
“वा! इकडे पण अगदी छान ताज्या, टवटवीत भाज्या आहेत. “ इंडिया बाजार मध्ये जाऊन अगदी रिलायन्स फ्रेश मध्ये आल्यासारखाच वाटलं. फक्त कांदे बटाटे वाईच जास्तच मोठे होते. एक कांदा म्हणजे कांदेश्वर, अगदी दोन दिवस पुरवावा, फ़्लोवर आणि कोबीचीही तीच गत. दोन प्रकारची लिंब, हिरवी लाईम आणि पिवळी लेमन, ही जरा जास्तच मोठी असतात आणि त्यांना आंबटपणा जरा कमीच. सरबतासाठी उत्तम. पण बाकी सगळा बाजार होता तोंडली, भेंडी, गाजर, बीट, लाल - पांढरा भोपळा, मेथी , कांद्याची पात, झालच तर अळूची पानही होती. आठवड्याला भाज्या रिपीट होणार नाहीत एव्हढी व्हरायटी बघून जीव भांड्यात पडला . कोथिंबीर म्हणजे कोरीअंडर काही दिसेना. साधारण कोथिंबिरीला मिळती जुळती पार्सली दिसली आणि दुसरी “cliantro” दिसली.
“ही cilantro दिसत्ये तर कोथिंबिरीसारखीच पण न जाणो पार्सली सारखी दुसरी एखादी वेगळीच भाजी असावी का ?” शेवटी न राहवून दुकानातच फोन वरून गूगल केल्यावर कळलं की कोथिंबिरीला स्पॅनिश मध्ये “Cilantro” म्हणतात.. इंडिया बाजारमध्ये आठवड्याची वाणसामान खरेदी हे वीकेण्डच मग ठरलेलं एक कामचं होऊन गेलं.
नवीन ठिकाणी जातो ते लागेल तशी, वेगवेगळ्या पातळ्यांवर अडजस्टमेन्ट करायच्या तयारीनेच, पण जेव्हा रोजच जेवण आपल्या सवयीचं मिळतं तेव्हा इतर आव्हाने आणि तडजोडी करायला जास्त जड जात नाही.
अलीकडे तर पूर्वी सहज न दिसणारे पदार्थ जसं भाजणीचं पीठ, मेतकूट, पोह्याचे पापड आणि आता तर बेडेकरांचे उकडीचे खास मोदकही मिळायला लागलेत.
रोजच्या जेवणाची सोय झाली कि मग इतर चवी चाखण्याचाही मोह होतो.
सात-आठ वर्षांपूर्वीचा काळ, भारतात इकडची सगळी चॉकलेट्स मिळत नसत त्यामुळे त्याच विशेष आकर्षण होतं. सुरवातीला हर्शीपासून ते लिंड पर्यंत सगळ्यांवर यथेच्छ ताव मारून झाल्यावर मग नजर जरा इतर ठिकाणी वळली.
इकडे जगभरातून लोक आल्यामुळे विविध प्रकारचे पदार्थ, फळे, भाज्या मिळतात. त्यामुळे बरेच नवीन आणि छान छान पदार्थ खायला मिळाले. ते आम्ही आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांनाही खाऊ घातले. तर आज मी अशा आमच्या गोतावळ्यातल्या हीट पदार्थांच यादी तुमच्याबरोबर शेअर करणारे.
Tres Leches Cake : हा स्पॅनिश पध्द्तीचा केक, खूप हलका आणि जाळीदार असतो, ट्रेस म्हणजे स्पॅनिशमध्ये तीन आणि Leches म्हणजे दूध, तर हा तीन प्रकारच्या दुधात बुडवलेला असतो. वरती strawberry , किवी अशा फळांच्या चकत्यांनी सजवलेला असतो. तोंडात टाकताच जिभेवर विरघळतो. Safeway ह्या ग्रोसरी चेन ची खासियत आहे.

त्या व्यतिरिक्त कॅरेट केक, लेमन केक आणि बनाना वॉलनट केक/ मफिन मी इकडेच पहिल्यांदा खाल्ले. विशेषकरून छोटया बेकऱ्यांमध्ये उत्कृष्ट प्रतीचे आणि रुचकर मिळतात.
इकडची अजून एक खासियत म्हणजे pies, चेरी, ऍपल ही नेहेमीची पण pumpkin pie (लाल भोपळ्याचे pie ) हॉलोवीन स्पेशल तर pecan pie thanksgiving ते ख्रिसमस च्या दरम्यानच मिळतो. Pecan pie इतका सही असतो की सेप्टेंबर ऑक्टोबरपासून आम्हाला त्याचे वेध लागतात.

तसच फ्रेंच मॅक्रोन, जर्मनीच्या lebkuchen cookies, marzipan, डॅनिश kringle हे खास युरोपियन पदार्थही Trader Joes मुळे कळले आणि लाडके झाले.
