'ओव्हररेटेड' - 'अंडररेटेड'

Submitted by सामो on 22 May, 2023 - 13:49

चांगुलपणा, बचतीची सवय, करुणा, उत्साही व्यक्तीमत्व, उद्योजकता असे नानाविध गुण असतात, पैकी तुमच्या मते कोणता गुण हा 'ओव्हर रेटेड' आहे आणि कोणता गुण हा 'अंडर रेटेड' आहे. आणि का? तेव्हा एकोळी उत्तर नको. 'का' या प्रश्नाचे सविस्तर उत्तर द्यावे.

माझ्या मते 'सातत्य' = कन्सिस्टन्सी हा प्रचंड अंडररेटेड गुण आहे. उदा. - मैत्री टिकण्याकरता, अनेक प्रकारच्या गुणांचे खरे तर सातत्य लागते. तुम्ही दुसर्‍या व्यक्तीस सपोर्ट करणे, धीराने म्हणजे पेशंटली त्या व्यक्तीचे गुणावगुण सहन करणे. त्या व्यक्तीला काय हवे ते त्या क्षणी ओळखून त्याप्रमाणे सल्ला देणे किंवा क्रिटिसाइज करणे. या सगळ्यात मुख्य म्हणजे सातत्य हवे. हे सातत्य तेव्हा येते जेव्हा, ते नाते निभावण्याची इच्छा असेल.
जॉबमध्येही, एक प्रॉजेक्ट मारे वेळेच्या आधी डिलीव्हर केले आणि दुसर्‍या प्रॉजेक्टला हयगय झाली तर कौतुक होणच शक्य नाही ना. कौतुक तर सोडाच पण तुमच्यावर कोणी विसंबूनही राहू शकणार नाही.

आता 'ओव्हररेटेड' गुण - मला वाटतं स्वकर्तुत्वावर न मिळालेले, वडिलोपार्जित, जेनेटिकली आलेले गुण हे ओव्हररेटेड. उदा - हुषारी. हां मूळात आपोआप आलेल्या हुषारीला तुम्ही धार लावलीत तर ते कर्तुत्व आहे आणि नक्कीच कौतुकास्पद आहे परंतु - वर्ण, जात, जात्याच बुद्धी, पिढ्यान पिढ्या चालत आलेली पारंपारिक कुशलता - या काही गोष्टी मला ओव्हररेटेड वाटतात. अर्थात सर्वांना वाटाव्यात असेही नाही.

ओव्हररेटेड - मराठी शब्द?
अंडररेटेड - मराठी शब्द? (अतिपरिचयात अवज्ञा?)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Underrated कमी/तुच्छ लेखणे >> अगदी असा अर्थ होत नाही. उदाहरणार्थ एखादा underrated अभिनेता आहे म्हणजे काही त्याला कमी किंवा तुच्छ लेखलं गेलं आहे असं नाही, तर त्याचे गुण अजून लोकांच्या नजरेत फारसे आलेले नाहीयेत किंवा त्याला अजून हवी तेवढी प्रसिद्धी मिळाली नाहीये असा अर्थ होतो.

हपा
मला वाटतं अनिरुद्ध खूप जवळ आहे...
>>लोकांच्या नजरेत फारसे आलेले नाहीयेत किंवा त्याला अजून हवी तेवढी प्रसिद्धी मिळाली नाहीये>>
मला वाटतं rating नेहमी माहित असलेल्या गोष्टीचं होतं ते करताना human element किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल असलेलं पूर्वग्रहदूषित मतही लक्षात घ्यावं. दोन माणसं सारखी नसतात. तुम्हाला जे आवडलं ते मला आवडेलच असं नाही मग ते माणूस, खाद्य, कला काहीही असो. माझ्यासाठी जे rational ते तुमच्यासाठी irrational असू शकते....
Happy
कदाचित माझं म्हणणं चुकीचं असू शकतं.

हरचंद पालव
आपला वरील प्रतिसाद वाचून
बेकरार दिलको करार आ गया.

"त्याग" मला खूपच overrated वाटतो.
+१
तारुण्यात जोश मध्ये येऊन "त्याग" म्हणून संन्यासी झालेले व नंतर आपल्या त्यागाची समाजाला जाणीवच नाही वगैरे चिडचिड झालेले लोक पहाण्यात आहेत.

काळा/ सावळा रंग - अंडररेटेड
>>>>

मला सावळी / डार्क मुलेच आवडतात असे म्हणायचे एक फॅड आलेय हल्ली मुलीँमध्ये. खरेच तशीच आवडतात की नाही हे खरे खोटे देव जाणे... पण ऐकायला छान वाटते Happy

बऱ्याच श्रवणीय गाण्यांच्या यशामध्ये गीतकाराचे योगदान हे अंडररेटेड असते, असे मला वाटते. तुलनेने संगीतकाराला व गायकाला जास्त महत्व दिले जाते. त्याचे दुष्परिणाम म्हणजे आजकाल नवीन श्रवणीय गाणी (म्हणजे ज्यामधील शब्द खूप सुंदर आहेत) कमी निर्माण होत आहेत. किती लहान मुले असे म्हणतात कि मला मोठा होऊन गीतकार व्हायचे आहे?

>>>>>किती लहान मुले असे म्हणतात कि मला मोठा होऊन गीतकार व्हायचे आहे?
काव्यगुण अंगभूत असतो. संगीत मात्र शिकता येते
हा गैरसमजही कारणीभूत असावा.

