल
१३० च्या वेगात चारशे किलो वजन असणाऱ्या गाडी ल अर्जंट ब्रेक लावून बघा काय घडते ते गाडी कुठल्या कुठे उडेल ते.
ट्रेन च वजन तर किती तरी शे टन असते

https://www.rediff.com/news/report/odisha-train-mishap-railways-seeks-cb...
हा दुवा पहा. कुणाला काही "संशय" असेल तर दूर होतील. आता प्रकरण CBI कडे सोपवण्यात आले आहे.
मंत्र्यांनी जाऊन बेसिन मध्ये आपले हात धुतले.
हा धागा आता बंद करा.

ह्यांचे निर्णय च भयंकर हास्यास्पद असतात.
अर्थ मंत्र्यांना विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर स्मृती इराणी देते..
संरक्षण मंत्र्यांना विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर अर्थ मंत्री देतात..स्वतःच्या खात्याच्या प्रश्नांचे उत्तर कोणताच मंत्री देत नाही...
रेल्वे अपघात कसा झाला ही टेक्निकल बाजू वर अवलंबून तपास आहे त्याचा तपास सीबीआय काय करणार.
त्यांना त्या मधील काडी चे तरी ज्ञान आहे का?
रेल्वे नीच तो तपास करायला हवा होता आणि समांतर तपास त्या क्षेत्रातील तज्ञ लोकांच्या समिती नी केला पाहिजे होता.
आणि ते दोन्ही तपास चे निर्णय आणि निष्कर्ष ह्याचा अभ्यास करून फायनल रिपोर्ट तयार केला पाहिजे होता..सीबीआय काय घंटा तपास करणार

या लेखावरून कोणी दोषी नाही अपघात योगायोग आहे असा निष्कर्ष कसा निघतो?
रुळांची, सांध्यांची देखभाल न करणे, त्यासाठी लागणारा वेळही मिळणार नाही एवढी गाड्यांची संख्या वाढवणे,
अलीकडच्या काळात रुळांची, इंजिनं-डब्यांच्या देखभालीपेक्षा, आधुनिकीकरणापेक्षा चकचकीतपणा आणि अनावश्यक बाबींवरील खर्चाचं महत्व वाढलेलं आहे.
या वरून तुम्ही कोणीच दोषी नाही, अपघात निव्वळ योगायोग असा निष्कर्ष काढला?

मला तर यातून केवळ हा अपघात नव्हे तर एकंदरीत रेल्वे सुरक्षेविषयी प्रश्न उभा रहातो असे वाटले.

बाकी या अपघाताबाबत तपास काय करणार आणि केलाच तर त्यातुन मिळालेली खरी माहिती लोकांपुढे येईल या अपेक्षाही बाळगत नाही.

<त्या निष्कर्षांमध्ये सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे एकाच मार्गावर दोन गाड्या येऊन त्या आदळल्याचं, मानवी चूक असल्याचं वगैरे वगैरे सांगितलं जाऊ लागलं. तसंच कोरोमंडलला आधी हिरवा सिग्नल दिला होता, पण तो अचानक तिचा सिग्नल लाल केला गेला आणि त्यामुळं ती गाडी शेजारच्या लूप लाईनवर उभ्या असलेल्या मालगाडीला जाऊन धडकली असंही एक तथ्यहिन कारण सांगितलं जाऊ लागलं. माध्यमांमध्ये सांगितलं जात असल्याप्रमाणं अचानक सिग्नल लाल झाल्यानं कोरोमंडलनं इतक्या वेगानं मालगाडीला लूपवर जाऊन मागून धडक दिली असण्याची शक्यता वाटत नाही. >
कोरोमंडल एक्प्रेसच्या इंजिनाचा डबा मालगाडीवर चढला होता. वृत्तपत्रांनी रेल्वे अधिकार्‍यांशी बोलून तुम्ही तथ्यहीन म्हणताय तेच कारण छापलं आहे. (मी इंडियन एक्स्प्रेस आणि द हिंदू मध्ये वाचलं.) त्यातला तांत्रिक भाग कळला नाही. पण असंच झाल्याचं म्हटलं आहे.

हो, त्या बाातम्यांव्यतिरीक्त खुद्द कोरोमंडल चालकाने त्यास पुष्टी दिली हे या व्हिडीओत सांगितले आहे.
त्यात मालगाडी डब्यावर चढलेले इंजिन 43 ते 49 सेकंदावर दिसत आहे.
सिग्नल लाल झाला आणि मग गाडी लूप वर गेली हे वाक्य गॊंधळात टाकणारे आहे. यात सिग्नल लाल झाला आणि सांधाही लुुप लाइनला जॊडला हॊता/लाल झाल्यावर जोडला गेला असे अभिप्रेत आहे.
चालकाने सिग्नल हिरवा होता म्हटले आहे, लाल त्याने सिग्नल ऒलांडल्यावर झालेला दिसतोय.