योगर्टलँड: फ्रोझन योगर्ट
आमच्या जवळपास योगर्टलँड आणि पिंकबेरी ह्या दोन फ्रोझन योगर्टच्या चेन्स आहेत. पैकी योगर्टलँड जास्त लोकप्रिय आहे.
हे फ्रोझन योगर्ट म्हणजे साधारण सॉफ्टी सारखे दिसणारे पण चवीला थोडे वेगळे, वेगवेगळ्या फ्लेवर्स मध्ये मिळते. तर ह्याची खासियत त्या दुकानात आहे. प्रवेश केल्या केल्या कप घ्यायचा, सात आठ फ्लेवर्स चे योगर्ट असते. खिट्टी दाबून आपण आपल्याला हवं तेव्हढं आणि हवं ते फ्रोझन योगर्ट कप मध्ये घ्यायचं, मग कॉउंटर वर वीस एक प्रकारची टोपिंग्स असतात, त्यात गोळ्या , चॉकलेटं, फ्रेश / फ्रोझन फळांपासुन ते बदाम, अक्रोड, सुकं खोबरं जे म्हणाल ते टॉपिंग टाकायचं. मग त्याचे वजनाप्रमाणे पैसे द्यायचे.
तर हे योगर्टलँड शाळेच्या रस्त्यावर असल्यामुळे महिन्यातून १-२ खेपा तर ठरलेल्याच होत्या. हे मुलांबरोबर मोठ्यांचही तेव्हढच लाडकं आहे.

पिझ्झा
आपल्याकडे जसे कॉर्नर कॉर्नरला वडापाव असतात आणि प्रत्येक गाडीची स्वतःची खासियत असते तीच गत इकडे पिझ्झाची म्हणता येईल. ह्या छोट्या पिझ्झाजॉइंट्स मध्ये बरयाचदा ताज्या बनवलेल्या पिझ्झाचा आणि चीजचा दरवळ तुम्हाला सहजच साद घालतो आणि तुम्ही खेचले जाता, कुणाचा सॉस स्पेशल तर कुणाचा कुरकुरीत crust किंवा हटके टॉपिंग्स प्रत्येकाची स्वतःची खासियत. .
दोन पिझ्झाची दुकानं विशेष लाडकी.
एक MOD (Made On Demand) Pizza,
ह्यात तुम्ही क्रस्ट निवडायची, मग त्यांच्याकडे २-४ प्रकारचे सॉस असतात त्यातला तुम्हाला हवा तो निवडायचा, तुमच्या आवडीप्रमाणे meat, veggies, चीज, ड्रेसिंग तुम्ही सांगाल त्या प्रमाणात घालून तुमच्या समोरच तुमचा पिझ्झा बनवतात आणि लगेच त्यांचा मोठा दगडी ओव्हन आहे त्यात भाजायला ठेवतात. हा फ्रेशली मेड पिझ्झा आमचा आणि आमच्या पाहुण्यांचा एकदम फेवरीट आहे.
दुसरा म्हणजे देसी पिझ्झा/ curry पिझ्झा, ह्यात इंडियन मसाल्याचा अंश असणारे सॉस असतात आणि टॉपिंगही तंदूर, आचारी पनीर, चिकन असे देशी मिळतात. हे फ्युजन पिझ्झा पण खूप लोकप्रिय आहेत.

नॉन वेजिटेरिअन लोकांसाठी तर खूपच सारे पर्याय आहेत, त्यापेक्षा त्यांची चंगळ आहे असे म्हणणे जास्त योग्य होईल. भारतात तेव्हा एक KFC सुरु झालेलं जवळच्या मॉल मध्ये, इकडे तशा चिकफीला, सुपरचिक्स, पोपेयेस अशा अनेक चेन्स आहेत त्यांच्या स्पेशल fries, sauce आणि वेगवेगळ्या crunchiness सह. (आमच्या घरच्या खादाड खाऊच्या सांगण्यानुसार )
आता हे बरेच जंक फूड आणि गोड पदार्थ झाले पण तुम्हाला काही पथ्ये असतील, तुम्ही आरोग्याबाबत आणि आहाराबाबत जागरूक असाल तरी काही हरकत नाही, सगळ्यांसाठी खूप ऑप्शन्स आहेत.
Chipotle- मेक्सिकन फूड, त्यांच्या कडचा बरिटो बोल हा पदार्थ बऱ्याच वयस्कर मंडळींनाही आवडतो, म्हणजे तरुणांना आणि मुलांनाही तर आवडतो पण त्यांना बऱ्याचदा फुकट ते पौष्टिक या नात्याने त्यांना सगळंच आवडत म्हणून हा विशेष वयाचा उल्लेख. हा खूप सर्रास मिळणारा, पौष्टिक, रुचकर, आणि वाजवी दरात व्हेज / नॉनव्हेज दोन्ही पर्यायात मिळणारा भारतीय चवीशी मिळता जुळता पदार्थ.