Celebrities आणि तो शब्दचं >>>>> overrated
एखाद्या विषयातले तज्ञ, अभ्यासक, लेखक, समाजसेवक, खेळाडू ( क्रिकेट सोडून) >>>> underrated

आता जावई सूनाक uk चा pm झाल्या वर
सुधा मूर्तीनची सो कॉल्ड सेलिब्रिटी मध्ये bollywoodkarani गणना केल्याचं दिसतय. कपिल शर्माच्या शो वर ( टीझर) सुधा मूर्तींना बघितलं म्हणू हा माझा एक समज.

प्रत्यक्षात त्या ह्या सगळ्यांपेक्षा बुद्धीने, कार्याने, विचाराने, कर्तुत्व, झालाच तर संपत्तीने फार उच्च ( त्यावरील इतर पहुण्यांपेलशही) आहेत.

आता जावई सूनाक uk चा pm झाल्या वर
सुधा मूर्तीनची सो कॉल्ड सेलिब्रिटी मध्ये bollywoodkarani गणना केल्याचं दिसतय. कपिल शर्माच्या शो वर ( टीझर) सुधा मूर्तींना बघितलं म्हणू हा माझा एक समज.

प्रत्यक्षात त्या ह्या सगळ्यांपेक्षा बुद्धीने, कार्याने, विचाराने, कर्तुत्व, झालाच तर संपत्तीने फार उच्च ( त्यावरील इतर पहुण्यांपेलशही) आहेत.

गॉड 'ओव्हररेटेड' का 'अंडररेटेड'?
>>>

गॉड ओवररेटेड
श्रद्धा अंडररेटेड

कारण मुळात देव असे काही नसते. सगळे बळ श्रद्धा देते.

लोकांना वाटते जगात देव आहे म्हणून मनात श्रद्धा आहे
प्रत्यक्षात मनात श्रद्धा आहे म्हणून जगात देव आहे.

छान धागा, प्रतिसाद पण वाचण्या लायक.
वर्ण, जात, वडीलो पार्जित संपत्ती- ओव्हर रेटेड ,...अगदी बरोबर सामो.

मला वाटते- विनोद बुद्धी असणे हे अंडररेटेड आहे. अगदी कमी लोकांत (फारेंड, अनू, अस्मिता) अशा लोकांत हा गुण असतो! मल दुर्मिळ वाटतो हा गुण.

मला ड्रेसिंग सेन्स असणे ओव्हररेटेड वाटते. असतो एखाद्या ला उपजतच. पण त्याचे वारेमाप कौतुक होताना दिसते.
तसच सौंदर्य पण ओव्हर रेटेड.

मला चहा आणि कॉफी पण ओव्हररेटेड वाटतात. फार काही उपयोग नसताना.
बिचारे लिंबू सरबत खूप अंडररेटेड आहे. बहुगुणी असूनही.

कोणता गुण हा 'ओव्हर रेटेड' आहे आणि कोणता गुण हा 'अंडर रेटेड' आहे. आणि का? तेव्हा एकोळी उत्तर नको. 'का' या प्रश्नाचे सविस्तर उत्तर द्यावे.....

उप्स ! हे नाही केले Sad

तसच सौंदर्य पण ओव्हर रेटेड. >>>>> आशु, यात त्या व्यक्तीचं स्वतःचं कर्तुत्व काहीच नाही. ही निसर्गाची देणगी किंवा आनुवंशिकता असते, त्यामुळे overrated, हे मान्य.
पण उत्तम ड्रेसिंग सेन्स असणे ओव्हररेटेड का बरं? उत्तम अभिरुची आणि कलात्मक दृष्टिकोन असणं महत्त्वाचं असतं. आणि तो शिकावा, समजुन घ्यावा लागतो. उत्तम dressing साठी योग्य कपड्यांची खरेदी, suitable accessories, trials, fittings, स्वतःचं व्यक्तिमत्त्व आणि शरीर त्या कपडे घालण्या योग्य असावेत यासाठी कष्ट घ्यावे लागतात.

मीरा..मान्य आहे, पण मला तसे वाटते खरे.
करियर च्या दृष्टिने नाही तर सर्व सामान्यांच्या नजरेतून स्वतःचा सेन्स स्वतः लाच भारी वाटत असतो Happy
हलके घ्या Happy

तसच सौंदर्य पण ओव्हर रेटेड. >>>>>ह्यात रेटिंग करणारे आपण कोण? मान्य आहे कि ती दैवी देणगी आहे. आनुवंशिक असेल. पण
A thing of beauty is joy for ever.
ओवररेटेड म्हणणे मला थोडी जेलसी वाटते. सरतेशेवटी सर्व दैवाची/देवाची देणगी आहे. नायगरा हिमालय आणि अशी निसर्ग रमणीय स्थळे ओवररेटेड आहेत असे म्हणण्यासारखे आहे.

मी कोकणातली आहे , देवगडचीच आहे पण तरी ही उकडीचे मोदक आणि देवगड हापूस आंबे हल्ली फार म्हणजे फारच ओव्हरेटेड झालेत अस मला वाटत. सगळे अगदी फारच हापूस हापूस करतात. मला स्वतःला नीलम तोतापुरी आंबे हापूस पेक्षा ही आवडतात म्हणून वाटत का तसं की हापूस अतिपरिचयात झालं असेल माझ्या बाबतीत ?

आशू होय ड्रेसिंग सेन्स चे वारेमाप कौतुक होते. मलाही ते अतिच वाटते. असेल अमक्याला ड्रेसिंग सेन्स मग करा ना ऐष. मला माझी आवडच प्यारी टाइप्स Happy आणि तसही हाऊ यु कॅरी त्याला ९९% महत्व असते. वेगवेगळ्या डिझाइनर्स्ना वेगवेगळे पोट्रे करताना पाहीलेले आहे. तेव्हा ठराविकच असं काही फॅशनमध्ये नसतं.

Pages