सिग्नल आधी हिरवा असणार. चालकाने तो ओलांडला उघड आहे कि तो लाल होणार. सांधा केव्हा बदलला ?
मी वाचल्याप्रमाणे रेल्वे डेटा लॉगर वापरतात. इथे होता कि नाही? जर तो असेल तर...

तांत्रिक भाग हा त्या क्षेत्रातील लोकांनाच व्यवस्थित माहीत पडेल .
त्या पेक्षा ती यंत्रणा जी लोक ऑपरेट करतात त्यांना practucaly ती यंत्रणा कशी काम करते ह्याची सर्व माहिती असणार.
त्या यंत्रणेत कसा दोष निर्माण होवू शकतो,कसे चुकीचे electronic msg जावू शकतात,त्या मुळे यंत्रणा चुकीची कशी वागू शकते है सर्व तीच लोक सांगू शकतात.
किंवा ज्यांनी ती यंत्रणा बनवली आहे ती लोक सांगू शकतात.
सीबीआय ल ह्या मधील काही ज्ञान असण्याची शक्यता कमीच आहे त्यांनी वरील लोकांची मदत घेतली तर च त्यांचा तपास योग्य मार्गाने जाईल .
नाहीतर हाताला काहीच लागणार नाही.
जसे सुशांत सिंग प्रकरणात झाले.
कोणत्या तरी अब्दुल वर सर्व घटनेचा भार टाकून तपास थांबवला जाईल

इंडियन एक्स्प्रेसमधल्या बातमीनुसार लेव्हल क्रॉसिंगचा गेट पूर्णपणे बंद झाला नाही किंवा बंद होऊनही सिग्नल लाल राहिला. यावर तिथल्या सिग्नलमनने लोकेशन बॉक्स लूप केल्याने अपघात झाला. हा तांत्रिक भाग नीट कळला नाही.>>>सिग्नलमनने लोकेशन बॉक्स लूप केले असेल. पण त्याचा अपघाताशी काय संबंध? लाल सिग्नल हिरवा होण्यासाठी बऱ्याच गोष्टींची पूर्तता व्हायला पाहिजे. त्यातील एक म्हणजे लेव्हल क्रॉसिंगचा गेट पूर्णपणे बंद असायला पाहिजे. कधी कधी गेटचे लिमिट स्विच काम करत नसेल तर गेट कीपर गेट बंद आहे हे समोर बघून रिलेला जबरदस्तीने लूप करत असेल. (आम्ही पण प्लांट मध्ये करत असू.) म्हणजे गेट बंद आहे अशी कंडीशन सिस्टीम मध्ये कृत्रिम रित्या निर्माण करणे. कराव लागत.
पण ह्याचा अपघाताशी काय संबंध?

इंडियन एक्स्प्रेसमधली बातमी पूर्ण वाचायला पैसे लागतील. म्हणून छापील पेपरात वाचून लिहितो. वरच्या अर्धवट माहितीने अपघात कसा झाला ते कळत नाही.
सिग्नलमन वा अन्य कर्मचार्‍याने मॅन्युअली लोकेशन बॉक्स लूप केला. ( म्हणजे त्या यंत्रणेशी जोडला? ) लोकेशन बॉक्स मुव्हेबल असतो आणि ट्रेन कोणता ट्रॅक घेणार हा हेच ठरवतो. (हे हिंदी सिनेमात पाहिलं आहे. ऐन वेळी ट्रॅक बदलून अपघात रोखणं इ.)
लेव्हल क्रॉसिंगचं बॅरियर खाली नसता तर कोरोमंडल एक्स्प्रेसला ग्रीन सिग्नल मिळाला नसता. ते काम सिग्नलमनने मॅन्युअली केलं. पण या मॅन्युअल बदलाची नोंद सिस्टममध्ये झाली नाही आणि ऑल क्लियर सिग्नल मिळूनही ट्रॅक लूप लाइनशी (जिथे मालगाडी होती) संलग्न राहिला.

लोकेशन बॉक्स मुव्हेबल असतो >> हे बरोबर वाटत नाही.
लूप लाईनवर मालगाडी उभी असतानाही त्या लाइनचा सांधा मेन लाईनशी जोडला रहाणे किंवा नंतर जोडला जाणे. हा खरा प्रॉब्लेम आहे.

Pages