साधा किंवा ब्राउन राईस, ब्लॅक / पिंटो बीन्स, परतलेली सिमला मिरची, साल्सा, पिका-दिया-गो (म्हणजे टोमॅटो-कांदा कोशिंबीर असते तशी पण चव वेगळी असते), कॉर्न्स, सार क्रीम, ग्वाकामोले ह्यांनी तो सजलेला असतो.
छोट्या छोट्या मेक्सिकन फॅमिली रेस्टॉरंट्समध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे साल्सा, नाचों चिईप्स आणि अतिशय रुचकर भात, बीन्स आणि टॉर्टिला पासून बनवलेले पदार्थ मिळतात. प्रवासात तर ती हमखास अतिशय सोयीचा पर्याय असू शकतात.
अवोकाडोचा ग्वाकामोले तर एकदम nutritious, फ्रेश आणि versatile पदार्थ आहे चिप्स, ब्रेड कशाही बरोबर खा.


फलाफल :
हा अजून एक अतिशय healthy, टेस्टी आणि भारतीय चवीच्या जवळ जाणारा mediterranean पदार्थ. ह्यात फावा beans ची पेस्ट करून त्यात दिल (शेपू , शेपू म्हणून दचकू नका, छान फ्लेवर येतो), इतर मसाले आणि मुख्य म्हणजे तीळ घालून छोटेगोळे करून पकोड्यांसारखे तळतात. आतापर्यंत मी बघितलेला मराठी पदार्थांव्यतिरिक्त खमंग चवीच्या जवळ जाणारा एकमेव अभारतीय पदार्थ.
हे फलाफल नुसतेच आरामात संपवू शकतो पण ते साधारणतः पिटा ब्रेड मध्ये घालून किंवा भात इतर सलाड्स, भाज्या, बाबागनुश म्हणजे वांग्याचं भरीत, वेगवेगळ्या चटण्या घालून खातात. ताहिनी म्हणून एक तिळापासून बनवलेला sauce असतो तो यांची लज्जत अजूनच वाढवतो.
जवळच एक डिश न डॅश नावाची चेन आहे त्यांची स्पेशालिटी म्हणजे ताहिनी बरोबरच मिळणारे अजून ३ प्रकारचे sauce आणि अत्यंत खमंग, कुरकुरीत फलाफल.

बक्लावा हा mediterranean गोड पदार्थ. उत्तम प्रतीचा बक्लावा जिभेवर ठेवताच विरघळतो आणि अतिशय हलका असतो. आपल्या खारी बिस्कीट सारखं खूप साऱ्या पापुद्र्यांचे हलकं, क्रिस्पी आवरण असतं, आत काजू, पिस्ता किंवा अक्रोडच पुरण असतं, आणि तो मधाच्या पाकात घोळवलेला असतो .
आता उत्कृष्ट म्हणजेच हलका, उत्तम दर्जाची ड्रायफ्रूट्स असणारा, गोड - ओलसर तरीही क्रिस्पी असा बक्लावा आमच्या इकडे एक छोटा लघु उद्योग करणाऱ्यांकडेच मिळालाय अगदी दुबई एअरपोर्ट आणि ग्रीक मधला पण टेस्ट केलेला पण त्याला तशी सर काही नव्हती.

आता तुम्ही अजून जास्त हेल्थ कॉन्शस असाल तर तुमच्या साठी असंख्य प्रकारची सॅलड्स आहेत. रेडी टू इट पाकिटं असतात, त्यात चिरलेल्या भाज्या असतात, त्यातच छोटी ड्रेसिंग ची पाकीट असतात. आयत्या वेळी हवे तेव्हढे मिक्स करायचे, झाले सलाड तयार.
बऱ्याचशा हॉटेल मध्येही खूप मोठा सलाड मेनू हि असतो.
इकडे कोविडच्या आधी स्वीट टोमॅटो नावाची एक चेन होती, ते सलाडसाठीच प्रसिद्ध होते. बुफ्फेच पण तो सलाडचा . त्याबरोबर मग २-३ प्रकाची सूप, बेड्स आणि डेझर्ट्स. कधीही गेलं तरीभरपूर गर्दी असणारं स्वीट टोमॅटो अगदी मुलांच्याही खूप आवडीचं होतं.

इकडच्या स्थानिक विविध प्रकारच्या बेरी, हिरवी, पिवळी सफरचंद, पेर, परसिमोन (उगम जपान) ही फळं, Quinoa, सोयाबीनचे दाणे, ऍस्परॅगस, सेलरी, लेट्युस ह्या भाज्या, त्या बनविण्याच्या वेगळ्या पद्धती, त्या खाण्याचे वेगळे portions अशा बऱ्याच नवीन गोष्टी आमच्या आधीच्या भारतीय पद्धतीच्या जेवणात, आहारात समाविष्ट झाल्या आणि आमचे खाद्य जीवन अजूनच समृद्ध झाले.
खादाडी ह्या अत्यंत लाडक्या विषयावर लेख लिहायला घेतल्यावर थांबणे कठीण होऊन बसले आणि तो फुटलोन्ग सब पेक्षाही खूप मोठा झालाय तर आता थांबते.
ही खाऊगल्ली तुम्हांला आवडली असेल तर जरूर कळवा!
#americadiary
Disclaimer - माझे वास्तव्य असलेल्या आणि थोडेफार स्थळ दर्शन केलेल्या जागेवरील अनुभवांवरून लिहिलेला ललित लेख आहे.

New South Korean restaurant
New South Korean restaurant alert in Bandra West guys. All the Ramen and Bibimbap you can eat.
नवीन Submitted by अश्विनीमामी on 31 May, 2023 - 21:00 >>>>>मुलींना सांगते खुश होतील कोरियन भूत आहे डोक्यात... हा हा हा
wow !! मस्त चविष्ट आणि
wow !! मस्त चविष्ट आणि तोंपासू असा लेख.. अमेरिकेत म्हणे mc D बर्गर आणि subway हे drive in /take away सदरात मोडते आणि याउलट
इथे (जर्मनीत) mc D आणि सबवे मध्ये आत आरामात बसून खाता येईल अशी ऐसपैस जागा असते ..आणि ऐन भुकेच्या वेळी म्हणजे इथे साधारण दुपारी १२ ते २ किंवा ऐवे ६ ते ७ mc D अगदी पुरेपूर भरून ओसंडून वहात असते आणि भली मोठी line असते प्रत्येक mc D /subway ला drive in ची सोय असतेच असे नाही अगदी highway touch असेल तर असते
इथे (जर्मनीत) mc D आणि सबवे
इथे (जर्मनीत) mc D आणि सबवे मध्ये आत आरामात बसून खाता येईल अशी ऐसपैस जागा असते ..>> इथे पण. पहिले मुलुंडात तीन मॅक डी होती.
एक डेवलपमेंटला गेली बिल्डिंग. स्टेशन जवळची, निर्मल मॉलच बंद पडला तिथले गेले. आता आर मॉल मधे मॅक डी व सबवे आहेत तिथे बसायला जागा आहे. रेडिट वर एक पब्लिक फ्रीक आउट सब रेडिट आहे तिथे अमेरिकेतील कस्टमरांचे ड्राइव इन मधील वागणे बघून लैच करमणूक होते. अग्गदी बूड हल्वत नाहीत. मग साइज वाढतो. पण तसे म्हणायचे नाही. गोळी घातली तर काय करा?!
सबवे नसते ड्राइव्ह-इन
सबवे नसते ड्राइव्ह-इन (ड्राइव्ह थ्रू) इथे. कारण मेनू मधून एक दोन आयटेम्स निवडले असे होत नाही. एकेक पदार्थ आपल्यासमोर अॅड करून ते बनवतात. त्यामुळे ते ड्राइव्ह थ्रूला सुटेबल नाही.
बाकी मॅक्डोनाल्ड व इतर बरीच आहेत ड्राइव्ह थ्रू. पण मॅक्डी मधे आतही भरपूर जागा असते. सबवे मधे सहसा नसते. काही अपवाद असतात. फ्रॅन्चायजी स्टोअर मधला जो गाळा असतो त्यात किती जागा आहे त्यावर असावे. मी काही ठिकाणी प्रॉपर सिट-इन बघितलेले आहे. सहसा हायवेजवळचे.
मॅकडी चे अमेरिकेत टार्गेट ग्राहक हे वर्किंग/ब्लू कॉलर क्लास आहे. ती पार्टी प्लेस नसते. अगदी स्वस्त बीफ व चिकन वाले बर्गर्स आणि सॅण्डविच. हेच मॅकडी मी लंडन व भारतात वेगळ्या क्लास करता टार्गेट केलेले पाहिले आहे. बर्यापैकी पॉश. पुण्यात मी आवडीने खाल्ले आहे. इथे इतक्या वर्षात कधीतरी एक ते मॅकचिकन सॅण्डविच सोडले तर दुसरे काही खाल्ल्याचे आठवत नाही. सबवे मात्र अनेकदा. भारतात लोक सबवे का खातात मला अजूनही कळलेले नाही
इथे व्हेज ऑप्शन म्हणून लोक सहसा जातात. तेथे व्हेज आणि सॅण्डविच - दोन्हीचे असंख्य पर्याय असताना सबवेचे काय कौतुक माहीत नाही. एकदा तेथील टेस्टकरता बनवलेले आहे काय खाउन बघायला पाहिजे.
आपल्याकडे जनरल चर्चेत्/लेखांत "पिझ्झा आणि बर्गर" असा जोडीने का उल्लेख केला जातो कोणास ठाउक. त्यांचा एकमेकांशी काहीच संबंध नाही. सहसा एकत्र खाल्ले जात नाहीत. कोठेही एकाच ठिकाणी मिळत नाहीत. बर्गर हा उभ्या उभ्या, कसाही, कोठेही खातात. पिझा सहसा घरी आणून बसून खातात.
माझ्या खवय्या मुलांनी
माझ्या मुलांनी भारतातील मॅक्डीचं चिकन जास्त चवदार असतं (हे फ्लेवर्सबद्दल नव्हे - मुदलात मीटच) असा निर्वाळा दिला गेल्या भारतवारीत.
>>> "पिझ्झा आणि बर्गर" असा जोडीने का उल्लेख केला जातो कोणास ठाउक
ते तुम्ही पूरब से पश्चिमचे झाल्याचं सर्वमान्य प्रतीक आहे! पिझ्झासुद्धा नव्हे, पिझ्झे! पिझ्झे आणि बर्गर खाऊन तुमच्या मुलांची वजनं वाढणार, मेंदूवरच्या वळ्या कमी होणार, केस त्या एका विचित्र पिवळ्या रंगाच्या विग्जमध्ये परिवर्तित होणार आणि ती कमी कपड्यांतल्या मडमांच्या प्रेमात पडून आईबापाला आणि स्वदेशाला विसरणार - असा तो एक व्हॉट्सअॅप ज्येनांचा आवडता ट्रोप आहे.
हो. आणि कसलीकसली "तत्त्वे" -
" पिझ्झे आणि बर्गर खाऊन
" पिझ्झे आणि बर्गर खाऊन तुमच्या मुलांची वजनं वाढणार, मेंदूवरच्या वळ्या कमी होणार, केस त्या एका विचित्र पिवळ्या रंगाच्या विग्जमध्ये परिवर्तित होणार आणि ती कमी कपड्यांतल्या मडमांच्या प्रेमात पडून आईबापाला आणि स्वदेशाला विसरणार " -
"कसलीकसली "तत्त्वे" - जी
"कसलीकसली "तत्त्वे" - जी "फक्त भारतीय सात्विक पदार्थांत असतात" - रीड 'कार्बोलोडिंग
>>> त्यामुळे भारतात
>>> त्यामुळे भारतात घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे.

‘भारतीय सात्त्विक’ ही द्विरुक्ती झाली, बरं का!
Submitted by फारएण्ड on 1
Submitted by फारएण्ड on 1 June, 2023 - 09:54>>> फा तुझ्या आख्या पोस्टला मोदकच मोदकच!!
भारतातल्या मॅकडीची क्वालिटी उत्तम आहे मी मॅक आलू टिकी खाल्ली होती, तिकडे जावुन बर्गर खाणे हे मनाला पटतच नव्हते त्यामुळे आम्ही त्यानी मॅकडीचा विषय काढला की गाडी वळावुन पाव-भाजि,पापु कडे नेत होतो पण भारतातल्या मन्डळिना आमच्याकडे पण मॅकडोनाल्ड झालय हे दाखवायच असल्याने जावच लागल.
पोराना अर्थातच प्रचन्ड आवडल.
इकडे सदर्न कॅलीला चिकफिले आणी इन एण्ड आउटच फार कौतुक आहे.
पण भारतातल्या मन्डळिना
पण भारतातल्या मन्डळिना आमच्याकडे पण मॅकडोनाल्ड झालय हे दाखवायच असल्याने जावच लागल.
पोराना अर्थातच प्रचन्ड आवडल.>> दहा बारा वर्शापेक्षा जास्त झाले की मॅक डी सबवे येउन. नाविन्या पेक्षा एक सोय व स्वस्तात चविष्ट म्हणून सर्वांना आवडते. भारतातले मॅकडीचे बेस्ट पदार्थः मॅक स्पाइसी चिकन बर्गर, मॅक व्हेजी / मॅक व्हेजी विथ चीज. फ्राइज ला तोडच नाही. फ्राइज वर एक चीज सॉस घालुन येते तेही मस्त लागते. कोक. ह्याला पण पर्याय नाही. ब्रेफा आयटम मध्ये एग मॅक मफिन हे एकावेळी दोन खावे लागतात कारण साइजने बर्गर पेक्षा अर्धे असतात. ह्यात एक चीज ची स्लाइस घालुन पण येते. ह्यातच एक चिकन सॉसेज पण आयटेम आहे. प्लस होम डिलिव्हरी अगदी अर्ध्या तासात येते. त्यामु ळे फार थकल्यावर किंवा बाहेरुन/ कामावरुन उशीरा आल्यावर एनर्जी नस्ते तेव्ह्वा उपयोगी पडते. गोडात स्वस्तातले सॉफ्टी आइसक्रीम व मॅक फ्लरी, ओरिओ क्रश केलेले मॅक फ्लरी बेस्ट. आमच्या ऑफिसच्या शेजारच्या मॉल मध्ये आहे मॅक डी व सबवे, बेसमेंटलाच आइसक्रीम मिळते मी कधी मधी नुसते आइसक्रीमच घेते. अगदी बेसिक मेन्यू आहे. पनीर व मॅक आलू टिक्की च्या वाट्याला जात नाही.
मॅकडी २००३ च्या आधी होते
मॅकडी २००३ च्या आधी होते जेव्हा मी भारतात होते तेव्हा.
सब मधे म्हटलेत तर अनेक
सब मधे म्हटलेत तर अनेक प्रकारचे ब्रेड्स व सॉसेस चे आकर्शण आहे. भारतीय जेवण फार मसालेदार तेलकट हेवी नको असल्यास एखादा सब बरा पडतो. मिंट मेऑनिज फे वरिट. सर्व व्हेज ऑपशनस व सलामी/ टर्की सँडविच घरी फेवरिट आहेत.
>>>>>>मिंट मेऑनिज फे वरिट.
>>>>>>मिंट मेऑनिज फे वरिट. सर्व व्हेज ऑपशनस व सलामी/ टर्की सँडविच घरी फेवरिट आहेत.
आमच्याकडेही मेयो + सर्व चकत्या ऑप्शन्स (टर्की, सलामी, हॅम)
पिझा मध्ये पिझा एक्स्प्रेस
पिझा मध्ये पिझा एक्स्प्रेस इथे अपर एंड चे रेस्टॉ आहे. इथे जर गेलो तर ऑर्डर देउन मग डो बॉल्स मागव्तो. गरम गरम डो बॉल्स बरोबर ग्रीन पेस्तो गार्लिक बटर व लाल लसूण चटनी भारी लागते.
येथील पोलोफोर्झा चिकन व पेपरोनी पिझा आमचे फेवरिट आहेत. वरोन घालायला तेले पण मिळ तात रेस्तो मध्ये. विविआना व पवई येथून घरी पण मागवता येते.
इथे पास्ता पण छान मिळतो व हालुमी चीज चे सलाड पण छान असते. पोटभरीचे आहे. सर्व प्रकारची कॉकटेल्स व कोफी, प्लस मिंट चॉकोलेट आइसक्रीम, चीजकेक्स मिळतात. एकूण ट्रीट.
ह्याहून जरा स्वस्त पिझा ह ट.
ह्याहून जरा स्वस्त पिझा ह ट. इथे पोरे लहान शाळॅमागअसताना जास्त जायचो.
व सर्वात चीप व बेस्ट डॉमिनोज. अर्ध्या तासात डिलिव्हरी. मी जास्त करुन स्ट्फ गार्लिक ब्रेड, फेंटा व सेव्हन अप. चिकन बोनले स कटलेट सारखे मिळते ते मागवते. चिकन कुत्र्याला. मार्गारिटा पिझा पण बरा अस्तो. व फार्म्र्स चॉइस का कायतो व्हेज पिझ्हा. एक अमेरिकन चीज व कॉर्न पिझा पण् येतो. कधीमधीच.
मॅकडी व के एफ सीच्या नगेट्स चिकन पॉपकॉर्न पण फेवरिट आहेत.
बाकी प्रत्येक सबर्ब मध्ये लोकल पिझा वाले भरपूर आहेत.
मॅकडी २००३ च्या आधी होते
मॅकडी २००३ च्या आधी होते जेव्हा मी भारतात होते तेव्हा.>>>
नवी मुंबईत १९९६ ला बहुदा आमच्या जवळच पहिलं झालेल. त्यावेळी आम्हाला त्याच कोण अप्रूप होत. कॉलेजमधून बस वगैरे घेऊन वाशीला गेलो होतो, अजून आठवतंय.
दोन बन्स च्या मध्ये एक टिक्की, मेयो , दोन टोमॅटोच्या चकत्या आणि एक lettuce च पण मला वाटत तेव्हा काही १२ रु ना मिळायचं
आणि कुंज विहारी चा दोन हातात न मावणारा वडापाव, ३-४ चटण्यांसह ५रु ना.
पण त्या वेळी mcD च कोण कौतुक.
आता त्याच कौतुकाने मुलं बोबा टी / स्टार बक्स ची भरपूर क्रिम आणि बर्फ घातलेली ड्रिंक्स साठी जीव टाकतात ते काहीस असच असावं असं वाटत.
एका ग्लासात, अर्धा ग्लास बर्फ
एका ग्लासात, अर्धा ग्लास बर्फ (किंमत जवळ जवळ ०), उरलेल्या अर्ध्यात क्रीम, आणि मग राहिलेल्या २५% त जे काय फ्लेवर च ड्रिंक असत ते. त्यासाठी टॅक्सेस पकडून ६-७$ +टीप
मला तर लूट वाटते
अजून कोणाला असं वाटत का ? असेल तर नक्की सांगा. मी एकटीच नाही याच समाधान
मी मध्यंतरी न्यूयॉर्कात एका
मी मध्यंतरी न्यूयॉर्कात एका मिशेलिन स्टार रेस्टॉरंटात गेले होते. तिकडे आम्ही वॉटरमेलन ज्यूस मागवलं. त्या ज्यूसमध्ये ३/४ पेक्षाही जास्त बरोह आणि उरलेलं वॉटरमेलन. सर्वरला सांगितलं तर प्रामाणिकपणे म्हणाला की असं केलं नाही तर वॉटरमेलन खूप लागेल ना!
तिकडे आम्ही वॉटरमेलन ज्यूस
तिकडे आम्ही वॉटरमेलन ज्यूस मागवलं. त्या ज्यूसमध्ये ३/४ पेक्षाही जास्त बरोह आणि उरलेलं वॉटरमेलन. सर्वरला सांगितलं तर प्रामाणिकपणे म्हणाला की असं केलं नाही तर वॉटरमेलन खूप लागेल ना!>>>

न्यूयॉर्कात एका मिशेलिन स्टार रेस्टॉरंटात गेले होते>>>>
मी माझ्या एका NYC च्या मैत्रिणीकडून बरच कौतुक ऐकलंय.
म्हणजे फक्त ऐकून आहे ह्याविषयी.
इकडे बे एरीयातली (अत्यंत तुरळक असलेली ) मि. स्टा. रेस्टॉरंट्स तिने शोधून काढली म्हणून आम्हाला कळली.
सायो, तुम्ही अजून तुमचे मि. स्टा. रे अनुभव सांगितले तर मजा येईल.
माझं एक निरीक्षण
पण NYC मध्ये लोकांचं राहणीमान फारच लक्सरीअस, ब्रँडेड वस्तुंनी भरलेलं असतं. त्यामानाने इकडे लोक सिम्पल राहतात. कॉस्टको / टार्गेट म्हणजेच value फॉर money वाले ऑप्शन्स जनरली वापरतात.
अनालॉजि :
थोडं जनरलायझेशन होतंय तरी
NYC - Delhi सारखं सगळं कस एकदम पॉश
मुंबई - मध्यम वर्गीय, काम करणारी लोक
लहानपणी ऊसाचा रस प्यायला गेलो
लहानपणी ऊसाचा रस प्यायला गेलो की आई म्हणायची, बर्फ नको , का तर रस कमी मिळतो. >>> वंशपरंपरा ह्यालाच म्हणतात ?

पण आजकाल बऱ्याच रेस्टॉरंट मध्ये फ्री रिफील देतात, त्यामुळे ही युक्ती वाया जाते.
पण मग, हळूच एक ड्रिंक घेऊन सगळ्यांच्या ग्लासात थोडं थोडं ओतून मग फ्री रिफील घेत राहावे आणि नवी परंपरा सुरु करावी का? अस राहून राहून ऑर्डर केलेल्या डिश येईपर्यंत वाटत राहतं. पण procastination चे गुरु असल्यामुळे मनात आलेला विचार कृतीत यायला काही वर्ष जातात.
इकडे योगर्ट लँड मध्ये छोटे छोटे कप घेऊन योगर्ट चाखू शकतो.
मी कितीदा तरी एखाद्या पाल्याबरोबर येऊन आई किंवा आजीला ३-४ सॅम्पल्स घेऊन मग स्वतः साठी काहीच न घेतलेले बघितलंय. त्यामुळे "पैसे वाचवायचे " हे ब्रीद वाक्य कातडीचा रंग, देशांच्या सीमा ह्यापलिकडचा असावा.
छन्दिफन्दी, अनुभव
छन्दिफन्दी, अनुभव लिहिण्याइतकी गेलेले नाही मिशलिन स्टार रेस्टॉत. हे वर म्हटलेलं तसं असलं तरी ह्याच्या किंमती अजिबात मिशलिन स्टार नव्हत्या. मी वेजिटेरियन असल्यामुळे मला खूप चॉईस नव्हता आणि ऑर्डर केलेलं मला अजिबात आवडलं नाही.
भारतीय जेवण फार मसालेदार
भारतीय जेवण फार मसालेदार तेलकट हेवी नको असल्यास एखादा सब बरा पडतो. >>> धन्यवाद. अमा. पुढच्या वेळी ट्राय करेन. आपल्याकडेही जर लोकांना एकदम मसालेदार्/झणझणीत टाइप चवीचा कंटाळा आलेला असेल तर हे आवडत असेल. पण ही अॅक्वायर्ड टेस्ट असावी.
सर्वरला सांगितलं तर प्रामाणिकपणे म्हणाला की असं केलं नाही तर वॉटरमेलन खूप लागेल ना! >>>
होल फुड्स मधले अॅस्पॅरॅगस वॉटर आठवले
बे एरियात गेल्या काही वर्षात बोबा टी/बबल टी, आणि फ्रोयो विथ टॉपिंग्ज याचे पेव फुटले. त्या आधी बोबा टी फक्त एशियन रेस्टॉ मधे मिळे. नंतर त्याचीच दुकाने झाली. आता अमेरिकेत सर्वत्र पसरली आहेत. मिडल-हाय स्कूल आणि कॉलेज क्राउड मधे प्रचंड लोकप्रिय आहेत.
भारतामधुन आलेले असताना, सॉफ्ट
भारतामधुन आलेले असताना, सॉफ्ट ड्रिंक व्हेन्डिंग मशिनमधुन बर्फ घ्यायचेच नाही. फक्त सोडा. का तर ड्रिंक कमी येइल.
आता मात्र ३/४ बर्फ व उरलेला सोडा लागतो. ते डायलूटच मस्त लागतं आता.
कालच insta वर पाहिले की Tim
कालच insta वर पाहिले की Tim Hortons coffee ne भारतात outlet उघडलय!
सांगायचा मुद्दा असा की भारतात सारे ग्लोबल ब्रॅण्ड्स कदाचित जास्त easily available आहेत अमेरिके पेक्षा!
कॅनडा मध्ये गेल्यावर ही कॉफी आणि त्याबरोबर त्यांचे donut balls वगैरे खूप आवडलेले. तिथून न्यू यॉर्क मध्ये पुढला ट्रीप चा टप्पा होता तिथे पण आवर्जून ही कॉफी मिळते का ते पाहिले. आणि एका गल्लीत सापडले दुकान पण अगदीच बकवास निघाली कॉफी तिथे. इथे northern कॅलिफोर्निया मध्ये नाहीच सापडले दुकान यांचे. कॅनडा मधल्या चवीसाठी तळमळत Amazon varun पाकीट मागवले तरी ती चव आलीच नाही. Maybe कॅनडातल्या पाण्याची चव लागली असेल "त्या" कॉफी ला.. आता Banff la जायचे आहे तेव्हा टीम Hortons che outlet कुठे असेल त्याचा शोध आधी घ्यायचा हे ठरवून ठेवले आहे
हे सगळे आठवले ते insta che reel बघून. म्हटलं कॅनडा ट्रीप पेक्षा इंडिया ट्रीप आधी होईल तेव्हा टीम Hortons मिळण्याचे चान्स जास्त आहेत
इथे northern कॅलिफोर्निया
इथे northern कॅलिफोर्निया मध्ये नाहीच सापडले दुकान यांचे. >>>
इथे ग्रेट लेक्स एरियामध्ये भरपूर टीम हॉर्टन चे शॉप आहेत. कधी मिशिगन, ओहायो किंवा इंडियानात आलात तर ट्राय करा.
अच्छा , धन्यवाद! इथेच तेव्हा
अच्छा , धन्यवाद! इथेच तेव्हा विचारले असते तर बरे झाले असते! इथे नमूद करू इच्छिते की ही घटना 10 वर्षापूर्वी घडली आहे
मस्त मस्त खाद्यभ्रमंती, अजून
मस्त मस्त खाद्यभ्रमंती, अजून लिहिलंत तरी चालेल.
प्रतिसाद वाचायचे आहेत अजून, ते ही इंटरेस्टिंग दिसतायेत.
बे एरिया मध्ये मला वाटतं एक
बे एरिया मध्ये मला वाटतं एक दोन स्केटिंग अरीना मध्ये टीमी आहे. तिकडे असताना जाऊन बघावं इतका काही फॅन नाही, त्यामुळे कधी गेलो नाही. अजून आहे का नाही कल्पना नाही.
ट्राय स्टेट मध्येही बऱ्याच ठिकाणी आहे टिमी.
बेकरीत peets कॉफी बेस्ट होतं. ते कॅनडात नाही म्हणून त्याला मिस करतो इथे.
धन्यवाद अन्जु!
धन्यवाद अन्जु!
Pages